प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

राष्ट्रकूट राजघराणे - राष्ट्रकूट हा शब्द राष्ट्रिक उर्फ रठ्ठ यांचा कूट म्हणजे संघ या अथानें उत्पन्न झाला असावा. कारण महाराष्ट्रांत या रठ्ठांची लहान लहान राज्यें पूर्वीपासून होतीं, तींच पुढें एकत्र होऊन एक मोठें राज्य झालें असावें. यांच्याबद्दल पुष्कळशी माहिती फ्लीट यानें प्रसिद्ध केली आहे. डॉ. बजेंस, डॉ. बुल्हर, डॉ. भांडारकर व रा. शं. पा पंडित यांनीहि या घराण्याबद्दल बरीच माहिती प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रकूट हे प्रथम उत्तरेकडून आले व त्यांनी सातव्या शतकाच्या उत्तरेकडून आले व त्यांनी सातव्या शतकाच्या उत्तरार्धांत मुंबई इलाख्यांतील हल्लींच्या कानडा जिल्ह्यावर त्यावेळी राज्य करीत असलेल्या प्राचीन चालुक्य घराण्याचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली. तिकडे जाण्यापूर्वी वर्‍हाडवर यांची सत्ता स. २३६-५५० पर्यंत असावी असा स्मिथचा तर्क आहे.

या घराण्याचा मूळपुरूष दंतिवर्मा पहिला हा होय. त्याचा पुत्र पहिला इंद्र व त्याचा पुत्र गोविंद पहिला (सुमारें स.६६०) होय; हा पराक्रमी होता. त्याचा पुत्र कर्क किंवा कक्क पहिला हा वैदिक धर्माचा विशेष अभिमानी होता (६८५), त्यामुळें त्याच्या कारकीर्दीत ब्राह्मणांनी यज्ञयाग वगैरे पुष्कळ केले. त्याचा पुत्र इंद्र दुसरा (७१०) यानें चालुक्य राजकन्येशीं लग्न केलें. दंतिदुर्ग वीरमेघ (दंतवर्मा दुसरा) हा फार शूर होता. यानेंच त्या वेळेचा पश्चिम चालुक्यराज कीर्तिवर्मा यास जिंकून चालुक्य साम्राज्य शेवटास नेलें (७५०) व सर्व महाराष्ट्र आपल्या अमलाखाली आणलें. पल्लव व चालुक्य यांच्या नेहमी लढाया होत, त्यामुळें ते दोघेहि हतबल झाले होते; त्याचा फायदा दंतिदुर्गानें घेऊन चालुक्यांप्रमाणेंच पल्लवांवरहि स्वारी करून व त्यांचे राज्य मोडून कांची शहर हस्तगत केले (७५४) बदामी ही (चालुक्यांची) राजधानी पल्लवांच्या सरहद्दीजवळ असल्यामुळें त्यांच्या तिच्यावर नेहमीं स्वार्‍या होत म्हणून दंतिदुर्गानें ती मोडून तिच्याऐवजी नाशिककडे मयूरखंडी ही राजधानी केली. पुढें शर्व उर्फ अमोघवर्ष पहिला यानें मयूरखंडीबद्दल मान्यखेट (हल्लींचे निजाम राज्यांतील मलखेड) ही नवीन राजधानी स्थापिली. दंतिदुर्गानें गंगाराजांनां जिंकून आपले मांडलिक बनविले आणि पाण्डय राजांनांहि थोपवून धरलें; त्यामुळें चोलांचा व त्याचा संबंध आला आणि त्यांच्यामध्यें लढाया सुरू झाल्या, त्या तिसर्‍या कृष्णराजापर्यंत चालू होत्या. त्यानें मात्र चोलांचा सपशेल पराभव केला. या लढाया १२ वर्षांत १०८ झाल्या असें एके ठिकाणी म्हटलें आहे. याप्रमाणें दंतिदुर्गानें महाराष्ट्र व त्याचा दक्षिण आणि आग्नेय प्रदेश आपल्या ताब्यांत आणला. या भागांत बलिष्ठ राज्यें नव्हतीं व जी मध्यम दर्जाची होतीं तीं आपसांत भांडत होतीं, त्याचा फायदा दंतिदुर्गानें घेतला.

दंतिदुर्गाच्या मागें त्याचा चुलता कृष्ण पहिला हा अकालवर्ष वल्लभ शुभतुंग हें बिरूद धारण करून गादीवर बसला (७५६). यानें आपल्या पुतण्याचें उरलेलें काम पुरें पाडलें. यानें चालुक्यांनां अगदी नामशेष केलें. वेरूळ येथील कैलास नांवाचे अप्रतिम लेणें यानेंच कोरविलें; असलें सुंदर व प्रचंड काम पृथ्वीवर अन्यत्र नाही. त्याच्या पश्चात त्याचा थोरला मुलगा गोविंद दुसरा यानें ७६५ पर्यंत राज्य केलें. त्यावेळीं त्याला त्याचा धाकटा भाऊ ध्रुव (धोंर) यानें पदच्युत करून व स्वत:स धारावर्ष, निरूपम, कलिवल्लभ हीं बिरूदें धारण करून गादी बळकावली. हा विशेष पराक्रमी होता; त्यानें दक्षिण व उत्तरेकडे स्वार्‍या करून पल्लव, चोल वगैरे बर्‍याच लहान सहान राजांना जिंकून आपले राज्य वाढविलें (७७०). याचा पुत्र गोविंद तिसरा हा या राष्ट्रकूटवंशांत सर्वांत शूर व प्रख्यात राजा झाला (८०३). यानें उत्तरेंत व दक्षिणेंत अनेक स्वार्‍या करून आणि बारा राजांनां जिंकून आपलें साम्राज्य पुष्कळच वाढविले; माळव्यापासून कांचीपर्यंत तें पसरलें होतें. त्यानें आपणास प्रभूतवर्ष, जगत्तुंग व वल्लभनरेंद्र हीं सम्राटदर्शक बिरूदें लाविली होती. यानें गुजराथच्या राष्ट्रकूट घराण्याकडून गुजराथ घेऊन वल्लभी राजांच्या गोध्रा प्रांतापर्यंत आपली हद्द सरकविली व पुढें थोडयाच वर्षांनीं वल्लभी घराणें नष्ट झाल्यावर साबरमतीपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला. कांही अरबी प्रवाश्यांच्या लेखांवरून सिंधच्या हद्दीपर्यंत याचें राज्य होते असें दिसतें. पण पुढें ही सत्ता टिकली नाहीं. विंध्याच्या पलीकडील मारावशर्वराजाहि त्याचा मांडलिक होता. पल्लवांनां त्यानें नामशेष केलें होतें. त्याचा धाकटा भाऊ इंद्र तिसरा यानें अनहिलवाडच्या चावडांपासून लाट देश जिंकून तेथें राष्ट्रकूट घराण्याची एक स्वतंत्र शाखा स्थापन केली (८१०). लाट म्हणजे मही व तापी-दुआब होय. गोविंदाचा पुत्र शर्व उर्फ नृपत्तुंग महाराज राजेश्वर अमोघवर्ष पहिला यानें कान्हेरी येथील लेणी कोरविलीं, त्यांत त्याचें नांव आहे. त्याची भक्ति जैनधर्माच्या दिगंबर-पंथावर होती व त्याचा गुरूहि जिनसेन नांवाचा जैन होता. जिनेसनाच्या गुणभद्र नांवाच्या शिष्यानें रचलेल्या उत्तरपुराणांत अमोघवर्षोचा उल्लेख आहे (८७८). याची कारकीर्द पुष्कळ मोठी (६२ वर्ष) झाली. अंग, वंग, मगध, मालव, वेंगी, विंगवेल्ली येथील राजांनी याचें मित्रत्व जोडलें. याचा पुत्र कृष्ण दुसरा उर्फ अकालवर्ष शुभतुंग हा राजा असतां, धारवाड व सौंदत्ती वगैरे भागांत जैनांनीं मंदिरें बांधली (९११). त्यानें मद्रासजवळील चिंगलपट, तंजावर, कांची वगैरे स्थळें घेतल्याचें आढळतें. कलिंग व मगध आणि गुर्जर, लाट व गौड राजे यांनां यानें जिकलें. त्रिपूरच्या कळूचुरी कोक्कल राजाची मुलगी महादेवी ही याची राणी होती. गुणभद्राचें उत्तरपुराण याच्या कारकीर्दीत संपले (८९८).

