प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

र्‍हेडेशिया - दक्षिण आफ्रिकेंतील ब्रिटिशांच्या ताब्यांत असलेले संस्थान. याच्या दक्षिणेस ट्रान्सव्हॉल; पश्चिमेस पश्चिमपोर्तुगीज आफ्रिका; व पूर्वेस ब्रिटिश न्यासालँड आहे. झांबेझी नदीनें या देशाचें दक्षिणर्‍हेडेशिया आणि उत्तरर्‍हेडेशिया असे दोन विभाग केले आहेत. हा देश कांगो नदीच्या दक्षिणेकडील उंचवटयाच्या प्रदेशावर वसलेला असून यांतून, लींपोपो साबी व पुंग्वे या नद्या वाहतात, बुलाबायोपासून सालिसबरीवरून थेट पोर्तुगीज पूर्वआफ्रिकेंपर्यंत या देशांतून रेल्वे गेली आहे. दक्षिण र्‍हेडेशियाचें क्षेत्रफळ १४९००० चौरस मैल असून १९२१ सालीं येथें ३३६२० यूरोपीयन व सुमारें ७७०००० एतद्देशीय लोक होते. उत्तरर्‍हेडेशियाचें क्षेत्रफळ २९१००० चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) ३७५० यूरोपियन व १० लाख एतद्देशीय अशी होती. दक्षिण र्‍हेडेशिया जरी उष्णकटिबंधांत आहे तरी उंचवटयावर असल्यामुळे तेथील हवा चांगली आहे. सप्टेंबरपासून मार्चपर्यंत पाऊस पडतो.

र्‍हेडेशियांतील लोक बांटुवंशाचे असून त्यांचे (१) र्‍हेडेशियांतील मूळचे रहिवाशी व (२) झुलुलँडमधून १९ व्या शतकांत येऊन राहिलेले अमाझुल, असे दोन वर्ग आहेत. दक्षिण र्‍हेडेशियांत मशोना व माटाबेले अशा दोन जाती आहेत. वायव्य र्‍हेडेशियांत बारोत्से जातीचे लोक रहातात. अगदी उत्तरेस अकोरीकोरी व मकुड्जा जातीचे लोक रहातात. यांच्या अनेक पोटजाती असून हे लोक फार भोळे आहेत. म्वारी हा त्यांचा प्रमुख देव होय. पश्चिम प्रांतांत अमंडाबेले, अमाहोली, इत्यादि अनेक जातीची वस्ती आहे. मुख्य शहरें, सॅलिसबरी (दक्षिण र्‍हेडेशियाची राजधानी), बुलवायो, उंटाली, ग्वेलो, व्हिक्टोरिया, मेलस्टर, लिव्हिंग्स्टन, अबरकॉन इत्यादि होत, र्‍हेडेशियन रेल्वेमुळें मुख्य शहरें आणि खाणीचीं व व्यापाराची ठिकाणें एकमेकांस जोडलीं आहेत. जमीन शेतकीच्या लायक असून मका या मुख्य धान्याशिवाय गहूं, जव व ओट ही धान्यें येथें होतात. येथील तंबाखू प्रसिद्ध आहे. ग्लोब आणि फोनिक्स येथील मुख्य सोन्याच्या खाणींशिवाय इतर पुष्कळ ठिकाणीं सोन्याच्या खाणी आहेत. चांदी, कोळसा, शिसें तांबे व हिरे हीं येथें सांपडतात. १९२३ सालीं दक्षिण र्‍हेडेशियाची आयातनिर्गत अनुक्रमें ३५५९१७० व ५३१०५६१ पौडंच्या मालाची होती. उत्तर र्‍हेडेशियाची आयात-निर्गत अनुक्रमें ५२८०६८ व ४६३५८५ पौडंच्या मालाची होती.

