विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रावेर - मुंबई, पूर्व खानदेश जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ४८१ चौरस मैल आहे. मुख्य शहरें रावेर व सावदे. लोकसंख्या ८००००. जमीन सुपीक असून पाण्याचा मुख्य पुरवठा तापी नदीचा आहे. हवा साधारण निरोगी असून पाऊस २४ इंच पडतो. रावेरशहराची लोकसंख्या ८००० हें शहर कलाबूतचें काम व तद्देशीय वस्त्रें यांबद्दल प्रसिद्ध होतें. हें शहर निजामानें पेशव्यांस १७६३ सालीं दिलें व पेशव्यानीं तें होळकरांस नंतर दिलें. येथें १८९२ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.