विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रोहिणी - प्राचेतस दक्षाच्या साठ कन्यांतील एक व चंद्राच्या सत्तावीस स्त्रियांतील एक. इतर कन्यांपेक्षां हिच्यावर जास्त प्रेम केल्याबद्दल दक्षानें चंद्राला तूं क्षयी होशील असा शाप दिला. ही सध्यां नक्षत्ररूपानें दिसतें.
(२) वसुदेवाच्या स्त्रियांतील एक. हिचा पुत्र बलराम हा श्रेष्ठ असून त्याशिवाय हिला आणखीहि पुत्र होते.