विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लल्ल - सुमारें शके ५६० साल हा लल्लाचा काल असावा असें अनुमान निघतें. तो स्वत: वेध घेणारा व शोधक होता. धीवृद्धिद तंत्र या नांवाचा त्याचा गणितग्रंथ आहे. तो सुधाकर द्विवेदी यानें १८८६ सालीं शोधून छापला आहे. याच्या ग्रंथांत अयनचलनाचा विचार मुळींच नाहीं. रत्नकोश या नांवाचा एक मुहूर्तग्रंथहि लल्लानें लिहिला आहे.