विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रिसिना - इटलीमधील पिसेनम प्रांतांतील जुनें शहर हे पोटेंझा नदीच्या तीरावर असून मासेराटाच्या वायव्येस तीन मैलावर आहे. परटिनॅक्स व सेप्टिमिश्रस रोव्हरस यांनी हें शहर घेतल्यावर याचें नांव बदलेलें. ह्याचें दुसरें नांव ''कोलोनिआ हेलव्हिआ रेसिना पर्टिनॅक्स'' हें होय. हल्ली या शहरांत वस्ती नाही. जुनी स्नानकुंडें, नाटकगृहें इत्यादि इमारतींचे अवशेष या शहरांत पुष्कळ आहेत. पोटेंझावरच्या जुन्या पुलाचे अवशेष कोठें कोठें आहेत.