यापुढील कांही पुरूषांची माहिती फारशी आढळत नाही. अकालवर्षाचा पुत्र जगत्तुंग दुसरा यानें आपल्या लक्ष्मी नावांच्या (कोक्कलची नात) मामेबहिणीशी लग्न केलें. त्याला लक्ष्मी व गोविंदांबा या राण्यांपासून इंद्र चवथा आणि कृष्ण तिसरा व अमोघवर्ष दुसरा अशीं तीन मुलें झाली. बापाच्यानंतर प्रथम इंद्र हा नित्यवर्ष ही पदवी घेऊन गादीवर बसला. याची राणीहि कोक्कलच्या घराण्यांतीलच विजयांबा नांवाची होती. तिच्यापासून झालेला गोविंद चवथा हा पुत्र इंद्राच्या मागून गादीवर आला; याला नृपत्तुंग सुवर्णवर्ष व वल्लभनरेंद्र अशा पदव्या होत्या (९३३). हा वाईट मार्गांला लागून लवकर मेल्यानें याच्या पश्चात याचा दुसरा चुलता कृष्ण तिसरा हा राजा झाला. याच्या व अनहिलवाडच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक मूळराज यांच्या नेहमीं लढाया चालत यावेळी राष्ट्रकूटांची हद्द महीपर्यंत मागें हटली असावी. त्याच्या मागून त्याचा धाकटा भाऊ अमोघवर्ष दुसरा ऊर्फ वद्दिग हा राजा झाला. यानेंहि त्रिपूरच्या कोक्कल कलचूरी घराण्यांतीलच कुंदक देवीबरोबर लग्न केलें. याचा मुलगा खोट्टीग उर्फ नित्यवर्ष दुसरा हा पुढें गादीवर आला आणि त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ कृष्ण चवथा उर्फ कन्नर, निरुपम अकालवर्ष हा राजा झाला (९४५). याचा मुलगा नृपत्तुंग कक्क तिसरा उर्फ कक्कल, अमोघवर्ष वल्लभनरेंद्र हा या घराण्यांतील विसावा व शेवटचा राजा होय. याची मुलगी जोव्रब्ब उर्फ जाकला देवी ही पश्चिम चालुक्यराज तैल दुसरा यास दिली होती. याच तैलपानें सासर्‍यावर स्वारी करून त्याचें राज्य बुडविलें (९७३). माळव्याचा हर्ष परमार व मुंज परमार यांनी राष्ट्रकूट राजे दुर्बल झाल्यामुळे त्यांच्या राज्यावर स्वार्‍या केल्या त्यामुळें जास्तच अव्यवस्था माजली. दक्षिणेंत चोल व गंग यांनींहि बंडे उभारली. याचा फायदा घेऊन व पूर्वींचें वंशवैर आठवून तैलपानें कक्कल राष्ट्रकूटांचें साम्राज्य खालसा करून आपलें चालुक्य-साम्राज्य स्थापन केलें. याप्रमाणे राष्ट्रकूटांचे राज्य महाराष्ट्रावर सव्वा दोनशें वर्षे (७५०-९७३) चाललें होतें. यानंतरहि नागपूरकडे १०८७ पर्यंत चालुक्यांचें मांडलिक म्हणून राष्ट्रकूटांचे एक राज्य होतें असें सीताबडीच्या शिलालेखावरून दिसतें. तेथें याच सुमारास धाडीभंडक उर्फ धाडीअदेव हा राजा होता.

राष्ट्रकूट राजे फार प्रबळ व श्रीमंत आणि भाग्यशाली होते. त्यांच्या वेळीं कोरल्या गेलेल्या वेरूळच्या लेण्यारून याची उत्तम साक्ष पटेल. बौद्ध भिक्षूंसाठी लेणी कोरण्याची रीत मागें पडून यांच्या कारकीर्दीत हिंदु देवतांची मंदिरे व लेणी कोरण्यांत येऊं लागली. तेव्हांपासून शंकर, विष्णू यांचे महत्त्व सुरू होऊन ते उत्तरोत्तर वाढून त्यामुळें अनेक पंथ उद्भवले. आद्य शेकराचार्यांचा जन्म यांच्याच राजवटींत झाला. त्यानी बौद्धधर्माचा पाडाव केला; तरी पण जैनांचें संपूर्ण महत्त्व नाहीसें झालें नाहीं. राष्ट्रकूटांच्या साम्राज्यांत कित्येक मांडलिक आणि कांही वैश्य गृहस्थ दिगंबर जैन होते. राष्ट्रकूटांच्या आश्रयाखाली अनेक संस्कृत ग्रंथ लिहिले गेले. मात्र या वेळेचें संस्कृत वाङ्‌मय कृत्रिम, विचित्र व बोजड दिसतें. हलायुधाचें कविरहस्य, त्रिविक्रमभट्टाचें नलचंपू व मदालसाचंपू वगैरे ग्रंथ या वेळचेच आहेत. राष्ट्रकूटांचे एक राजचिन्ह गंगायमुना या नद्यांचें चित्र होतें तें प्रथम गुप्तांचें होतें, मग चालुक्यांचें आणि नंतर राष्ट्रकूटांचे झालें असे फ्लीट म्हणतो. यांच्या कांही ताम्रपटांवरून हे सोमवंशी यदुकुलोत्पन्न (यादव) होते असें दिसतें. बर्नेलच्या मतें हे द्रविड असावे तर फ्लीट व भांडारकर हे यांनां आर्य म्हणतात व त्याच्या संपादनार्थ राष्ट्रकूट शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या देतात.

मूलताईकडील राष्ट्रकूट. - या भागांत दुर्गराज, गोविंदराज, स्वामीकराज व नंदराज युद्धासुर (७०९) या राजांची नांवें आढळतात. यांचा संबंध मान्यखेटच्या मूळ घराण्याशीं कितपत होता तें समजत नाही.
लाटचे राष्ट्रकूट. - लाट देशांत तिसर्‍या इंद्र्रानें राज्य स्थापिलें. त्याला कर्क दुसरा उर्फ सुवर्णवर्ष (८१२) आणि गोविंद चौथा उर्फ प्रभूतवर्ष दुसरा (८२७) हीं दोन मुलें होतीं. त्यांनी त्याच्या मागें अनुक्रमानें राज्य केलें.

गुजराथचे राष्ट्रकूट. -यांत कक्कराज पहिला, त्याचा पुत्र ध्रुवराजदेव, त्याचा गोविंदराज व त्याचा कक्कराज २ रा (७५७) असे राजे झाले. मान्यखेटच्या तिसर्‍या गोविंदराजानें हें राज्य बुडविलें.
हस्तिकुंडीचे राष्ट्रकूट. - इ.स. ९७३ च्या एका अंकित लेखावरून हस्तिकुंडी येथें एक लहानसें राष्ट्रकूट घराणें होतें, व त्यांत हरिवर्मन, विदग्ध (९१६), मम्मट (९३९), दावल (९९७) व बालप्रसाद हे राजे झाले असें आढळतें. यांत दावल हा पराक्रमी होता; त्यानें मालवराज मुंजापासून मेवाडच्या राज्याचें व अनहिलवाडच्या मूलराजापासून धरणीवराह राजाचें रक्षण केलें होतें.

याखेरीज राजपुतान्यांत जी राठोडवंशीय राजघराणी आहेत; त्यांपैकी पुष्कळ घराणीं या महाराष्ट्रांतील राष्ट्रकूट वंशापैकी होत असे म्हणतात. चालुक्यांनी मान्यखेटचें साम्राज्य बुडविल्यावर त्या राजघरण्यांतील पुरूषांनी राजपुतान्यांत लहान लहान राज्यें स्थापिली. (इंडि. अँटि. १. २०५; बाँबे आर्किआलॉजिकल रिपोर्ट १८७८; आयंगार-एन्शन्ट इंडिया; स्मिथ-अर्लि हिस्टरी ऑफ इंडिया; माबेल डफ; बाँबे ग्याझे. भा. १ पु. २; नागपूर डिट्रिक्ट ग्याझे.)

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .