विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रायाचोटी - मद्रासमधील कडाप्पा जिल्ह्यांतील एक तालुका. लोकसंख्या सुमारे एक लाख. ह्या तालुक्यांत रायाचोटी हें एकच शहर असून बाकी ८९ खेडी आहेत. ह्या तालुक्यांत तळी पुष्कळ आहेत. मुख्य उत्पन्न तांदूळ व कंबू. आग्नेयीकडील भाग फारच सुपीक आहे. मुख्य नद्या पापघ्नी, मांडवी, बहुदा, व चिटलेरू होत. या सर्व चिटलेरूच्याच शाखा आहेत. रायाचोटीची लोकसंख्या सात हजार. हें शहर मांडवी नदीवर असून येथें वीरभद्रस्वामीचें एक देऊळ आहे.