विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लँकेस्टर - इंग्लंड, लँकॅंशायर कौंटीमधील एक बंदर व म्युनिसिपल बरो. लोकसंख्या (१९२१) ४०२१२. हें बंदर ल्युना नदीमुखाच्या दक्षिण तीरावर आहे. हा दुर्ग प्राचीन रोमन छावणीच्या ठिकाणी उभारला असावा असा अंदाज आहे. स्टोरी संस्थेंत चित्रांची गॅलेरी, कलाभुवन, पदार्थसंग्रहालय व ग्रंथालय आहेत. येथील मुख्य उद्योगधंदे म्हणजे कापूस पिंजणें, मेणकापड, नक्षीदार लांकूडकाम, रेल्वेचे डबे वगैरे तयार करणें होत. प्राचीन काळी लँकेशायर हें रोमन लोकांचे महत्त्वाचें ठाणें होतें. येथें डेन्स लोकांच्या वेळचे कांही अवशेष दृष्टीस पडतात.