विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामपुर बोवालिया - बंगाल, राजशाही जिल्ह्याचें व रामपुर बोवालियाचें मुख्य ठिकाण. हें पद्मा नदीच्या उत्तर तीरावर बसलेलें आहे. हे पूर्वीपासून रेशमी व्यापाराचें ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणीं १८ व्या शतकांत डच लोकांनी एक वखार घातली. स. १८७६ मध्यें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें एक मोठा तुरूंग आहे व त्यांतील कैदी मोहरीचें व एरंडीचे तेल काढणें, दोर्या तयार करणें आणि बांबूच्या व लांकडाच्या वस्तू बनविणें यासारखीं कामें करतात. येथें एक कॉलेज आहे.