प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

राजपुताना -  हिंदुस्थानांतील उत्तार अक्षांश २३ ३' व ३० १२', आणि पूर्व रेखांश ६९ ३०' व ७८ १७' यांच्या दरम्यान वसलेला, १३०५६२ चौरस मैल क्षेत्रफळाचा आणि ९८६०७९४ लोकसंख्ये(१९२१) चा बहुतेक गोल आकाराचा एक प्रांत. यांत १४ संस्थानें, २ जहागिरी व अजमेरमेरवाडा नांवाचा एक लहानसा खालसांतील प्रांत आहे. राजपुतान्याच्या पश्चिमेस सिंध; वायव्येस बहावलपूर संस्थान; उत्तरेस व ईशान्येस पंजाब; पूर्वेस संयुक्तप्रांत व ग्वाल्हेर संस्थान; आणि दक्षिणेस मध्यहिंदुस्थान आहे. संस्थानामध्यें १७ रजपूत, २ जाट (भरतपूर, धोलपूर) व १ मुसुलमान (टोंक) जातीची संस्थानें आहेत. या संस्थानांवर देखरेख ठेवणें व त्यांचा आणि हिंदुस्थानसरकारचा परस्पर संबंध राखणें हीं कामें येथील गव्हर्नर ज. च्या मुख्य एजंटाकडे असतात. तोच अजमेर-मेरवाडयाचाहि कारभार पहातो. याच्या हाताखालीं तीन राजकीय खात्याचे व एक कारभाराचा असे तीन मदतगार एजंट आहेत व तीन रेसिंडेंट आहेत. कारभाराच्या सोयीसाठीं संस्थानांचे गट पाडले आहेत. बिकानेर, शिरोही व झालवाड हीं संस्थानें एजंटाच्या खास अखत्याराखालीं आहेत; पूर्वेकडील एजन्सींत (त्याचा कारभार साध्या पो. एजंटाकडे असतो) भरतपूर, धोलपूर, करौली व अलवार हीं येतात; इरावती-टोंक एजन्सींत (कारभारी साधा पो. एजंट) बुंदी, टोंक व शहापूर हीं येतात; जयपूर रेसिडेन्सींत (कारभारी जयपूरचा रेसिडेंट) जयपूर, किसन गड व लवा येतात. मेवाड एजन्सींत (कारभारी साधा पो. एजंट) बांसवाडा, डुंगरपूर, प्रतापगड व खुशालगड हीं येतात; पश्चिमराजपुताना एजन्सींत (कारभारी जोधपूरचा रेसिडेंट) जोधपूर व जेसलमीर हीं येतात आणि कोटाझालावाड एजन्सींत कोटा हे संस्थान येतें. साधारणपणें उत्तरदक्षिण पसरलेल्या अरवली या पर्वतानें राजपुतान्याचे पूर्व व पश्चिमराजपुताना असे दोन भाग पडतात. अरवलीचा वायव्येकडील सर्व प्रांत रेताड, निर्जल व नापीक आहे, परंतु सांप्रत हळू हळू तो सुधरत आहे. पाण्याच्या टंचाईनें उन्हाळ्यांत लोक परागंदा होतात. ईशान्येकडील भाग मात्र बराच पिकाऊ आहे. सर्वांत सुपीक प्रांत आग्नेयीकडील अरवलीचें पठार व खोरीं होत; या भागांत अरवलीचे निरनिराळे फांटे व पुष्कळशा बारीकसारीक नद्या वाहातात. अरवलीचें शिखर अबू (५६५० फूट) होय. कच्छाच्या आखातापासून लुनी नदीपर्यंत जंगल पसरलेलें आहे. लुनी, चंबळ, मही, बनास, बाणगंगा या मुख्य नद्या हेत. राजपुतान्यांतील एकंदर १५७६ मैलांपैकीं ७३९ मैल आगगाडीचा रस्ता इंग्रजसरकारचा आहे. संस्थानी फांटयांत जोधूपर बिकानेर रेल्वे ही प्रमुख आहे; मारवाड जंक्शनपासून बिकानेर ते हैद्राबाद (सिंध) असा हा फांटा आहे. लोकसंख्येपैकीं शेंकडा ५० लोक शेतकरी, २० लोक कारागीर, ५ लोक मजुर व नोकर आणि २॥ लोक व्यापारी आहेत. मुख्य भाषा राजस्थानी (हिच्यांत मारवाडी, जयपुरी, मेवाती व माळवी या पोटभाषा) असून, ब्राह्मण, जाट, महाजन (बनिया) चांभार, रजपूत (शेंकडा सहा), मीना (यांच्यांत मिश्र जाती आहेत), गुजर, भिल्ल, माळी व बलाई या जाती मुख्य ओत. त्यांतहि रजपूत जात ही राजकीय वर्चस्वाची असल्यानें तिच्या ताब्यांत पुष्कळशी जमीन (जमीनदार अथवा कुळें म्हणून) आहे. वंशांची शुद्धता, राजे लोकांशी नातेवाईकपणा, थोडीफार सत्ता इत्यादि कारणांमुळें हिंदुस्थानांत रजपुतांनां बराच मान असतो. त्यामुळें हिंदुस्थानांतील बहुतेक (ब्राह्मणाखेरीज इतर) जाती आपला संबंध किंव मूळ कोणत्याना कोणत्या प्रकारानें रजपुतांशीं जोडण्याचा प्रयत्‍न करतात. हिदूंची संख्या शेंकडा ८३ आहे.

सांबर हें मुख्य सरोवर खार्‍या पाण्याचें असून बाकी ढेबर, राजसमुद्र, पिकोला वगैरे मोठीं गोडया पाण्याची सरोवरें आहेत. सांबर येथें मीठ तयार होतें. राजपुतान्यांत मिठाचे कारखानें बरचे आहेत, पण ते हिंदुस्थान सरकारच्या ताब्यांत आहेत. जोधपूर संस्थानास पूर्वी यांचें उत्पन्न सालीना ८ लाख येत असे. उदेपूर संस्थानासहि तांबे, शिसें व जस्त यांच्या खाणीचें पुष्कळच उत्पन्न येई. भूस्तरशास्त्रदृष्टया राजपुतान्याचे दोन भाग, (एक अरवली पर्वतासुद्धा पूर्वेकडील व दुसरा पश्चिमेकडील) पडतात. अरवलीचा उत्क्षेप विंध्याद्रीच्या तालुकामय खडकामुळें झालेला आहे. हे खडक जंबूर व शीस्ट नांवाच्या दगडाचे स्फटिकमय असल्यानें जयपूर, अलवार, उदेपूर, इकडे संगमरवरी व पाटीचे दगड (खाणींतून) बरेच आढळतात. मकराणा येथें संगमरवराच्या खाणी आहेत. पलाण येथें दगडी कोळशाच्या खाणी आहेत. हा कोळसा मध्यम प्रतीचा आहे. त्यांत बंगाली कोळसा मिसळून मग तो वापरण्यास घेतात. स्लेटीच्या जातीच्या दगडी पत्र्यांचा उपयोग घरांवरील छपरास होतो. खेत्री व सिंघाण येथें तांब्याच्या, निकलच्या व कोबाल्टच्या खाणी आहेत. राजपुतान्यांत १००-१५० वर्षांमागें सिंह होते. हल्लीं अबूकडील भागांत थोडेसे आहेत. वाघ मात्र पुष्कळ आहेत. चित्तो, अस्वल, काळवीट, रोही, नीलगायी हीं जनावरें बरींच आढळतात. पश्चिम व वायव्य भागांत उन्हाळा अतिशय असून उष्ण वारे व वादळें फार होतात. ईशान्य व नैर्ऋत्येकडील वारे राजपुतान्यांत मुळींच येत नसल्यानें प्राचीन काळापासून इकडे नेहमीं दुष्काळ पडतात. पावसाचें मान सर्वत्र सारखें नाहीं. पश्चिमेस तर मुळींच पाऊस नसून, जोधपूर-बिकानेरकडे सालीना ६-७ इंच पाऊस पडतो, तर कोटाझालावाडकडे ४० इंच पडतो. धोलपूर-करोलीकडे ३० इंच आणि अबूवर ८० इंचांपर्यत पडतो. अबूंत धरणीकंप फार होतात. अबू, डुंगरपुर, बांसवाडा येथें साग व इमारती लांकूड सापडतें.

