विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राप्री - संयुक्तप्रांत, मैनपूरी जिल्ह्याच्या शिकोहाबाद तहशिलींतील खेबें. हें मैनपूरी शहराच्या नैर्ऋत्येस यमुना नदीच्या दर्यांत वसलेलें आहे. राव झोरावरसेन अथवा रापरसेन यानें हें वसविलें असें म्हणतात. खेडयांत मशिदी, थडगीं, विहिरी आणि जलाशयें आहेत. तेथें सांपडलेल्या कांहीं लेखांवरून ह्या खेडयांतील इतिहासाची माहिती मिळते. येथें शेरशाह व जहांगीर यांनी पुष्कळ इमारती बांधल्या आहेत. अद्याप येथें एका राजवाडयाचा दरवाजा आहे. यावरून पूर्वी हें भरभराटीचें शहर होतें असें दिसतें.