विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लाहरपूर - संयुक्तप्रांत, सीतापूर जिल्हा आणि तहशिलीतील एक गांव. हें सीतापूर शहरापासून १७ मैल लांब आहे. लो.सं. सुमारे १००००. १३७४ साली फिरोज तष्लकानें हें गांव वसीवेंल असें म्हणतात. कांही वर्षांनंतर एका लहरी नांवाच्या पारशी मनुष्यानें तें काबीज केलें व त्याला लाहारपूर असें नांव दिलें. १५ व्या शतकांत मुसुलमानांनी पारशी लोकांचा पराभव केला व गौर रजपुतांनी मुसुलमानांनां हांकलून दिलें (१७०७). लाहरपूर ही राजा तोडरमल्लची जन्मभूमि होय असें म्हणतात.