विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लालसोट- राजपुताना, जयपूर संस्थानांत देवसा जिल्ह्मातील लालसोट तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें जयपूर शहरापासून ४० मैल व देवसापासून २४ मैल आहे. लोकसंख्या सुमारें ८०००. १७८७ सालीं जयपूर, जोधपूर व मराठे यांच्यामध्यें येथें एक मोठी लढाई झाली होती, तींत मराठयांचा पराभव झाला.