इतिहास.-राजपुतान्यांत पुढीलप्रमाणें निरनिराळ्या राजसत्ता होत्या. अशोक (बैरात येथील ख्रि. पू. २५० च्या वेळचे शिलालेख), बॅक्ट्रियन ग्रीक (ख्रि. पू. २ रें.शतक, उदेपुराजवळ यांची नाणीं सांपडतात व तेथील माध्यमिका गांवाचा उल्लेख येतो), शक (ख्रि. पू. २ रें ते इ. स. चौथें शतक; रुद्रदामन वगैरे), गुप्तवंश (चौथें ते ६ वें शतक), हूण (६ वें अर्धशतक), हर्षवर्धन (सातवें शतक. याच्या वेळीं ह्युएनत्संग इकडे आला होता. त्यानें गुर्जर, वडारी, बैरत व मथुरा असे राजपुतान्याचे चार प्रांत उल्लेखिले आहेत) व अनेक रजपूत राजे (आठवें शतक ते आजतागायत). सातव्या व अकराव्या शतकाच्या सुरवातीस अनेक रजपूत घराणी उदयास आली. मेवाडकडे गुहिलोट, मंदोरकडे परिहार, सांबर व जेसलमीरकडे चव्हाण व भाटी, नैर्ऋत्येकडे परमार व सोळंकी वगैरे घराण्यांनीं राज्यें स्थापिली. यांचाच विस्तार पुढें होत गेला. मुसुलमानांच्या पहिल्या स्वार्‍यांच्या वेळीं ही घराणी दिल्ली, कनोज, व लोहोर इकडे विशेषत: रहात असत. मुसुलमानांनीं प्रथम राजपुतान्यांतील गुजराथकडे व यमूनेकडे जाणारे मार्ग हस्तगत केले व रजपुतांच्या आपापसांतील भांडणांचा फायदा घेऊन त्यांनां आपले मांडलिक बनविले. दिल्ली, गुजराथ, माळवा, येथील मुसुलमान राजे व राजपुतान्यांतील रजपूत राजे यांच्यांत नेहमी लढाया चालत. उदेपूरच्या महाराण्याचा मान सर्व राजपुतान्यांत श्रेष्ठ आहे. तेथील राण्यांनींहि मुसुलमानांविरुद्ध पुष्कळ शतकें टिकाव धरला होता. बाप्पा, संग, प्रताप, राजसिंह वगैरे राणे या बाबतींत प्रसिद्ध आहेत. मालदेव जोधपूरकर व सवाई जयसिंह यांनींहि मुसुलमानांविरुद्ध उचल केली होती. चितोड, कालिंजर, कमळमेर, रणथंबोर, उदेपूर, जालोर वगैरे किल्ले व हळदीघाट, अजमेर, खानौ इत्यादि स्थळें राजपुतान्यांत (त्या त्या ठिकाणीं घडलेल्या प्रसंगामुळें) प्रसिद्ध आहेत. अकबरानें रजपुतांशीं बेटीव्यवहार करण्याची युक्ति काढून त्यांचा कडवेपणा नाहींसा केला व त्यांचा आपल्या साम्राज्यवर्धनाच्या कामीं उपयोग करून घेतला. औरंगझेबाच्या मरणानंतर सिसोदिया, राठोड व कच्छवाह हीं घराणीं मुसुलमानांविरुद्ध एक झालीं पण सिसोदिया घराण्यांतील राणीच्या मुलांनां वारसाचा अग्रहक्क असावा असें या वेळीं ठरल्यानें पुन्हां रजपुतांत भांडणें सुरू झाली व त्याचा फायदा मराठयांनी घेऊन अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत बहुतेक राजपुताना त्यांनीं आपल्या साम्राज्यामध्यें समाविष्ट केला. याच धामधुमींत जाटांचें भरतपुर हें संस्थान निर्माण झालें. पुढें शिंद्यांचीं व इंग्रजांचीं युद्धें होऊन दौलतरावापासून लेक व वेलस्ली यांनीं प्रथम पूर्व व ईशान्य राजपुताना व नंतर बाकीचा भाग आपल्या ताब्यांत घेतला. यशवंतराव होळकरानें इंग्रजांशीं युद्ध चालवून अजमेर किल्ला घेऊन त्यांनां आग्र्यापर्यंत हांकलून दिलें पण रजपूत राजांनीं मदत न केल्यानें अखेर यशवंतरावाचा पराभव होऊन सर्व रजपुतानां इंग्रजांच्या अंमलाखाली गेला. पुढें अमीरखान पेंढार्‍यानें पूर्वराजपुताना ताब्यांत घेऊन रजपुत राजांच्या कारभारांत ढवळाढवळ केली; पेंढार्‍यांचा बंदोबस्त १८१७ साली कायमचा करून इंग्रजांनीं प्रत्येक संस्थान आपल्या ताब्यांत घेऊन त्याच्याकडून आपली सार्वभौमसत्ता कबूल करवून घेतली. यावेळीं करौली व कोटा या संस्थानांनी प्रथम तह केले. अमीरखानासहि टोंक संस्थान मिळालें. इंग्रजांनीं शिंद्यापासून अजमेर घेतलें. त्या वेळेपासून गादीच्या वारसाबद्दलचें तंटे मधून मधून राजपुतान्यांत होत व बंडाळीहि माजे, ती इंग्रज सरकार मोडी. भरतपूरचें (१८२५), जयपूरचें (१८३५), जोधपूरचे (१८३९) वगेरे बंडें झालीं होती. नानागर्दीत (१८५७) रजपूत राजांनीं इंग्रज सरकारची बाजू सोडली नाही. त्यावेळीं राजपुतान्यांत इंग्रज सरकारचें गोरें सैन्य मुळींच नव्हतें, एतद्देशीय सैन्य होतें आणि त्यापैकीं बर्‍याचशा सैन्यानं उचलहि केली होती पण रजपूत राजांनीं इंग्रजांनां मदत केल्यामुळें राजपुतान्यांत नानागर्दीचा प्रसार झाला नाहीं. बिकानेर, कोटा, बुंदी, झालवाड जोधपूर, वगैरे संस्थानांनीं या कामीं पुढाकार घेतला होता. या उपकारास्तव इंग्रजांनीं राजपुतान्यांतील प्रत्येक संस्थानास दत्तकाची सनद दिली (१८६२) आणि मिठावरील व इतर कांहीं कर बंद केले.
