प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रायपूर, जिल्हा.- मध्यप्रांतांत छत्तिसगड भागांतील जिल्हा. याचे क्षेत्रफळ ११७२४ चौ. मैल आहे. हयांत छत्तिसगड मैदानाचा दक्षिणभाग आणि टेंकडाळ प्रदेश येतो. ह्या जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशांत वायव्येस, नैर्ऋत्येस आणि आग्नेयीस जमीनदारी संस्थानें आहेत. जिल्ह्यांत महानदी व शिवनाथ ह्या दोन नद्या आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील जंगलांत सागाची झाडें व पूर्वेस व दक्षिणेस सालाचीं झाडें आहेत. बाकीच्या सर्व जंगलांत मध्यप्रांतातील साधारण झाडें आहेत. रेडे व रानटी बैल पूर्वेस आढळतात. रानटी कुत्रे फार आहेत. रेताड व खडकाळ जमीन असल्यामुळें उन्हाळ्यांत उष्णता फार भासते. पाऊस ५५ इंच पडतो. छत्तिसगडमध्यें पूर्वी भुइया व मुंडा ह्या जाती राहात असत. परंतु ह्याना गोंड लोकांनी नंतर हांकून लाविलें. हें ११ व्या शतकांत रतनपूर राज्यापासून निराळें असून राज्यकारभार देखील निराळा होता. ह्या वेळेपासून रायपूर येथें हैहयवंशीं राजे राज्य करीत असत. १७४१ सालीं मराठा सरदार भास्करपंत हा बंगालवर स्वारी करण्याकरितां जात असताना त्यानें वाटेंत रतनपूर घेऊन आपल्या राज्यास जोडलें आणि नंतर १७५० मध्यें अमरसिंग ह्यानें घेतलें. १७५०-१८१८ ह्या अवधींत या जिल्ह्यावर मराठे राज्य करीत होते व त्यांचा कर वसूल करण्याचा उद्देश असल्यामुळें त्यांनी फार जुलूम केला व त्यामुळें नेहमी बंडे होत असत. १८३० पासून १८५३ पावेतों पुन्हां मराठे राज्य करीत होते. १८५३ सालीं छत्तिसगडच्या राजाला मुलगा नसल्यामुळें हें इंग्रजी राज्याला जोडलें आणि बिलासपूर हा रायपूर जिल्ह्यापासून निराळा करून १८६१ त नवीन जिल्हा केला. आरंग, राजिम आणि सिरपूर ह्या ठिकाणी प्राचीन हिंदूचे लेख सांपडतात. द्रुग, राजिम आणि सिरपूर ह्या ठिकाणीं बुद्धाच्या वेळच्या काहीं वस्तू सांपडतात.

जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) १४०६६७६. जिल्ह्यांत रायपुर, धमतरी व आरंग ही मुख्य शहरें आहेत. शेकडा ८८ लोक छत्तिसगडी, ६ उडिया, ४ हिंदी आणि ६ पेक्षां कमी मराठी भाषा बोलतात. उडिया लोक संबळपूरजवळ खरीआस जमीनदारींत राहतात. मालगुजारी भागाच्या वायव्येस व देवरबीजा आणि धमदा यांच्या सभोंवतालीं काळ्या जमिनीचा प्रदेश आहे व ह्या ठिकाणी गहूं व इतर पिकें होतात. ही जागा सपाट नसल्यामुळें बांध घालतां येत नाहीत व त्यामुळें तांदुळ या ठिकाणी पिकत नाही. धमतरी, बालदा आणि राजिम या ठिकाणी जमीन सपाट असून बांध घातले असल्यामुळें तांदुळ पुष्कळ पिकतो व उत्पन्न चांगले होतें.

जिल्ह्याच्या एकंदर क्षेत्रफळांत शेंकडा ५० जमीनदारी क्षेत्र असून त्यापैंकी १० चौ. मैल रयतवारीपद्धतींत येतात. १०६ चौ. मैल साधारण सारा माफ आहे अशा आहेत व ४३४० एकर जमीन पडीक म्हणून विकली आहे. बाकीच्या मालगुजारी जमिनी आहेत. त्यांत उडीद, मूग, मठ, चणे, जवस व तीळ पेरतात. परंतु तांदुळ सर्वांत जास्त पेरतात. रायपूरला शेतकी खात्यानें प्रयोगक्षेत्र काढलें आहे. गुरें फार लहान आहेत. मालगुजार रेडे ठेवतात व ते भातांची शेतें नांगरण्याच्या उपयोगास आणतात. बकरी व मेंढया फार थोडया आहेत. सरकारी जंगल एकंदर १३६६ चौरस मैल आहे. हयांत एक सालाचें जंगल व दुसरें इतर झाडें लावलेलें जंगल असे भाग आहेत. जंगलांत वेळू, व साल पुष्कळ आहेत. पश्चिम व पूर्व भागांत लोखंड सांपडते. चिचोली येथें तांबें व शिसें सांपडतें. शिळाछापाचा दगड विंद्या खडकाच्या खालील भागांत सांपडतो. गेरू गंदई जमीनदारींत व चुना धमदाजवळील एक दोन खेडयांत सांपडतो. ह्या ठिकाणीं टसर रेशीम थोडया प्रमाणावर विणलें जातें. कांही कोष्टी लोक सुती कापड विणतात. मुख्यत्वेंकरून गहूं, जवस आणि तीळ बाहेर पाठवितात. परंतु तांदुळ उत्तरेस मध्यप्रांत, वर्‍हाड, हैद्राबाद आणि मुंबई येथें पाठवितात. जंगलांतील उत्पन्नापैकीं साग, साल, आणि बीजासाल हीं बाहेरगांवी पाठवितात. लाख मिर्झापूर येथें व मोहाचीं फुलें नागपूर व कामठी येथें दारूकरितां पाठवितात. बेंगाल-नागपूरची मुख्य शाखा जिल्ह्यांतून जाते. येथून धमतरी येथें एक फांटा गेलेला आहे. हा जिल्हा शिक्षणाच्या बाबतींत इलाख्याच्यांतील सर्व जिल्ह्यांत दुसरा आहे. रायपूर शहरांत एक हायस्कूल, जमीनदार व संस्थानांतील राजे लोकांच्या मुलाकरितां एक राजकुमार कॉलेज, कांही इंग्रजी दुय्यम शाळा, मराठी शाळा आणि २०० वर प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत.

तहशील.- रायपूर जिल्ह्याची तहशील. द्रुग जिल्हा नवीन निराळा झाल्यापासून रायपूर तहशिलींत बराच फरक झाला आहे. क्षेत्रफळ १०१६ चौरस मैल आहे तहशिलींत रायपूर (जिल्ह्याचें व तहशीलीचें मुख्य ठिकाण) आणि आरंग हीं दोन शहरें आहेत.

शहर.- रायपूर जिल्ह्याचें व छत्तिसगड भागाचें मुख्य ठिकाण. हें खारून नदीपासून ४ मैल अंतरावरील मैदानांत नागपूरपासून १८८ मैल व कलकत्त्यापासून ५१३ मैलांवर वसलेले आहे. राजिम व धमतरी येथें जाणार्‍या शाखांचें रायपूर हें जंक्शन आहे. येथील लोकसंख्या ३२११४. हें १८१८ सालीं छत्तिसगड भागाचें मुख्य ठिकाण करण्यांत आलें. हें शहर नवव्या शतकापासून अस्तित्वांत आहे असें म्हणतात व जुना भाग नव्या भागाच्या नैर्ऋत्येस नदीपर्यंत पसरलेला होता. हयांत प्राचीन काळचा एक किल्ला असून त्याच्या दोहों बाजूंस दोन मोठी तळीं आहेत व आंत पुष्कळ देवळें आहेत. त्यांत दुधादरी नांवाचे हल्ली मोडकळीस आलेलें उत्तम खोदीव देऊळ आहे. ह्या ठिकाणीं हल्ली पुष्कळशी तळीं खोदलीं आहेत. छत्तिसगड भागाच्या निरनिराळ्या अधिकार्‍यांचें हें शहर मुख्य ठिकाण आहे. १८६७ सालीं ह्या ठिकाणी म्युनिसिपालिटी स्थापन झाली. छत्तिसगड भागांतील रायपूर हे मुख्य व्यापाराचें ठिकाण आहे. शहरांत पितळकाम, लांकडास लाखेचें रोगण देणें, कापड विणणें, आणि सोन्याचांदीचे दागिणे करणें इत्यादि किरकोळ धंदे लोक करतात. तुरूंगामध्यें सुती कापड विणतात व कोरफडीच्या पातीच्या चटया बनवितात. ह्या ठिकाणीं तेलचक्की व कापूस वठण्याचे कारखाने आहेत. ह्या ठिकाणीं १८७५ सालीं बांधलेलें एक पदार्थसंग्रहालय आणि लोकांच्या खाजगी वर्गणीवर चालेलें कुष्ट रोग्यांकरितां एक धर्मालय आहे. येथें एक हायस्कूल व राजकुमार विद्यालय आहे. याशिवाय इतर शाळा व दवाखाने आहेत.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .