विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राक्षसतळ - हें सरोवर मानससरोवराच्या अगदी जवळ असून मानसपेक्षां अधिक उंचावर आहे. दहापंधरा वर्षांतून एखाद्या वेळेस ही दोन्ही सरोवरें पाऊस फार पडला असतां एकच होतात त्यावरून राक्षसतळ हा वर, मानससरोवर या वधूस भेटावयास जातो अशी लोकांची समजूत आहे असें कावागुची लिहितो. राक्षसतळास तिबेटी लोक 'लाकगल' असें म्हणतात.