राजपुतान्यांत वैरात येथें अशोकाचे शिलालेख व प्राचीन बौद्धावशेष, खोलवी येथील लेणी, अबूवरील दिलवाडची जैन मंदिरें, चितोडचा किल्ला, सोहागपूर, कालिंजर, बरोली, नागदा, चंद्रावती, पुष्कळ येथील प्राचीन देवळें; बयानाचा गरुडस्तंभ, जोधूपर व अलवार येथील मशिदी वगैरे स्थळें पाहाण्यासारखीं आहेत. पोलोच्या खेळांत रजपूत लोक बरेच पुढें येतात. देश रेताड असला तरी बाजरी, ज्वारी, मूग, कुळीथ, गहूं, हरभरें, अफू, तंबाखू, तीळ व ताग हीं पिकें होतात. पाऊस पडणार्‍या भागांत फळफळावळ व भाज्या होतात. वाहतुकी व नांगरटी उंटानें करतात. मलमल विणणें, कापडास रंग देणें, सतरंज्या, घोंगडया विणणें, मातीची भांडी करणें, हस्तिदंती काम, पोलादी व पितळी काम वगैरे कामें तयार होतात. बिकानेंर, जोधपूर, शेखावती, इकडे उत्तम लोंकर मिळते. जयपूरचा सोनेरी मुलामा, इंद्रगडचीं मातीची नक्षीदार भांडीं, अलवार-उदेपूरकडील हस्तिदंती बुद्धिबळें व बांगडया वगैरे जिन्नस प्रख्यात आहेत. पूर्वी भीलवाडा, चुरू, रायगड, मालपुरा, पाली हीं व्यापाराचीं ठिकाणें प्रसिद्ध होतीं. हल्लीं प्रत्येक संस्थानाची राजधानी व बारण, भीलवाडा, चुरू, दीग, झुंझव, मेरट, नागोर, पाली, सांबर व सीकार हीं व्यापाराची ठिकाणें आहेत. राजपुतान्यांतील निर्गत माल मीठ, लोंकर, लोंकरी जिन्नस, कापूस, अफू, तूप, संगमरवरी दगड, कातडीं, रंगीत कापड, उंट, बकर्‍या-मेंढया इ. आणि आयात माल धान्य, विलायती कापड, साखर, धातू, राकेलतेल इत्यादि आहे. व्यापारासाठीं बर्‍याचशा पक्क्या सडका बांधलेल्या आहेत. बुंदी, धोलपूर, डुंगरपूर, जयपूर, किसनगड, शाहपूर व उदेपूर या संस्थानांचीं स्वत:ची पोस्टऑफिसें आहेत. सर्व संस्थानांत १८६७ पावेतों ग्रामपंचायती होत्या, हल्लीं बहुतेक त्या नाहींशा झाल्या. संस्थानिकांच्या कोर्टांच्या निकालावर कांहीं कांहीं बाबतींत गव्हर्नरजनरल-इन-कौन्सिलकडे दाद मागतां येते. अबू, सांबर, दीदवान, पचभद्र येथें इंग्रजसरकारची कोर्टें आहेत; सर्व संस्थानिक १८७६ पर्यंत आपल्या नांवाची नाणी पाडीत असत, पुढें इंग्रज सरकारनें आपल्या टांकसाळी तेथें घातल्या. हल्ली बुंदी, जयपूर, जेसलमीर, किसनगड, टोंक, उदेपूर व शहापूर येथील संस्थानिक आपल्य नांवाची नाणीं पाडतात. सांप्रत सर्व राजपुतान्यांत सुमारें ४० म्युनिसिपालिटया असून त्यांपैकी बहुतेकांचें सभासद सरकार (एजन्ट किंवा संस्थानिक) नियुक्त असतात. इंपीरियल पब्लिक वर्क्स म्हणून इंग्रज सरकारचें एक खातें असून त्याची मदत संस्थानिकांनां नेहमी मिळते. राजपुतान्यांतील सुमारें १७५ दवाखान्यांपैकीं हिंदुस्थानसरकारचें ८ आहेत. पूर्वी राजपुतान्यांतन ब्राह्मण व महाजन हेच फक्त शिकत असत. पहिल्या इंग्रजी शाळा अलवार (१८४२), जयपूर (१८४५) व भरतपूर (१८५८) येथें स्थापन झाल्या. हल्लीं ६५० शाळा असून त्यांतील ५०० संस्थानांच्या, ३४ मिशनर्‍यांच्या व बाकीच्या खाजगी आहेत. जयपूर व जोधपूरचीं कॉलेजें अलाहाबाद विद्यापीठास जोडलेलीं आहेत. जयपूर येथें एक संस्कृत कॉलेज आहे. भरतपूर, जयपूर व उदेपूर येथें स.१८६६ त मुलींच्या शाळा स्थापन झाल्या; हल्लीं या शाळा ७५ पर्यंत आहेत. अजमेरचें मेयो कॉलेज हें संस्थानिकांच्या मुलांसाठीं स्थापन केलें आहे. [इंपे. ग्याझे; टॉड-राजस्थान; टाईम्स-इयर बुक १९२५.]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .