विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लंडनडेरी - आयर्लंड, लंडनडेरी परगण्याचें मुख्य शहर. लोकसंख्या (१९०१) ३८८९२ होती. येथें फॉइल विद्यालय व मागी विद्यालय, आणि सेंट कोलम्बोचें मंदिर या मुख्य इमारती आहेत. या शहरांत तागाचा मुख्य कारखाना आहे. शिवाय सॉलमन मासे धरण्याचा मोठा धंदा चालतो. फाईल नदीवरील हें बरेंच मोठें बंदर आहे. या बंदरांतून ग्रेट ब्रिटनला शेतकीचें उत्पन्न जातें. ग्लासगो, लिव्हरपूल, बेलफास्ट वगैरे ठिकाणांहून येथें नियमित वेळीं उतारू आगबोटी येतात.