विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामसनेही घाट - संयुक्तप्रांत, बाराबंकी जिल्ह्याची आग्नेयीकंडील तहशील. क्षेत्रफळ ५८५ चौरस मैल. तहशिलींत ६१६ खेडीं आणि तीन शहरें आहेत. त्यांपैकी रूदोली आणि दर्याबाद हीं मोठी शहरें आहेत; हीं इशान्येस घोग्रा नदीपासून तों दक्षिणेस गोमती नदीपावेतों पसरलेलीं आहेत. व गोमतीच्या मध्यभागांतून तिची उपनदी कल्याणी वाहते. येथें दलदलीच्या जागा आहेत.