विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रूपबास - राजपुताना, भरतपूर संस्थानांतील रूपबास तहशिलीचें मुख्य शहर. जहांगीर बादशहाचें हें नेहमीचें शिकारीचे ठिकाण होतें. जवळच बलदेवाची दगडाची निद्रिस्थ मूर्ति आहे. ही मूर्ति २२॥ फूट लांब असून तीवर १६०९ साल कोरलेलें आहे. येथून ८ मैलांवर बन्सी पहाडपूरची प्रसिद्ध दगडाची खाण आहे.