प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रूमानिया:- हा देश आग्नेय यूरोपांत आहे. हा काळ्या समुद्रावर बाल्कन द्वीपकरूपाच्या ईशान्येस आहे. येथील लोकसंख्या सन १९२५ मध्यें सुमारें १७३९३१४९ होती. क्षेत्रफळ १२२२८२ चौरस मैल आहे. रूमानिया समुद्रकिनार्‍यापासून सुरू होतो व डोकें कापलेल्या अर्धचंद्राप्रमाणें त्याचा आकार आहे. याच्या आंतील भागाच्या सरहद्दीवर वापेंथियन पर्वताची ओळ आहे. याच्या पश्चिम भागाला ट्रॉन्ससिरव्हेनियन पर्वत म्हणतात. पूर्वेकडील सरहद्द प्रूथ नदीनें मर्यादित आहे. दक्षिणेस डान्यूब नदीच्या मुखानें व काळ्या समुद्रानें सरहद्द मर्यादित झाली आहे. या देशांतील नद्यांत डान्युब व तिला मिळणार्‍या ज्यू, ओत्ट, प्रूथ वगैरे नद्या मुख्य आहेत. डोब्रूजाखेरीज रुमानियाचा सर्व प्रदेश डान्यूब नदीच्या आसपास आहे. या प्रदेशांतील पृष्ठभाग पिंवळ्या मातीचा आहे. रूमानियाची हवा हिवाळ्यांत अतिशय थंड व उन्हाळ्यांत अतिशय उष्ण असते.


खनिज, शेती व धंदे--पेट्रोलियम, मीठ, पिंगट कोळसा हीं खनिज द्रव्यें येथें मोठया प्रमाणावर काढतात. २० व्या शतकाच्या आरंभी रूमानिया येथील पेट्रोलियम सर्व जगांत महत्त्वाचें होतें. तसेंच रूमानिया खनिज झर्‍यांकरितां प्रसिद्ध आहे. येथील जमीन सुपीक आहे व सुधारलेल्या पद्धतीनें लागवडीत आणली जाते. या कारणामुळें १९०० साली जगांतील धान्य पिकणार्‍या या सर्व देशांत रूमानियाचा तिसरा नंबंर होता. येथें मका व गहूं फार पिकतो. द्विदल धान्यांशिवाय बटाटे, बीट् व तंबाखू हीं येथील मुख्य पिकें आहेत. सन १९२४ मध्ये रूमानियामध्ये २४७१२१६७ एकर जमीन लागवडीखालीं होती. पेट्रोलियम शुद्ध करण्याचे कारखाने, लोखंड ओतण्याचे कारखाने, भट्टया, कांचेचे कारखाने, साखर शुद्ध करण्याचे कारखाने कागदाच्या गिरण्या वगैरे मुख्य धंदे आहेत. १९२३ सालीं रूमानियाची आयात-निर्गत अनुक्रमें १९७१२९४१, व २४३७२६७५ पौंड किंमतीची होती. धातू, यंत्रें, रेशीम, लोंकर, कापड, केस व कातडें हा आयात माल व पेट्रोलियम, इमारतीचे लांकूड हे बाहेर जाणारे पदार्थ होत.

जमाबंदी व दळणवळण.- राष्ट्राचे उत्पन्न आयात मालावरील कर, सार्वजनिक कामें, सार्वजनिक जमीन, प्रत्यक्ष व अप्रत्क्ष कर यांपासून आहे. राष्ट्राचें कर्ज, रक्षणाचा खर्च, सार्वजनिक कामें व शिक्षण या खर्चाच्या मुख्यबाबी आहेत. १९२५ साली रूमानियाचें ३ खर्च १॥। अब्ज ली उत्पन्न व २ खर्च ८॥ अब्ज ली खर्च होता व कर्ज ३०९९१२१०५३९ ली होतें. येथील मोठाल्या पेढया सरकारी आहेत. सन १८८९ मध्यें रूमानिया लॅटिन मोनेटरी युनियनला मिळाला व सोनें हें नाण्याचें प्रमाण ठरविलें. चांदी ५० ली पर्यंत ''लीगल टेंडर'' समजलें जातें. सोन्याचीं नाणी येथें चालतात. १९२० सालीं कागदी चलन रूमानियामध्यें सर्रास उपयोगांत येंऊं लागलें.

१८३० साली येथें हमरस्ते बांधण्यांत आले. १८६९ सालीं रूमानियांत प्रथम आगगाडी सुरू झाली. १९२० सालीं रूमानियामध्यें ७२४६ मैल आगगाडी रस्ता होता. ही सर्व सरकारच्या ताब्यांत आहे. त्याशिवाय डान्यूब व काळा समुद्र यांमध्यें जलमागांने दळणवळण सुरू असून त्यावरहि सरकारचाच ताबा आहे.

राज्यव्यवस्था.- सार्वत्रिक मत देणाच्या अधिकारानें निवडलेल्या सभेनें १८६६ सालीं चार्लस ओंच होबेनझोलेर्न सिगम्यारिंजन याला राजा निवडलें. याच सभेंनें एक राज्यव्यवस्थेचा मसुदा तयार केला व तोच कांही फेरफारानें अद्याप चालू आहे. होवेनझोलंर्न सिगम्यारिंजन या घराण्यांतच राजसत्ता चालू आहे. व गादीला कोणी पुरूष वारस नसला तर लोकांच्या प्रतिनिधींनीं राजघराण्यांतून राजा निवडतां येतो. येथील पार्लमेंटचे दोन भाग आहेत; एक सिनेट व दुसरा प्रतिनिधींची सभा. सीनेटचे सभासद ८ वर्षांकरितां व प्रतिनिधि सभेचे सभासद ४ वर्षांकरितां निवडतात. सीनेटचा सभासद ४० वर्षांच्या वर असला पाहिजे. गादीचा वारस, दोन मुख्य धर्माध्यापक, सहा कनिष्ठ धर्माध्यापक व दोन विश्वविद्यालयाचे रेक्टर हे अधिकरी म्हणून या सभेंत बसतात. प्रतिनिधींच्या सभेचे सभासद निवडण्याचा अधिकार वयांत आलेल्या प्रत्येक कर देणार्‍या मनुष्याला आहे. प्रतिनिधि २५ वर्षांपेक्षां कमी वयाचा नसला पाहिजे. पार्लमेंटने पास केलेला कायदा तात्पुरता धाब्यावर बसविण्याचा राजास अधिकार आहे. अंमलबजावण्याचा अधिकार मुख्य प्रधानाच्या अध्यक्षत्वाखालीं असलेल्या एका सभेस आहे. १९२३ सालीं रूमानियामध्यें जी नवीन राज्यघटना अंमलांत आली तीअन्वयें जंगल व भूम्यन्तर्भाग ही सरकारच्या मालकींची आहेत असें ठरलें. स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीनें रूमानियाचे ७३५ जिल्हे व ५८६४ तालुके पाडण्यां आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यावर एक कर वसुली करणारा अधिकारी व एक दिवाणी कोर्ट असतें.

