प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रोमन कायदा -  यूरोपच्या किंबहूना जगाच्या सांस्कृतिक इतिहासामध्यें रोमन कायद्यास मोठें महत्त्वाचे स्थान आहे आणि यामुळें या कायद्याचा इतिहास म्हणजे जगांतील एक मोठया व महत्त्वाच्या अनुभवाचा इतिहास होय. रोमन कायद्याच्या इतिहासाचे ५ भाग पडतात: (१) राजसत्तेचा काल, (२) लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या आरंभापासून तों मध्य व दक्षिण इटली पादाक्रांत होईपर्यंतचा काल, (३) लोकसत्ताक राज्यपद्धतीचा उत्तरार्ध, (४) डिओक्लेशिगनच्या सत्तेच्या आरंभापर्यंतचा काल व (५) डिओक्लेशियनपासून जस्टिनिययनपर्यंचा काल.

राजसत्तोचा काल- रोमचें राष्ट्र उदयास किंवा अस्तित्वांत आलें त्यावेळीं रोमन समाज राजसत्तेखाली होता. राजाला मदत म्हणून १ लोकांची व १ नागरिकांची अशा दोन सभा होत्या. प्राचीन काळी रोमन नागरिकांची अशा दोन सभा होत्या. प्राचीन काळीं रोमन नागरिकांत एक प्रबल व दुसरा अर्धवट गुलामगिरींत असलेला असे दोन वर्ग होते. पहिल्याला नागरिकत्वाचे हक्क असत व दुसर्‍याला असले हक्क नसत. पहिल्याला पॅट्रिशियन्स व क्लायेन्टीस् म्हणत. पॅट्रिशियन लोकांच्याच हिताकरितां रोममधील सर्व संस्था होत्या. या लोकांचीं जेन्टे अथवा गोत्रें असत. प्रत्येक गोत्रकुलाची निराळी मालमत्ता व स्मशानभूमि असे. यांच्यांतील एखादा बेवारस मेला तर त्याची मालमत्ता त्याच्या दुसऱ्या बांधवांनां मिळत असे. व गोत्रांतील प्रत्येक जातीचें साहाय्य घेण्याचा हक्क असे. क्लायेन्टीस लोक परंतत्र असत. त्यांच्या मालकाला त्यांनां लागवडीकरितां जमीन द्यावी लागत असे; त्याला कोणी इजा केल्यास त्याबद्दल दाद लावण्याचें काम त्यांच्या मालकाकडे असे. सार्वजनिक व खाजगी शांतता राखण्याला कोणतेहि कायदे केलेले नव्हते; व या कामाकरितां ईश्वरप्रणीत कायदे, रूढी व खाजगी आणि सार्वजनिक शांतता राहण्याकरितां कायदे (बॉनी मोअर्स) यांचा उपयोग होत असे. ईश्वरप्रणीत कायद्याप्रमाणे खून करणाराला शिक्षा होत असे. कारण त्यानें ईश्वरदत्त जीवाचा नाश केला असे. याशिवाय अनेक ईश्वरप्रणीत कायदे होते. आरंभी रूढीत एकरूपता मुळींच नव्हती. पण हळू हळू तिच्यांत थोडी थोडी एकरूपता येऊं लागली. बॉनी मोअर्सच्या योगानें अपमान करून एखादें कर्तव्य करण्यास भाग पाडून सार्वजनिक शांतता अगर खाजगी शांतता राखीत असत. राजसत्तोच्या कालांत असलेला कायदा रूढीप्रणीत होता व कोणताहि कायदा लिहिला गेला नव्हता. राजसत्तेच्या अखेरच्या काळांत सर्व्हिअस राजानें रोमन समाजाच्या रचनेंत सुधारणा केली. त्यायोगानें प्लेबियन या शूद्र वर्णाला नागरिकत्वाचे जास्त हक्क देण्यांत आले व त्यांच्यावरील जबाबदारीहि वाढविण्यांत आली. रोम शहराचे ४ भाग करण्यांत आले. नागरिकांचें एक नोंदणीबुक करण्यांत आलें व त्यांत त्यांच्या जमिनीची किंमत, त्यांची गुरेंढोरें वगैरेंची नोंदणी होत असे. लष्करी कामाकरितां नागरिकांचे पांच भाग करण्यांत आले. कायदे करण्याचा अधिकार असलेली एक सभा स्थापण्यांत आली व तिला 'कॉमिशिया सेंचुरिआटा' म्हणत. पूर्वी जमिनीची विभागणी गोत्रवार केली जात असे ती या सुधारणेमुळें व्यक्तिश: होऊं लागली.

खाजगी कायद्यांत कौटुंबिक कायदा येतो. रोमच्या कुटुंबांत पूर्वी बायको व मुलें यांचाच समावेश होत होता असें नाहीं तर कुटुंबाच्या मुख्यावर अवलंबून असलेल्या व त्याच्या अधिकाराखालीं असलेल्या सर्व लोकांचा समावेश होत असे. रोमन लोक एकपत्‍नीव्रती होते. विवाहविधि हें पारमार्थिक दृष्टया प्रत्येक मनुष्याचें कर्तव्य समजलें जात असे. व तो विधि दहा साक्षीदारांच्या समोर केला जात असे. बायकोच्या मालकीची सर्व मालमत्त नवर्‍याला मिळत असे. कुटुंबांतील मुख्याइतकेच सार्वजनिक हक्क प्रत्येक कुटुंबांतील मनुष्याला असत. परंतु कुटुंबाच्या बाबतीत मात्र मुख्याचे अधिकार विशेष असत. कुटुंबांतील मनुष्यानें कुटुंबाच्या बाहेर अपराध केला तर त्याला एखाद्या गुलामाप्रमाणें अगर पशूप्रमाणें वादीच्या ताब्यांत देण्याचा मुखाला अधिकार असे. मुख्याला दत्तक घेण्याचा अधिकार असे; पॅट्रिशियन कुटुंबाला रूढी व ईश्वरप्रणीत कायदे लागूं असत. नवरा कुटुंबांतील उपाध्यायाचें काम करीत असे. रोमन लोकांच्या मालमत्तोची वांटणी कोणत्या तत्त्वावर झाली ती माहिती उपलब्ध नाही. पॅट्रिशियन लोकांच्या ताब्यांतील जमीन बहुतेक विकत घेतलेली अथवा त्यांनां मिळालेली असे.

कुटुंबाच्या मुख्याच्या मृत्यूनंतर त्याचा अधिकार त्याच्या वंशजांतील जो त्याच्या मृत्यूमुळें कायदेशीर वारस (सुइ ज्यूरिस) झाला असेल त्याला मिळत असे. व वारस नसल्यास त्याच्या कुलाकडे जात असे. फ्लेबियन उर्फ शूद्रवर्णीय लोकांत एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता त्याच्या मुलांकडे जात असे. परंतु त्याला वारस नसल्यास त्या मालमत्तोची व्यवस्था काय करीत असत याचा उल्लेख केलेला नाही. यांच्यांत मृत्यूपत्राची चाल नव्हती.

राजसत्तेच्या कालांतील लोकांत ठराव करण्याची चाल असे, व तारण म्हणून गहाणहि ठेवीत असत व हें गहाण कराराच्या पूर्ततेनंतर परत करावें लागे; नाहींतर शिक्षा केली जात असे. करार मोडल्याबद्दल न्यायकोर्टात दाद मागतां येत नसें. पूर्वीपासून विश्वासघात व राजद्रोह हे अपराध शिक्षेला पात्र असत. परंतु व्यक्तीच्या अथवा त्याच्या मालमत्तेच्या अपराधाला धार्मिक प्रायश्चित अगर सार्वजनिक अथवा खाजगी शिक्षा असे. रोममध्यें व्यक्तिविषयक सूडाची कल्पना बरेच दिवस चालू होती.

कुलाचा मुख्य हाच पुष्कळ अपराधांची चौकशी करणारा असे. मृत्यु, गुलामगिरी, हद्दपारी, कुलांतून काढून टाकणें वगैरे शिक्षा देण्याचा त्याला अधिकार असे. कुटुंबाला फौजदारी खटल्याची चौकशी करण्याचा अधिकार नसे परंतु त्याची रचनाच अशी असे कीं, पुष्कळ फौजदारी गुन्हे कुटुंबाच्या गुन्ह्मांत येत असत. खुनाची चौकशी खाजगी रीतीनें कधींच होत नसे व खुनाबद्दल सूड घेण्याला मुळीच मोकळीक नव्हती. चोरी हा खाजगी गुन्हा समजला जात असे.

लोकसत्ताक राज्यपद्धती पासून मध्य व दक्षिण इटली पादाक्रांत होईपर्यंतच्या लोकसत्तोचा काळ:- या कालाचा खात्रीलायक इतिहास जरी उपलब्ध नाहीं तर कांही ठळक गोष्टीवर भरंवसा ठेविण्याला पुरेशी माहिती उपलब्ध आहे. दोन पॅट्रिशियन कौन्सिलांची वार्षिक निवडणूक, फ्लेबमधून निवडल्या जाणार्‍या ट्रिब्युनची सुरवात, राजकीय सत्तेसंबंधी फ्लेब व पॅट्रिशियन लोक यांच्यातील तंटे या त्या ठळक गोष्टी होत. राजकीय व सामाजिक समतेच्या लढार्इंत फ्लेबियन लोक हळू हळू विजयी झाले. ख्रिस्त पू. ५०९ च्या कायद्याप्रमाणें रोम शहरांतील कोणत्याहि न्यायाधिशाला कॉमिशिया सेंच्युरीआटाकडे अपील केल्याशिवाय कोणाहि रोमन नागरिकाच्या जीविताला, स्वंतत्रतेला अगर नागरिकत्वाला धक्का पोचवितां येत नसें. ख्रिस्त पू. ४९४ व ४७१ त रदबदलीचा अधिकार असलेले ट्रिब्युन निर्माण करण्यांत आले. ख्रिस्त पू. ४५१ त 'नियमद्वादशी' सुरू करण्यांत आली व ती फ्लेबियन लोकांच्या कायद्याच्या दुरूस्तींकरितां व त्यांच्या लेखी संग्रहाकरितां जी चळवळ झाली तिचें फळ होय. ख्रिस्त पू. ४४५ मध्यें फ्लेबियन व पॅट्रिशियन यांच्यातील मिश्र विवाहाला कायद्यानें संमति मिळाली. ख्रिस्त पू.३६७ त फ्लेबियन लोकांना जमिनीची मालकी मिळविण्याचा हक्क प्राप्त झाला. देशांतील मानाच्या जागा मिळविण्याचा हक्क फ्लेबियन लोकांनी हळू हळू मिळविला. लोकसत्तेच्या काळांत फ्लेबियन लोकांनां सिनेटमध्यें घेत असत अशाबद्दल दाखले आहेत.

लोकसत्तेच्या काळांत कायदे करणार्‍या कॉमिशिया, कॉन्सिलियम फ्लेबिस् व कॉमिशिया ट्रिबुटा अशा ३ संस्था होत्या. क्युरीजच्या (कॉमिशियाच्या) सभेला फक्त मृत्यूपत्र व वारस यांनां अनुमति देण्याचा अधिकार असे. व यांचे कायदे बहुधां सार्वजनिक हितसंबधाचे व राज्यव्यवस्थेसंबंधाचे आहेत. कॉमिशियाचे कायदे सर्व लोकानां लागू असत व कौन्सिलचे कायदे फक्त फ्लेब लोकांनांच लागू असत.
रोमचे प्राचीन कायदे व्यक्तिविष्यक असत. म्हणजे रोमच्या नागरिकांनांच फक्त या कायद्यांचें रक्षण असे. एखादा परकी मनुष्य जर येथें आला तर त्याला येथील कायद्यांचें रक्षण नसे. परंतु जसजसा रोमचा व्यापार व इतर देशांशी दळणवळण वाढत गेलें तसतसे परदेशांतील लोकांनां रोमच्या कायद्यांचें संरक्षण मिळूं लागलें. नियमद्वादशीनें नवराबायकोसंबंधीच्या कायद्यांत विशेष म्हणण्यासारखा फरक केला नाही. फक्त या वेळेपासून लग्न धर्मविधीशिवाय होऊं शकत असे. या कायद्याप्रमाणें बापाचा मुलांवरील हक्क त्यानें त्याचा कृत्रिम विक्रय तीन वेळां केल्याशिवाय नाहींसा होत नसे.
प्राचीन कायद्यांत वस्तूंच्या मालकीला शास्त्रीय शब्द नव्हता, कारण त्यावेळीं सर्व मालमत्ता कुटुंबाच्या मुख्याच्या ताब्यांत असे. नियमद्वादशीमध्येंहि असल्या मालकीचा कोटेंच उल्लेख नाही. या कायद्यांत फक्त मनुष्याचें घर, शेती व तिच्या आनुषंगिक वस्तू यासंबंधींच्याच मालकीचा उल्लेख आहे; व असल्या वस्तूंची मालकी मिळविण्याला कांही विशेष उपाय असे असें नाहीं. परंतु यांव्यतिरिक्त वस्तूंच्या मालकीस एखादा दिवाणी उपाय योजावा लागे. असल्या उपायांत म्यान्सिपेशन, वस्तू कोर्टात सादर करणें, युसुकेपियन व मृत्युपत्र हे मुख्य आहेत. वारसासंबंधाचे राजसत्तेतील कायदे लोकसत्तोच्या आरंभी तसेच होते. मृत्युपत्र करणाराचा खुषीने होत असे. एखादा मनुष्य मृत्युपत्र न करतां वारला व त्याला (सुइ हेरीडिस) वारस नसला तर त्याची मालमत्ता त्याच्या वडिलाच्या बाजूच्या जवळच्या नातेवाईकाला मिळत असे व त्याला असला नातेवाईक नसला तर त्याची मालमत्त त्याच्या वंशजाला मिळत असे.

या काळांत शेती हा मुख्य धंदा होता व व्यापार फार थोडा चालत असे. असल्या व्यवहारांत दिलेल्या वचनांच्या पूर्ततेबद्दल शपथांवर व प्रतिज्ञेवरच भरंवसा ठेवावा लागत असे. व जर एखाद्यानें केलेला ठराव पाळला नाहीं तर कांही अटीप्रमाणेंच जर तो ठराव झाला असेल तर न्यायकोर्ट मध्यें पडून तो ठराव पूर्ण करावयास लावीत असे, परंतु कोर्टाच्या मध्यस्थीची अपेक्षा करावयाची असल्यास तो ठराव कायदेशीर असला पाहिजे, अगर दोन्ही पक्षांपैकी एखाद्यानें परस्पर कबुलीपेक्षां कांही तरी कृत्य करून कबुली कृतींत उतरविली पाहिजे.

पैसे तोलून उसने देण्याची चाल प्राचीन होती. साक्षीदारांसमोर तोलून दिलेल्या पैशाकरितां कायदेशीर उपाय करतां येत असे. कर्जाऊ दिलेली रक्कम नेमिलेल्या वेळी परत न केल्यास धनकोला कायदेशीर उपाय योजण्याचा हक्क असे. व ऋणकोशीं समेट न झाल्यास त्याला अडकवून ठेविण्याचा अगर हलकें काम करावयाला लावण्याचा अधिकार असे. परस्परांतील ठराव एका विशिष्ट प्रश्रोत्तरांच्या रूपांतच केल्यास त्यायोगानें कायदेशीर बंधन होत असे.

कायदेशीर उपाय:- हे उपाय पांच प्रकारचे आहेत: (१) साक्रयामेंटो, (२) पर ज्युडिसिस पास्टुलेशनेम, (३) पर कंडिक्शनेम, (४) पर मानस इंजेक्शनेम व (५) पर पिगन्टोरिस क्यापिओनेम. हे पांच उपाय ज्या उद्देशानें काढले आहेत ते व त्यांच्या रीती ह्मा निरनिराळ्या आहेत. हक्काच्या व कर्जाच्या प्रश्राच्या निकालाकरितां पहिले तीन उपाय आहेत. व बाकीचे दोन कायद्याच्या निकालाच्या अंमलबजावणी संबंधी आहेत. पहिल्या उपायाप्रमाणें परस्पर एकमेकांस रक्कम अनामत ठेविण्यास सांगत. व चौकशीच्या निकालाप्रमाणें या अनामत पैशाची विल्हेवाट लागत असे. ज्याची बाजू योग्य असेल त्या कोर्ट पैसे परत देत असे व दुसर्‍याचे पैसे धार्मिक कृत्याला म्हणजेच सार्वजनिक उपयोगांकरितां देत असे. दुसर्‍या उपायाप्रमाणें न्यायाधीश किंवा पंच नेमिण्याकरितां मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करतां येत असे. या उपायासंबंधानें जास्त माहिती उपलब्ध नाही. तिसर्‍या उपायानें नगदी दिलेले पैसे वसूल करतां येत असत. चवथ्या उपायाप्रमाणे कबूल केलेल्या कर्जाच्या खटल्यांत व ज्याचा निकाल न्यायकोर्टानें लाविला आहे अशा कर्जाबद्दल ३० दिवसांची मुदत दिली जात असे. या मुदतीनंतर जर रक्कम आदा करण्यांत आली नाही तर धनको ऋणकोला न्यायासनापुढें आणीत असे व त्यावेळीं सुद्धां कर्जाची फेड करण्यांत आली नाही तर धनको त्याला घरी नेंऊन कैदेंत ठेवूं शकत असे; त्यानंतरहि पक्षकारांत समेट झाला नाही तर ऋणकोला ६० दिवस कैदेंत ठेवण्यांत येत असे व या अवधीनंतर त्याला बाजारांत नेऊन त्याच्या देण्याबद्दल जाहीर करण्यांत येत असे. व असल्या तीन लागोपाठ जाहीर करण्यानंतर त्याला एखाद्या परकीयाला विकण्यात येत असे. पांचव्या उपायाप्रमाणें दिलेल्या कर्जाची फेड म्हणून धनकोला अधिकार असे; व याकरितां न्यायाधिशाची संमति असणे अवश्य नसे.

लोकसत्तेचा उत्तरार्ध.- सहाव्या शतकांत व्यापाराची वाढ झाल्यामुळे पुष्कळ परकीय लोक येथें आले म्हणून एतद्देशीय व परकीय यांच्यांतील न्यायाचा निवाडा करणार्‍या प्रेटर लोकांची संख्या हळू हळू वाढविण्यांत आली. ७ व्या शतकाच्या आरंभी पास झालेल्या अ‍ॅब्युशियन कायद्याने नियमद्वादशीच्या कायद्यांत बराच फरक झाला. धांर्मिक विचार व सार्वजनिक व व्यक्तिविषयक गुणासंबंधीचें मत यांच्यांत झालेल्या क्रांतीचा व्यक्तिविषयक कायद्यांवर बराच परिणाम झाला व त्यामुळें मालमत्ता व ठराव यांच्याबद्दलच्या कायद्यावरहि त्याचा परिणाम झाला. या अवधीत झालेले सर्व कायदे बहुतेक कायदे करणार्‍या सभेंने केलेले आहेत.

या अवधींत विशेष महत्त्वाचे फरक पब्लिशियन एडिक्ट यानें केलेले आहेत. या एडिक्टनें पूर्वीच्या कायद्यांतील दोष दूर केले.

डीओक्लेशियन सत्तेच्या आरंभा पर्यंतचा काल.- या कालांत क्रिरिटियम् कायद्याची मर्यादा जास्त नियंत्रित झाली. नागरिकांच्या कायद्याचा कडकपणा हळू हळू कमी झाला. नवर्‍याचा हक्क बहुतेक कमी झाला. गुलामांनां बंधमुक्त करतां येंऊ लागलें. वारसाचा हक्क त्याच्या हेतूच्या निदर्शनावरून सुद्धां सिद्ध होत असे. ही रोमच्या कायद्यांत हळू हळू झालेली क्रांति लोकांच 'जस् नॅचरल' कडे असलेल्या कलामुळें झाली आहे. या कायद्याचे विशिष्ट धर्म हे आहेत कीं (१) तो सर्व लोकांनां सारखा लागू असे. (२) तो सर्व राष्ट्रांच्या लोकांनां कोणत्याहि कालीं लागू असें (३) व व्यक्तींच्या हक्काची नैसर्गिक जाणीव हिच्याशी ह्मा कायद्याचे सादृश्य असे, केलेले करार पाळणें, समतेच्या तत्त्वावर नफा नुकसान देणे, व नातेवाइ्रकांचे हक्क कबूल करणें हे ह्माचे मुख्य सिद्धांत होते.

राज्यरचनेंत झालेल्या बदलामुळें या काळांत न्यायखात्याकडे पुष्कळ चांगले चांगले लोक येऊं लागले, कारण पूर्वी इतर खात्यांत असलेल्या मोठमोठया जागा या कालांत कमी झाल्या व मोठया जागा फक्त न्यायखात्यांत होत्या. तेव्हा साहजिकच मोठमोठे हुशार लोक न्यायखात्यांत काम करूं लागले व त्यामुळें कायद्यांत बर्‍याच सुधारणा झाल्या. आगस्टस राजानें साम्राज्यांतील सर्वांनां नागरिकत्वाचे अधिकार दिले. फौजदारी कायद्याच्या सुधारणेकरिता निरनिराळे कायदे पास केले. गृहनीति वाढविण्याकरितां व कायदेशीर लग्नाच्या वाढीकरितां कायदे केले. मोकळ्या झालेल्या गुलामांनां अतिशय सढळ हातानें नागरिकत्वाचे हक्क देतां येऊं नयेत म्हणून कायदा केला. टायबेरियस राजाच्या वेळेपासून सिनेट कायदे करीत असे. हॅड्रिअन राजानें पूर्वीच्या आज्ञापत्रांची तपासणी करण्याकरितां सालव्हियस ज्युलियन्सला सांगितलें व त्यानें फेरतपासणी करून तयार केलेल्या आज्ञापत्रानां सिनेटकडून कायद्याचें स्वरूप देवविलें.

पूर्वी न्यायाधीश लोक कायदेपंडितांनां सल्ला विचारीत असत. आगस्टस राजाने असल्या कायदेपंडितांनां सनद देऊन फक्त सनदी कायदेपंडितांनांच सल्ला विचारावा असा नियम केला व असा दिलेला सल्ला अमलांत आणणें किंवा न आणणें हे साधारणत: न्यायाधिशाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असे. या कालांत नागरिक व परकी यांच्यातील भेद नाहींसा झाला. परंतु सैनिक व सामान्य नागरिक यांच्यांतील भेद वाढला. सैनिकांनां वारसासंबंधाच्या कायद्यापासून पुष्कळ सवलती मिळाल्या.

या कायद्याचेंहि बरेंच रूपांतर झालें, या कालांत मृत्युपत्र करणार्‍याला एखाद्याला एखाद्याच्या आयुष्यभर आपल्या मालमत्तोचा वारसा देऊन नंतर तो तिसर्‍याच मनुष्याला देण्यासंबंधी मृत्युपत्रांत लिहितां येत होतें. अशा तर्‍हेनें मृत्युपत्रांत वारसा देऊन तो तिसर्‍याकरितां अनामत ठेवण्याची सोय या काळांत झाली. या पूर्वी लग्न झालेल्या मुलीला व तिच्या आईला परस्परांच्या मालमत्तेवर वारसा सांगतां येत नव्हता; परंतु या कालांत झालेल्या कायद्याप्रमाणें मृत मुलीच्या मालमत्तेवर बाप, भाऊ व बहीण यांच्याशिवाय आईचा वारसा इतर सगोत्रजांपेक्षा जास्त असे. मुलीचा बाप अगर भाऊ जिवंत असतां आईला मालमत्ता मिळत नसे. त्यांच्या पश्चात आईचा व बहिणीचा हक्क समान असे व इतर सगोत्रजांच्या हक्कापेक्षां आईच्या हक्काला जास्त महत्त्व दिलें जात असे.

डिओक्लेशियन पासून जस्टिनियन पर्यंतचा काल.- डिओक्लेशियनच्या कारकीर्दीपासून पुढें कायदे करण्याचा अधिकार फक्त राजांकडे गेला. सिनेट अस्तित्वांत होतें परंतु त्याचा राज्यकारभाराचा व कायदे करण्याचा अधिकार काढून घेण्यांत आला. सनदी न्यायपंडितांची सल्ला घेण्याची चाल सुद्धा बंद पडली व जुन्या कायद्यांच्या अर्थाकरितां व नवीन कायद्यांच्या उत्पत्तीकरितां लोकांनां राजावर अवलंबून बसावें लागत होतें.
ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वामुळें येथील कायद्याची प्रवृत्ति कॉन्स्टन्टाईन राजानें ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सुरू झाली. असल्या प्रवृत्तीची साक्ष पटविणार्‍या कायद्यांत या कालांत पास झालेले तीन कायदे मुख्य आहेत ते: (१) 'पापीया पोपेकन' कायदा रद्द करण्याचा कायदा (२) घटस्फोटाबद्दल शिक्षा करणारा कायदा व (३) एपिस्कोपेटिस ऑडिएन्शिया हे होत. कॉन्स्टन्टाईन राजापासून जस्टिनियन राजापर्यंत सर्व राजांनी घटस्फोटासंबंधी निरनिराळे कायदे केले व प्रत्येकाला आपल्या मागच्या राजानें केलेले कायदे इच्छित हेतु साधण्यास निरूपयोगी झाले म्हणून रद्द केले गेले.

डिओक्लेशियनच्या राज्यपद्धतींत पूर्वीची न्याय देण्याची पद्धत बदलणें भाग पडलें, कारण पूर्वी शपथ घेतलेल्या व दोन्ही बाजूंनां मान्य असलेल्या न्यायाधिशास न्याय देण्याचा अधिकार असे, परंतु या कालांत प्रांतिक राजप्रतिनिधीच न्याय देत असत. या कालांत न्याय मिळविण्याची पद्धतहि बदलली. वादीला कोर्टाकडे आपला फिर्याद सिद्ध झाली नाही तर प्रतिवादी खर्चाच्या दुप्पट दंड देण्याबद्दल कबुली द्यावी लागे. नंतर कोर्टाला जर फिर्याद योग्य वाटली तर प्रतिवादीला सरकारतर्फे बोलावणें पाठविण्यांत येत असे. तीन बोलावण्यांनंतर जर प्रतिवादी आला नाहीं तर त्याच्या अपरोक्ष खटल्याचा निकाल करण्यांत येत असे हजर राहिल्यावर प्रतिवादीला वादीच्या अर्जाला उत्तर द्यावें लागत असे. नंतर एक दिवस नेमण्यांत येत असे त्या दिवशीं दोन्ही पक्षांचे खटले चालू करण्याबद्दलच्या अडथळ्यांचे मुद्दे असलयास ऐकण्यांत येत; नाहीं तर पूर्वीच्या कालांत असलेल्या पद्धतीप्रमाणेंच पुढें खटला चालू रहात असे.

जस्टिनियनपूर्वीच्या राजांनी केलेल्या कायद्यांचे तीन संग्रह आहेत; ते प्रेगोरियन, हर्मोजिनियन व थिओडेसियन हे होत. पहिला संग्रह तिसर्‍या शतकाच्या शेवटी ग्रेगोरियसनें केलेला असून तो हेंड्रियनपासून डिओक्लेशियन पर्यंतच्या राजांनी केलेल्या कायद्यांचा संग्रह आहे. हमोजिनियननें ४ थ्या शतकाच्या शेवटीं पहिल्या संग्रहाला पुरवणी म्हणून एक कायदेसंग्रह केला. हाच संग्रह हमोंजिनियम या नांवानें प्रसिद्ध आहे. थिओडोसियन राजानें इ. स. ४२९ त कान्स्टंटाईनपासून आपल्या राज्यापर्यंत झालेल्या राजांच्या कायद्याचा संग्रह करण्याकरितां कमिशन नेमिले. त्याचा उद्देश न्यायपंडितांच्या लेखावरून निघणारे कायदे कास्टन्टाइनपासून झालेल्या कायद्यांचे एकीकरण करण्याचा होता. या संग्रहाला थिओडोसियनस् म्हणतात. या संग्रहाच्या प्रसिद्धीनंतर झालेल्या कायद्यांना नाव्हेलस असें म्हणतात. व त्याचे ३ संग्रह आहेत; त्यांनां पोस्ट थिओडोसियन नाव्हेलस असें म्हणतात. याशिवाय या काळांत झालेल्या कायद्यांचे दुसरेहि पुष्कळ संग्रह आहेत.

जस्टिनियन राजानेंहि कायदेसंग्रह करण्याकरितां एक कमिशन नेमलें. या संग्रहांत सिनेटनें पास केलेल्या कायद्यांचा संग्रह असून नोव्हेबर स. ५३४ पर्यंत त्यानें स्वत: केलेले कायदेहि त्यांत आहेत. या कालांत ख्रिस्ती धर्माच्या प्रभावामुळे कुटुंबाच्या कायद्यांत बरेच फरक झाले. आतां कायद्याच्या दृष्टीनें पतिपत्‍नीही सारख्याच दर्जांची समजलीं जात; व जस्टिनियन कायद्यानें तर बायकोला विशेष हक्क दिले. पूर्वीच्या कालांत रोममध्यें मुलावर बापाचा जितका अधिकार चालत असे तितका कोणत्याहि देशांत नसे; परंतु या कालांत जस्टिनियन राजांच्या कारकीर्दीत बापाचे बहुतेक विशेष हक्क काढण्यांत आले. अर्भकानां टाकणार्‍यांनां शिक्षा होऊ लागली; व मृत्यूची शिक्षा देण्याचा अधिकार असलेलया कौटुंबिक न्यायसभेची पद्धत अजीबात बेद करण्यांत आली दारिद्रयानें पोषणास असमर्थ असलेल्या पित्याखेरीज कोणालाहि मूल विकण्यास बंदी होती. कौटुंबिक कायद्याच्या प्रत्येक भागांत सुधारणा झाली. मालमत्तेच्या कायद्यांतहि पुष्कळ रूपांतर झालें. दुसर्‍याच्या नांवावर मालकी करण्याच्या पद्धतीत साधेपणा आला. जमीन व घरें विकण्याकरितां लेखी दस्तऐवज लागूं लागले; व असले दस्तऐवज साक्षीदारांच्या देखत लिहावे लागत व त्यांच्याच देखत ताबा द्यावा लागे.
वारसासंबंधीच्या कायद्यांतहि बर्‍याच सुधारणा झाल्या. त्यामुळें एखाद्यानें आपल्या मरणसमयीं आपल्या वारसानें एखाद्याला कांही मालमत्ता द्यावी अशी इच्छा दर्शविली तर वारसाला ती पूर्ण करावी लागे; अगर त्याला अशी इच्छा मुळीच दर्शविली गेली नाही असें शपथेवर सांगावें लागत असे. जस्टिनियन राजानें केलेला कायदेसंग्रह कायद्यांच्या शाळेंतून मूळग्रंथ म्हणून शिकविला जात असे. व राजानें असा नियम केला कीं कायदेसंग्रहाखेरीज दुसर्‍याचा उपयोग केला जात नसें. एखाद्या खटल्यासंबंधाचा कायदा या संग्रहांत नसून त्यांत असलें एखादें मागचें उदाहरण नसेल तर तो खटला राजाकडे निकालाला पाठवावा लागे. कायदेसंग्रह चांगला रहावा म्हणून जस्टिनियन राजानें यावर टीकात्मक लेख लिहूं दिले नाहींत अगर त्यांचा सारांशहि काढूं दिला नाही.

यूरोपमधील पूर्वेकडील राष्ट्रांत या कायदेसंग्रहाला पास झालेल्या कायद्यांचे रूप १८३५ त प्राप्त झालें व पश्चिम भागांतल्या कायद्यांची उत्पत्ति या कायदेसंग्रहापासूनच झाली आहे. १६ व्या शतकांत रोमच्या कायद्यांचे पुनरूज्जीवन झालें. रोमन लोकांचे प्राचीन कायदे अक्षरश: पाळले जात नव्हते, व ते पुरातन कायदेच समजले जात. व या कालांत न्यायपंडित अर्वाचीन रोमन कायदा रचावयास लागले.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .