विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रूद्रट - एक संस्कृत साहित्यशास्त्रज्ञ. याचें दुसरें नांव शतानंद होतें व याच्या बापाचें नांव भट्टवामुक होतें. याच्या पलीकडे याच्यासंबंधी इतर माहिती उपलब्ध नाहीं. काव्यालंकार नांवाचा याचा ग्रंथ उपलब्ध आहे. प्रो. पिशेलनें शृंगारतिलक ग्रंथ रूद्रटाचा आहे असें म्हटलें आहे पण तें सर्व पंडितांनां ग्राह्म नाही. रूद्रट हा ८ व्या शतकाच्या अखेरीस व दहाव्या शतकाच्या पूर्वपादाच्या दरम्यान झाला असावा असें म्हणतां येतें. रूद्रटाच्या ग्रंथावर नमि साधु यानें टीका लिहिली आहे. काव्यालंकारग्रंथांत नायकनायिकाविचार, शृंगारवीरादि रसांचें वर्णन इत्यादि विषय आले आहेत.