राज्य पद्धति.- दक्षिण र्‍हेडेशियामधील राज्यकारभार स. १९२३ च्या आक्टोबरपर्यंत दक्षिण आफ्रिका कंपनीच्या ताब्यांत होता. पण १९२३ च्या आक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून दक्षिण र्‍हेडेशिया बादशहाच्या ताब्यांतील वसाहतीनां जोडण्यांत आला व तेथें नवीन राज्यपद्धति अंमलांत आली. या नवीन पद्धतीनें र्‍हेडेशियाचा राज्यकारभार गव्हर्नर, एक कार्यकारीमंडळ व कायदेमंडळ यांच्या ताब्यांत असतो. कायदेमंडळाला दोनतृतीयांश मतानें शासनपद्धतींत दुरूस्ती सुचविण्याचा अधिकार आहे. स्त्रियांनांहि मतदानाचा अधिकार आहे. उत्तर र्‍हेडेशियाचा राजकारभार १९२४ च्या एप्रिलपासून ब्रिटिश सरकारनें आपल्या ताब्यांत घेतला आहे व दक्षिण र्‍हेडेशियाच्या शासनपद्धतीप्रमाणेंच येथील राज्यघटना बनविण्यांत आली आहे. १९२१ सालीं दक्षिण र्‍हेडेशियांत सुमारें ८० शाळा असून त्यांपैकी ५ एतद्देशियांकरितां होत्या. वसाहतींने २२१९४० पौंड शिक्षणासाठीं १९२१ सालीं खर्च केले. १९२३ साली दक्षिण र्‍हेडेशियाचें १३२६४६९ पौड उत्पन्न व खर्च १३५७४४२ पौड होता; उत्तर र्‍हेडेशियाचें २५८००८ पौड उत्पन्न व ३३८९८३ पौड खर्च होता.

इतिहास.- प्रथम बांटु लोकांच्या ताब्यांत र्‍हेडेशियाचा प्रदेश होता. पुढें १५ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत मोनोमोटापा घराण्यांतील राजांनी येथें राज्य केलें. नंतर झुलू लोकांच्या माटाबेले जातीचा पुढारी मॉसिलिकेट्झ यानें व त्याच्या पश्चात् लॉ बेंगुलानें र्‍हेडेशियांतील बर्‍याच भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली. १९ व्या शतकांत आफ्रिका खंडांतील बेवारशी भाग आपापल्या ताब्यांत आणझयाबद्दल पश्चिम यूरोपीय राष्ट्रंमध्यें स्पर्धा सुरू झाली. शेवटी र्‍हाडस नामक एका इंग्लिश मुत्सद्दयानें १८८८ साली लॉ बेंगुलाशी तह करून, ब्रिटिशांच्या परवागीशिवाय इतर कोणत्याहि राष्ट्राशीं लॉ बेंगुलानें तह करतां कामा नये असें ठरवून घेतलें व पुढें लौकरच त्याला पेन्शन घेण्यास लावून त्याच्या ताब्यांतील सर्व खाणी वगैरेचें मालकी हक्क र्‍हाडस प्रभृति जमीनदारांनी आपल्याला मिळविले व अशा रीतीने हळू हळू हा सर्व प्रदेश ब्रिटिश साऊथ ऑफ्रिकन कंपनीच्या ताब्यांत आला. या कंपनीला १८८९ साली याची सनद मिळाली. झांबंझीला रेल्वे नेणें, वसाहतवाल्यांनां उत्तोजन देणें व व्यापाराची उन्नति करणें हे कंपनीचे उद्देश होते. आरिबाल्ड रॉशकोलो होमनें मोशानालॅंड काबीज करून पोर्तुगीजांचा पराभव केला. डॉक्टर जामिसनच्या कारकीर्दीत बनियालँड ट्रेक येथील बोर स्वारीची पिच्छेहाट झाली. पोर्तुगीजांच्या संमतीनें नवीन बंदर केल्यामुळें व नवीन सोन्याच्या खाणी सांपडल्यामुळें देशाची पुष्कळ भरभराट झाली. १८९५ सालच्या जाहीरनाम्याप्रमाणे सनदी कंपनीच्या भागाला र्‍हाडेशिया हें नांव देण्यांत आले. केप व कायरो यांमध्ये दळणवळण सुरू करण्याकरितां ऑफ्रिकन ट्रान्सकाँटिनेन्टल कंपनीची स्थापना झाली. बेचुआनालँडचा कारभार कंपनीसरकारकडे देण्याकरितां ब्रिटिश सरकारनें दिलेली संमति जामिसनच्या हल्यामुळें रद्द करण्यांत आली. जामिसननंतर आलेल्या अर्लग्रेच्या कारकीर्दीत मेटेवल लोकांनी, कंपनीच्या जुलुमानें पीडित झाल्यामुळें बंड केलें, या १८९६ सालच्या बंडानंतर येथील राज्यकारभारांत पुष्कळ फेरफार झाले. ब्रिटिश साउथ ऑफ्रिकन वसाहतींचे अधिकाधिक ऐक्य होत जावे या निमित्तानें जी चळवळ सुरू झाली तींत दक्षिण र्‍हाडेशियानेंहि उत्याहानें भाग घेतला पण १९०८ सालीं जी वसाहतपरिषद भरली होती तींत र्‍हाडेशिया हा परंतत्र असल्यामुळें र्‍हाडेशियन सभासदांनां फारसा मान मिळाला नाही. व दक्षिण आफ्रिकन संघांत त्यांचा समावेशहि करण्यांत आला नाही. तथापि र्‍हाडेशियांतील बरेच लोक कंपनीच्या ताब्यांत रहाण्याला तयार असल्यामुळें त्यांनी या प्रश्राकडे विशेष लक्ष दिलें नाही.

१९११ साली र्‍हाडेशियाचे जे तीन भाग होते ते बदलून उत्तर र्‍हाडेशिया व दक्षिण र्‍हाडेशिया एवढे दोन भाग ठेवण्यांत आले. दक्षिण आफ्रिकन संघाने दक्षिण र्‍हाडेशियाला आपल्या संघांत सामील होण्याला परवानगी दिली होती. तथापि दक्षिण र्‍हाडेशिया त्याला कबूल नव्हता. त्याला स्वत:चें पूर्ण स्वांतत्र्य पाहिजे होतें. १९११ साली, कायदेमंडळांत निवडलेल्या प्रतिनिधींनां बहुमत देण्यांत आले; व त्यामुळें दक्षिण र्‍हाडेशिया व त्याचा कारभार चालविणारी कंपनी यांच्यामध्यें झगडयाचें बी रूजलें गेलें. १९१४ साली या झगडयाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. त्याच सालच्या कायदेमंडळानें दक्षिण र्‍हाडेशियांतील जमिनीवर कंपनीचा मालकी हक्क नाही असें ठरविलें, व हा प्रश्र न्यायकमिटीकडे सोपविण्यांत आला. इतक्यांत महायुद्धाला सुरवात झाली. र्‍हाडेशियानें महायुद्धामध्यें दोस्तसरकारांना सर्व तर्‍हेनें मदत केली. इकडे र्‍हाडेशियांतील अंतर्गत कारभारांबद्दल व विशेषत: कंपनीच्या जमीनमालकीच्या प्रश्रावर न्यायकमिटीनें आपलें पुढील मत जाहीर केले; दक्षिण र्‍हाडेशियांतील सर्व जमीन राजाच्या मालकीची असून ती कंपनीला उपभोगासाठी देण्यांत आली आहे व तिच्यापासून सर्व जमीन काढून घ्यावयाची असल्यास, तिला तोटा आला असल्यास तो भरून दिला पाहिजे. कंपनीनें ज्या जमिनी विकल्या असतील त्या तिनें आपल्या अधिकारांतच विकल्या आहेत, सर्व खाणीवर कंपनीची सत्ता आहे. त्यानंतर कंपनीला किती तोटा आला त्याचा अंदाज ठरविण्यांत आला व त्याची भरपाई दक्षिण र्‍हाडेशियानें दिल्यास जबाबदारी राज्यपद्धति त्याला देण्यांत यावी, असा कायदेमंडळानें ठराव केला. तथापि लॉर्ड मिलनर या वसाहतसेक्रटरीनें तसें करण्याला अनुमति दिली नाही. तथापि त्यानें पुन्हां एक कमिटी नेमिली व त्या कमिटीनें दक्षिण र्‍हाडेशिया हा ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यांत येऊन त्याला जबाबदारीचें स्वराज्य देण्यांत यावें अशी शिफारस केली. पण या कमिटीनें आपलें मत देण्यापूर्वी दक्षिण र्‍हाडेशियांतील सर्व रयतवारी जमिनीवर दक्षिण आफ्रिकन संघाची मालकी कबूल करण्यास दक्षिण र्‍हाडेशिया तयार असेल तर त्याला आपल्या संघांत सामील करण्यांत येईल असा स्मट्स साहेबानें खलिता पाठवला पण १९२३ साली, कायदेमंडळाच्या ठरावाला अनुसरून दक्षिण र्‍हाडेशियाला जबाबदारीचें स्वराज्य देण्यांत आल्यामुळें स्मट्स साहेबाचा खलिता विचारांत घेण्याचें कारणच उरलें नाही.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .