विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लबदर्या - मुंबई इलाख्यांत सिंधप्रांतामध्यें लारखाना जिल्ह्मांतील हा एक तालुका आहे. याचें क्षेत्रफळ ३५६ चौ. मैल असून लोकसंख्या १९२१ सालीं ६८७६४ होती. तालुक्यांत ५७ खेडीं असून तालुक्याचें ठिकाण डोकरी हें आहे. जमीन फार सुपीक आहे. तांदुळाचें पीक मुख्य समजलें जातें. सिंधुनदाला पूर येऊन गेल्यावर गाळ वाहून आलेल्या जमिनींत गहूं व हरभरा पेरतात. तो फार उत्कृष्ट असतो. लारखाना जिल्ह्मांतील इतर कोणाच्याहि भागापेक्षां लबदर्या तालुक्यांत आंबे व इतर मळ्यांतील फळभाजी वगैरे विपुल होतात.