विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रिस्ले, सर हर्बर्ट होप (१८५१-१९११) - एक इंग्रज मानवशास्त्रज्ञ. १८७३ सालीं हिंदुस्थानच्या सिव्हिल सर्व्हिसमध्यें याला नोकरी मिळाली. ही नोकरी संभांळून यानें हिंदुस्थानांतील मानवंवशाचा व जातिभेदादि चालींचा सूक्ष्म अभ्यास केला व सरकारच्या मदतीने मोठमोठीं पुस्तकें प्रसिद्ध केलीं. १९०१ सालच्या हिंदुस्थानच्या खानेसुमारीकमिटीचा तो अध्यक्ष होता. १९१० साली इंडिया ऑफिसच्या न्यायदानकमिटीचा तो सेक्रेटरी झाला. १९०७ साली त्याला के. सी. आय. ईं. ही पदवी मिळाली.