प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रामानुज - रामानुजाचार्याचा जन्म शके ९३८ म्हणजे इसवी सन १०१६-१०१७ मध्यें झाला. तरुणवयांत तो कांचीपुर (कांजीवरम्) येथें रहात असून अद्वैतवादी ''यादवप्रकाश'' याचा तो शिष्य होता. रामानुजाचार्याचा ओढा वैष्णव मताकडे असल्यामुळे, गुरूच्या उपदेशानें त्याचें समाधान होईना म्हणून त्याच्याजवळून तो निघाला. पुढें आळवारांच्या प्रबंधांचें त्यानें अध्ययन केलें. यामुनाचार्यांच्या मागून गादीवर आल्यावर तो त्रिचनापल्लीजवळ श्रीरंगम् येथें राहिला व तेथें व त्यानें आपल्या आयुष्यांतील मुख्य कार्य केलें. उत्तरहिंदुस्थानांतील मुख्य मुख्य तीर्थांची त्यानें यात्रा केली होती असें सांगतात. उतारवयांत चोल राजाकडून त्याचा छळ झाला. सदर राजानें त्यास वैष्णवधर्म टाकून शैवमताचा स्वीकार करावयास सांगितलें होतें, त्यामुळें होयसळ यादवांच्या राज्याचा त्यानें इसवी सन १०९६ मध्यें आश्रय केला; या वंशांतील राजा म्हैसूरप्रांतावर राज्य करीत असून त्याची राजधानी ''द्वारसमुद्र'' (हाळेबीड) होती. येथें त्यानें विठ्ठलदेव उर्फ बिट्टीदेव यांस इसवी सन १०९८ मध्यें आपल्या पंथाची दीक्षा दिली. विठ्ठलदेव हा त्यावेळीं गादीवर असलेल्या बल्लाळाचा भाऊ असून बल्लाळाच्या नांवानें सरहद्दीवरील कांही प्रांतांचा राज्यकारभार पहात असे. रामानुजाचार्यानें पुढील ग्रंथ रचले:- वेदांतसार, वेदाथसंग्रह, वेदान्तदीप, ब्रह्मसूत्रें व भगवद्भीता यांवरील भाष्यें.

ईश्वराविषयींच्या प्रेमास अगर भक्तीस आपल्या सिद्धांतांत जागा मिळावी म्हणून रामानुजाचार्यानीं ब्रह्मसूत्रें व उपनिषदें यांचा आधार घेऊन पुढीलप्रमाणें आपला सिद्धांत लोकांपुढें मांडला:- जीवात्मा अगर चित्, निर्जीव जग अगर अचित् व परमात्मा अगर ईश्वर ही तीन तत्त्वें शाश्वत होत. या विधानास उपनिषदांचा आधार आहे. ''भोक्ता भोग्यं प्रेरितारंच मत्वा सर्व प्रोक्तं त्रिविधं ब्रह्ममेतत्'' (श्वेताश्वतर उप० ११२) पण उपनिषदांचाच आधार घेऊन ब्रह्म हें जगाचें उपादानकारण व निमित्तकारण आहे असें ब्रह्मसूत्रांत सांगितलें आहे तेव्हां सदर तत्त्वाची आपल्या मताशी सांगड घालतां यावी म्हणून रामानुजाचार्यानी माध्यंदिन शाखेच्या बृहदा० उपनिषदांतील उतार्‍याचा आधार घेतला आहे (बृहदा० उप० ३.७,३). परमात्मा हा जीवात्म्याचा व त्याचप्रमाणें बाह्म जगताचाहि अन्तर्यामिन् म्हणजे अंतस्थ राहून नियमन करणारा आहे असा सदर उतार्‍याचा मथितार्थ आहे.

रामानुजाचार्यानीं आपला सिद्धांत पुढील प्रमाणें मांडला आहे:- चित् व अचित् हे दोन्ही ईश्वराचे गुणधर्म होत. हे दोन मिळून ईश्वराचा देह होतो; उपनिषदांतहि असेंच सांगितलें आहे; व हा देह (दोहोंचा झालेला) व अन्तर्यामिन् आत्मा (ईश्वर) मिळून ब्रह्म होतें (ज्याप्रमाणें देह व अन्तर्यामिन् आत्मा मिळून मनुष्य होतो त्याप्रमाणें) . सृष्टयुत्पत्तीच्या पूर्वी ईश्वराचें शरीर सूक्ष्मस्वरूपांत भासतें व उत्पत्तीनंतर तें विश्वरूप बनून त्याचा विकास होतो. याप्रमाणें ब्रह्म हें बाह्म हे बाह्म जगाचे उपादान कारण आहे व अंतर्यामिन् या नात्यानें त्यास निर्माण करण्याची इच्छा होते म्हणून तें निमत्तकारणहि आहे. अचेतन जगाचें सूक्ष्म स्वरूप म्हणजे प्रकृति होय (हा शब्द सांख्य मताच्या आद्य संस्थापकानें प्रथम प्रचारांत आणला); हिरण्यगर्भाण्ड निर्माण होईतोंपर्यंत प्रकृतीचा विकास अन्तर्यामी ईश्वराच्या तन्त्रानें होतो. महत् अहंकार या ज्या विकासाच्या अनुक्रमवार पायर्‍या आहेत त्या साख्यमतांतल्याप्रमाणेंच होतात. हिरण्यगर्भाड निर्माण झाल्यावर पुढची उत्पत्ति ब्रह्मदेव, दक्ष यांचा अन्तर्यामिन् या नात्यानें ईश्वरच करतो.

ईश्वर हा निर्दोष किंवा वैगुण्यरहित आहे. तो सनातन, सर्वव्यापी, सर्वांतर्यामी, शुद्ध आनंदस्वरूप असा असून तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान् वगैरहि आहे; तो सृष्टीचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता असून, आर्त, जिज्ञासु अर्थांर्थी व ज्ञानी हे त्याच्या पदाचा आश्रय करतात. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ तो प्राप्त करून देतो. अद्भुत, दिव्य, अद्वितीय सौंदर्यानें युक्त असा त्याचा देह असून, लक्ष्मी, भू, व लीला या त्याच्या तीन बायका होत. हा ईश्वर निरनिराळ्या पांच स्वरूपांत अगर प्रकारांनीं प्रगट होतो ती स्वरूपें:-

(१) परस्वरूप :- ह्या स्वरूपांत नारायण (याला परब्रह्म व परवासुदेव असेंहि म्हणतात). वैकुण्ठपुरींत वास करतो; वैकुण्ठपुरीचें रक्षण करण्यास नगरपालक व द्वारपाल आहेत. शेषसर्परूपी पर्यंकावर धर्म, वगैर अष्टपाद ज्याला आहेत अशा रत्‍नखचित सिंहासनावर तो अधिप्रित होतो; श्री, भू, लीला ह्या त्याची सेवा करतात; शंख, चक्र इत्यादि दिव्य आयुधें तो धारण करतो. किरीटासारखी दिव्य भूषणेंहि तो धारण करतो. ज्ञान, शक्ति इत्यादि कल्याणकारक व अनंत गुणधर्मांनी युक्त असा तो आहे. अनंत, गरूड, विश्वक्सेन इत्यादि नित्य विभूती व मुक्त झालेले पुण्यात्मे त्याच्या सहवासाचें सुख अनुभवीत असतात.
(२) व्यूहस्वरूप- यांत पर हा स्वत:च वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरूद्ध अशीं पूजेच्या सोयीकरितां व उत्पत्ति वगैरे कामांकरितां चार रूपें धारण करतो. वासुदेव हा षड्गुणपूर्ण आहे; संकर्षणाच्या अंगी ज्ञान व बल, प्रद्युम्नाच्या अंगी ऐश्वर्य व वीर्य व अनिरूद्धाच्या अंगी शक्ति व तेज याप्रमाणे या रूपांच्या (व्यहांच्या) ठिकाणी गुण विभागले आहेत.
(३) विभवस्वरूप:- यांत मत्स्य, कूर्म वगैरे अवतार येतात.
(४) अन्तर्यामिन् स्वरूप:- यांत सर्वांच्या अंत:करणांत तो वास करतो; योगी लोकच फक्त त्यास पहातात; व जीवात्मे मग ते नरकास अगर स्वर्गास जावोत-त्यांच्याबरोबर तो असतो.
(५) मूर्तिस्वरूप:- गृह, ग्राम, नगर वगैरे ठिकाणीं उपासक ज्या पदार्थाची किंवा द्रव्याची मूर्ति करतो त्या मूर्तींत अप्राकृत (मूर्तीत असतो पण जडरूपानें नसतो) शरीरानें युक्त असा तो राहतो.

कांहीजण व्यूहस्वरूपांतून वासुदेवास गाळतात व बाकींच्या तिहींचीच सदर स्वरूपांत गणना करतात. अर्थपंचकांत अन्तर्यामिन् स्वरूपाचा प्रकार निराळा म्हणजे सर्व वस्तूंच्या अंतस्थ राहून, सर्वांचें नियमन करणारा, विदेही, सर्वव्यापी, सर्व सद्गुणांचा निधि असा सांगितला असून त्यास विष्णु, नारायण, वासुदेव इत्यादि नांवे आहेत.

प्रत्यक्त्व, चेतनत्व, आत्मत्व व कर्तृत्व इत्यादि गुणधर्म जीवात्मा (चित्) व परमात्मा (ईश्वर) या दोघांनांहि लागू आहेत. जीवात्मा अगर चित् हा स्वयंप्रकाशी, आनंदी, नित्य, अणुपरिणाम, अगोचर, अगम्य, निरवयव, विकाररहित, ज्ञानी, ईश्वराच्या असा असा त्याचे अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे व तो स्वत: ईश्वराचा गुणधर्म आहे. जीवात्म्याचें हें वर्णन शंकराचार्यांनीं केलेल्या जीवात्म्याच्या कर्तृत्व किंवा पदार्थ या नात्यानें त्यास अस्तित्व नाही; व अद्वैतमतांत ईश्वरावर जीवात्म्याचें अवंलबित्व असणें शक्य नाही; जीवात्मा अणूपरिमाण नाही असेंहि त्यानीं म्हटलें आहे. चित् अगर जीवात्मे पुष्कळ असून त्यांचे वर्ग पुढीलप्रमाणें आहेत-(१) बद्ध, (२) मुक्त, (३) नित्य; पहिल्या वर्गापैकीं जे बुद्धिप्रधान प्राणी आहेत त्यांचे दोन पोटवर्ग आहेत:- (अ) बुभुक्षू व (आ) मुमुक्षु; वुभुक्षूपैकीं कांही संपत्तिसाधनांत व देहाच्या वासना तृप्त करण्यांमध्यें गर्क होतात; व कांही अलौकिक श्रेयसाधनाच्या आशेनें यज्ञयागाउि कर्मे करून, तीर्थयात्रा, दान वगैरे गोष्टी करतात. यांपैकी कांही भगवंतास भजतात तर कांही इतर देवांस भजतात. मुमुक्षुवर्गापैकीं कांहींजण ''केवलिन्'' होण्याची इच्छा करतात तर कांही शाश्वत सुख म्हणजे मोक्ष मिळविण्याची इच्छा करतात; या उत्तरोक्तांपैकी कांही भक्त असून ते प्रथम वेदांचें अध्ययन करून वेदांत व कर्मयोग यांच्याशी आपला परिचय करून घेऊन नंतर भक्तीच्या सर्व अंगांच्या साहाय्यानें ईश्वरप्राप्ति करून घेतात. वरच्या तीन वर्णांसच भक्तिमार्गांचे अवलंबन करतां येतें; शूद्रास या बाबतींत अधिकार नाही. कांही प्रपन्न म्हणजे स्वत:स दुबळे व बलहीन समजून ईश्वरास शरण जाणारे असे असतात. प्रपन्नांपैकी कांही पहिले तीन पुरूषार्थ (धर्म, अर्थ, काम) साध्य करून घेण्याचा प्रयत्‍न करतात तर कांहीनां यांत गोडी न वाटून ते मोक्षाचीच इच्छा करतात; व एखाद्या गुरूचा उपदेश घेऊन भक्तिमार्गाचें अवलंबन करण्याची अंगांत ताकद नसल्यामुळे व सर्वप्रकारे असहाय्य असल्यामुळें ईश्वरी इच्छेवर सर्व हवाला टाकतात.

या पत्तीच्या (म्हणजे ईश्वरास शरण जाण्याच्या) मार्गाचा अवलंब करण्याचा अधिकार शूद्रांसकट चारी वर्णास आहे.

भक्तियोगास पूर्णता येण्यास कर्मयोग व ज्ञानयोग यांची अवश्यकता आहे. फलसङ्रहित धर्मविषयक सर्व विधी अगर नित्यनैमित्तिकें करणें याचें नांव कर्मयोग. देवार्चन, तप, तीर्थयात्रा, दान, यज्ञयाग इत्यादि कर्मे कर्मयोगांत मोडतात. कर्मयोगानें आत्म्याची शुद्धि होऊन तो ज्ञानयोगास पात्र होतो. प्रकृतीपासून आपण निराळे असून आपण ईश्वरशेष म्हणजे ईश्वराचा अंश आहोंत हें जाणणें याचें नांव ज्ञानयोग. ज्ञानयोगाच्या पुढची पायरी भक्तियोग होय. यमनियमादि योगाच्या अष्टांगांसहित अविच्छिन्न किंवा सतत ध्यान करणें याचें नांव भक्तियोग. हा साध्य करण्याची सात साधनें आहेत:- (१) विवेक म्हणजे अपवित्र व अभक्ष्य असे जे पदार्थ मानले गेले नाहींत त्यांचे सेवन करून काय शुद्धि करणें (जात्याश्रयनिमित्तदष्टादन्नात्कायशुद्धि:); (२) विमोक म्हणजे ब्रह्मचार्य पाळणे; (३) अभ्यास; (४) शक्त्यनुसार पंचमहायज्ञादि अनुष्ठानक्रिया; (५) कल्याणसत्य, आर्जव, दया, दान, अहिंसा वगैरे; (६) अनवसाद म्हणजे दैन्याभाव किंवा धीर खचूं न देणें; (७) अनुद्धर्ष म्हणजे तुष्टयभाव, व त्याचप्रमाणे अतिसंतोषहि न होऊं देणें. या सात साधनांनी अनुगृहीत अशी भक्ति परमेश्वरी साक्षात्काराच्या जवळ जवळ जाऊन अन्तिम प्रत्ययांत तिचें पर्यवसान होतें. प्रपत्ति म्हणजे:-

आनुकूल्यस्य संकल्प: प्रातिकूल्यस्य वर्जनम्।
रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृतववरणं तथा॥
आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ।
याप्रमाणें प्रपत्ति म्हणजे आत्मार्पण होय.

अर्थपंचकांत पांचवाहि एक मार्ग सांगितला आहे तो आचार्याभिमानयोग हा होय; ज्यांस वरच्या कोणत्याहि मार्गांनीं जातां येत नाहीं त्यांजकरितां हा मार्ग असून आचार्यास शरण जाऊन प्रत्येक गोष्टीत त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणें म्हणजे सदर योग होय. सदर योगांत आपल्या शिष्यास मोक्ष मिळवून देण्याकरितां सर्व आवश्यक गोष्टी आचार्यच करतो.

विष्णूच्या भक्तांनी पूजा कशी करावी याबद्दलचे १६ प्रकार सांगितले आहेत. रामनुजपंथाच्या एका ग्रंथकारानें, हे १६ प्रकार ज्यांत सांगितले आहेत अशा पद्मपुराणांतून उतारा घेतला आहे. भागवतपुराणांत भक्तीचे ९ प्रकार सांगितले आहेत म्हणून मागेच सांगितलें आहे; त्यांपैकी सख्य वगळून बाकीचे आठ या सोळा प्रकारांत येत असून रहिले आठ येणेंप्रमाणें:-- (१) शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी श्रीहरीच्या आयुधांनी युक्त अशा मुद्रा अंगावर धारण करणें; (२) कपाळी सरळ उभी रेघ लावणे; (३) वारंवार मंत्र म्हणणे; (४) तीर्थसेवन; (५) नैवेद्यभक्षण; (६) श्रीहरीच्या भक्तांची सेवा करणें; (७) प्रत्येक एकादशीस उपोषण करणें व (८) श्रीहरीच्या मूर्तीस तुलसीपत्र वाहणें. हारितस्मृतीत नवविधा भक्ति सांगितली आहे. हाहि उतारा दिला आहे; यांतील तीन प्रकार भागवतपुराणांत सांगितल्याप्रमाणेंच आहेत; बाकीचे सहा, वर जे आठ सांगितले आहेत त्याप्रमाणें पण पहिल्या दोहोंचा एके ठिकाणी समावेश करून व तिसरा प्रकार गांळून सहा संख्या केली आहे.

कपाळावर दोन उभ्या व त्यांस सांधणारी एक आडवी अशा पांढर्‍या मातीच्या रेघा व मध्यभागीं हळदीची किंवा रव्याची एक उभी रेघ लावतात.

पंथ.- उत्तरहिंदुस्थानांत रामानुजाचार्यांच्या पंथाचे फारसे लोक नाहीत; दक्षिणहिंदुस्थानांत मात्र पुष्कळच आहेत. वडकलइ व टेंकलइ असे यांच्यांत दोन पंथ आहेत. या दोन पंथांतील भेद पुढीलप्रमाणें आहे:- मोक्ष' मिळविण्याच्या बाबतीत मनुष्याचा प्रयत्‍न व ईश्वराचा अनुग्रह यांतील संबंध दाखविण्यास हे दोन पंथ दृष्टांतादाखल जीं निरनिराळीं उदाहरणें देतात त्यांवरून त्यांच्यांतील मुख्य भेद स्पष्ट कळून येतो.

याप्रमाणें रामानुजाचार्यानी आपली आत्मज्ञानपर तत्त्वें उपनिषदें व ब्रह्मसुत्रें यांवरून घेतलीं असून, बाह्मजगताच्या उत्पत्तीचा त्यांचा सिद्धांत पुराणांत सांगितल्याप्रमाणेंच असून सांख्यदर्शनाच्या २४ मूलतत्त्वांच्या आधारें तो रचला आहे. रामनुजाचार्यांचा वैष्णवधर्म म्हणजे पांचरात्रधर्मांत सांगितलेल्या वासुदेवधर्मांत नारायण व विष्णू यांच्या संबंधाची भर घालून झालेला धर्म होय.

या पंथाच्या वाङ्‌मयांत विष्णू हें नांव फार करून आढळत नाहीं. अतिशय प्रामुख्यानें आढळणारें असें नांव नारायण हें होय; तथापि परमात्मा व त्याचे ४ व्यूह यांसंबंधीं कांहीं सांगतांना वासुदेव या नांवाचाहि उल्लेख केला आहे. गोपालकृष्णाचें नांव बिलकुल आढळत नाहीं हें ध्यानांत ठेवण्याजोगें आहे. राधा व इतर गोपी यांचा अंतर्भाव झाल्यामुळें वैष्णवधर्मास जें एक हिडिस स्वरूप प्राप्त झालें आहे त्यापासून सदर पंथ अगदी अलिप्त आहे. सदर पंथाची ''राम'' ही आवडती उपास्य देवता आहे असेंहि दिसत नाही. परमात्मा अगर ईश्वर याजप्रत जाण्यासंबंधी रामानुजाचार्यांचीं तत्त्वें भगवद्भीतेंतील तत्त्वांप्रमाणेंच किंवा तीच विस्तृत करून सांगितलेलीं आहेत. ईश्वराचें सतत ध्यान अगर चिंतन म्हणजे भक्ति असें भक्तिस संकुचित स्वरूप या पंथानें दिलें आहे, म्हणजे बादरायणाचार्यानीं वर्णन केलेली उपासना व ही भक्ति एकच. ध्यान अथवा चिंतन यांमध्यें ध्यातवस्तूविषयीं प्रेमवृत्ति असतेच तथापि ईश्वराविषयीं अलोट प्रेम असा नेहमीचा रूढ अर्थ घेतलेला दिसत नाही. परंपरेनें (पूर्वापार) चालत आलेल्या भक्तिमार्गास शुद्ध ब्राह्मणधर्माचें रूप देण्याकडे या पंथाची प्रवृत्ति आहे; वडकलइ पंथाच्या मतांवरून ही गोष्ट विशेष स्पष्टपणें कळून येते. टेंकलइ पंथ या बाबतीत अधिक उदार असून त्यानें आपला धर्म शूद्रास देखील आचरितां येईल असें आपल्या तत्त्वांस वळण दिलें आहे. धार्मिक बाबतींत शूद्रा आपला हक्क बजावूं लागले होते अगर डोकें वर काढूं लागले होते हें, रामानन्दाचे शिष्य व नामदेव, तुकाराम इत्यादि महाराष्ट्रीय संतांच्या उदाहरणांवरून आपणांस कळून येईल.

स्वत:च्या मुक्ततेकरितां आपण स्वत: कांहि न करतां गुरूस पूर्णपणें शरण जाण्यासंबंधी अर्थपंचकांत जो पांचवा उपाय सांगितला आहे त्याविषयी संशय येतो. ख्रिस्तांनें जें आत्मार्पण केलें त्याच्याशीं वरील उपायाचें विलक्षण साम्य आहे. रामानुजाचार्यांच्या काळी व त्याच्याहि पूर्वी मद्रासच्या आसपासच्या प्रदेशांत ख्रिस्ती धर्मांतून घेतल्या असण्याचा संभव आहे. रामनुजाचार्यांचा पंथ श्रीसंप्रदाय या नांवानें ओळखला जातो. (भांडारकर - वैष्णविझम्, इ.; गोविंदाचार्यस्वामीदि लाइफ ऑफ रामनुज; रंगाचार्लु-लाइफ अँड टीचिंग्स ऑफ रामानुज; सी. आर्. श्रीनिवास आयंगार-दि लाइफ अँड टीचिंग्स ऑफ श्री रामानुजाचार्य.)

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .