विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामचंद्रपूरम् - मद्रास, गोदावरी जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ २९६ चौरस मैल. या तालुक्यांत मंडपेठ नांवाचें एक शहर व ११७ खेडीं असून रामचंद्रपुरम् हें मुख्य ठिकाण आहे. तालुक्यांतील वस्ती फार दाट आहे. फ्रेंच लोकांचें ठाणें यानाम हें याच तालुक्यांत आहे.