विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लॅपसाकस - आशियामायनर. ही प्राचीन ग्रीक वसाहत मिसियांत होती. ग्रीक वसाहतीपूर्वी ही पिल्युस नांवानें प्रसिद्ध होती. ग्रीक वसाहतीपूर्वी ही पित्युस नावाने प्रसिद्ध होती. ही हेलेस्पांटवर गॅलीपोलीच्या समोर होती. येथील बंदर चांगलें असून आसमंतांतील प्रदेश मद्यासाठी प्रसिद्ध होता. मिकेलच्या युद्धानंतर हें (इ. स. पूर्वी ४७९) हें अथेनियनांस मिळालें परंतु त्यांच्या विरूद्ध बंड केल्यानें याचा नाश झाला. सिरीयाच्या अँटीओकपासून या शहराचा बचाव केल्यामुळें येथील लोकांचें व रोमचें सख्य झालें. प्रायपस देवाचें येथें मुख्य देवस्थान होतें.