विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रूद्रप्रयाग - संयुक्तप्रांत, गढवाल जिल्ह्यांतील एक तीर्थस्थान. या स्थळी मंदाकिनी आणि अलकनंदा यांचा संगम झाला आहे. संगमापासून वर थोडया अंतरावर रूंद्रेश्वर नांवाचे शिवस्थान आहे. रूद्रप्रयागाचा महिमा केदारखंडांत सविस्तर वर्णिला आहे. या स्थलास कर्मक्षेत्र अशी संज्ञा आहे. केदारास जाणारे यात्रेकरू येथे उतरतात.