विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लावार - संयुक्तप्रांत, मिरत जिल्हा व तहशिलींतील एक गांव. हें मिरत शहराच्या उत्तरेस १२ मैल असून येथील लोकसंख्या १९०१ साली ५०४६ होती. मीर सुरख याच्या वंशजांकडे तें असून शिवाय लावारच्या आसपास ४५ खेडी त्यानें संपादन केलीं आहेत. महाल सराई नांवाची एक उत्तम इमारत जवाहिरसिंगानें मिरत येथील सुरजकुंड नांवाचा तलाव खोदवला होता.