प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लाटिन वाङ्‌मय, भाषा.- ख्रिस्त पूर्व ६ व्या अगर ८ व्या शतकांत लॅटिन भाषा रोम व त्याच्या जवळच्या मुलुखांत प्रचारांत होती अशाबद्दलचा खात्रीलायक पुरावा उपलब्ध आहे. तथापि नक्की कोणकोणत्या प्रदेशांत बोलली जात होती याबद्दल मात्र खात्रीलायक अनुमान करतां येत नाही. तौलनिकभाषाशास्त्रज्ञांनी लॅटिन ही इंडोयुरोपीयन भाषासंघाच्या इटालियन भाषाशाखेची एक पोटभाषा ठरविली आहे. तथापि इटालियन शाखेंतील फॉलिस्कन पोटभाषेमध्यें व लॅटिनमध्येंच तेवढें खरें साम्य आढळून येतें. असें आहे तरी लॅटिन व इतर इटालियन पोटभाषांमध्यें वर्ण, वर्णोच्चार वगैरे बाबतींत थोडेंफार साम्य आढळून आल्याविना रहात नाहीं. कालांतरानें इंडो-यूरोपीय भाषासंघातील पोटभाषा परस्परांपासून फुटूं लागून इटालियन भाषावर्ग हा इतर भाषावर्गांपासून विभक्त झाला व त्याची स्वतंत्रपणें वाढ होण्यास सुरवात झाली. सिसरोच्या काळची लॅटिन भाषा ही फाटाफुटीनंतरच्या लॅटिन भाषेचें परिणत स्वरूप होय असें म्हणावयास हरकत नाहीं. फुटीपूर्वीच्या लॅटिन भाषेंत व नंतरच्या लॅटिन भाषेंत बरेचसे फरक आढळतात. उदाहरणार्थ फुटीच्या पूर्वी लॅटिन शब्द उच्चारतांना त्यांतील पहिल्या अक्षरावर जोर देण्यांत येत असे पण पुढें शेवटच्या तीन अक्षरांवर अधिक जोर देण्यांत येंऊ लागला. जसें-अमाबामुस. याशिवाय इतरहि बरेच फेरफार घडून आले. उदाहरणार्थ ज्या शब्दाच्या शेवटचें अक्षर आय होते तें 'ई' करण्यांत आला; जसें अँटी = अँटे. शेवटच्या शब्दाचा 'ओ' चा ई करण्यांत आला, जसें सेकुएरो = क्षेकुएरे. इ. एल्, इ एल् एल् वगैरेंच्या इ मागें आली असतां 'ओ' मध्यें रूपांतर करण्यांत आलें जसें:-व्हेले = व्होलो. व्यंजनांमध्यें खालीलप्रमाणें फेरफार झालेले आढळतात. दोन अक्षरांमध्यें आय आला असतां तो गाळण्यांत येऊं लागला. उदाहरणार्थ ट्रिइसचें ट्रेस झालें. 'डु' हा शब्दामध्यें आला असतां त्याचा 'ब' झाला. जसे डुएल्लुम = बेल्लम. दोन स्वरांमधील 'एस' च्या ऐवजीं आर घालण्यांत येऊं लागला. जुन्या लॅटिनमधील एसम् व एसो हे एरम् व एरो असें लिहिण्यांत येऊं लागले. आर एस्, एल एस्, हे डबल आर, डबल एल झाले. जसें फसेंच्या बदलीं फेरे असें रूप बनलें. एम्, एन्, एल्, व्ही च्या पूर्वीच्या एसचा लोप झाला. जसें प्रिसमुसबदलीं प्रिमुस् शब्द आला; इस्डेमचें इडेममध्यें रूपांतर झालें.

शब्दघटनाशास्त्रांहि बरेंच फेरफार घडून आले. नामाच्या बाबतींत द्विवचनाचा लोप झाला. 'ओ' कारन्त नामाच्या व 'आ' कारांत नामाच्या षष्ठी विभक्तांच्या प्रत्ययांत फेर झाला. जुन्या लॅटिनमध्यें नामाचे शब्दाच्या अंत्याक्षरावरून चार प्रकार घडले होते त्यांच्या जागी पांच प्रकार झाले. क्रियापदाच्या बाबतींत जे अनेक बदल घडून आले त्यांमध्यें रीतिभूतकाळ, व पूर्णभूतकाळ यांचें एकीकरण भूतभूतकाळवाचक धातुसाधित अव्ययांतील सुधारणा, इत्यादि प्रमुख होत. वाक्यरचनेच्या बाबतींत मुख्य फेरफार घडून आले ते असे -: ग्रीक अगर संस्कृत भाषेमध्यें एकाच विभक्तीचा निरनिराळ्या तर्‍हेनें उपयोग करण्यांत येत असे. परंतु नवीन लॅटिनमध्यें विभक्तीचे उपयोग अधिक संकुचित करण्यांत येऊं लागले. संकेतार्था (सबजंक्टिव्ह) चा उपयोग अधिक करण्यांत येऊं लागला. धातुसाधित अव्यय घालून गौण वाक्य बनविण्याची पद्धत प्रचारांत आली.

लॅटिन भाषेवर ग्रीक भाषेचा परिणाम:- या नवीन लॅटिन भाषेवर ग्रीक भाषेचा बराच परिणाम झालेला आढळतो. ग्रीक वर्चस्वाच्या मुख्यत: चार अवस्था आढळतात. रोमन व ग्रीक संस्थानांचा प्रथमत: ज्यावेळी संबंध येऊं लागला ती पहिली अवस्था होय. या काळांत ग्रीक शहरांचे वाचक शब्द, ग्रीकांचे व्यापारविषयक शब्द, ग्रीक देवतावाचक शब्द लॅटिनमध्यें रूढ झाले. जसें-सिकुली, ग्रेशी, तालेंतुम्, अँकोरा, अपोल्लो वगैरे. पुढें जसा रोमन लोकांचा व ग्रीकांचा अधिकाधिक संबंध येऊं लागला तसतसे ग्रीकाचे व्वहारांत नेहमीं बोलण्यांत येणारे शब्द लॅटिनमध्यें येऊं लागले. पण हे शब्द मात्र लॅटिन प्रत्यय लावून वापरण्यांत येत असत; ही दुसरी अवस्था होय. तिसर्‍या अवस्थेंत ग्रीक शब्द ग्रीक प्रत्ययासह लॅटिन भाषेंत रूढ झालेले आढळतात. शेवटच्या म्हणजे चौथ्या अवस्थेंत ग्रीक ग्रंथांचें भांषांतर करतांना लॅटिन शब्दांनां देखील ग्रीक प्रत्यय लावलेले दृष्टीस पडतात.

लॅटिन उच्चार :- लॅटिन अक्षरांच्या उच्चारांसंबंधी संपूर्ण विवेचन करणें शक्य नाहीं. तरी त्यातल्या त्यांत मुख्य विशेष तेवढे पाहणें जरूर आहे. लॅटिनमध्यें 'सी' चा उच्चार नेहमींच 'क' होतो. इंग्लिश मधील 'के' या अक्षरासारखें लॅटिन मध्यें स्वतंत्र अक्षर नाहीं. 'क्यू' च्या पुढें नेहमीं यू हा स्वर यावयाचाच. 'जी' चा उच्चार ग असा होतो; 'ज' होत नाहीं. इंग्लिशमध्यें 'जे' हें जें अक्षर आहे त्याला सदृश असें लॅटिन मध्यें अक्षर पूर्वी नव्हतें. 'आय' याचाच व्यंजनाप्रमाणें उपयोग करण्यांत येई. उदाहरणार्थ 'यूडेक्स' (जूडेक्स = न्यायाधीश). पण उत्तरकालीन वाङ्‌मयांत 'जे' अक्षर कधीं कधीं वापरण्यांत येतें. इंग्लिशमधील 'डी' अक्षराप्रमाणेंच लॅटिनमध्यें 'डी' चा द अगर ड असा उच्चार होतो तथापि 'डी' च्या पुढें आय् अगर स्वर आल्यास क्कचित 'ज' असाहि उच्चार होतो. जसें 'डायर्नल' च्या बदली ज्यर्नल. 'एन' चा उच्चार न होतो तथापि पुढें 'कवर्गातील अक्षर आल्यास ङ्ग असा होतो. 'ब' चा उच्चार 'व' हि होतो. बवयो:सावर्ण्यम्' या संस्कृत नियमाशी या बाबतींत साम्य दिसतें. 'बी' च्या पुढें 'एस्' आला असतां 'ब' चा 'प' असा उच्चार होतो. जसें 'अर्बस' च्या बदली अर्प्स. स्वरांमध्यें 'ए' 'यू' 'ई' चे आह्, ऊ, ई असे उच्चार होतात. 'ओ' चा आऊ असा सर्वसाधारण उच्चार होतो.

लॅटिन व संस्कृत:- लॅटिन व संस्कृत या दोन्हींहि, इंडोयूरोपियन भाषासंघांतील भाषा असल्याकारणानें त्यांच्यामध्यें थोडें कां होईना साम्य आढळल्यास आश्चर्य नाही. जुन्या संस्कृतपासून लॅटिन भाषा निघाली असावी असें मत एक वेळ विद्वानांनी प्रतिपादिलें होतें. तथापि हल्ली या दोन्ही भाषाहि एका सामान्य पण अज्ञात अशा भाषेपासून निघाल्या असें मत पुढें आले आहे. व्याकरणाच्या बाबतींत लॅटिन व संस्कृतमध्यें बर्‍याच बाबतींत साम्य असलेलें आढळतें. लॅटिनमधील कांही शब्द, संस्कृत शब्दाशीं अगदीं सदृश असे दिसताता अशा शब्दांची संपूर्ण यादी करण्यांत आल्यास तिचा भाषाशास्त्राला उपयोग होईल.

भाषेची अवस्थांतरें:- भिन्नभिन्न कालीं लॅटिन भाषा कशी परिणत होत गेली हें पाहणें महत्त्वाचें आहे. प्राचीन काळचे जे शिलालेख सांपडले आहेत त्यांच्यामध्यें तुलना केली असतां भाषेमध्यें व अक्षरामध्यें कसे सूक्ष्म फरक होत गेले तें पहावयास सांपडते. लॅटिन वाङ्‌मयाचे 'अभिजात पूर्व युग' (ख्रि. पू. २४०-८०.) 'सुवर्णयुग' (ख्रि. पू. ८०-१४ इ.स.) रौप्य युग (१४-१८०) असे स्थूल मानानें भाग पडतात. या तीन भागांतील लॅटिन भाषेचे स्वरूप ताडून पहाणें बोधप्रद आहे. अभिजातपूर्वयुगांतील नेव्हियस, फ्लौतस, एन्नियस, वडील केटो, टेरेन्टियस, पाकव्हियस, अ‍ॅक्सियस, लुसिलस हे ग्रंथकार प्रमुख होत. नेव्हियसच्या ग्रंथांत जुन्या शब्दांचा भरणा फार आढळतो. पंचमी व षष्ठीचे जुने प्रत्यय वापरलेले आढळतात. एन्नियसनें लॅटिन भाषारीति निश्चित केली. 'हेक्झामीटर' पद्यांत स्वराच्या पुढें द्वित व्यंजन आलें असतां मागील र्‍हास्व स्वर दीर्घ होतो हें त्यानें सिद्ध केलें. संस्कृतमध्येंहि असाच नियम आहे. क्रियापदांची जुनी रूपेंच तो वापरतो तसेच षष्ठीचें एकवचन व अनेकवचन पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेंच वापरलेली आढळतात. त्याची वाक्यरचना अगदीं साधी व सरळ असते. त्याच्यानंतर लॅटिन वाङ्‌मयांत बोलीमधील शब्द वापरण्याचा प्रघात कमी होत चालला. पाकव्हियसनें प्रथमत: ग्रीक भाषेच्या धर्तीवर लॅटिन मध्यें समास वापरण्याची पद्धत सुरू केली. एन्नियस पेक्षां अ‍ॅक्सियसच्या भाषेंत नीटनीटकेपणा, अधिक आढळतो. लुसिलसमध्यें शुद्ध लॅटिन भाषा वापरलेली आढळते. केटोच्या ग्रंथांची मूळची प्रत उपलब्ध नाही. त्यामुळें त्याच्या भाषेसंबंधी अनुमान काडतां येत नाही. लॅटिन काव्याचें अवलोकन केलें असता, ज्याप्रमाणें लॅटिन भाषेची वाढ कशी होत गेली हें पहावयास मिळते तसें लॅटिन गद्यांवरून पहावयास मिळत नाही. वक्तृत्त्वकला ही लॅटिनमधील गद्यनिर्मितीला बव्हंशी कारणीभूत झाली असें म्हणतां येईल. तथापि अभिजातपूर्वकालांतील वक्त्यांच्या भाषेंत ओजस्विता असली तरी माधुर्य नव्हतें, व त्यांच्यांत जुन्या तर्‍हेचीं रूपें बरींच येत.

सिसरोच्या वेळी लॅटिन गद्य पूर्णावस्थेला पोहोंचलें होतें असें म्हणण्यास हरकत नाही. भाषामाधुर्य, रचनाकौशल्य व अर्थगांभार्य हे उत्तम गद्याला आवश्यक असणारे तिन्ही गुण त्या काळांतील गद्यांत दिसतात. नवीन कल्पनांचे वाचक शब्द या काळांत पुष्कळच निर्माण झालेले आढळतात. लॅटिन ही कोणत्याहि विषयांतील विचार पूर्णरीतींने शब्दद्वारा व्यक्त करण्याला समर्थ आहे हें सिसरो प्रभृतींनी दाखवून दिले. सिसरोची भाषा ही लॅटिनचा नमुना म्हणून मानण्यांत येते. त्याच्याच तोडीचा ग्रंथकार सीझर हा होय. सीझरची भाषा साधी व शुद्ध आहे. सिसरोच्या वेळच्या व्हारोच्या लेखनांत जरी जुने शब्द आढळतात तरी एकंदरीनें व्हारोची भाषा फारच ओजस्वी व परिणामकारी आहे. ल्युकेशियसमध्यें नवीन शब्द बनविण्याची प्रवृत्ति बरीच दिसते. कॅटयूलसच्या भावगीतांमधील भाषा फारच रमणीय आहे. सौंदर्य व साधेपणा यांचा मिलाफ झालेला याच्या इतका दुसर्‍या कोणत्याहि लॅटिन ग्रंथकारांत दिसत नाही. व्होरेस व व्हर्जिलच्या व लिव्हीच्या ग्रंथांत लॅटिन वैभव पूर्णावस्थेला पोहोचलेले आढळतें.

वाङ्‌मय.- रोममध्यें फार प्राचीन काळीं देखील वाङ्‌मयाचे अस्तित्व बीजरूपानें आढळतें. यावरून रोमन लोकांस कोणत्या वाङ्‌मयाची आवड होती तें दिसून येतें. या अनुरोधानेंच पुढें वाङ्‌मयाची वाढ झाली. लेखनकला प्रथम दरबारी कामांतच उपयोगांत आणीत असत, उदाहरणार्थ परराष्ट्राशी तह, नियमद्वादशीचा कायदा वगैरे. त्याप्रमाणें धर्मविधींचेहि ग्रंथ लिहिलेले असत. ज्याला वाङ्‌मय असें म्हणतां येईल असे वाङ्‌मय साधारणत: अ‍ॅनल्स मॅक्झिमि(वंशेतिहास) यांपासून सुरू झालें, त्याप्रमाणेंच प्रेतविधीच्या वेळची भाषणें व थउग्यांवरील लेख हे वाङ्‌मयाच्या आद्य कालचे होत. याचेंच परिणत स्वरूप म्हणजे महाकाव्यें व इतिहास हीं होत. यानंतर आपणांस कांही वक्त्यांची भाषणें राखून ठेवल्याचें कळतें. परंतु काव्यांचे मूळ पाहूं गेलें असतां आपणांस तें धार्मिक मंत्रांत व प्रार्थनांत आढळून येईल. नंतर पुढें वृत्तों प्रचारांत आलीं. त्यांपैकी सॅटरनियन हें वृत्त सर्वत्र व प्रथम उपयोगांत आलें. नंतर प्रेतविधीच्या वेळीं मृताच्या स्तुतिपर गाणीं प्रचारांत आली. यांचेंच प्रौढ स्वरूप म्हणजे महाकाव्यें, स्तुतिपर काव्यें आणि होरेस याचीं लघुकाव्यें ही होत. यानंतरची काव्यें म्हटली म्हणजे नाटकी आख्यानें होत. यामध्यें संविधानक सुसंगत नसे. परंतु चुटके, औपरोधिक कविता, व प्रचलित विषयांवर टीका हीं असत. यांचाच पुढें आनंदपर्यवयासी नाटकांत विकास झाला. यांचेंच निरनिराळें स्वरूप ल्युशियस, होरेस, परशियम, जुव्हेनल, व्हॅरो, पेट्रोनिअस यांच्या ग्रंथांत दिसून येतें. रोमन वाङ्‌मयाचे मुख्यत: कालानुक्रमानें ४ भाग करतां येतात.

पहिला भाग ख्रिस्तपूर्व २४० ते ख्रिस्तपूर्व ८० पंर्यत.

अभिजात पूर्वयुग.- ख्रि. पू. २७२ त रोमन लोकांनी टॅरेटम शहर हस्तगत केलें. याचा रोमन वाङ्‌मयावर मोठा परिणाम झाला. लिव्हियन घराण्यांतील एका मनुष्यानें लिव्हियन अँड्रोनिकस (ख्रिस्त पूर्व २८४-२०४) या ग्रीक गुलामास आपल्या कुटुंबांतील माणसांत ग्रीक भाषा शिकविण्यास ठेविलें. याचा हळू हळू परिणाम असा झाला कीं, ग्रीक भाषेचें ज्ञान हें प्रत्येक रोमन गृहस्थास अवश्य होऊन बसलें. याच अँड्रोनिकसनें एका प्रसंगी एका ग्रीक नाटकाचें रूपांतर संगीत आख्यानाबद्दल करून दाखविलें. या वेळेपासून नाटक हें एक करमणुकींच्या प्रसंगाचें आवश्यक अंग झाले. लिव्हियस याची नाटकें उपदेशपर असत व ग्रीक नाटकांची ओळख करून देऊन चटक लावण्यापलीकडे वाङ्‌मयदृष्टीनें यांचे महत्त्व फार नाही. याच्या नंतर नीव्हियस (ख्रि. पू.२००) यानें ग्रीक आनंदपर्यवसायी व शोकपर्यवसायी नाटकांची रूपांतरें केलीं. हा स्वत: ग्रीक नसून रोमन किंवा कॅंपनियामधील अर्धवट रोमन रहिवाश्याचे हक्क मिळविलेला होता. या वेळच्या लोकांच्या व याच्या स्वत:च्या अभिरुचीप्रमाणे यानें आनंदपर्यवसायी नाटकेंच पुष्कळ लिहिली. पुढें पुढें हा या नाटकांचा उपयोग राजकीय दृष्टीनें करूं लागला व बडया लोकांवर टीका करूं लागला. तेव्हां शेवटी त्यास कैद व हद्दपारी भोगावी लागली. हा खरा रोमन राष्ट्रीय कवि होता. यानें प्युनिक युद्ध, क्लॉडिअस मार्गेलस याचीं शूर कृत्यें वगैरेंवर काव्यें व नाटकें रचलीं आहेत. याच काळचा दुसरा नाटककार टी मॅकिअस फ्लॉटस (ख्रि. पू. २५४-१८४) यानें पुष्कळ आनंदपर्यवसायी नाटके लिहिली आहेत. हा त्यावेळी फार लोकप्रिय होता. याचीं नाटकें बरींच उपलब्ध आहेत. यावरून रोमन लोकांची त्यावेळची साधी रहाणी दिसून येते. फ्लॉटस याच्या पूर्वीचें रोमन वाङ्‌मय हें सर्वसाधारण जनतेकरितां असे परंतु फ्लॉटस याचें व तदनंतरचे वाङ्‌मय हें फक्त बडया लोकांच्या करमणुकीकरतां तयार झालें, व यांत त्यांच्याच राहणीचें व रीतीभातीचे वर्णन आढळतें. क्यू. एनिअस यानें (ख्रि. पू. २३९-१६९) रोमन वाङ्‌मयाला एक निराळीच दिशा दिली. याचा जन्म मेसापिआमधील रूडी येथें झाला. जन्मापासून याच्यावर ग्रीक संस्कृतीचा व वाङ्‌मयाचा परिणाम झाला होता व त्यावेळेचे मोठमोठे रोमन लोक त्याचे मित्र होते. यामुळें या काळच्या ग्रंथकारांमध्ये हाच मुख्य मुख्य ग्रीक व रोमन संस्कृतींचे ऐक्य करण्यास समर्थ होता. त्यावेळच्या सर्व कवीमध्यें खरोखर प्रतिभा अशी याच्याच काव्यांत दिसते.

रोमन वाङ्‌मयाची यानें बजावलेली पहिली कामगिरी म्हणजे यानें शोकपर्यवसायी नाटकें प्रचारांत आणली. यानें जनतेची दृष्टी ग्रीकांच्या सामाजिक गोष्टीवरून पूर्वीच्या शौर्ययुगाकडे (वीररसप्रधान) वळविली. परंतु यानें रोमन नाटकांचें राष्ट्रीयत्व कायम ठेवलें. यानें पूर्वीच्या ग्रीक वीरांनां रोमन वीरांचे शौर्य व रोमन मुत्सद्दयांचे धोरण व उदात्त विचार यांनी समवून रोमन भाषेलाहि प्रौढ व गंभीर रूप दिलें. यावेळीं जरी रोमन नाटकांत कल्पकता दिसून येते तरी त्यांतील उदात्त विचार व नैतिक तत्त्वें यांनींच पुढच्या वर्क्तृत्वपूर्ण भाषणांस वळण लावलें. यानें कांही काव्यें लिहिली. यानें अ‍ॅनल्स या नांवाचे एक ऐतिहासिक महाकाव्य लिहिलें आहे त्यावरून यास रोमनवाङ्‌मयाचा जनक म्हणूं लागले. याचेंच परिणत स्वरूप म्हणजे व्हर्जिलची काव्यें व प्लिनीचा इतिहास होय. याचें सर्व वाङ्‌मय उपलब्ध नाही तरी जेवढा भाग आहे तेवढयावरून याची योग्यता फार मोठी होती हें आपणास दिसून येतें. यानें व्याकरणदृष्टयाहि वाङ्‌मयाची सुधारणा केली. या काळचा महत्त्वाचा दुसरा ग्रंथकार म्हटला म्हणजे एम्. पोरशिअस केटो (ख्रि. पू. २३४-१४९) हा होय. याच्यामध्यें पूर्ण स्वदेशी बाणा दिसून येतो. त्यावेळची लॅटियममधील लोकांची मनस्थिति, त्यांचा स्वभाव, त्यांचा भांडखोरपणा, वगैरे गोष्टी याच्या लेखनांत दिसून येतात. याची आकुंचित दृष्टी व त्याप्रमाणेंच स्वदेशाभिमानाची कल्पना यांमुळे हा त्यावेळच्या ग्रीक संस्कृतीस विरोध करणार्‍यांचा पुढारी बनला. यानें वाङ्‌मय हें राजकीय व व्यवहारिक दृष्टीनें उपयुक्त करण्याचा निश्चय केला व म्हणून त्यानें गद्यामध्यें ग्रंथरचना केली. यानेंच प्रथम आपलीं भाषणें प्रसिद्ध केलीं व त्यांनां वाङ्‌मयांत स्थान दिलें. या भाषणांची सिसरोनें स्तुति केली आहे. यानेंच प्रथमत: स्वभाषेत इतिहास लिहिला. व्हर्जिल यास याच्या आरिजिन्सचा फार उपयोग झाला असला पाहिजे. याच्या इतिहासांत सर्व इटलीमधील जनतेची स्थिति व वाढ दाखविली आहे.

नेव्हियस, फ्लॉटस, एनियस आणि केटो हे त्यावेळेचे निरनिराळे वाङ्‌मयास वळण लावून देणारे ग्रंथकार झाले. यावरूनच पुढे वाङ्‌मयाची वाढ कोणत्या दिशेनें व्हावयाची हें ठरवावयाचें होतें. यानंतर नेव्हियस प्रभृतींचे काम स्टेंटिअस सिसिलिअस (याने आनंदपर्यवसायी नाटकें लिहिली), एम्. पॅसुव्हियस (यानें शोकपर्यवसायी नाटकें लिहिलीं), एल्. अ‍ॅकिअस यांनी तसेंच पुढें चालविले. यानंतर महत्त्वाचा ग्रंथकार असा पी. टेरेंन्टिअस अ‍ॅफर हा झाला. यालाच टेरेन्स असे म्हणत. याच्या नाटकावरून त्यावेळचे पुढारी सिपिओ. लिलियस वगैरेंच्या आयुष्यक्रमाची व त्यांच्या विचारांची वगैरे कल्पना येते, कारण हा त्यांच्या मंडळींत असे. यावेळेच्या वाङ्‌मयांत रोमन स्वाभिमान कमी दिसतो व ग्रीक संस्कृतीचा पगडा बराच बसलेला दिसतो. त्यामानानें साधेपणा जाऊन छानछोकीकडे कल वळलेला आढळून येतो. परंतु पुढें ग्रॅकाय बंधूनी केलेली चळवळ व त्यामुळें उत्पन्न झालेली जागृति यांचा परिणाम वाङ्‌मयावर होऊन पुष्कळसे औपरोधिक वाङ्‌मय तयार झाले. यावेळचा प्रमुख ग्रंथकार म्हणजे सी, ल्युसिलिअस हा होय. याच्या औपरोधिक लेखांमध्यें राजनीति, सामान्यनीति, समाज वगैरेंवर भरपूर टीका आहे. याच्यानंतर सिसरोपर्यंतचा काळ अगदी रूक्ष असा गेला. या कालांतील वाङ्‌मय साधारणपणें पुढें दिल्याप्रमाणें आढळतें: काव्यामध्यें ल्युसिलिअस याची औपरोधिक काव्यें, अकिअस याचीं शोकपर्यवसायी नाटकें, एनिअसच्या काव्याची कांही परिशिष्टरूपी खंडकाव्यें व कांही किरकोळ काव्यें, पोरशिअस याचीं कांही टींकात्मक व व्याकरणावरील काव्येंहि याच कालची होत. यामध्येंच होरेसच्या पत्रांचे बीज दिसून येतें. यावेळचा गद्यग्रंथ म्हणजे अ‍ॅडहेरोनिअम हाच काय तो दिसून येतो. हा वक्तृत्वविषयक होता. ऐतिहासिक दृष्टया या कालांत महत्त्वाचे असें विशंषसे वाङ्‌मय तयार झालें नाहीं परंतु या कालाच्याच बखरींतून व टिपणांवरून आणि सरकारी कागदपत्रांचया साहाय्यानें फ्लिनी यानें आपला जगप्रसिद्ध इतिहास लिहिला. यावेळच्या बखरकारांमध्यें एल्. कॅल्युर्निअस पिसो फ्रुगी, सी. फॅनिअस यांचा उल्लेख केला पाहिजे. याशिवाय किरकोळ चरित्रें वगैरेहि या काळांत लिहिलीं गेलीं.

आपणास सध्यां जरी फ्लॉटास् व टेरेन्स यांच्या नाटकाशिवाय या कालचें वाङ्‌मय उपलब्ध नाही. तरी त्यानें पुढील वाङ्‌मयाचें धोरण आंखून ठेवले. आनंदपर्यवसायी नाटकांत प्रथम विनोद व चापल्य दिसून येतें व नंतर त्यांत गंभीरता येऊन त्यावर शहरांतील रहाणीची छाप दिसते. भारदस्त वाङ्‌मयामध्यें नैतिक, ऐतिहासिक व औपरोधिक इतके प्रकार आढळतात. प्रतिभा कायती एनिअसमध्यें चमकतें. आयुष्यांतील सुखदु:खे या विषयाकडे कवीचें लक्ष अद्याप गेलें नव्हतें. वृत्तें प्रचारांत आली पण ती बाल्यावस्थेत होती. गद्यलेखनशैली भरारत चालली होती. रोमन वाङ्‌मयाचें जनक जें ग्रीकवाङ्‌मय याचा प्रसार रोम व लॅटिअम याच्या पलीकडे झाला नव्हता. सॉबिलिअन व इटालिअन राष्ट्रजाती या अद्याप रोमशीं इतक्या मिळून वागत नव्हत्या. त्यामुळें पुढें दोन पिढयानंतर त्यांनी दाखविलेल्या काव्याभिरूचीचा उगम दिसत नव्हता. यानंतरच्या सामाजिक रणानंतर व अंतस्थ युद्धानंतर वाङ्मयामध्यें एक मोठी क्रांति घडून आली.

दुसरा काल- ख्रि. पू. ८०- ख्रि. पू. ४२

सुवर्णयुग.- लोकसत्ताक राज्याचे शेवटचे दिवस म्हणजे वाङ्‌मयसुवर्णयुगाचा पूर्वार्ध होय. या कालांत गद्यरचना उत्कृष्ट दशेस पोंचली. आणि काव्यांत नाविन्य व अलंकार याची भर पडली. या कालांतील मुख्य गद्यग्रंथकार म्हणजे सिसरो, सीझर व सॅलस्ट हे असून ल्युक्रेशिअस व कॅटेलस हे मुख्य कवी होते. या कालांत लेखन हें जरी उपजीविकेचे साधन झालें नव्हतें तरी जनता सुसंस्कृत असून तीस वाङ्‌मयाची गोडी लागली होती. वक्त्यांचीं भाषणें हीं जितकीं ऐकणार्‍यांनां तितकीच वाचणार्‍यांनाहि आवडत असत. व कांहीं तर मुद्दाम वाचकांकरितांच केवळ तयार केलेलीं असत.

या कालचा मुख्य वक्ता सिसरी (ख्रि. पू. १०६-४३) याच्या भाषणाचें महत्त्व वक्तृत्वाचा दृष्टीनें डिमॉस्थेनीस याच्यापेक्षां पुष्कळ कमी असलें तरी वाङ्‌मयाच्या दृष्टीने तें फार आहे. रोमन वक्त्यांना न्यायसभेंतील किरकोळ विषयांवर बोलावयाचें नसून मोठमोठया राजकीय प्रश्रांवर भाषणें करावयाची असत. व या दृष्टीनें सिसरोची बरोबरी करणारा दुसरा वक्ता त्या काळी झाला नाहीं. यानें लॅटिन लेखनशैलीलाहि चांगलें वळण दिलें. त्याप्रमाणेंच हा वक्तृत्वावरील चांगला टीकाकारहि होता. याची पत्रें फार स्वाभाविक दिसतात. व त्यावरून त्याचे विचार वगैरे स्पष्ट कळून येतात. यावेळचे दुसरे वक्ते म्हणजे क्किन्टस हॉर्टेन्शिअस आर्टेलस आणि सी. जुलिअस सीझर हे होत. आर्टेलस याची वक्तृत्वशैली पौरस्त्यांप्रमाणें अलंकारिक असे. यानेंच विलासी काव्यांचा आरंभ केला. सीझर याच्या वक्तृत्वाची कल्पना आपल्याला त्याचा प्रतिपक्षी जो सिसरो त्याच्यावरून करतां येईल. परंतु विशेषत: यानें आपल्या ''कॉमेन्टरींत'' गद्य भाषेला जें वळण लावून दिलें यावरून त्याची खरी योग्यता कळून येईल. याची साधी भाषा, उघड रीतीनें व सरळ भाषेंत विषय मांडण्याची तर्‍हा व पाल्हाळाचा अभाव, या गोष्टी याच्या विशेष आहेत. सीझर याच्या अगदी सी. सॅलस्ट्रिअस क्रिसास (ख्रि. पू. ८७-३६) याची लेखनपद्धति होती. याला सॅलस्ट असेंहि म्हणत. यानें कांही ऐतिहासिक प्रकरणें लिहिली आहेत. ती अलंकारिक भाषेंत लिहिलीं आहेत. यानें एक इतिहासहि लिहिला आहे. याच कालांत एम्. टेरेंटिअम व्हॅरो यानें कांही शास्त्रीय व इतर विषयांवरहि ग्रंथरचना केली.

'एनिअस' याच्या ' अ‍ॅनल्स' या काव्यानंतर महाकाव्य असें झालें नव्हतें. परंतु या कालांत टी. ल्युक्रेशिअम कॅरस (ख्रि. पू. ९६-५५) यानें डी. रेरम नॅचुरा हें महाकाव्य रचलें. हा कवि जगापासून दूर एकांत वासांत रहात असे. यामुळें त्याच्या मनोवृत्तीवर परिणाम झालेला त्याच्या काव्यांत दिसून येतो. यानें ग्रीक काव्याचा आधार घेतला आहे. या काव्यांत कल्पना व मनोविकार यांचा विकास दृष्टीस पडतो. यानंतरच्या कवीनी काव्याचें बाह्मांग नटविण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो. यांची पद्धति अलेक्झांड्रियाकडून आलेली दिसते; यांपैकी मुख्य म्हणजे व्हेलेरिअस केटो आणि सी. लिसिनिअस कॅल्व्हस; या मंडळीपैकी सी. व्हॅलेरिअस कॅटॅलस (ख्रि. पू. ८४-५४) याच्याच कविता फक्त उपलब्ध आहेत. हा कॅलस याचा मित्र होता. यानें स्वत:च्या आयुष्यांतील प्रसंगांवर कविता केल्या आहेत. याचें प्रेम, याची मैत्री, याचा प्रवास व याचें खाजगी व राजकीय वैर हीं सर्व याच्या कवितेंत चित्रित केलेलीं आढळतात. आयुष्यांतील सुखदु:खांचे प्रतिबिंब काव्यांत उतरण्याच्या कामांत याचा कोणी हात धरूं शकणार नाही. याशिवाय यानें वैयक्तिक औपरोधिक लेख लिहिण्यास सुरवात केली. या लेखांच्या मुळाशी राजकीय किंवा सामाजिक कोणताच हेतु नव्हता. यानें कांही ग्रीक पौराणिक कथांचे रूपांतर केलें. कांही वृत्तांतहि सुधारणा केली.

तिसरा काळ- ख्रि. पू. ४२ ते इसवी सन १७.

ऑगस्टसचा काळ.- लोकसत्ताक राज्याच्या अखेरीस रोमन वाङ्‌मयास चालना मिळाली ती तशीच पुढें देखील चालू होती. त्यांनीं आपलें काम तसेंच चालू ठेवलें. परंतु यावेळी वाङ्‌मयाच्या रंगभूमीवर एक नवीनच वर्ग दाखल झाला. हा वर्ग जरी वाङ्‌मयदृष्टया पूर्वीच्याच संस्कृतींत वाढलेला होता तरी या नव्या का लामध्ये तो आल्यामुळे व तो पूर्वी राजकीय दृष्टया निराळ्या स्थितींत असल्यामुळें त्याच्या वाङ्‌मयांत या नवीन विचारांचे वारें स्पष्ट दिसतें. लोकसत्ताक राज्याच्या अखेरीच्या वाङ्‌मयांत त्या वेळच्या बडया लोकांची मनस्थिती व वर्तणुकीचें वर्णन आढळतें, परंतु या कालच्या आरंभींच्या वाङ्‌मयांत आपणांस नवीन उत्साह भरलेला दिसेल तर नंतरच्या वाङ्‌मयांत ख्यालीखुशाली व चैनबाजीचें वर्णन आढळेल. या काळांत आरंभी साम्राज्याच्या वाढीची आणि वैभवाची आशा व त्याबद्दल औत्सुक्य दिसतें, तेंच पुढच्या कालांत तीच आशा पूर्ण होऊन शांतता नांदत असल्यामुळे सुखोपभागाकडील प्रवृत्ति पूर्णपणें दिसून येते. या त्यांच्या सर्व आशा पूर्ण करणारा जो ऑगस्टस त्याच्याबद्दल अर्थातच रोमन लोकांस फारच प्रेम व पूज्य भाव वाटत असे. व वीरांचा योग्य सन्मान करण्याची ज्यांनां प्रथमपासूनच संवय होती त्या रोमन लोकांनी त्याचा बोलबाल केला यांत काहीं विशेष नाहीं. त्याचा स्तुतिपाठक अर्थातच प्रथम कांही त्याच्या बरोबरीच्या मनुष्यांपैकी निघाला नाही. या कामाला प्रथम सुरवात व्हर्जिल यानें केली. नंतर होरेस यानें लवकरच त्याचें अनुकरण केलें. यानंतर अँटनी याचा अक्टिअम येथील लढांईत पराभव झाल्यावर ऑगस्टस यानें बडे लोक व सामान्य जनता यांची मतें आपल्याकडे पूर्णपणें ओढून घेतलीं. साम्राज्यस्थापनेमुळें लोकांमध्यें राष्ट्रीय व साम्राज्यभावनांचा उदय झाला. पण त्याबरोबरच स्वतंत्र राजकीय विचारांचा लोप झाला, त्यामुळें लोकांची प्रवृत्ति गद्यवाङ्‌मयाचे जे दोन मुख्य भाग वक्तृत्व व तात्कालिक इतिहास त्यांच्यापासून काव्याकडे वळली. तेव्हापासून साम्राज्याच्या आकांक्षांचे उद्गार काव्यांतून बाहेर पडूं लागले. पूर्वीच्या वैभवाचें वर्णनहि काव्यांतूनच ऐकावायास मिळूं लागलें. त्याच प्रमाणें आयुष्यांतील निरनिराळे प्रसंग व सुखदु:खे यांचीं वर्णनेंहि काव्यांमधून बाहेर येऊं लागलीं; यापैकीं मुख्य विषय म्हणजे निसर्ग व प्रणय हे असत. याच वेळीं ग्रींक काव्यांचेंहि पुनरूज्जीवन झालें. औपरोधिक लेखांचें आतां राजकीय बाबतीत काम न राहिल्यामुळे त्यांचाहि विषय समाज व समाजांतील कांही व्यक्ती होऊन बसला. गद्यवाङ्‌मयाची एक मुख्य कामगिरी राहिली होती ती म्हणजे संपूर्ण गतकालाचा इतिहास लिहिणें ही होय. या कामगिरीलाहि हाच काल योग्य होता कारण याच काळीं जुनी राजव्यवस्था मोडून नवीन सुरू झाली होती.

या काळीं मेसिनस यानें वाङ्‌मयास फार उत्तोजन दिलें व याची आणि ऑगस्टसची मैत्री असल्यामुळे राजकीय धोरण व वाङ्‌मयांचें धोरण यांचें ऐक्य होतें. यावेळी शांततेच्या वातावरणांत काव्यास योग्य उत्तोजन मिळून त्याची वाढ जोराची होऊन तें जवळ जवळ पूर्णत्वासव पोंचलें.

या कालांतील पहिला कवि व्हर्जिल (ख्रिस्त पूर्व ७०-१९). हा होय. हाच रोमचा राष्ट्रीय कवि होय. हा निसर्गभक्त होता. यापूर्वींच्या सर्व काव्यकल्पना वगैरेस यानें पूर्णत्वाप्रत नेऊन पोंचविलें आणि पुढच्या कवीनां अनुकरण करण्यासहि कठिण असें उत्कृष्ट उदाहरण घालून दिलें. लहानपणापासूनच्या याच्या कविता फार वाखाणण्याजोग्या आहेत. पहिल्या प्रथम त्यानें थिऑक्रिटस, नंतर एनिअस व ल्युक्रेशिअस यांच्या धर्तीवर कविता केल्या व त्यांतहि त्यानें आपलें नैपुण्य फार चांगल्या रीतीनें प्रकट केलें आहे. जॉर्जिक्समध्यें याची कल्पकता व स्वावलंबन दिसून येतात. यांतहि ग्रीक काव्याची झांक मारते व त्यांत जो मूळ कवीचा उद्देश तो साधण्याकडे विशेष लक्ष दिल्यासारखें दिसतें. तरी सुद्धां यानें सत्यास न सोडतां आपल्या काव्यांत आपली प्रतिभा पूर्णपणें निदर्शनास आणली. एक्लोगस व जॉर्जिक्समध्ये व्हर्जिल यानें इटली देशांतील लोकांची साधी रहाणी मोठया बहारीनें वर्णन केली आहे. इलिअडमध्यें त्यानें साम्राज्याचें वैभव व ऑगस्टस याचें चित्र वठविलें आहे. या काव्यामध्यें त्या वेळच्या राजकीय घडामोडीचें वगैरें वर्णन केलें आहे. या बाबतींत जरी तो होमरची बरोबरी करूं शकला नाहीं तरी त्यानें, दंतकथा, निरनिराळीं स्थळें, धार्मिक विधी, यांचें जें बारकाईंने वर्णन केलें आहे त्यामुळें त्याचें हें महाकाव्य म्हणजे त्या वेळच्या रोमन साम्राज्य वैभवाचें अखंड स्मारक होऊन बसलें आहे.

यानंतरचा या कालचा दूसरा मोठा कवि म्हटला म्हणजे क्यू. होरेशिअस फ्लॅकस (ख्रि. पू. ६८-८) अथवा होरेस हा होय. याच्या काव्यांत लोकसत्ताक राज्य मोडल्यानंतरची रोमन लोकांची रहाणी, रीतीभाती, विचार वगैरे पूर्णपणें प्रतिबिंबित केलेली आढळतात. याचा लेखनकाल सुमारें ३० वर्षांचा होता व त्याचे साधारण ३ भाग होतात: पहिल्या कालांत यानें (एपोडस व सटायर्स) इपोड चालीवर कविता व कांही औपरोधिक कविता केल्या. इपोड या कविता ग्रीक धर्तीवर लिहिलेल्या असून त्यांत वैयक्तिक टीका आहे व औपरोधिक काव्यांमध्यें सर्वसाधारण समाजावर टीका आहे. दुसर्‍या कालांमध्यें त्यानें साधारण आयुष्यांतील प्रसंगांवर कविता केल्या आहेत. यानंतरच्या तिसर्‍या कालांत तो आपल्या शेतावर जाऊन शांततेनें राहिला होता. याच्या कल्पनेची भरारी या कालाइतकी केव्हांच उंच गेली नव्हती. तरुणपणामध्यें उपभोगिलेली सुखें या कालांत त्याच्यापुढें उभीं राहून त्याला स्फूर्ति आणीत असत. यावेळीं नवी परिस्थिति त्याच्या अंगवळणी पडून त्याचा मित्र मेसिनस यानें त्याला सामान्य जनतेचींहि मनें या परिस्थितींत अनुकूल करून घेण्याचें काम सांगितलें. याच्या काव्यांत समाजसेवेपेक्षां आत्मशिक्षणाचा उपदेश जास्त केला आहे. याच्या एपिसल्समध्यें याची काव्यरचना साधी असून सरळ व सुबोध आहे. याच्या आयुष्याची शेवटची दहा वर्षे पुन्हां भावपूर्ण काव्यें लिहिण्यांत गेली. यानें आपल्या कालाची फार स्तुति करून होतकरू लेखकांचें लक्ष शोकपर्यवसायी नाटकांकडे वळविण्याचा प्रयत्‍न केला.

परंतु या कालानंतरची काव्यें जी आजपर्यंत जिवंत राहिली आहेत त्यांवरून या कालांत भावपूर्ण काव्यें अथवा शोकपर्यवसायी नाटकें निघालीं नाहींत असें दिसतें. यावेळी शोकगीतें ग्रीक भाषेंतून नुकतींच प्रचारांत येत होतीं. व ती जगामध्यें बरेच दिवसपर्यंत फार लोकप्रिय होतीं. मिमनेरमस याच्या कालापासून त्या वेळचे ऐषआराम, शिष्टाचार, वगैरे वर्णन करण्यास याच चालीचीं काव्यें पसंत करीत. या चालीत कविता करणारे प्रमुख कवी म्हटले म्हणजे टिब्यूलस, प्रोपरशिअस व ओव्हि हे होत. या तिघांत टिब्यूलस (ख्रि. पू.५४-१९) मध्यें सुसंस्कृति व कोमल भावना जास्त दिसून येतात. याच्या कवितांत विप्रलंभ शृंगार दिसून येतो. याच्या कवितांवरून इंग्रजी कवि ग्रे याची आठवण होते.

सेक्स्टस प्रोपरशिअस (ख्रि.पू. ५०-१५) याची प्रतिभा टिब्यूलसपेक्षां उच्च दर्जाची होती परंतु हा तितका सुसंस्कृत नव्हता व याची काव्याभिरूचि कमी प्रतीची होती. याचें तारुण्य टिब्यूलस सारखें निरोगी वनांत अथवा बाह्म प्रदेशांत गेलें नसून तें राजधानींतील ऐषआरामांत व ख्यालीखुशालींत गेलें होतें. याची 'सिंथिआ' बद्दल प्रेमविषयक काव्यें ही कॅटॅलस पेक्षां जास्त संभाव्य दिसतात. याचें काव्य कसलेल्या कवीच्या मानानें कमी दर्जाचें ठरेल परंतु कांही मोठमोठे प्रसंग यानें फार बहारीनें वर्णन केले आहेत व शोकरसाचें वर्णन यांत फार उत्तम साधलें आहे. याच्या काव्यावरून ल्युक्रेशिअस याची स्मृति होते.

पी. ओव्हिडिअस नॅसो (ख्रि. पू. ४३-१८) अथवा ओव्हिड हा या चालीच्या काव्यांत मोठा प्रवीण होऊन गेला परंतु याच्या काव्यांत तितकी भारदस्त रचना व तेज आढळून येत नाहीं. याच्या कवितेंत विषयोपभोग व तत्प्रीत्यर्थ कारस्थानांचे वर्णन आढळतें, त्यामानानें कोमल भावना अथवा निरनिराळे मनोविकार चित्रित केलेल दिसत नाहींत. जरी याच्या सर्व कविता यानें स्वत:वरून केल्या तरी त्याच्या हुशारीनें व चातुर्यानें त्यानें त्या सर्व लोकांस प्रिय होतील अशा केल्या. याच्या काव्यांतून याची निरनिराळ्या वेळची मन:स्थिति व त्याचे मनुष्यस्वभावास अनुसरून असणारे दोष हे इतर कवींपेक्षां फार स्पष्टपणें दिसून येतात.

रोमन साम्राज्याचा हा काल इराणी युद्धानंतरचा ग्रीसचा काल, अथवा इंग्लंडमधील एलिझाबेथचा काल अथवा यूरोपमधील १९ व्या शतकाच्या आरंभाचा काल याप्रमाणें होता. यावेळीं सर्वत्र नवजीवनाचा प्रसार झाला होता. पूर्वीचा काल पूर्ण वैभवाचा व पुढचा आशापूर्ण असा दिसत होता. या कालांत गतकालचें यथार्थ वर्णन करण्याचा होरेस वगैरे कवीनीं जरी काव्यांत प्रयत्‍न केला तरी टी. लिव्हिअस (ख्रि. पू. ६९-इ.स. १७) किंवा लिव्हि यानें लिहिलेला इतिहास फार पद्धतशीर आहे. याची गतकालाचें वर्णन देतांना त्या कालाशीं पूर्ण एकतानता झालेली दिसते. याच्या वर्णनानें रोमन लोकसत्ताक राज्याचें वैभव स्पष्टपणें आपल्या डोळ्यांसमोर उभें रहातें. याच्या लेखनामध्यें रोमन लोकांचा स्वाभिमान पूर्णपणें प्रतिबिंबित झालेला दिसतो. हा इतिहास पूर्ण रोमन आहे असें आपणांस वाटते. या इतिहासांत रोमन गद्य भाषेची लेखनपद्धति पूर्णत्वास पोंचते.

चवथा काळ -इ. स. १७ सुमारें इ. स.१३०

रौप्ययुग.- रोमन वाङ्‌मयाचें धोरण जें ऑगस्टसच्या कालांत ठरून गेलें तें तसेंच पुढें सुमारें शंभर वर्षेपर्यंत चाललें. यावेळीं वाङ्‌मयाभिरूचि सर्व साम्राज्यांत पसरली होती व ठिकठिकाणी वाङ्‌मयांत भर पडत होती; तरी रोम हें वाङ्‌मयक्षेत्राचें केंद्र होतें. गद्य वाङ्‌मयाचीं जीं निरनिराळीं अंगें वक्तृत्व, इतिहास, पत्रें, कांही विशिष्ट विषयावरील ग्रंथ, संभाषणें, वगैरे यांची वाढ होत होती. शास्त्रीय व इतर विषयांवरील ग्रंथहि बरेच तयार होत होते. आधिभौतिकशास्त्रें, शिल्पशास्त्र, वैद्यक, शेतकी वगैरे विषयांवरहि ग्रंथरचना पुष्कळ झाली. पूर्वीच्या आख्यानांचें रूपांतर हळू हळू अलीकडच्या कादंबर्‍यांमध्यें होऊं लागलें. काव्यामध्येंहि जरी नावीन्य अथवा उच्च कल्पनाशक्ति दिसली नाहीं तरी एकंदर काव्यामध्यें पुष्कळच सुधारणा व भर पडलेली दिसून येईल. या कालांत कांही ऐतिहासिक व कांही कांही अलेक्झांड्रिया येथील काव्यांच्या धर्तीवर लिहिलेली महाकाव्यें आढळतात. यावेळेस कांही शोकपर्यावसायी नाटकें अशा प्रकारची तयार झालेलीं दिसतात कीं, तीं ग्रीक नाटकांच्या धर्तीवर नसून त्यांमध्यें रोमन लोकांचा आयुष्यक्रम मुळींच वर्णन केलेला नाही. यांपैकीं सेनेका याची कांही नाटकें उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेंच बोधपर काव्यें, भावपूर्णकाव्यें व शोकगीतें यांचाहि भरणा बराच झाला. यांपैकी स्टेटिअस याचीं कांही काव्यें उपलब्ध आहेत. या कालांत चांगल्या दर्जाच्या कविता म्हटल्या म्हणजे, औपरोधिक काव्यें होत. ऑगस्टसच्या कालांत काव्यास जी कृत्रिमता आली होती तीमुळें मूळच्या रोमन भाषाशैलीचा जोम नाहींसा झाला होता. या कालचें शिक्षण सार्वत्रिक असे पण तें अर्धवट असून पूर्ण नव्हतें. यावेळच्या कवीचा काव्याशी परिचय अथवा अभ्यास पूर्वीच्याप्रमाणें नसें. याचें उदाहरण आपल्यास ल्युकन व व्हर्जिल अथवा होरेस यांची तुलना केल्यास दिसून येईल. या रौप्ययुगांत जरी कांही उत्तम ग्रंथांची वाङ्‌मयांत भर पडली तरी एकंदर ओव्हिड व लिव्हि यांच्या मरणापूर्वीच वाङ्‌मयसमुद्रास ओहोटी लागल्याची पूर्ण चिन्हे दिसत होती. या कालामध्यें पूर्वीच्या कालाप्रमाणें ग्रीक वाङ्मयाच्या सहवासानें ग्रंथकारांना पूर्वीच्या ग्रंथकारांप्रमाणें स्फूर्ति होईना व यांच्या मनांत ग्रीक वाङ्‌मयाबद्दल पूर्वीप्रमाणें आदरहि उत्पन्न होईना. या गोष्टीला मार्शल व जुव्हेनल हेच काय ते अपवाद होते व त्यांनी ग्रीक पुराणांचें निरनिराळ्या तर्‍हांनीं रूपांतर केलें.

लोकसत्ताक राज्याच्या वेळी व ऑगस्टसच्या काळांत राजकीय धारेण व वाङ्‌मयाचे भक्त व चहाते यांच्यामध्यें एकप्रकारची स्पर्धा असे, तीमुळें वाङ्‌मयरचनेस पुष्कळ मदत होत असे. त्या प्रकारची स्पर्धा या कालामध्यें व या वाङ्‌मयामध्यें विशेषशी दिसून येत नाही. यावेळीं वक्तृत्वाचें स्वतंत्र व राष्ट्रीय अस्तित्वच नाहीसें झालें. इतिहासाचें जें मूळ कार्य कीं, राष्ट्रांत जागृति उत्पन्न करणें तेहि नाहीसें झाले होतें. व इतिहासाचें काम म्हणजे ग्रंथकारावर राजाची ज्याप्रमाणें मर्जी अगर गैरमर्जी असेल त्याप्रमाणें त्याची स्तुति अगर निंदा करणें हें झालें. सृष्टिवर्णनापासून जरी दोन्ही वेळीं सारखाच आनंद होत होता तरी आयुष्यक्रम, विद्वान लोकांच्या हातांत महत्त्वाची कामें नसणे या सर्वांमुळे कवींच्या कल्पनाशक्तीस बराच आळा बसला. यामुळें काव्यास आणखी एक नवीन विषय मिळाला, तो म्हणजे रोमन समाजाचा होत चाललेला नैतिक र्‍हास हा होय. या गोष्टीवरून सेनेका व टॅसिटस यांस स्फूर्ति झाली. या कालांत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे रोमन संस्कृतीचा साम्राज्याबरोबरच स्पेनमध्यें प्रसार झाला. त्यामुळें पूर्वी लॅटिअममध्ये ज्याप्रमाणें दोन तीन शतकांपूर्वी प्रकार झाला त्याप्रमाणें स्पेनमध्यें होऊन रोमन वाङ्‌मयामध्यें स्पेनमधील निरनिराळ्या शहरांतून आलेल्या सेनेका, ल्यूकन, क्किटिलियन, मार्शल वगैरे ग्रंथकारांनी भर टाकली. त्याप्रमाणेच या गोष्टमुळें जुन्या धर्तीचे जे रोमन ग्रंथकार टॅसिटस व जुव्हेनल यांनांहि महत्त्व आले.

साधारणत: या शतकामध्यें एकंदर वाङ्‌मयाचें स्वरूप, भाषा व विषय यांकडे पाहिले असतां त्यास उतरतीकळा लागल्याचें स्पष्ट दिसतें. तरी सुद्धां या कालमध्यें खरोखर कांही प्रतिभासंपन्न ग्रंथकार होऊन गेलेच. या वाङ्‌मयांतहि पूर्ववैभवाची साक्ष पटते. यावेळींहि लोकांत वाङ्‌मयभिरूचि होती व यावेळी लेखनपद्धतीकडे विशेष लक्ष देण्यांत येत असे. या कालाचे साधारण ३ भाग करतां येतात.

पहिला काल, टायबेरियसपासून नेरोपर्यंत:- ऑगस्टसच्या कालाच्या अखेरीस केवळ किरकोळ कविता प्रसिद्ध होत होत्या. या कालांत दरबाराकडून वाङ्‌मयास उत्तोजन मिळण्याच्या ऐवजीं वाङ्‌मयाच्या पुरस्कर्त्यांस दरबारची धास्ती वाटूं लागली होती. या कालांत मॅनिलिअस याचें फलज्योतिषावरचें काव्य प्रसिद्ध झालें. याची दुर्बोधतेमुळे फार हेळसांड झाली. फीड्रस याच्या कल्पित गोष्टी मात्र फार लोकप्रिय झाल्या. ऐतिहासिक लेखकांपैकी, सी. व्हेलेइअस पेंटरक्युलस व व्हॅलेरिअस मॅक्झिमस हे प्रमुख होते. ए. कॉर्नेलिअस सेल्सस यानें कांही उपयुक्त विषयांवर पुस्तकें लिहिली; यांपैकी वैद्यकावरचे पुस्तक उपलब्ध आहे. या कालांतहि कांही व्याकरणावर व वक्तृत्वावर ग्रंथ झाले. क्लॉडिअस याच्या कारकीर्दीत प्राचीन वाङ्‌मय, व्याकरण व कायदा वगैरेंच्या अभ्यासास उत्तेजन मिळालें. नेरो या बादशहास नाटकें व कला यांची आवड असल्यामुळें वाङ्‌मयास पुन्हां उत्तेजन मिळाले. या वेळचे मुख्य ग्रंथकार एल अ‍ॅनिअस सेनेका, एम्. अ‍ॅनिअस ल्युकॅनस, ए. पर्शिअस फ्लेकस व पेट्रोनिअस आर्बिटर हे होत. यांतील पहिले तीन स्टोईक तत्त्वज्ञानपद्धतीचे पुरस्कर्ते होते व शेवटचा मोठा टीकाकार होता; यांपैकी सेनेका यानें त्यावेळच्या आयुष्यक्रमाचें वर्णन फार चांगले केलें आहे.

ल्युकन याच्या 'फार सॅलिया' मध्यें स्टोइक तत्त्वज्ञान व वक्तृत्त्व हें दिसून येतें. याची कल्पनाशक्ति इतकी उच्च दर्जाची दिसत नाही. परशिअस याचे औपरोधिक लेख त्याच तत्त्वज्ञानपद्धतीचें आविष्करण करतात. याचे लेख अगदी नीरस आहेत. पेट्रोनिअस याची सॅटिरिकन ही कादंबरी याच काळची होय. यांतील वर्णन, रचना, व टीका हीं फार चांगली साधली आहेत.

दुसरा काल डॉमिशिअन याचा काल:- व्हेसपॅशिअन हा गादीवर आल्यावर वाङ्‌मयास थोडें गंभीर स्वरूप आले. याच्या कारकिर्दीत सी फ्लिनिअस सेकंडस (इसवी सन २३-७९) अथवा फ्लिनी (मोठा-आधिभौतिक इतिहासाचा कर्ता) हा गद्य ग्रंथकार व सी. व्हॅलेरिअस फ्लॅकस सेटिनस बॅलबस-अर्शोनॉटिका या काव्याचा कर्त्ता- हा कवि असे होऊन गेले. ऑगस्टसच्या कालानंतर याच कालांत रोमन वाङ्‌मयांत विशेष भर पडली. या कालच्या ग्रंथांपैकी क्किंटिलियन याच्या 'इन्स्टिटयूटस्', सिलिअस इटाँलिकस याचें 'प्यूनिक युद्ध', स्टेटिअस याचीं महाकाव्यें व 'सिल्व्हि' या कविता, व मार्शल याचें 'एविग्रॅम्स' हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यांपैकी विशेषत: मार्शल याच्या ग्रंथांत आपणास त्या वेळच्या ख्यालीखुशालीच्या आयुष्यक्रमाचें चित्र स्पष्टच दिसतें.

तिसराकाल, नर्व्हा व ट्रॅजन यांचा काल:- एकंदर रोमन साम्राज्यकालामध्यें मुख्य असे ग्रंथ याच कालांत लिहिले गेले. कॉर्नेलिअस टॅसिटस (५४-११९ इसवी) याचे ' अ‍ॅनल्स' इतिहास', ' अ‍ॅग्रिकोलायाचें चरित्र' व 'गर्मेनिया' हे ग्रंथ, व डी जुनिअस गुव्हेनॅलिस (इ. स. ४७-१३०) याचे औपरोधिक लेख, या दोन ग्रंथांमध्यें टायबेरिअसपासून डॉमिशिअन पर्यंतच्या रोमन आयुष्यक्रमाचें वर्णन आढळतें. रोमन लोकसत्ताक राज्यपद्धतीचा बाणा या दोन ग्रंथकारांमध्येंच दिसून येतो. सी. फ्लिनिअस सिसिलिअस सेकंडस अथवा फ्लिनी (धाकटा) याच्या 'पत्रांमध्यें' एकंदर राजनीतीचा र्‍हास, नैतिक अधोगति, वगैरेंचे चित्र आढळतें. जुव्हेनल याच्या मृत्यूनंतर रोमन वाङ्‌मय हें अस्सल राष्ट्राच्या विचारांचें, राष्ट्रांतील व्यक्तींच्या स्वभावांचें, व मन:स्थितीचें निदर्शक, व जगांतील महत्त्वाच्या वाङ्‌मयापैकी एक असें राहिलें नाही.

यानंतरचे ग्रंथकार:- ह्मानंतर वाङ्‌मयाच्या एक एक अंगाचा शेवट होत गेला. काव्याचा अंत प्रथम झाला. जुव्हेनलनंतर दोन शतकांमध्ये फक्त दोन किरकोळ कवीचीं नांवें दिसतात. चवथ्या शतकांत असाच एक कवि आढळतो. शेवटचे रोमन कवी म्हटले म्हणजे एक क्लॉडिअस क्लॉडिऍन्स (हा होनोरिअस या राजाच्या दरबारांत होता) याच्यामध्यें थोडें पूर्वीचे पाणी दिसते; दुसरा रूटिलिअस नॅमॅटिअनस, यानें आपलें प्रवासवृत्त लिहिलें आहे.

गद्यवाङ्‌मयांतहि फारच थोडें त्राण उरलें होतें. जुव्हेनल नंतरच्या कालांतील मुख्य गद्यग्रंथकार सी. सुटोनिअस ट्रॅक्किलस हा चरित्रकार होय. याचीं चरित्रें महत्त्वाची आहेत. यानंतरचा एम्. कॉर्नेलिअस फ्रॉंटो हा ऑरेलिअस याच्या दरबारांत असे. यानें एकदम सुवर्णयुग व रौप्ययुग यांच्या धर्तीवर लिहिण्याचें सोडून त्यापूर्वीच्या पद्धतीनें लिहिण्यास सुरवात केली, पण हें फारच थोडें दिवस चाललें. या कालांत आफ्रिकेचें वर्चस्व दिसून येतें. यानंतरचा गद्य ग्रंथकार अ‍ॅप्यूलिअस हाहि आफ्रिकन होता. याने 'मेटॅमॉरॅफोसेस' हा ग्रंथ मूळ ग्रीकवरून लिहिला आहे. परंतु यांत रोमन असें कांही नाहीं. यानंतर कांहीनी इतिहासाच्या संक्षिप्त आवृत्या काढल्या. या कालांत 'हिस्टोरिआ ऑगस्टा' हा ग्रंथ सहा ग्रंथकारांनी तयार केला. या कालचा शेवटचा इतिहासकार क्यू. ऑरेलियस सिमॅकस हा होय. यावेळीं ख्रिस्ती लेखकांमध्यें मात्र थोडासा जोम दिसून येतो. यांच्यापैकी पहिला ग्रंथकार मिन्युशिअस फेलिक्स हा होय. हा फ्रॉंटोचा समकालीन असून यानें 'ऑक्टेव्हिअस' हा पारमार्थिक ग्रंथ लिहिला. यामध्यें प्राचीन कालची छटा बंरीच दिसते. याच्याविरूद्ध टर्टूलिअन हा कार्थेजकडील ग्रंथकार होऊन गेला. याची भाषा म्हणजे लॅटिन, ग्रीक, हिब्रू यांचें केवळ मिश्रण आहे. यामुळें या काळीं लॅटिन भाषेमध्यें कशी भेंसळ होत होती हें दिसतें. या सर्वांपेक्षां ऑरेलिअस ऑगस्टिनस अथवा सेंट ऑगस्टिन हा हिप्पोचा बिशप असून फार प्रख्यात ग्रंथकार होऊन गेला. ज्या काली नवें अस्सल वाङ्‌मय तयार व्हावयाचें बंद झालें त्या वेळी व्याकरणात्मक व टीकात्मक ग्रंथांचा सुळसुळाट झाला. लोकसत्तक राज्याच्या वेळी वेव्हॅरो व आगस्टसच्या कालांत फ्लॅकस यांनी शब्दशास्त्राचा अभ्यास केला होता. यानंतर कांही ग्रंथकारांनी लॅटिन ग्रंथांच्या शुद्ध प्रती काढण्याचें व टीका करण्याचें काम केले. हें काम ४ थ्या शतकापर्यत चालू होतें. याचा ग्रंथ कॉन्स्टांटिनोपल येथें ५ व्या शतकायंत प्रसिद्ध झाला.

कायद्याच्या क्षेत्राकडे जर दृष्टी टाकली तर मात्र रोमन लोकांची कुशाग्रता अखेरपर्यंत स्पष्ट दिसून येते. पहिला विख्यात कायदेपंडित क्यू. म्युशिअस स्किव्होला हा होय. ऑगस्टसच्या काळांत एम्. अँटिस्टिअस लेबिओ आणि सीअटैअस कॅपिटो हे दोन परस्पर विरूद्ध मताचे कायदेपंडित होते. पहिला सुधारणावादी असून दुसरा जुन्यासच चिकटून असे. सॅलव्हिअस जुलिऍनस यास हॅड्रिअन बादशहानें कायद्यांचा समुच्चय करण्यास सांगितले. गायस याच्या 'इन्स्टिटयूशन्स' फार प्रसिद्ध आहेत. अ‍ॅमिलिअस पॅपिनिअ‍ॅनस हा एक प्रमुख कायदेपंडित होऊन गेला. जस्टिनिअन याच्या 'कोड' मध्यें सर्व रोमन कायदेपंडितांचे चातुर्य दिसून येतें. याचें श्रेयहि बोनिअस यासच आहे.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .