प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रोगनिदान - इजा अगर रोग कोणता हें ओळखणं याचें नांव निदान करणें. हें कधीं बरेंच सोपें असते; उदाहरणार्थ, ठेंच लागली किंवा जखम झाली असतां, परंतु प्राय:निदान अंमळ अवघडच असतें. व तें डॉक्टर, वैद्य लोक कशा तर्‍हेनें करतात याची माहिती पुढें दिली आहे. अगोदर शारीरविज्ञानशास्त्र व रोगविज्ञानशास्त्र यांवरील पुस्तकावरून अभ्यास करून वैद्याला रोंगनिदान करण्याची थोडीशी पात्रता येते. परंतु निव्वळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नसतें तर जेथे अनेक प्रकारचे रोग प्रत्यही पहावयास सांपडतात अशा रुग्णालयांत पद्धतशीर रीतीनें रोगनिदान करण्यास शिकलें पाहिजे. रोग्याच्या व्याधीची हकीकत त्याच्या तोंडून ऐकणें, रोगग्रस्त भाग व एकंदा शरीराचें सूक्ष्म अवलोकन करणें व या केवळ अवलोकनानें काय रोग आहे याचा बराचसा अंदाज साधल्यास करणें यास निरीक्षण-परीक्षा म्हणतात. त्यानंतर रोग्याच्या शरीरांतील कोणत्या तरी एका अगर अनेक इंद्रियसंस्थेंत बिघाड झाला आहे हें वैद्याच्या मनानें ठरलें म्हणजे ती अगर त्या इंद्रियसंस्था हातानें प्रथम केवळ स्पर्श करून अगर चांचपून, दाबून, पाहणें यास स्पर्शपरीक्षा म्हणतात व यामुळें (अवलोकनपरीक्षेमुळें) जो रोगाविषयीं तर्क (निदान) त्यानें केला असेल त्यास आणखी दुजोरा मिळतो व त्यांत भर पडते व रोगग्रस्त भाग एखादी रोगग्रंथि हातानें चांचपून पहांतांहि येते. या स्पर्शपरीक्षेनें रोगाविषयी कांही तर्क होऊन जो रोगग्रस्त भाग, अगर इंद्रिय आहे असें वैद्यास वाटत असेल त्यानें त्या भागावर आपलें आडवें बोट (डाव्या हाताचें) ठेवून त्यावर उजव्या हाताच्या बोटांच्या अग्रांनीं ठोकलें म्हणजें निरोगी स्थितीत जो पोकळ अगर नगार्‍याप्रमाणें ध्वनि यावयाचा तेथें जर बद्द अगर भरींव आवाज ऐकूं आला अगर याच्या उलट जेथें ह्वदय, यकृतादि इंद्रियांच्या जागेवर ठोकून पाहिलें तर निरोगी स्थितींत जेथें व ज्या अमुक बरगडीपासून अमुक बरगडीपर्यंत बद्द आवाज यावयाचा तो न येतां पोकळ अगर अन्य तर्‍हेचा येऊं लागला तर तेथे अमुक रोगवृद्धी झाली आहे असा तर्क होतो. याप्रमाणें निरीक्षण, स्पर्श, चांचपणें व ठोकून पाहाणें हे रोगपरीक्षेचे प्रकार होऊन बरीच माहिती मिळविल्यावर जर रोग छाती अगर उदर या ठिकाणीं असेल तर रोगनिदासाठी ध्वनिवाहक नलिकायंत्रानें संशयित जागीं ऐकलें म्हणजे येथें त्यास निरोगी इंद्रियध्वनीहून वेगळे असे विकृत श्वसनध्वनी अगर हृदयध्वनी अगर अन्यइंद्रियध्वनी त्या त्या विशिष्ट रोगपरत्वें ऐकूं येतात व रोगनिदान अधिकाधिक निश्चत होत जातें. छातींत रोग नसला व अन्य इंद्रियंसस्थेत असला तरी प्रत्येक रोग्याचें हृदय, नाडी, फुफ्फुसें हीं तपासण्याचा परिपाठ आहे. कारण त्यायोगें कधीं कधीं रोग्याच्या ध्यानीमनी नसलेली रोगावस्था नजरेस येते. याप्रमाणें प्रत्येक रोग्याचें शरीरऊष्णमान, नाडीच्या ठोक्यांचे व श्वासांचें दर मिनिटास काय प्रमाण आहे हें व मूत्रपरीक्षा हीं प्रत्येक रोग्यामध्यें आरंभीच पाहण्याने रोगनिदानास मदत होते. यानंतर जें अगर जीं विशिष्ट इंद्रियें बिघडली असतील तें अगर ती विशेष बारकाईनें तपासण्यासाठी जीं विशिष्ट यंत्रें, साधनें व उपकरणें असतील त्याच्या साहाय्यानें अधिक बारकाईनें तपासल्याने रोगनिदान अधिक निश्चित होतें. उदाहरणार्थ नेत्र, कान, कांठ, गुद, स्त्रीजननेंद्रियें, मूत्राशय, यांसारख्या ठिकाणचें खोल रोगनिदान करण्यासाठीं जी विशिष्ट परीक्षण-यंत्रें व साधनें असतात त्यांचा उपयोग जरूर केला पाहिजे. सूक्ष्मदर्शक यंत्रानें मल, मूत्र, रक्त, कफ, पू, लस व रोगग्रस्त भागाचे सूक्ष्म छेद तपासल्यानें रोगनिदानास फार मोठें साहाय्य होतें. रोग शरीरांत खोल जागीं असल्यास कांही प्रसंगी 'क्ष' किरणांनी त्याचा चित्रलेख घेतल्यानें इजाअस्तिभंग, सांधे निखळणें, क्यान्सर व इतर ग्रंथि, क्षय, फुफ्फुसदाह, पूयोत्पत्ति, आगंतुक पदार्थ यांसारख्या निदान करण्यास अवघड अशा कारणंचेंहि बरोबर निदान होतें. तसेंच शरीरांत जालीम संजीवक औषधें व लशी टोंचण्याच्या ज्या लहानमोठया सुईसह कांचेच्या पिचकार्‍या असतात त्यांची सुई संशयित व रोगग्रस्त जागीं खुपसून पिचकारीचा दांडा बाहेर हळूच ओढल्यानें रोगाच्या ठायी जमलेले पू, रोगट रक्त, लस पिचकारीत येतें व तेथें हे दोष व विकृती उत्पन्न झाल्या आहेत हें निश्चित होतें व त्याप्रमाणें शस्त्रसाहाय्यानें रोगनिवारण करतां येते. गांठी, गळवें, फुफ्फुसावरण, यकृत, अशा सारख्या बाह्म व खोल ठिकाणी पू, लस यांची उत्पत्ति झाली आहे की, काय असा संदेह उत्पन्न झाल्यास याप्रकारें रोगनिदान करण्याचा परिपाठ पडला आहे. इतक्या साधनांनी रोगनिदान होईल तर रोग, उदर वगैरे ठिकाणीं असल्यास केवळ रोगनिदानासाठी उदराची पोकळी चिरून रोगस्थिती प्रत्यक्ष पहातां येते. व साधल्यास त्याच वेळीं शस्त्रक्रियेनें रोगनिवारणहि करतां येतें. सांथीच्या तापांत दूषित रक्तांतील जंतुपरीक्षासूक्ष्मदर्शक यंत्रसाहाय्यानें करणें हें तर स्वंतत्र व महत्त्वाचें शास्त्र बनलें आहे. रोगनिदानाची नवीं साधनें भविष्यकाळी किती उपलब्ध होतील तें सांगवत नाही. नाडीपरीक्षा ही हृदयाची रोगस्थिति, ज्वर धमन्यांची रुग्णावस्था अजमावण्यास मुख्यत: उपयोगी आहे. वाटेल त्या रोगाचें निदान नाडी पाहून सांगणें अशक्य आहे. नाडीच्या गतीचे चित्रलेख घेतां आल्यानें नानातर्‍हेचे धमन्या, हृदय व मूत्रपिंडरोग वगैरे रोगांचें निदान करण्यास मदत होते. प्रत्येक रोग्याचें वजन करून पहाणें हें अवश्य आहे. व त्यामुळें कधीं कधीं रोगनिदानास मदत होते. रोगनिदान ही मोठी जबाबदारीची व चातुर्याची कला आहे. कारण नुसता अमुक एक रोग आहे एवढें निदान करून उपयोगी नाही, तर तशीं अगर त्यासारखी लक्षणें व साम्य बाह्मत: असणार्‍या अन्य एक अगर अनेक रुग्णावस्था असतात त्यांपैकी हा अमुकच रोग आहे व अमुक नाही असें वैद्यानें निश्चित निदान केलें पाहिजे. यास उदाहरण:- अजीर्ण, अपचन, व जठरदाह या रोगांत हृदय, ऊर या ठिकाणीं असह्म वेदना उत्पन्न होतात. हेंच लक्षण अँजायना पेक्टोरिस अथवा हृदयस्थशूल या अन्य, स्वतंत्र व भयंकर रोगांचें आहे. तसेंच पोटांत मुरडा, शूळ होणें हें साध्या अपचनापासून होणें शक्य आहे, तसेंच तें आंत्रपुच्छदाह नामक भयंकर रोगाचेंहि लक्षण आहे. पण विशेष विचार न करतां वरील दोन्हीं प्रसंगी रोग्यास भयंकर रोग मुळींच नसून वैद्य-डॉक्टरांनी जर ते भयंकरच रोग आहेत असें निदान केलें तर रोग्यास नसती काळजी व खर्च पडून वैद्याच्या लौकिकासहि धक्का बसतो. तसेंच खरोखरी वरील भयंकर रोग रोग्यास असून व रोगनिदान बरोबर करतां न आल्यामुळें हे साधेच रोग आहेत असें रोग्यास वैद्यानें सांगितल्यानें रोगी गैरसावध राहून एखाद्यावेळीं त्याच्या जिवासहि अपाय होण्याचा संभव आहे. यावरून रोगनिदानाचें महत्त्व केवढें आहे हे कळेल. अचूक निदानखेरीज रोगचिकित्सा म्हणजे उपचार व्यर्थ आहेत. एखादा काल्पनिक रोग समजून त्यावर इलाज करीत बसणें हा वेडेपणा चुकीच्या रोगनिदानामुळें घडतो.

रोगनिदानासाठीं प्रथम रोग्याच्या तोंडून अगर तो बेसावध असल्यास त्याच्या नातलगाकडून व्याधींची हकीगत ऐकून घेऊन त्यांतील निदानास उपयुक्त तेवढा भाग लक्षांत घ्यावा लागतो. रोग्याचें वय, लग्न झालें आहे किंवा नाही, जात, धंदा, त्याचें राहण्याचें ठिकाण, गांव, प्रांत, देश, हल्लींची व पूर्वीची प्रकृति, सामाजिक दर्जा, कुटुंबांत आनुवंशिक व्याधि आहे किंवा नाहीं यांपैकी प्रत्येक बाबीच्या चौकशीपासून निदानास उपयुक्त असें कारण सांपडण्याचा संभव असतो. हिंवताप, मुतखडा व अनेक रोग कांही गांवीं व प्रांतांत विशेष असतात व कांहीं धंदे करणारांनां काही ठराविक रोग होतात. निरीक्षणपरीक्षेच्या वेळी रोगी उंच की ठेंगणा, कृश, किंवा मांसल व स्थूल आहे, निजून आहे की, बसण्याजोगा सावध आहे हें पहावें लागतें. त्याची चर्या, मुद्रा, आवजाची व बोलण्याची तर्‍हा, चाळे, हावभाव यांकडे लक्ष असावें. तो कोणत्या प्रकृतीचा असावा याचा तर्क करावा. कफ, वाव, व पित्त या प्रकृतीचे रोगी वैद्य लोक ओळखतात. तसेंच प्रबल, संधिवात, शांत अगर थंड व क्षयी प्रकृतीचे रोगी डॉक्टर लोक ओळखतात. क्षयी प्रकृतीचे बोजड व नाजूक असे दोन प्रकारचे रोगी असतात. याशिवाय पादांगुष्ठवाताची, वातपित्तप्रकृतीची, दु:खी व खेदी, रक्तस्त्रावक, दारूबाजाची अशा विविध प्रकृतीचे रोगी निरीक्षणपरीक्षेंने ओळखतां येतात. तसेच हिंवताप, क्यान्सर, मधुमेह, जुनाट मुत्रपिंडरोग, पंडुरोग, फिरंगोपदंश, रक्तपित्तरोग, यामुळें आलेली अंगावरची कळा माहितगार वैद्यास निरीक्षणानेंहि बहुधां ताडतां येते. कांहीं रोगी मिश्र प्रकृतीचेहि आढळतात. निरीक्षणाच्या वेळी पुढील गोष्टीहि असल्यास पाहता येतात व त्यांमुळें रोगनिदानास मदत होते:-रोग्याची जीभ व तिचा रंग बुरशी, भेगा कीट वगैरे; रोग्यास घाम येत आहे काय; अंगावर पुरळ, फोड वगैरे उठले आहेत काय; त्वचा, ओंठ हिरडया, पापण्याच्या आंतील भाग वगैरे पाहून रोग्यास कावीळ, पांडुरता अगर काळवंडलेले अगर काळेनिळे ओंठ, चेहरा, अगर अंगाच्या त्वचेस सूज आली आहे काय; पुरळ कोठें व कसा आहे, एका अगर दोन बाजूस आहे, त्वचा, ओठ, डोळे व रसग्रंथि, दांत, हाडें, सांधे (गळा, कांख, जांघाड, येथील) या ठिकाणी क्षयी प्रकृति अगर फिरंगोपदंशजन्य कांही गांठी वगैरे विकृति दिसत आहे काय; संधिवात अगर पादांगुष्ठवातानें पीडित सांधे दिसत आहेत काय; थायराइड पिंड मोठा झालेला दिसत आहे काय; लुलेपणा, अर्धांग आहे काय इत्यादि पुष्कळ बाह्म लक्षणें केवळ निरीक्षणानें पाहून व रोग्यास आंतून काय लक्षणें होतात हें त्याच्या तोंडून ऐकून व जरूर तेवढे पुरवणी प्रश्र त्या विचारून वैद्य-डॉक्टरास रोगाचें अनुमान-निदान-करतां येतें. शरीरांतील इंद्रियसंस्था म्हणजे समूह अनेक आहेत; त्यापैकी कोणती संस्था मुख्यत: बिधडली आहे हें शोधून काढण्याचा या निरीक्षणाचा हेतु असतो. (१) पचनेंद्रियसंस्था, (२) श्वसनेंद्रिय संस्था, (३) रूधिराभिसरणेंद्रियसंस्था, (४) जननेद्रिय व मूत्रेंद्रिय संस्था, (५) मज्जास्थानादि इंद्रियसंस्था, (६) चलनेंद्रियसंस्था, वगैरे मुख्य इंद्रियसमूह शरीरांत आहेत, त्यापैकी ज्या समुहामध्यें रोगोद्भव झाला आहे असें निरीक्षण व प्रश्र परीक्षेमुळें वैद्यास आढळून आलें असेल तो इंद्रियसमूह विशेष बारकाईनें आणखी तपासावा म्हणजे शक्य तितकें पूर्ण रोगनिदान होतें.

याशिवाय बालरोगनिदान व स्त्रीरोगनिदान करतेवेळीं शैशवावस्थेंतील व स्त्रीशारीरविषयक जे स्वतंत्र रोग आहेत त्यांचेंहि रोगनिदान करतां आलें पाहिजे. अर्भकांनां काय होतें हें त्यांनां स्वत: सांगतां येत नसल्यामुळे बाह्म चिन्हांवरून व लक्षणांवरून म्हणजे निरीक्षणानें प्रथम निदान करून नंतर स्पर्श व यंत्रादि परीक्ष केल्या पाहिजेत. चेहरा व त्यावरील लालीमुळें ज्वर व गोवरादि सांथीचे ताप कळतात. मुलांचे रागावणें, चिडणें, चेहरा सुकणे, डोळे खोल जाणें, रडण्याची व निजण्याची तर्‍हा, आवाज, उगाच हातापायाचे हलविण्याचे चाळे करणें, मुख, कान, मस्तक या ठिकाणीं वरचेवर हात नेणें, नाक चोळणें गळा धरून ठेवणें, किंकाळीं फोडणें, हातपाय ताठणें, आंचके देणें, घोगरा आवाज, यामुळें क्षय, अतिसार, मेंदूचा दाहरोग, वातरोग, जंत व कृमि, देताद्भव, कर्णशूळ, मस्तिष्काचरणदाह, कंठदाह, फुफ्फुस व फुफ्फुसावरणदाह वगैरे रोग होत अगर होणार असल्याचीं सूचक लक्षणें अनुभविक डॉक्टर-वैद्यास ताडतां येतात व नंतर इतर प्रकारच्या रोगपरीक्षेनें तें रोगनिदान कायम करतां येतें. मुलाच्या नाडीच्या ठोक्याचें व श्वासाचें प्रमाण मोठया माणसाच्या प्रमाणाहून भिन्न असतें. त्यांनां ताप सहज येतो; असे अनेक फरक प्रौढ व बालरोग्यामध्यें असतात. रोगाची हकीकत रोग्याकडून स्वत: अगर आप्तेष्टाकडून ऐकावी असें वर सांगितीलेंच आहे व त्यांच्या मतें रोगाचें कारण काय असावें हें ऐकून घ्यावें. कधीं कधीं त्याचा निदानासाठी फार उपयोग होतो. पण कधीं कधीं होतहि नाही. कारण आपणास काय होतें हें सर्व रोग्यांनां नीट सांगतां येतेंच असें नाहीं. त्यांच्या मतें एखाद्या रोगाचें भलतेच व काल्पनिक कारण असतें. वैद्यानें त्यांच्या हकीकतीपैकीं उपयुक्त व मुद्दयाचा अंश तेवढा रोगनिदानासाठी घ्यावा. रोग्यास मनसोक्त हकीकत सांगूं द्यावी. त्यामुळें त्याच्या मानसिक रचनेचा व स्थितीचा अंदाज करतां येतो. रोग्यास अगोदर एक रोग असून मागाहून दुसराहि नवीन रोग होणें संभवनीय आहे. म्हणून त्याच्या एकटयाच्या सांगण्यावर स्वस्थ न बसतां वैद्यानें स्वत: रोगनिदान करावें. छातीत अगर उदरांत मोठा भयंकर रोग असून त्याची वेदना वगैरे बाह्म चिन्हें नसणें शक्य आहे; म्हणून रोगनिदान करणें हें वैद्यानें नेहमी मेहनत घेऊन करावें. रोग्याच्या तोडून रोगाचें कारण ऐकून घ्यावें पण त्याची संगति लावणें म्हणजे रोगनिदान करणें हें त्याची पूर्ण शरीरपरीक्षा केल्यावरच करतां येंतें. उपदंश, प्रमेह वगैरे गुप्त रोगांची हकीकत तर पुष्कळ अज्ञानी व ज्ञानी रोगी वैद्यापासून मुद्दाम लपविण्याचा प्रयत्‍न करतात. म्हणून या पूर्वी झालेल्या रोगाची लक्षणें वैद्यासच ओळखतां आली पाहिजेत व या एकच गोष्टीवरून कळेल, कीं रोग्याची हकीकत अगदीं विश्वसनीय असतेच असें नाही. स्त्रीरोग हा एक स्वतंत्र रोगसमूह असून त्याची लक्षणें, ते रोग तपासण्याची पद्धति, रोगनिदान हेंहि बालरोगाप्रमाणे स्वतंत्र प्रकरण असल्यामुळे त्याच्या अभ्यासानें उत्तम रोगनिदान व स्त्रीरोगनिवारण करतां येतें.

नाडीपरीक्षा. - रोगनिदानासाठी बहुधां नाडीपरीक्षेचा अवलंब करण्यांत येत असतो म्हणून नाडीची कांही माहिती या ठिकाणी दिली आहे. नाडी म्हणजे शरीरांतील कोणतीहि धमनी. दरवेळी हृदयांतून येणारें रक्त तींत भरल्यानें प्रसरण पावतांना फुगलेली चांचपणार्‍या बोटांनां लागणें व तीतील रक्त पुढें सरकल्यावर तिचें रिक्त स्थितींमुळें आकुंचन होतेवेळी बोटांस लागत असलेली क्षणमात्र बोटास न लागणें, हा एकसारखा चालणारा क्रम होय. नाडी सोयीस्कर ठिकाणची म्हणून मनगटाच्या ठिकाणी, आंगठयाच्या बाजूची पहातात. येथें धमनी त्वचेखाली पृष्ठभागास अगदी नजीक असते व तिच्याखाली कठिण हाड असल्यामुळें नाडी बोटाखाली दाबून पहाण्यास सोयीचे असतें. अशा प्रकारच्या पृष्ठभागाजवळ असणार्‍या धमन्या करंगळीच्या बाजूस मनगटांत दंडांच्या आंतील बाजूस, कंठाच्या दोन्ही बाजूस कानशिलापुढे, आंगडांत, डोक्याच्या आंतील बाजूस, पायांवर आंगठयाच्या मागें व घोटयाच्या सांध्यापुढेहि असतात. व येथेहि बोटानें दाबून नाडी पहातां येते. लें लक्षांत ठेवावें की, रोग्याच्या मनगटांतील नेहमीची नाडी तपासून ती नींट लागली नाही तर दुसर्‍या मनगटांतील नाडी पहावी. कारण अपवादात्मक म्हणून कचित्काळीं ही नाडी या ठिकाणी नसते. नाडी पहाण्याचें कारण हें कीं, हृदय एकसारखें संकोचन प्रसरण पावून शरीरभर धमन्यांच्या मागें रक्त पाठवतें व शिरांच्या मार्गे अशुद्ध रक्त परत शरीरांत येतें तेव्हां प्राणरक्षक आधार जें हृदय त्याची रोगी-निरोगी स्थिति व रोग्याची एकंदर अवस्था अजमावण्यासाठी प्रास्ताविक तपासणी या दृष्टीनें या नाडीपरीक्षेचा उत्तम उपयोग होतो. व कांहीं रोगांच्या निदानाचा धागा यामुळें सांपडतो. मात्र हरएक रोगांचें निदान नाडीपरीक्षेमुळें होतें हें खरें नव्हे. नाडी तपासून पुढील गोष्टी पहावयाच्या असतात: (१) नाडीचा दर मिनिटास वेग पहावा व तो निरोगी स्थितींत ७०-७२ पर्यंत असतो व ठोके नियमितपणें पडतात. झोपेत असलेल्या व अशक्त माणसाच्या नाडीचा वेग असतो. म्हणून ५०-६० पेक्षां कमी व ८० पेक्षां जास्त वेग आढळून आल्यास ज्वर, हृदयरोग, अगर वातप्रकृतीमुळें मानसिक चलबिचल होऊन अगर श्वासमार्गापैकी अगर अन्य रोग होऊन हें प्रमाण बिघडेल. म्हणजे त्याचा वेग वाढेल. उलटपक्षी, कावीळ, ग्लानि वगैरे रोगांत नाडीचा वेग ४० ठोक्यांपर्यंतहि कमी होतो. हे ठोके अनियमितपणें एकसारखे अगर मध्येंच कांही वेळ पडले तर तेंहि रोगाचेंच सूचक होय. (२) नाडीचा भरीवपणा पहाणें ही दुसरी गोष्ट होय. निरोगी स्थितींत पुष्कळ रक्त दर टोक्याच्या वेळी धमनीत आल्यामुळें नाडी पूर्ण भरलेली व मोठी अशी बोटास लागते व दर ठोक्यावेळी कमी रक्त हृदयांतून धमींनत आलें तर नाडी हातास बारीक लागते. नाडी अनियमित चालल्यास नाडीचे कांही ठोके बोटांस बारीक लागतात व कांही भरदार लागतात. आभासयुक्त नाडी म्हणून एक प्रकार आहे, त्यांत रोगी श्वास आंत घेताना नाडी फार अशक्त लागते, अगर लागतसुद्धा नाही. अशी नाडी दुर्मिळ असली तरी ती ह्वदयावरणदाह, छातीतील खोल ग्रंथिरोग, हृदयाची परम अशक्तता, फुफ्फुसावरणदाह वगैरे रोगांत आढळते. (३) नाडी पहाण्याचा तिसरा हेतु रक्तवाहिन्यांचे काठिण्य अगर मार्दव अजमावणें हा होय. काठिण्य असणें ही रोगी स्थिति होय. नाडीवर बोटानें दाबलें म्हणजें नाडी बंद होते व नाडी दाबल्यानंतर बोटाखाली दीर्घनलिकेच्या आकाराची अशी धमनी (नाडी) बोटास न लागणें ही निरोगी स्थिति होय धमन्या रोगट असल्या तर त्या बोटानें खालीवर चांचपतांना बोटांस कठिण लागून त्यावर जमूं लागलेलें चुन्याचें कीटहि स्पर्शानें कळतें. नाडी दाबली तर तींतील प्रवाह बंद करतां येतो. पण कांही रोग्यांत असें करणें धमनीच्या काठिण्यामुळें व दुसर्‍या कारणामुळें जड जातें. येणेंप्रमाणें नाडी बंद करून बोट हळू हळू ढिलें केलें म्हणजें ज्या नाडींत एकदम जोरानें रक्तप्रवाह व नाडी पुन्हां सुरू होते त्या नाडीस कठिण नाडी म्हणतात. व जींत रक्तप्रवाह व नाडी पुन्हां सौम्यपणें सुरू होते ती मृदु नाडी जाणावी. अभ्यासानें हे सूक्ष्म फरक वैद्यडाक्टरास कळतात. परंतु रूग्णालयांत रोगांचें अध्ययन करण्याच्या वेळी व संशय पडेल तेव्हां अनिश्चितपणा न रहावा म्हणून ठराविक व मोजका दाब न पाडतां येईल अशीं यंत्रें शोधून काढलीं आहेत; व त्यांसच लेखणीचा दांडा लावून तो नाडीनें हलून ती गति काळ्या कागदावर पांढर्‍या रेषेनें दर्शविली जावी अशी योजना केलेली असते म्हणजे नाडीचा आलेख कागदावर निधतो. असा आलेख हृदयाच्या ठोक्यांचा व श्वसनगतीचाहि घेतां येतो. या यंत्रास नाडयालेखयंत्र म्हणतात. यास बटण असतें, त्याचा दाब धमनीवर पडेल असें तें ठेवून दोन तीन ठिकाणी कोपरापासून मनगटापर्यंत तें यंत्र त्यास जोडून असलेल्या पट्टयानें हातास बांधतात. त्यास स्प्रिंग व चक्रें असतात. किल्ली दिली म्हणजे यंत्र सुरू होऊन त्याची लेखणी हलूं लागून आलेख निघतो. हा असावा तितका विश्वसनीय येणें हें सरावानें साधतें. ही संदिग्धता टाळण्यासाठीं पारद-नलिकायुक्त नाडयालेखयंत्र म्हणून एक नवें साधन निघालें आहे. त्याचे आलेख व मापें बरींच बिनचूक असतात. त्यामुळें हृदयाच्या आकुंचनामुळें व प्रसरणामुळें धमन्यांत जास्त व कमी होणारा दाब यंत्राच्या बटणास कळून त्यास जोडलेल्या लेखणीच्या गतीनें वाटोळ्या फिरणार्‍या रिळावरील अगर रहाटावरील काळ्या कागदावर पांढर्‍या रेषांचा आलेख लिहिला जातो. अगर यंत्रास तबकडीवर आंकडे लिहिले असतात तेथें तो दाब कांटयानें दर्शविला जातो. दोन्ही प्रकारच्या दाबांमध्यें २५-३० मिलिमीटर फरक असतो. हृदयांकुचनामुळें होणारा दाब लहानपणापासून मोठेपणापर्यंत वाढता असतो. जसें:९-१४ वर्षे वयांत ९० मिलिमीटर दाब; १५-२१ वयांत १००-१२० मि.मी. दाब; २१-६५ वयांत १२०-१३५-१५० मिलिमीटर दाब असतो, व पुरूषांपेक्षां स्त्रियांत हा दाब १.-१५ मि. मी. कमी असतो.

आलेखाचे विभाग व त्यापासून कळणार्‍या गोष्टी:- (१) दर मिनिटास ठोक्याचें प्रमाण. (२) त्यांचा नियमित अगर अनियमितपणा हें स्पष्टपणें कळतें. (३) या आलेखाचें भाग:- एक वर जाणारी उभी साधारणपणें बहुतेक सरळ रेषा असते; ती हृदयाचें आकुंचन दर्शविते (तिला आरोह रेषा म्हणतात) व नंतर तीच खालीं वळून तिची तिरकसपणें खाली जाणारी तिरकस रेषा असते ती हृदयप्रसरणक्रिया दर्शविते (तिला अवरोह रेषा म्हणतात). मात्र खाचा, खळगे व उंचवटे असल्यामुळे ही पहिल्या रेषेइतकी सरळ नसते. पहिली रेषा हृदयाकुंचनामुळें उसळणारी रक्ताची लाट दर्शविते व तिचा जो कळस अगर माथा त्यास प्राथमिक लाट म्हणतात. हृदयास्नायु मृदु असल्यास ही रेषा उंच असते व स्नायू कठिण असल्यास रेषा आंखुड असते. दुसर्‍या रेषेवर (अवरोहरेषेवर) एक किंवा दोन खळगे व उंचवटे असतात असें वर म्हटलें आहे. यांपैकी एक उंचवटा मात्र सर्व आलेखांत हटकून असतोच व त्यास डायक्राटिक अगर परावर्ती उंचवटा म्हणतात व तो हृदयांतील पहिली मोठी धमनी निघते तिच्या मुखाजवळील पडदे मिटल्यामुळें रक्ताची परत लाट त्यावर आपटून उत्पन्न होतो. व ही परावर्ती नाडी कांही मोठया ज्वरामध्यें यांत्रिक आलेखाशिवाय नुसत्या बोटासहि समजते. कांही वेळां अशी नाडी फार स्पष्ट समजते तीस पूर्णपरावर्ती नाडी व त्याहून स्पष्टतर असते तीस अतिपूर्ण परावर्ती नाडी म्हणतात. अशा प्रकारची मुदु नाडी हृदयस्थ स्नांयूच्या मार्दवामुळें मोठया ज्वरांत होते कारण रक्तवाहिन्यंतर्गत स्वाभाविक दाब बेतांत रहाण्याच्या शक्तीचा तेव्हां र्‍हास होतो. अ‍ॅमिल नायट्रिस हें औषध हुंगल्यानें कांही वेळ अशी नाडी प्रसरणामुळें होते. उलटपक्षी जुनाट मूत्रपिंडरोग, हृदयस्थ महाधमनीच्या तुटक्या पडद्यामुळें होणारा हृद्रोग या स्थितीमध्यें नाडींत काठिण्य येतें व तेव्हां हा अवरोह रेषेंतील उंचवटा अस्पष्ट असतो अगर नसतोहि. कधीं कधीं याच्या अगोदर एक उंचवटा असतो त्यास उपपरावर्ती उंचवटा म्हणतात. व तो दाबण्यास कठिण अशा प्रकारच्या नाडीच्या आलेखामध्यें दिसून येतो, कारण अशा स्थितीत धमनीचे पडदे मिटल्यावर रक्ताच्या मागें उसळणार्‍या लहरींचे व उपलहरींचे चित्र अगर आलेख चांगला उमटतो. अशाच कठिण नाडीच्या आलेखांत कधीं कधीं परावर्ती उंचवटयानंतरहि लहान उंचवटे दिसतात, त्यांनां अनुवर्ती उंचवट म्हणतात. कठीण नाडी व दाबण्यास अवघड प्रकारची नाडी या लहान अगर मोठया व भरलेल्या असतात असा नियम नाहीं तर रक्तवाहिन्या विकृत झाल्या म्हणजे जशा बोटानें चांचपतांना भरीव, दोरीसारख्या हातास लागतात तशीच ती तिच्या रचनेंत विकृति नसून बोटास भरीव म्हणजे दोरीसारखी लागते. असेंहि शक्य आहे की, रक्तवाहिन्यांच्या रचनेंत काठिण्य येणें व नाडी इतर रोगामुळें कठिण असणें या दोन्ही गोष्टी एका वेळीं असूं शकतील: (१) धमन्यांत रक्त फार असणें; (२) छोटया व सूक्ष्म धमन्या आणि शिरांतून मागील नाडींतील रक्त लोटण्यास प्रतिबंध, (३) धमनीचें कमीजास्त संकोचन या कारणामुळें कठिण नाडी लागते व याच्या उलट स्थितीमुळे मृदु नाडी लागते. यावरून लक्षांत येईल कीं, हृदय बळकट असून त्याचें नीटपणें संकोचन चालत असलें व धमन्यांत रक्ताचा योग्य पुरवठा असून बारीक धमन्या निरोगी स्थितीप्रमाणें संकोचित (बारीक) असल्या म्हणजे कठिण नाडी लागते. अशी स्थिति थंडी पडली म्हणजे रक्तवाहिन्यांतील नैसर्गिक संकोचनप्रसरणशक्तीस उत्तोजन मिळून तयार होते. उलटपक्षी जेव्हां अशक्त हृदय असून हृदयाच्या मोठया धमन्या, शिरा, कप्पे यांच्या मुखावरील पडदे रोगविकृतीमुळे फाटके असून रक्तप्रवाह पुरेसा पुढें लोटण्यास असमर्थ असतात, किंवा अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या फार प्रसरण पावतात अगर वर सांगितलेला रक्तवाहिन्यांतील संकोचनप्रसरणशक्तीचा र्‍हास, मोठा ज्वर वगैरे कारणामुळें होतो तेव्हां मृदु नाडी लागते. कठिण नाडींत रक्ताचा दाब फार असतो व मृदु नाडींत रक्त कमी दाबांत असतें असेहि म्हणणें बरोबर आहे. परावर्ती नाडीसंबंधी आणखी हें सांगणें जरूर आहे की, ती बोटाने समजते व मोठया ज्वरांत तर विशेष स्पष्टपणें कळते व तींतील परत येणार्‍या लहरीमुळें नाडीचा एक ठोका बोटास दोन ठोके लागल्याप्रमाणें भासतो. अशा वेळी नाडीचें प्रमाण मोजतानां चूक न व्हावी म्हणून त्याच वेळी नलिकायंत्रानें हृदयाचेहि ठोके ऐकून मोजावे व हृदयावर हात ठेवूनल मोजावे म्हणजे संशय उरणार नाही.
ध्वनियंत्रसाहाय्यानें नाडीपरीक्षा:- छाती तपासण्याच्या नलिकायंत्रानें धमनीविस्तरणरोग त्यांत ऐकूं येणार्‍या घरघरीमुळें ओळखतां येतो. याच यंत्रानें अगर दुसर्‍या विशिष्ट ध्वनियंत्रानें कोपरापुढील बेचकळी धमनी असतें तेथें ऐकून धमनींतील दाब पहातां व अजमावतां येतो व बोटानें दाबून नाडी बंद करण्याऐवजी पिशवींतील हवेचा दाब धमनीवर पाडून प्रवाह बंद करावयाचा हें तत्त्व यांत असतें. मोठया धमन्यांतील एरवीची घरघर व परीक्षण्यंत्राच्या दाबामुळें उत्पन्न होणारी घरघर या परीक्षणयंत्रानें ऐकतां येतात. शिरामध्यें नाडी उडण्याचा चमत्कार (थोडया माणसांच्या गळ्यांतील शिराखेरीज) नसतो. पंडुरोग व अशक्तता या रोगांत छाती तपासून, हृदयांतून निघणाऱ्या अशुद्ध रक्तवाहिनीत घरघर ऐकूं येते. पण तिचें कारण कळत नाही.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .