विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रोण - मुंबई, धारवाड जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ४३२ चौरस मैल. मुख्य शहरें रोण (वस्ती ७०००) व गजेंद्रगड (९०००) होत. लोकसंख्या (१९२१) १०३०४६. येथील लोक हुषार व सुखी आहेत. पावसाचें मान २३ इंच आहे. रोण येथें इ.स. ११८० मधील एक देवस्थान आहे.