विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लल्लूजी लाल- एक हिंदुस्थानी ग्रंथकार. हा गुजराथी ब्राह्मण असून उत्तरहिंदुस्थानांत राहिलेला होता. डॉ. गिलख्राइस्टच्या नेतृत्वाखाली यानें व सदलमिश्रानें नवीन हिंदी भाषा उर्दू ही होती, आणि अरबी व पर्शियन भाषेंतील पुष्कळ शब्द त्यांत येत असत; अशा प्रकारच्या नवीन हिंदी भाषेची फार आवश्यकता होती. व ती अवश्कता, यानीं हे फारशी व अरबी शब्द काढून त्यांबद्दल संस्कृत भाषेंतील शब्द घालून पुरी केली. या नवीन हिंदी भाषेला 'खरी बोली' असेंहि नांव आहे. 'उच्च हिंदी' असेहि म्हण्तात; व ही हल्ली उत्तरहिंदुस्थानांत फार फैलावली आहे. तरी पण काव्यामध्यें मात्र हिचा उपयोग अद्यापि करण्यांत येत नाहीं पण गद्यवाङ्मयासाठीं या भाषेचाच उपयोग होतो. या भाषेंतील पहिलें गद्य पुस्तक लल्लूजी लालचें प्रेमसागर हें होय.
लल्लूजी ग्रंथ. (१) प्रेमसागर हा ग्रंथ भागवत पुराणाच्या दहाव्या स्कंधाचें हिंदींत भाषांतर आहे. (२) लताइफ-इ-हिंदी-यांत उर्दू, हिंदी व व्रजभाषा यांतील शंभर गोष्टींचा संग्रह आहे. (३) राजनीति-हितोपदेशाचें व्रजभाषेंत भाषांतर. (४) सभाविलास-व्रजभाषेंतील प्रसिद्ध लेखकांचे उतारे एकत्र केलेलें पुस्तक. (५) माधवविलास; (६) लालचंद्रिका-बिहारी-लालाच्या सातसाईवर टीका; (७) मकारदिर-इ-भाषा-हिंदी व्याकरण; (८) सिंहासनबत्तीशी; (९) वेताळपंचिशी सूरतीमिश्राच्या व्रजभाषेंतील या पुस्तकाच्या भाषांतराचें हें हिंदींत भाषांतर आहे. (१०) माधवानल कादंबरी मोतीरामाच्या कादंबरीचें भाषांतर; व (११) शाकुन्तल.