विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रोहटस - पंजाब, झेलम जिल्ह्याच्या झेलम तहशिलींतील एक किल्ला. बादशहा शेरशहानें हा बांधला. याला ४० लक्ष रू. खर्च आला याचा घेर २॥ मैल असून भिंती ३० फूट रूंद असून ३०-३५ फूट उंच आहेत. याशिवाय याला ६८ बुरूज व बारा दरवाजे आहेत; त्यांपैकी सोहल दरवाजा फारच उत्तम आहे.
(२) बंगाल, शाहाबाद जिल्ह्यांतील सस्त्राम विभागांतील एक किल्ला. ११०० च्या सुमारास हा किल्ला प्रतापधवलच्या ताब्यांत होता. १५३९ त तो शेरशहानें घेतला. पुढें अकबरचा हिंदू सेनापति मानसिंग येथें राहत असे. १७६४ त तो ब्रिटिशांच्या हांती आला. याचा घेर सुमारे २८ मैल आहे.