विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लष्कर - ग्वाल्हेर संस्थानची सांप्रतची राजधानी. हीं जुनें ग्वाल्हेर शहर व किल्ला यापासून २ मैल आहे. पूर्वीची शिंदे सरकारची राजधानी उज्जैनी येथें होती. लष्करची स्थापना मूळ दौलतराव शिंदे यानीं स. १८१० त केली. त्यावेळेस येथें महाराजांना वाडा व दुसर्या कांहीं इमारती होत्या. १८२९ सालीं लष्करला व्यवस्थित रूप आलेलें होतें. हमरस्त्यावर पुष्कळ चिरेबंदी हवेल्या बनल्या होत्या. स. १८५८ त झांशीची राणी व तात्या टोपी बंडवाल्यांनां मिळून तारीख ३० रोजीं लष्करला येऊन शिंद्याची मदत मागूं लागले. शिंद्यानें मदत तर दिली नाहींच; उलट त्यांजवर हल्ला केला. शिंद्याचें मदत तर दिली नाहीच; उलट त्यांजवर हल्ला केला. शिद्याचें सैन्य फितूर होऊन शिंद्यास आग्रा किल्ल्यांत आश्रय घेणें भाग पडलें. सर ह्मू रोजने बंडवाल्यांपासून लष्कर ता. २० जून रोजीं परत घेतलें. लष्करची रचना फार रेखीव असून किल्ल्याखाली फूलबाग नांवाचा बाग आहे. सांप्रतचे महाराज जयधिलास नांवाच्या वाडयांत रहात असून मोतीमहालांत कांही कचेर्यांकरितां व्यवस्था केली आहे. मोतीमहालाच्या दक्षिणेस एलजिन क्लब व जयाजींराव इस्पितळ आहे. राजवाडयाच्या पलीकडे शहराचा भाग लागतो. दिल्लीच्या चांदणीचौकासारख्या येथील बाजारांत श्रीमंत सराफ लोकांची दुकानें दुतर्फा असून मधून प्रशस्त व रूंद असा रस्ता गेलेला आहे. येथील इमारतीचें चिरेबंदी काम प्रेक्षणीय आहे. येथील लोकसंख्या सुमारे ८००००० आहे. लोक बहुधां व्यापारी असून संपन्न आहेत. येथें १८८७ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. स्टेशनजवळ हिंदु लोकांकरितां २ धर्मशाळा असून त्यांपैकी डफरिन नांवाची धर्मशाळा सुंरेख आहे.