लष्कर व आरमार.- लष्करी शिक्षण २१ ते २५ वर्षापर्यंत सक्तिचें व सार्वत्रिक आहे. प्रत्येक नागरिकाला खडया सैन्यांत २ वर्षे, राखीव सैन्यांत १८ वर्षे व शिबंदीमध्ये ९ वर्षे नोकरी करावी लागते. येथील सैन्याच्या सात कोअर आहेत. स. १९२४ च्या डिसेंबरमध्यें रूमानियांतील लष्कर १३५१८५ सैन्य व ११७३९ अधिकारी इतकें होतें. सन १९२२-२३ साली सैन्यावर होणारा खर्च १,७०,००,००,००० ली होता. रूमानियन आरमाराचे दोन भाग केले आहेत: एक डान्यूबकरितां असलेले; याचें मुख्य ठिकाण गलाट्झ आहे व दुसरें काळ्या समुदावर; याचें मुख्य ठिकाण कॉस्टंट्झा आहे. ग्लाट्झ येथें आरमारी शिक्षणाची शाळा आहे. येथील राजधर्म ऑर्थाडॉक्स चर्चचा आहे. तथापि धर्मस्वातंत्र्य सर्वांनां देण्यांत आलें आहे.

शिक्षण.- प्राथमिक शिक्षण सक्तीचें व मोफत आहे. जेथें शाळा आहेत तेथें ७ ते ११ दरम्यान वयाच्या मुलांस शिक्षण सक्तीचें करण्यांत येतें १९१८-१९ त प्राथमिक शिक्षणसंस्था ५७६४ व त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या ६९२८९६ होती. मध्यम शिक्षण देणार्‍या संस्था (सरकारी व खाजगी) १४२ असून त्यांत ५३ हजार विद्यार्थी होते. धंदेशिक्षणाच्या ७५ संस्था; व्यापाराच्या २५; शेतकीच्या २५ अशा संस्था होत्या. बुखारेस्ट, जासी, क्लूज, व सरनौटी येथें विश्वविद्यालयें आहेत. व त्यांत कायदा, तत्त्वज्ञान, शास्त्रीयविषय, वैद्यकी व ईश्वरशास्त्र या शाखा आहेत.

इतिहास.- इ. सनाच्या सहाव्या शतकापासून १२ व्या शतकापर्यंत रूमानियांत रानटी लोक, गॉथ, तार्तार, स्लाव्ह वगैरे लोकांच्या धाडी आल्या. तेराव्या शतकाच्या शेवटीं या देशांत ब्लॅच, स्लाव्ह व तार्तार लोकांची वस्ती होती. रूमानियाचे वॅलॅशिया व मॉलेव्हिया असे दोन भाग आहेत. सन १७७४ पर्यंत वॅलेशिया व मॉलँव्हिया यांचा स्वतंत्र निरनिराळा इतिहास आहे. यानंतर हे तुर्कसत्तेखाली येऊन येथें एकाच प्रकारची राज्यपद्धति असल्यामुळें, यांचा इतिहास १८५९ पर्यंत 'डान्यूबियन संस्थाने' या नांवाखाली येतो. १८५९ नंतर हे प्रांत एक होऊन रूमानिया या राष्ट्राची स्थापना झाली. हंगेरियांतून बरेच ब्लॅच लोक येऊन त्यांनीं लेशिया संस्थान वसविले; हें हंगेरी देशाचें मांडलिक होते. पुढें कांही दिवसांनी हें संस्थान तुर्क लोकांच्या वर्चस्वाखाली गेलें. सन १४०२ नंतर येथील राजे कधीं हंगेरीचे मित्र तर कधीं तुर्कंचे बगलबच्चे असत. इसवी सन १५९३ ते १६०१ या काळांत मायलेक नांवाचा राजा झाला. हा शूर असून यानें तुर्कांचा पराभव करून स्वंतत्र तर्‍हेनें राज्यकारभार केला. परंतु त्याच्यानंतर पुन्हा तुर्क लोकांच्या वर्चस्वाखाली वॅलेशियाचा कारभार गेला. सन १७१९ नंतर तर राज्याची जागा स्तंबुल येथें जो मनुष्य जास्त पैसे देंऊं करी त्याला दिली जात असें. या देशावरील आपला ताबा अबाधित रहावा म्हणून तुर्कांनी डान्यूब नदीच्या कांठावरील कांही किल्ले व त्यांच्या सभोंवतालच्या प्रदेश आपल्या ताब्यांत ठेविला होता. सन १७६९ त हें संस्थान रशियन सरदाराच्या ताब्यांत गेले. महाजन लोकांनीं एक शिष्टमंडळ रशियाच्या राणीकडे पाठविलें; तेव्हां देशाच्या स्वतंत्रतेबद्दल हमी देण्यांत आली. तुर्कस्तानच्या सुलतानानें रशियाशीं बोलणें सुरू केलें, तेव्हां बॅलेशिया व मालेव्हिया या संस्थानांस स्वातंत्र्य द्या अशी अट घालण्यांत आली. शेवटी सन १७७४ मध्यें कुचुक केनार्जीच्या तहान्वयें येथें तुर्कांचा अंमल सुरूं झाला.

बॅलेशियाप्रमाणेंच मोल्डेव्हिया संस्थान सुध्दां, हंगेरींतून आलेल्या व्लॅच लोकांनी १४ व्या शतकाच्या पहिल्या अर्धांत बसविलें. सन १३७२ पर्यंत मोल्डेव्हियाचा राजा हंगेरीचा मांडलिक समजला जात असे. परंतु या संस्थानावरील वर्चस्वाबद्दल पोलंड व हंगेरी या देशांत तंटा होऊन असें ठरलें कीं, तुर्कांनी त्या देशावर स्वारी केली तर हंगेरी व पोलंड यांच्या सैन्यांनीं तुर्कांनां घालवावें व मोल्डेव्हिया या दोघांनी वांटून घ्यावा. इ. स. १४५८ ते १५०४ पर्यंत मोल्डेव्हियांत, स्टिफन दि ग्रेट हा राज्य करीत होता. याच्या कारकीर्दीत तुर्क, पोल व हंगेरियन या लोकांचीं मोल्डेव्हियांत डाळ शिजत नाही इतकेंच नाहीं तर, त्यानें तुर्क व पोल यांच्या स्वार्‍या, त्यांचा पूर्ण मोड करून परतविल्या व पोलंडचा पोकुशिया नांवाचा प्रांत आपल्या राज्याला जोडला. स्टिफननंतर त्याचा मुलगा तिसरा बोगडन हा गादीवर आला. याच्या कारकीर्दीत मोल्डेव्हिया तुर्कांचे मांडलिक संस्थान झाले. मोल्डेव्हियाला तुर्कांनां खंडणी द्यावी लागत असे. त्याबद्दल तुर्कांनीं त्याच्या राज्यव्यवस्थेंत अगर धर्मांत ढवळाढवळ न करण्याची हमी दिली. मॉल्डेव्हियावरील आपला ताबा अबाधित रहावा, म्हणून तुर्कांनी मॉल्डेव्हियांतील कांही किल्ले आपल्या ताब्यांत ठेविले. पुढें त्यांनी खंडणी वाढविली; सोळाव्या शतकाच्या मध्यंतरी तर मॉल्डेव्हियाला तुर्कांचें जूं इतकें असह्म झालें कीं, त्यामुळें इलियस राजाला (१५४६-५१) मुसुलमान व्हावें लागलें. १५६१ सालीं हंगेरीच्या साहाय्यानें व तुर्कस्तानला लांच देऊन जेकब बसिलिकस नांवाचा तोतया मॉल्डेव्हियाच्या गादीवर बसला; परंतु १५६३ साली तेथील लोकांनी बंड करून त्याचा खून केला व पुन्हां पूर्वीचेंच राजघराणें गादीवर आलें. तुर्कांचें वर्चस्व पूर्वीप्रमाणेंच चालू होतें. इ. स. १५७३ साली जॉन राजानें तुर्कांविरूद्ध बंड केलें, परंतु त्यांत त्याचा मोड होऊन तो मारला गेला. १६०० सालीं बालेशियाचा राजा मायकेल यानें मॉल्डेव्हिया जिंकला, परंतु त्याच्या मरणानंतर पोलंडनें तेथें आपलें वर्चस्व स्थापिलें. १६१८ सालीं तेथें पुन्हां तुर्कांचें वर्चस्व सुरू झाले, व बालेशियाप्रमाणेंच येथेहि दर तीन वर्षानीं जास्त खंडणी देणाराला येथील राजा करीत असत. इ.स. १६३४ साली बसिल दि वुल्फ राजा गादीवर आला व त्यानें मॉल्डेव्हियांत बरीच सुधारणा केंली. पुढें पोलंड व तुर्कस्तान यांच्यातील युद्धामुळें मॉल्डेव्हियाचें बरेंच नुकसान झाले. इ.स. १७११ सालीं मॉल्डेव्हियाचा राजा कॅंटेमिर हा तुर्कांच्या जुलमाला कंटाळून रशियाच्या आश्रयाखाली गेला, परंतु तुर्कांनी त्याचा पराभव केल्यानें कॅंटेमिरला रशियांत पळून जाणें भाग पडलें. यानंतर १७७४ पर्यंत मॉल्डेव्हियाचें राज्यपद, तुर्कस्तानला जास्त खंडणी देणार्‍याला दिलें जात असे; व बहुधां हे श्रीमंत ग्रीक लोक असत. रूसो-तुर्की युद्ध संपविणार्‍या कुचुक कैनाजींच्या तहान्वयें स. १७७४ नंतर मॉल्डेव्हियाचा कारभार चालू लागला. १७७४ सालीं कुचुकच्या तहांत असें ठरलें कीं, मॉल्डोव्हिया व बालेशिया ही संस्थानें तुर्कस्तानचीं मांडलिक रहावी. परंतु त्यांनां चवथ्या महंमदाच्या वेळी जे हक्क होते तेच असावे, व त्यांनी द्यावी लागणारी खंडणी कमी करून दोन वर्षेंपर्यंत ती माफ करावी. पुढें तुर्कस्तान जेव्हां पूर्वीप्रमाणे सुलतानी गाजवूं लागलें तेव्हां इ.स. १७८३ सालीं पुन्हां रशियानें मध्यस्थी करून या दोन संस्थानांचे हक्क व खंडणी ठरवून टाकली. तरी सुद्धां तुर्कस्तान या संस्थानांतील राजाला वरच्यावर गादीवरून काढून नजराण्याच्या रूपानें त्याच्या जवळून पैसे उकळीत असे. शेवटीं इ. स. १८०२ सालीं पुन्हां रशियानें तुर्कस्तानजवळून असा करार करून घेतला कीं, गादीवरून काढण्यास कारणें आहेत अशी रशियाच्या प्रतिनिधीची खात्री केल्याशिवाय, कोणत्याहि राजाला सात वर्षांच्या आंत गादीवरून काढूं नये; महाजन व राजा यांनी सैन्याचा खर्च द्यावा; व तुर्कस्तानच्या दरबारीं असलेल्या रशियाच्या प्रतिनिधींने या दोन संस्थानच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवावी. इ. स. १८०४ मध्यें रशिया व तुर्कस्तान यांच्यामध्यें लढाई झाली, तींत रशियास जय मिळाला. त्यांनी मॉल्डेव्हिया व बालेशिया ही संस्थानें आपल्या ताब्यांत घेतली व तेथील राज्यव्यवस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, वगैरे लोकांच्या मंडळातर्फे चालू केली. परंतु इ. स. १८१२ सालीं पुन्हां पूर्वीच्याच अटीवर हीं दोन संस्थानें तुर्कस्तानला दिलीं परंतु त्यांतील बेसरेबियाप्रांत रशियाला दिला. पुढें या दोन संस्थानांत बरीच एकी होऊन गुप्त मंडळ्यांची स्थापना होंऊ लागली. असल्या मंडळ्यांत ''हेटेरिया'' नांवाची संस्था मुख्य होती. १८२१ त मॉल्डेव्हियाचा राजपुत्र अलेक्झांडर इप्सिलंटी यानें हेटेरियन संस्थेताल लोकांचे सैन्य जमवून तुर्कस्तानच्या विरूद्ध बंड उभारलें. यानें लोकांनां अशी थाप मारली कीं, आपल्याला रशियाच्या राजाचें पाठबळ आहे. पण अलेक्झांडरचा तुर्क सैन्यानें पुरा मोड केला. इ. स. १८२६ त अक्केरमन येथें झालेल्या रशिया व तुर्कस्तान यांच्यामधील तहानें या दोन संस्थानांचे हक्क ठरविण्यांत आले. पुढें इ. स. १८२९ त आड्रियानोपलच्या तहानें ते कायम करण्यांत आले. या तहानें डान्यूब नदीच्या डाव्या किनार्‍यावरील सर्व शहरें तुर्कस्ताननें संस्थानांनां परत देण्याचे कबूल केलें; बालेशियाच्या बाजूच्या नदीच्या किनार्‍यावर तटबंदी न करण्याचें तुर्कस्ताननें कबूल केलें व तुर्कस्तान आपली वचनें पूर्ण करीपर्यंत रशियाचें सैन्या या संस्थानांत रहावें व रशियाच्या देखरेखीखाली बिशप व महाजन यांच्या मंडळानें ठरविलेल्या ''र्ऑग्यानिक लॉ'' प्रमाणे या संस्थानांची अंतर्गतवस्था चालावी असें ठरलें. ही व्यवस्था इ. स. १८३४ त तुर्कस्ताननें मान्य केली, तेव्हां रशियाचें सैन्य या संस्थानांतून गेलें. इ. स. १८३४ पासून १८४८ पर्यंत ही संस्थानें रशियाच्या वर्चस्वाखाली होती. इ. स. १८४८ च्या राज्यक्रांतिकारक चळवळीची लाट हंगेरीतून या संस्थानांत आली. या चळवळीचा उद्देश रशियाचें वर्चस्व कमी करण्याचा होता. परंतु रशिया व तुर्कस्तान यांनी ''आर्ग्यानिक लॉ '' जबरदस्तीनें चालू ठेविला (१८४९).

इ. स. १८५६ च्या पँरिसच्या तहांत ठरलें की, हीं दोन संस्थाने तुर्क साम्राज्यांत रहावी, व त्यांच्या असलेल्या हक्काबद्दल यूरोपांतील बलाढय राष्ट्रांनी हमी घ्यावी; बेसरेबियाची एक पट्टी मॉल्डेव्हियाला परत द्यावी, या दोन संस्थानांच्या कायद्याची फेरतपासणी एका यूरोपांतील मंडळाकडून व्हावी व त्या मंडळाला या दोन संस्थानांच्या प्रतिनिधिसभेनें मदत करावी; परंतु या प्रतिनिधिसभेंनें या दोन संस्थानांचे एकीकरण व्हावें असें एकमतानें ठरविलें. स. १८५८ त पॅरिस येथें भरलेल्या यूरोपांतील लोकांच्या सभेनें असें ठरविलें कीं, या दोन संस्थानांचा कारभार वेगवेगळ्या राजांनीं पहावा व त्याच्या वेगवेगळ्या प्रतिनिधिसभा असाव्या. दोन्ही संस्थानांच्या हिताचे कायदे मध्यवर्ती कमिशननें करावेत (त्यांनां दोन्ही प्रतिनिधिसभांनी संमति दिली तर ते करावेत). स. १८५९ त दोन्ही संस्थानांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणीं जमले परंतु दोन्ही सभांनी अलेक्झांडर यालाच राजा निवडले. अशा रीतीनें या दोन संस्थानांचे एकीकरण होऊन त्याला रूमानिया असें नांव प्राप्त झालें. या एकीकरणास यूरोपांतील राष्ट्रांची संमति मिळाली. इ. स. १८६२ पर्यंत दोन प्रतिनिधिसभा होत्या व एक मध्यवर्ती कमिशन होतें. १८६२ त एकच प्रतिनिधिसभा बुखारेस्ट येथें भरली व दोन संस्थानांकरिता एकच प्रधानमंडळ नेमण्यांत आले व मध्यवर्ती कमिशन मोडण्यांत येऊन त्याच्याबद्दल ''कौन्सिल ऑफ स्टेट'' ही संस्था स्थापण्यांत आली. इ. स. १८६४ त सिनेट सभा व प्रतिनिधिसभा अशा दोन सभा स्थापण्यांत आल्या. म्हणून इ. स. १८६६ त अलेक्झांडरला पदच्युत करण्यांत येऊन त्याच्या जागी कॅरोलचा राजा म्हणून निवड करण्यांत आली. त्यानें तुर्कस्तानचे मांडलिकत्व कबूल करून राज्यपद स्वीकारलें. इ. स. १८६६ त राज्यव्यवस्थेची नवीन रचना करण्यांत आली, प्रतिनिधिसभेचे वरिष्ठ व कनिष्ठ असे भाग करण्यांत येऊन राजाला कोणताहि कायदा अनियंत्रितपणें रद्द करण्याचा अधिकार देण्यांत आला.

इ. स. १८७६ त रूसो-तुर्की युद्धास सुरवात झाली व त्या युद्धाचा शेवट आड्रियानोपल तहानें झाला. त्या तहानें असें ठरलें कीं, रूमानियाला स्वतंत्रता मिळून राज्यवृद्धीला मोकळीक असावी. इ. स. १८७८ त रशियानें रूमानियाच्या ताब्यांत असलेला बेसरेबियाच्या भागाचा ताबा आपल्याकडे घेतला व या प्रदेशाचा मोबदला म्हणून तुर्कांचे डोब्रुजा व डान्युब नद्यांच्या मधील प्रदेश रूमानियाला मिळाला. या प्रश्राचा निकाल बर्लिन येथे राष्ट्रांची सभा भरून तिनें असा लावला की रूमानियानें १८५६ च्या पॅरिसच्या तहान्वयें मिळविलेला बेसअरेबियाचा भाग रशियाला द्यावा, रूमानियांतील लोकांनां धार्मिक स्वातंत्र्य असावें; डान्यूब नदीच्या बेचक्यांतील प्रदेश व डीब्रुजाप्रांत रूमानियाला मिळावा व या सर्व अटींबद्दल रुमानियाचें स्वातंत्र्य सर्वसामान्य असावें. या अटींबद्दल रूमानियांत बरीच खळबळ उडाली. परंतु शेवटीं त्या मान्य होऊन १८८० त रूमानियाचें स्वातंत्र्य सर्व राष्ट्रांनी कबूल केलें. इ. स. १८७८ च्या युद्धानंतर रूमानिया व रशिया हे एकमेकाबद्दल जळफळत होते. त्याचप्रमाणें आस्ट्रिया व रूमानिया यांच्यामध्यें, डान्यूब नदीवर जहाजें चालविण्याच्या हक्काबद्दल व रूमानियांतील लोकांच्या रूमानियाबाहेरील हक्काबद्दल लढा उत्पन्न झाला. इ. स. १८९८ त रूमानियाचा कॅरोल राजा आस्ट्रिया-हंगेरीच्या सम्राटाला व रशियाच्या झारला भेटला. त्या मुलाखतीमुळें या राष्ट्रांतील आपापसांतील बेबनाव मिटला असें म्हणण्यास कांही हरकत नाही. इ. स. १९०७ त रूमानियांत शेतकरी लोकांनी बंड केले. जमीनदार लोकांचा शेतकर्‍यांवरील जुलूम हें या बंडाचे मुख्य कारण होतें. पुढे लवकरच हें बंड मोडलें गेलें; व शेतकर्‍यांची गार्‍हाणीं ऐंकून त्यांच्यावरील जुलूम नाहींसा करण्यांत आला. बाल्कन द्वीपकल्पांतील बदलामुळें रूमानियाचें कांही नुकसान झालें नाही, परंतु पुढे मॅसिडोनियांतील प्रश्रामुळें इ. स. १९१० त रूमानियाचा तुर्कांशी बेवनाव झाला, व याच कारणामुळें ग्रीस व रूमानिया यांच्यांतील स्नेहभावांत फरक पडला (१९०५, १९०६ व १९१०).

सन १९११ त सुरू झालेल्या बाल्कन युद्धामध्यें रूमानिया तटस्थ होता. १९११ सालीं रूमानियाच्या धर्मखात्यामध्यें बर्‍याच महत्त्वाच्या सुधारणा घडून आल्या. याच वर्षी कार्प हा रूमानियाचा प्रधान झाला. याच्या कारकीर्दींत अनेक भानगडीचे प्रश्र उपस्थित झाले. सार्वत्रिक मतदानाचा प्रश्र चर्चेला निघून त्याच्यावर बराच वादविवाद झाला पण त्यांतून निष्पन्न कांहींच झालें नाही. कार्पने आपल्या कारकीर्दीत शेतकर्‍यांची स्थिति सुधारण्याचें व लष्करी खात्यामध्यें सुधारणा करण्याचें काम केलें. पुढें दुसर्‍यांदा बाल्कन युद्धास सुरवात झाली. या युद्धामुळें बाल्कन राष्ट्रें सामर्थ्यवान होतील व त्याचा परिणाम पुढें मागें रूमानियाला भोगावा लागेल अशा भीनीने रूमानियानें ऑस्ट्रिया-हंगेरीशी अपमानास्पद सख्यत्व पत्करून बाल्कन राष्ट्रांचे सामर्थ्य कमी करण्याचा प्रयत्‍न केला. बल्गेरियानें रूमानियाशीं तहाची वाटाघाट केली पण तीत त्यास फारसें यश आलें नाही. शेवटी लंडन येथें या दोन्ही राष्ट्रांतील प्रतिनिधींमध्ये अधिक वाटाघाट होऊन सिलिस्ट्राचा प्रदेश रूमानियाला मिळाला. तथापि एवढयानें रूमानियांतील लोकांचें समाधान न झाल्यामुळें बल्गेरियाविरूद्ध रूमानियानें लढाई पुकारावी अशी चळवळ सुरू झाली. इतक्यांत बल्गेरियानें सर्व्हियावर अकस्मात स्वारी केल्यानें रूमानियानेहि बल्गेरियावर व डान्यूबच्या इतर भागांत सैन्य पाठविले; तेव्हां बल्गेरिया तहाला तयार झाला. या तहान्वयें रूमानियाला डोब्रझाचा प्रदेश व मॅसिडोनियांतील रूमानियन लोकांच्या संरक्षणासाठी जादा हक्क प्राप्त झाले. १९१४ सालीं ऑस्ट्रियानें सर्व्हियाशीं युद्ध पुकारलें व महायुद्धाचा वणवा पेटला. रूमानिया आपल्या बाजूला येऊन मिळणार अशी आस्ट्रियाला खात्री वाटत होती. पण या सुमारास रूमानियांमध्यें लिबरल पक्ष अधिकारारूड झाला होता व रूमानियांतील जनता ऑस्ट्रियाच्या या साहसी कृत्याला अनुकूल नव्हती. तथापि महायुद्धाच्या आरंभीच्या काळांत रूमानियानें ताटस्थ्याचें धोरण पतकरलें. पण ज्यावेळीं जर्मनीचा पॅरिसवरील हल्ला फसला त्यावेळी रूमानियानें कोणत्या बाजूनें युद्धांत पडावे याविषयीं पुन्हां चर्चा सुरू झाली. तथापि ब्रॅटिनो प्रधानानें सुमारें एक वर्षभर कोणत्याच बाजूने रूमानियानें युद्धांत न पडण्याविषयीं खबरदारी घेतली होती. शेवटी १९१५ साली इटलीनें दोस्तांच्या बाजूनें युद्धांत भाग घेतल्यामुळें हा प्रश्र निकरावर येऊन ठेपला. याच सुमारास जर्मनीनें, तुर्कस्तानकडे आपला दारूगोळा रूमानियांतून नेण्याबद्दल परवानगी मागितली पण ती रूमानियानें दिली नाही. तेव्हां रूमानियावर जर्मनी व आस्ट्रियाचा कोप झाला, याच सुमारास रशियानेंहि रूमानियाला निकड लावल्यामुळें रूमानियानें दोस्तांच्या बाजूनें लढाईंत पडण्याचे जाहीर केले. प्रथमत: ऑस्ट्रियाच्या सैन्याविरूद्ध रूमानियाच्या सैन्याला जय मिळत गेले. तथापि जर्मनीनें आपलें सैन्य आस्ट्रियाच्या मदतीला पाठवतांच रूमानियन सैन्याला अपजय मिळण्यास सुरवात झाली, व रूमानियाचें संरक्षण करण्याचीच जबाबदारी सैन्यावर येऊन पडली. मारासेस्टी येथें झालेल्या भयंकर लढाईंत रूमानियाचा मोठा पराभव झाला; व जर्मनीनें घातलेल्या उपमर्दकारक अटी मान्य करणें रूमानियाला भाग पडलें. तशांतच रूमानियातील आर्थिक परिस्थिती फार बिघडल्यामुळें रूमानियाला १९१६ साल फार हलाखीचें गेलें. जर्मनीला जय मिळण्याची चिन्हें दिसूं लागली, त्यामुळे बरेचसे लोक रूमानिया सोडून परदेशीं जांऊ लागले बोल्शेव्हिक चळवळीचा जनतेच्या मनावर परिणाम होऊं लागला. अशा भयंकर परिस्थितींत रूमानियांतील कर्त्या पुरूषांनीं नेट धरून मोडक्या थोडक्या सैन्याची संघटना करून, छोटे छोटो ग्रामसंघ निर्माण करून आलेल्या संकटाला तोड दिलें. १९१९ च्या फेब्रुवारीत बेसरेबिया व रूमानिया यांचें एकीकरण झाले. तथापि जर्मनीच्या प्रबळ लष्करापुढें रूमानियाचे कांही चाललें नाही. पण थोडक्याच काळांत जर्मनीला फ्रान्सच्या रणक्षेत्रावर माघार घ्यावी लागल्यामुळें ही स्थिति पालटावयास लागली. रूमानियामध्यें तात्पुरतें लिबरल पक्षाचें प्रधानमंडळ स्थापन झालें. बुकोबिना व ट्रान्सिल्व्हानिया यांचे व रूमानियाचें पुन्हां एकीकरण झालें. जर्मनीचा पुरा पराभव होऊन व्हर्सेलिसच्या तहानें रूमानियाला पुन्हां त्याचा प्रदेश मिळाला व अलेक्झांडर व्होएवॉडच्या नेतृत्वाखालीं संयुक्त प्रधानमंडळ स्थापन झालें. त्या मंडळानें रूमानियाचा राज्यकारभार पुन्हां पूर्वीप्रमाणें चालू केला. १९२२ सालीं झालेल्या निवडणुकींत लिबरलपक्ष मताधिक्यानें निवडून आला व जॉन ब्रॅटियानी हा रूमानियाचा प्रधान झाला.

यावेळी रूमानियाची धार्मिक परिस्थिति फार बिघडली होती. नवीन राजाच्या राज्यभिषेकोत्सवाच्या वेळी भलताच खर्च करण्यांत आल्यामुळें प्रजेची मनें फारच असंतुष्ट झाली होती, त्यामुळें राजाचा खून करण्याचा गुप्त कट करण्यांत आला, पण तो उघडकीस आला. हंगेरीवर, ट्रियननच्या तहाप्रमाणें, हंटर अलाइड मिलिटरी कमिशन शस्त्रसंन्याशाची अट लादूं शकलें नाही, यामुळें रूमानियाला हंगेरीची भीति वाटत होती. खुद्द रूमानियांत लांचलुचपतीचे प्रकार राजरोस घडून येत होते. फ्रान्सनें रूमानियाला, पोलंड व जुगोस्लाव्हियाच्या नंतर कर्ज देऊं केलें यामुळे रूमानियाने तें पत्करलें नाहीं. फ्रान्ससंबंधी रूमानियाची दृष्टि कलुषित झाली होती. तथापि १९२४ सालीं फ्रान्स व रूमानिया या राष्ट्रंमध्ये, संरक्षक स्वरूपाचा तह घडून आला. १९२४ सालीं सरकारी अधिकारी, व इतर पार्लमेंटमधील सभासद इत्यादिकांनां मारण्यासाठीं अस्तित्वांत आलेला विद्यार्थ्यांचा प्रचंड कट उघडकीस आला. व्हसेंलिसच्या तहाप्रमाणे जर्मनी रूमानियाशी वागला नाहीं यामुळें स. १९२५ च्या फेब्रुवारीपासून रूमानियानें जर्मनीशी असलेला व्यापारसंबंध तोडून टाकला.

भाषा व वाङ्‌मय, भाषा:- रूमानियन भाषा ज्या भागांत स्लाव व मग्यार भाषांचे वर्चस्व आहे अशा भागांतील एका लहानशा टापूंत प्रचलित आहे. वास्तविक ती रोमान्स भाषावर्गांतील भाषा आहे; तथापि इतर रोमान्स भाषावर्गाच्या केंद्रापासून ती स्थानदूरत्वामुळें अलग झालेली आहे. ही भाषा रूमानिया, ट्रान्सिल्व्हानिया, बुकोव्हिना, बनत, बेसरेबिया व सर्व्हिया व बल्गेरियाचा कांही भाग इत्यादि ठिकाणी बोलली जातें. या भाषेचे मॅसेडो रूमानियान व ईस्ट्रो रूमानियान असे दोन भेद आहेत. ओएरिया व डेशिया या रोमन प्रांतांत जी लॅटिन भाषा बोलण्यांत येते तिच्यावर स्लाव्हॉनिक भाषेचा परिणाम होऊन जी भाषा बनली ती रूमानियन भाषा होय असें म्हणावयास हरकत नाहीं. भाषेच्या घटनेच्या दृष्टीनें देखील रूमानियन भाषेंत अद्यापि लॅटिन व्याकरणाचींच तत्त्वे गृहीत धरली आहेत. तथापि या भाषेंतील शब्दकोशांत स्लाव्हॉनिक शब्दांचीच संख्या अधिक आहे. साधारणत: दर दोन लॅटिन शब्दांस तीन स्लाव्हॉनिक शब्द हे प्रमाण पडतें. तसेंच तुर्की, ग्रीक, मग्यार वगैर भाषांतील बरेच शब्द या भाषेंत आलेले आहेत. तथापि या भाषेंत जे लॅटिन शब्द आहेत ते मात्र इतर रोमान्स भाषांतील लॅटिन शब्दांप्रमाणें विकृत स्थितींत आढळत नाहींत. उदा. डोमिना (लॅटिन), गृहिणी, डोम्ना (रूमानिया), डोन्ना (इटली), डोना (स्पेन व पोर्तुगाल), डाम (फ्रेंच) तसेंच रोमन पूर्वकाळांत ज्याप्रमाणे लॅटिन भाषेंत लॅटिन लिपीच वापरण्यांत येते. स्लाव्हॉनिक अक्षरांच्या उच्चारानुरूप नवीन अक्षरें योजण्यांत येतात. 'ई' शिवाय इतर सर्व अनुच्चारित स्वरांचा इटालियन भाषेंतील स्वराप्रमाणेंच उच्चार करण्यांत येतो. रूमानियन भाषेत प्रत्ययांची समृद्धि आहे. नामें चालविण्याचे दोन प्रकार आहेत; सहा विभक्त्या आहेत. बरेच शब्द एकवचनांत पुल्लिंगी व व अनेकवचनांत स्त्रीलिंगी चालतात. लॅटिनप्रमाणेच क्रियापदांचेहि तीन प्रकार आहेत.

वाङ्‌मय:- रूमानियन वाङ्‌मयाचे कालदृष्टया तीन भाग पाडतां येतात ते असे:-(१) स्लाव्हॉनिक वर्चस्वाचा काल (१५५०-१७१०), (२) ग्रीक वर्चस्वाचा काल (१७१०-१८३०) व (३) अर्वाचीन काळ (१८३०-१९००).
पहिला काल (१५५०-१७१०) :-इतर सर्व वाङ्‌मयाप्रमाणेंच रूमानियन वाङ्‌मयाचाहि प्रारंभ बायबलच्या भाषांतरापासूनच होतो. रुमानियन जी अगदीं जुनीं बायबलची भाषांतरें दृष्टीस पडतात तीं सर्व स्लाव्हॉनिक बायबलची शब्दश: भाषांतरें आहेत. डायाकोनस कोरेसीनें १५७७ साली प्रथमत: ' अ‍ॅपोसल' चा कांही भाग रूमानियन भाषेंत भाषांतरिला. १५८२ सालीं जुन्या करारांतील ऐतिहासिक भागांचे पॅलिया या नावाखाली भाषांतर करण्यांत आलें. १५८२ सालापासून तों १६५० पर्यंत जरी स्लाव्हॉनिक भाषेचाच रुमानियन वाङ्‌मयावर पगडा दिसत होता तरी स्वभाषेच्या सुधारणेची कल्पना रूमानियनांनां येऊ लागल्याची चिन्हें दिसत होतीं. १६४८ सालीं ट्रान्सिल्व्हानियामध्यें प्रथमत: नव्या कराराचें रूमानियन भाषेंत संपूर्ण भाषांतर प्रसिद्ध झालें. हें भाषांतर हियेरेमोनाक सिल्व्हेस्टर यानें केलें होतें व या त्याच्या भाषांतराच्या साहाय्यानें, कंटोकूझेने, प्रेझेनू, अँथीम इत्यादि लेखकांनीं बायबलचीं भाषांतरें केलीं. १६८८ सालीं रादूग्रेझेनू यानें बायबलचें संपूर्ण भाषांतर रूमानियन भाषेंत प्रसिद्ध केलें. धार्मिक वाङ्‌मयाप्रमाणेंच या काळी नीतिविषयक वाङ्‌मयहि बरेंच निर्माण झालें. विशेषत सुभाषितें, साधूंची चरित्रें इत्यादिसंबंधीं बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले. सुभाषितसंग्रहामध्यें फ्लेरोरा दारूरिलॉर, दि इनव्हा टॉट्ररी क्रेस्टीनेस्टी (१७००), आयोनचें काररेप्रेस्कुर्ट (१६८५), वसार्वाचें 'मिरर ऑफ किंग्ज' ही प्रसिद्ध आहेत. साधूंच्या चरित्रांपैकी दि व्हिएटिले स्पिटीलॉर हें चरित्र डोसीथ्यूनें लिहिलें असून ते फार चांगलें आहे. १६४० साली रूमानियन भाषेंत, मोक्सा नांवाच्या इतिहासकारानें कायद्यासंबंधीचें पुस्तक प्रसिद्ध केलें. १६५२ त इंद्रेपटारिया लेजी हे कायदेकोड प्रसिद्ध झालें व तेंच १८७६६ पर्यंत सर्वसमंत होतें. या ग्रंथाचे लेखक, युरिल, नास्टयूरेल व डॅनिइ पानोनीआनुल हे होत. इतिहासविषयक ग्रंथांमध्यें 'दि क्रॉनिकल ऑफ कपिटनल', फांटेमीरचे 'शेनिकूल मोल्डो ब्लाहि ओर' इत्यादि प्रमुख आहेत.

द्वितीयकाल (१७१०-१८३०) :- द्वितीय कालाच्या प्रारंभापासून रूमानियन वाङ्‌मयावर रोमन कॅथालिक पंथाच्या वाङ्‌मयाची छाप पडण्यात सुरवात होते. लॅटिन भाषेकडे रूमानियनांचें लक्ष्य वेधून, स्लॉव्ह लोकापासून त्यांनां दूरचे भासविण्याचा प्रयत्‍न करणें इत्यादि अनेक मार्गांनीं रूमानियन लोकांना आपल्या धर्माकडे आणण्याचा रोमच्या धर्मगुरूंनी प्रयत्‍न केला. त्याला बर्‍याच काळांनंतर जरी थोडें फार यश आलें तरी त्याचा वाङ्‌मयविषयक चळवळीवर मात्र इष्ट परिमाण झाला नाहीं. १७ व्या शतकाच्या अखेरच्या काळांत स्लॉव्हानिक लिपीचें उच्चाटण होऊन रूमानियन लिपि रूढ झाली होती. त्यामुळें महत्त्वाचे धर्मविषयक ग्रंथ रूमानियन भाषेंत प्रसिद्ध होऊं लागले. केसराई व फिलरेट या दोघां बिशपांनी लिहिलेला मिनेइयू हा १२ भागांचा ग्रंथ १७७६-८० या कालांत प्रसिद्ध झाला. याशिवाय या कालांत अनेक नीतिविषयक ग्रंथहि बरेच निर्माण झाले. कायदेवाङ्‌मयांत १७८० साली प्रिन्स प्सिलंती याच्या आश्रयाखाली प्रसिद्ध झालेला बलचियन कायदेसंग्रह हा प्रमुख होय. त्याशिवाय डोनीसी यानेंही ग्रीक भाषेतील 'बॅसिलिका' ग्रंथाच्या आधारानें एक कायदेसंग्रह प्रसिद्ध केला व तोहि महत्त्वाचा आहे. द्वितीय काळांतील प्रख्यात इतिहासकार नेकुलसिया हा होय. यानें मॉल्डेव्हियाचा १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचा इतिहास लिहिला आहे. त्याच्याच पुढचा इतिहास रोसेट यानें लिहिला. एनकीनें १७३०-१७७४ चा रूमानियाचा इतिहास गद्यपद्यांत लिहिला. बलचियामधील राहणारा डायोनिसी एक्केसियार यानें बलचियाचा इतिहास लिहिला आहे. बकारेस्कु यानें ऑटोसन साम्राज्याचा आरंभापासून तों १७९१ सालापर्यंतचा इतिहास लिहिला आहे. टॉन्सिल्व्हानियांतील प्रमुख इतिहासकार क्केन, मूयॉर, व सिन्साइ हे होत. शास्त्रीय पद्धतीनें रूमानियाचा इतिहास लिहिणार्‍यांमध्यें क्केन हा प्रमुख होय सिन्साइ यानेंहि रूमानियाचा इतिहास लिहिला आहे. रूमानियांतील द्वितीयकालीन कादंबरीवाङ्‌मयवर व नाटयवाङ्‌मयावर ग्रीक वाङ्‌मयाची छाप बसलेली आढळते. तथापि १८ व्या शतकाच्या अखेरीस रूमानियन वाङ्‌मय स्वयंभू तर्‍हेनें निर्माण होऊं लागलें द्वितीय काळाच्या प्रारंभी ग्रीक काव्यांची भाषांतरें झालीं होती. व फ्रेंच व इटालियन ग्रंथांचीं बरींच भाषांतरें प्रसिद्ध करण्यांत आलीं. मोल्येर, कॉर्नेली, कोटझेब्यू, शेक्सपियर, शिल्लर इत्यादिकांनी नाटकें रूमानियन भाषेंत भाषांतरांत होऊन त्यांचें प्रयोग रंगभूमीवर होऊ लागले काव्यवाङ्‌मयाच्या बाबतींतहि अशीच स्थिति आढळते तथापि ट्रॅन्सिल्व्हानियामध्यें कांही स्वतंत्र युद्धांचे उत्कृष्ट कवी निपजले व त्यांनी उच्च दर्जाची काव्यें लिहिली, त्यांपैकी अ‍ॅरॉन व बराक हे दोन प्रमुख कवी होत. अरॉनचे 'पॅशन', 'पिरमसी टीस्वे', सोफ्रोनिमसि हरिति इत्यादि काव्यें अति प्रसिद्ध आहेत. बराकचीं 'रासीपी, जेरूसेलेमुलुइ, अधीरसे एलेना' हीं मुख्य काव्यें आहेत. प्रणयगीतालेखकांमध्यें बकारेस्कु अलेकु व योअन हे तीन प्रसिद्ध कवी होऊन गेले. याशिवाय कार्लोव्हा हाहि चांगल्या प्रकारचा कवि असून त्याचें 'रूइन्स ऑफ तिगोंविझेरा' हें काव्य प्रसिद्ध आहे. मॉल्ढेव्हियामधील कॉन्स्टंटाईन कोनकी हा कवि प्रसिद्ध असून त्याला रूमानियाचा लाँगफे लो असें संबोधण्यांत येतें. त्याचें अल्का टु इरिप्ति तालमासिरी हें काव्य प्रसिद्ध आहे.

तृतीयकाल(१८३० पासून पुढें):-तिसर्‍या कालाच्या प्रारंभी रूमानियन भाषेच्या शुद्धीकरणाची चळवळ सुरू झाली. रूमानियन ही लॅटिन भाषेचें अपत्य असून लॅटिनेतर असे जे शब्द रूमानियन भाषेंत असतील ते वापरण्याचें होतां होईल तों बंद व्हावें या हेतूनें ही चळवळ निघाली. या चळवळीचा आद्य पुरस्कर्ता लझार नांवाचा एक शिक्षक होता. खरें पाहतां लझारचा जो एलियडे नांवाचा शिष्य त्यासच नवीन मनु सुरू करण्याचें श्रेय दिलें पाहिजे. एलियडे (१८०२-७२) हा त्यावेळेचा अत्यंत विद्वान गृहस्थ होता. त्यानें भाषाशास्त्रावर व व्याकरणावर बरेच सुंदर ग्रंथ लिहिले होतें. राजकारणावर देखील त्यानें ग्रंथ लिहिले होतें; त्यांपैकी त्याचा प्रमुख ग्रंथ म्हणजे 'करीअर डे अंबे सेक्से' हा होय. फ्रेंच व इटालियन भाषेंतील कांही नाटकें व व कादंबर्‍याहि यानें भाषांतरिल्या होत्या. बोलिटिनिएनु (१८२६-७३) याच्या कवितांमध्ये जाज्वल्य देशाभिमान, व देशासाठीं सर्वस्वत्याग करण्याची बुद्धि हे विशेष दिसून येतात. 'डायिंग व्हर्जिन', मॅसेडोनेले, 'फ्लांरिले बास्कोसलुई' इत्यादि त्याच्या प्रसिद्ध कविता आहेत. याशिवाय त्यानें ट्रेयन, मिर्सिया, स्टेफन इत्यादि कादंबर्‍या व मिहनीया, मिहैयू इत्यादि नाटकें लिहिलीं आहेत. रूमानियन भाषें बॅलड नामक कवितेचा प्रकार त्यानेंच प्रचारांत आणला. बोलिंटिनिएनु शिवाय अ‍ॅलेक्झांड्रेस्कु, क्रेटेन्, सिहलेनु, डेपंराटियानु, निकोले निकोलियानु, इत्यादि बरेच लेखक या काळांत झाले. अलेक्झांड्री (१८२१-९०) हा रूमानियाचा सर्वांत प्रसिद्ध असा भावनाप्रधान काव्यें लिहिणारा कवि होय पास्टे ल्यूरि, लीजंडे ओस्टासी नॉस्ट्री इत्यादि त्याची काव्यें प्रसिद्ध आहेत. याच्याच वेळीं असलेला पण याच्याहिपेक्षां अधिक श्रेष्ठ असा कवि एमिनेस्कु हा होय. याच्या कवितेंत नैराश्यवादाची छटा आढळते. तथापि कल्पना, विचारगांभीर्य, भाषामाधुर्य इत्यादि गुण याच्या कवितेंत दृग्गोचर होतात. व्ल्हाउटा व कॉस्बुक हे दोघे एमिनेस्कूचे प्रसिद्ध शिष्य होते व त्यांचींहि काव्यें बरीच प्रसिद्ध आहेत. काव्यांत ज्याप्रमाणें एमेमस्कू त्याचप्रमाणे गद्यवाङ्‌मयांत बालसेस्कु, ओडोबेस्कू इत्यादि नांवे प्रसिद्ध आहेत. काव्यांत ज्याप्रमाणें एमेनस्कू त्याचप्रमाणें गद्यवाङ्मयांत ओडोबेस्कू याचें नांव सर्वश्रेष्ठ म्हणून गणलें जातें. ऐतिहासिक कादंबरीचा हा जनक होय. मिहनेह ओडा, डोआम्ना कियग्ना, या कादंबर्‍या बहारीच्या आहेत. फिलिमोनच्या सियोकोइचे सी कोई या कादंबरींत तत्कालीन सामाजिक चालीरीतीचें प्रतिबिंब रेखाटलेले आढळतें. १९ व्या शतकांतला रूमानियांतील अत्यंत प्रसिद्ध लेखक व राष्ट्रकर्ता, कोगाल निस आनु यानें मॉल्डोव्हियांतील जुन्या बखरी प्रसिद्ध केल्या, राजनीतीशास्त्रावर अनेक लेख लिहिले, व अशा रीतीने रूमानियामध्यें विचारक्रांति घडवून आणिली. असाकी (१७८८-१८७१) यानेंहि वाङ्‌मयामध्यें बरीच क्रांति घडवून आणिली. लॅटिन शब्दाशिवाय दुसर्‍या भाषेंतील शब्द न वापरण्याची जी प्रवृत्ति १८ व्या व १९ व्या शतकांत ग्रंथकारांमध्यें दृग्गोचर होत होती ती बदलून, रूमानियन वाङ्‌मय व भाषा अधिक नीटनेटकी व शब्दसंपन्न करण्याचें श्रेय टिटु मायोरेस्कु यासच आहे. इयान धी कायानें १८४८ च्या धामधुमीच्या काळांतील घडलेल्या प्रसंगांची, अर्मिटिरी व स्क्रिसारी कात्रे व्ही अलेक्झांड्रि या आठवणीवजा ग्रंथांत हकीकत दिली आहे. या ग्रंथांतील भाषा नमुनेदार आहे. कादंबरी वाङ्‌मयांत, बार्बू स्टेफानेस्कु, कारगियाली, व घेरीया ही तीन नांवें फार प्रसिद्ध आहेत. स्टेफानेस्कू हा उत्कृष्ट कथालेखक आहे, कारागियाली याची फॅसीलिया डे पस्टे ही कादंबरी, परिणामकारी आहे, रूमानियन काहणीवाङ्‌मय कादंबरीवाङ्‌मयापेक्षांहि विपुल आहे. त्याचे 'अद्बुत,' 'धार्मिक', 'समाजिक' व ललित' असे चार भाग पाडण्यांत आलेले आहेत. पहिल्या प्रकारांत, अलेक्झांडर दि ग्रेट, कॉन्स्ंटटाईन, इत्यादिकांच्या गोष्टी येतात. अँटनपन्न हा या प्रकारचें वाङ्‌मय उत्पन्न करणारांत श्रेष्ठ समजला जातो. याचें स्पिटालूल अ‍ॅमोस लुई, पोव्हेस्टा वोरबुइ, सेझस्टोआरिया लटारा, हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दुसर्‍या प्रकारांत, बायबलमधाल अगर इतर धर्मकथांचा समावेश होतो. या कहाणी-वाङ्मयाच्या बाबतींत विशेष लक्ष्यांत ठेवण्याजोगी गोष्ट म्हटली म्हणजे ही कीं, रूमानियन कहाणी वाङ्‌मयांमध्यो विलक्षण साम्य आहे, याचें कारण एकानें दुसर्‍यांपासून हें उसनें अगर चोरून घेतलें नसून बाल्कन राष्ट्रांतील लोकांच्या मनाची समान ठेवण हें होय. अलेक्झांडरी यानें १८५२-६६ या सालांच्या दरम्यान रूमानियन कहाणी-वाङ्‌मय एकत्रित करून छापलें. मरीहानस्कूनें ट्रान्सिल्व्हानियाचें कहाणी. वाङ्‌मय एकत्रित करून छापले. डॉ. स्टान्सेस्फू, स्बीएरा, कुरझो व्ल्हाच यानींहि असेच संग्रह प्रसिद्ध केले आहेत.
विसावें शतक:- १९ व्या शतकाच्या उतरार्धांत रूमानियामध्यें वाङ्‌मयविषयक पुनरूज्जीवन झालें व त्याचा परिणाम विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळापर्यंतहि झाल्याविना राहिला नाही. विसाव्या शतकांतील रूमानियन वाङ्‌मयाच्या चळवळीत तितु मायोरेस्कू हा प्रमुख होय. यानें काढलेल्या 'कॉनव्होरबीरि लिटरारे' पत्रानें त्या काळाच्या वाङ्‌मयामध्यें क्रांति घडवून आणिली. या क्रंति घडवून आणण्याच्या कामीं त्याला क्रेमंगा, करगियेल, एमीनेस्कू, वलहुट्झा इत्यादि ग्रंथकारांचेंहि पुष्कळच साहाय्य झालें. क्रेअंगाच्या 'रिकलेक्शन्स ऑफ चाइल्डहुड' प्रभृति कथांमध्यें रूमानियामधील शेतकरी-वर्गाच्या आकांक्षाचें प्रतिबिंब स्पष्टपणें दृष्टीस पडतें. करगियलच्या 'दि लॉस्ट लेटर' व 'स्टॉर्मी नाइट' या नाटकांमध्यें व त्याच्या कथावाङ्‌मयामध्यें पाश्चिमात्तय संस्कृतीचें अंधानुकरण केल्याने काय दुष्परिणाम होतात याचें यथार्थ चित्र दृष्टीस पडतें. या वलहुट्झा ग्रंथांत नावीन्य व कल्पकता दृष्टीस पडते. प्रो. जॉर्गाच्या 'हिस्टरी ऑफ रूमानियन लिटरेचर' या पुस्तकांत राष्ट्रय वाङ्‌मयांसंबंधीच्या त्याच्या कल्पना ग्रंथित झालेल्या आढळतात. जॉर्गाच्या 'सामनातोरूल' वगैरे पत्रामध्यें रूमानियन लोकांच्या स्वभावांची चित्रें रेखाटलेलीं आहेत. मार्कु बेझाच्या 'ऑन दि रोड्स' या ग्रंथात मॅसीडोनिया एपीरल, थेसली इत्यादि प्रदेशांच्या डोंगराळ टापूत राहणार्‍या ब्लाच जातीच्या लोकांचा जीवितक्रम रेखाटलेला आढळतो. ट्रॅन्सिल्व्हानियामध्यें कॉसबुक, ऑक्टेव्हियन गोगा, स्टीफन जोसेफ इत्यादि उत्कृष्ट कवी असून जोसेफनें शेक्सपियरच्या 'मिड् समर्स नाइट ड्रीम' व शेलेच्या 'टु ए स्कायलार्क' यांचे रूमानियन भाषेंत भाषांतर केलें आहे. बार्बू डेलावरान्सी यानेंहि तीन नाटकें लिहिली आहेत. व्हिक्टर एफ्टीम्यूच्या काव्यांत अद्भुत कल्पनांचें वातावरण दृष्टीस पडतें. ब्राटेस्कू व्हायनेष्टी, डूइलियु झमफायरेस्कु व मायकेल सडोवीनु हे तीन उत्कृष्ट कथालेखक आहेत. नुक्ताच वारलेला सर्ना कवि हा एमिनेस्कु या रूमानियाच्या सुप्रसिद्ध कवीच्या तोडीचा कवि म्हणून नांवाजलेला आहे.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .