प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लाहोर, जिल्हा. - पंजाब, लाहोर, विभागांतील एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ २८२४ चौरस मैल. आग्नेय बाजूस सतलज नदी वाहत असून पलीकडे फिरोजपूर आहे. याच्या ईशान्येस सियालकोट व अमृतसर हे जिल्हे; वायव्येस गुजराणवाला; व नैर्ऋत्येस माँटगॅमेरी जिल्हा आहे. जिल्ह्यांत डोंगर वगैरे कांही नसून रावी व सतलज नद्यांच्या मधील प्रदेश येतो. दरसाल पावसाचें मान २२ इंच असतें. या जिल्ह्माचा इतिहास म्हणजे लाहोर व कसूर शहरांचा इतिहास होय. सन १८४९ त पंजाब इंग्रजी राज्याला जोडल्यावर लाहोर जिल्हा बनविण्यांत आला. सन १८५७ च्या बंडांत मियन मीरचे शिपाई चळवळ करूं लागले होते. परंतु वेळीच त्यांचा कट उघडकीस आला. बंडाचा निकाल होऊन स्वस्थता नांदेपर्यंत लाहोरमध्यें स्वस्थता नव्हती. मुसुलमानी अमलाच्या पूर्वीचे अवशेष गुजरणवाला हद्दीवर थोडेफार आढळून येतात. जिल्ह्यांत ६ शहरें असून ११९४ खेडीं आहेत. जिल्ह्यांत लाहोर, चूनियन व कसूर अशा तीन तहशिली आहेत.

लाहोर शहरांत अनेक धार्मिक संस्थांची मुख्य ठिकाणें आहेत; आर्यसमाज संस्था, सनातन धर्मसभावगैरे, आहेत. जिल्ह्माची भाषा पंजाबी असून उर्दू भाषा क्कचित प्रसंगी जुन्या रहिवाश्यांकडून उपयोगांत आणिली जाते. लाहोर जिल्ह्यांत पावसाचें मान ८ पासून २० इंचपर्यंत असल्यानें शेतकीची लागवड पाटाच्या पाण्यावर सर्वस्वी अवलंबून असते. जमीन ठिकठिकाणीं निराळया तर्‍हेची आहे. कारण नद्यांच्या वाहून आलेल्या गाळाप्रमाणें ती कमजास्त सुपीक बनते. जिल्ह्यांत उद्योगधंदे फक्त लाहोर जिल्ह्यांत आढळतात. लाहोर येथें बरेच कापसाचे जिन व कापूस दाबण्याचे प्रेस आहेत. लाहोर, चुनियन व कसूर हीं कारखान्याचीं केंद्रें होत.

तहशील.- हिचें क्षेफ़ळ ७३० चौरस मैल आहे. तालुक्यांतून रावी नदी वाहत जाते. १९११ सालीं लोकसंख्या ४६५८७८ होती. हींत ३७२ खेडीं आहेत. एकंदर लाहोर जिल्ह्यांत या तहशिलींत शिक्षणप्रसार बराच आहे.

शहर.- पंजाबप्रांताचें मुख्य शहर. हे रावी नदीच्या कांठी आहे. कराची, पेशावर व कलकत्ता शहरांनां जी रेल्वे जाते ती लाहोर शहरावरून जाते. प्रांतांत लाहोर दुसर्‍या नंबरचें शहर आहे. याची लोकसंख्या (१९२१) २८१७८१.

इतिहास:- दंतकथा अशी आहे की, रामाचा मुलगा लव यानें हें वसविलें, पण ती विश्वसनीय नाही. प्लिनीनें यासंबंधी कांही उल्लेख केलेला दिसत नाही. लाहोरपासून २५ मैलांवर अंबा कापी नांवाच्या जुन्या स्थलाचा उल्लेख कनिगहॅम साहेबानें केलेला आहे. व त्याला टॉलमी वगैरे इतिहासकारंचा आधार आहे. तत्रापि लाहोरसंबंधी पहिला ऐतिहासिक लेख चिनी प्रवासी ह्युएनत्संग याचा असून ६३० सालीं लाहोरगांवाहून तो जालंधर येथें गेला असतां लाहोर येथें त्याला ब्राह्मणवस्ती पुष्कळ आढळून आली. अल्बरूणी नांवाचा प्रसिद्ध अरबी ज्योतिषी लाहोरसंबंधानें असें लिहितो कीं, राज्याची राजधानी लाहोर येथें नसून सियालकोट येथें होती. व अल्मसुदी नांवाचा ग्रंथकार लाहोर संबंधानें कांहीं देखील उल्लेख करीत नाहीं. १० व्या शतकाच्या शेवटीं लाहोरास ब्राह्मण राजे होते. १०३१ साली लाहोर मुसुलमानांच्या ताब्यांत गेलें. त्यानंतर १६ व्या शतकापर्यंत या नाही तर त्या कोणत्या तरी मुसुलमानांच्या ताब्यांत लाहोर होतें. १५२४ सालीं बाबरनें लाहोर लुटलें. १५८४ पासून १५९८ पर्यत अकबराची मुख्य जागा लाहोरास होती. त्यावेळेस पोर्तुगीज व इंग्रज लोक हिंदुस्थानांत आले होते. अकबरानें पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या व लाहोर मोठया भरभराटीस आणून सोडिले. खवाबाग, मोतीमशीद, व अनारकालींचे थडगें या प्रेक्षणीय इमारती होत. राजवाडयाची बांधणी फार सुरेख असून त्यापैकीं बराच भाग शिखांनी व इंग्रजांनी कमजास्त फेरफार करून विद्रुप करून टाकलेला आहे. नूरजहानचें थडगें असेंच खराब झालेलें असून शिखांनी इमारतीचा बराच भाग उध्वस्त केला आहे. आपल्या बापाच्या थडग्याशेजारी शहाजहान यानें एक लहानशी इमारत बांधविली आहे. ती फार मनोहर असून खवाबाग इमारतीच्या डाव्या बाजूला नवलाखा नांवाची इमारत बांधली आहे. तिच्या प्रीत्यर्थ ९ लाख रू. खर्च झाले. शहरापासून ४ मैलांवर शालमार नांवाची बाग आहे. शहाजहानाचा मुख्य एंजिनीयर अलीमर्दनखाननें १६६७ त त्याची (बागेची) रचना केली. औरंगझेबाच्या काळीं लाहोरला ओहोटी लागली. या वेळेपासून १९ व्या शतकापर्यंत स्वार्‍या व लढाया नेहमीं चालू होत्या. १७६७ पासून १७९७ पर्यंत लाहोरास शीख लोकांचें वर्चस्व असून शांतता होती. महाराज रणजितसिंग गादीवर असेपर्यंत लाहोरचें नष्ट वैभव परत आलेले होतें. मुसुलमानांच्या थडग्यांवरील उत्तामोत्ताम कोरींव कामें अमृतसरला नेऊन त्या ठिकाणीं एक प्रेक्षणीय असें देवालय बांधलें ही गोष्ट खरी आहे. शालमार बाग पूर्वस्थितीवर आणला. जुम्मामशीद व राजवाडा यांमधील जागेंत एक सुंदर बारद्वारा बांधली व आणखी कांहीं कामें केलीं. परंतु रणजिंतसिंगानंतर पुढें इंग्रजी राज्याला सुरवात झाली. यूरोपीयन लोकांची वस्ती शहरच्या आग्नेयीस अनार्कलीजवळ आहे. येथें सेक्रेटरीएट, जिल्हाकचेरी, सरकारी पाठशाला, पंजाबविश्वविद्यालय, टाउनहॉल, पदार्थसंग्रहालय, सार्वजनिक वाचनालय, मप्रो व लेडी अचिन्सन इस्पितळ वगैरे इमारती आहेत. पूर्वबाजूला रेल्वेचे कारखाने असून नवलाखाजवळ लाहोर रेल्वेस्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस मूलचंद व्यापार्‍यानें बांधलेला धर्मशाळा व देवालय आहे. लारेन्स मोंटगॉमेरी हॉलच्या सभोंवतीं सुंदर उद्यान असून त्यांत अनेक पशुपक्षी बाळगलेले आहेत. १८६७ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली. लाहोर ज्यासंबंधानें एकदां प्रसिद्धीस आलें होतें त्या कला आतां नजरेस येत नाहींत. मेणबत्त्या, साबू, तेलें वगैरे जिन्नस तयार करतात. गिरण्यांतून कापड निघतें. लोंकरी कापड पश्मीना वगैरे काढतात. नानाप्रकारचीं कौलें व विटा तयार करितात. कापसाचे कारखाने, रेल्वेवर्कशाप, तेलाची व पिठाची गिरणी वगैरे कारखाने आहेत. येथील विश्वविद्यालयाला जोडलेली ५-६ कॉलेजे व बरीच हायस्कुले आहेत. छापखाने पुष्कळ असून सुमारें २० च्या वर नियतकालिकें निघतात. एक पंजाब व्हालेटियर रायफल्स व पंजाब लाइट हॉर्सचें मुख्य ठिकाण लाहोरास आहे. किल्लयावर गोरी व काळी पायदळाची तुकडी असते.

छावणी.- पंजाब, उत्तरेकडील फौजेचें तिसर्‍या भागाचें मुख्य ठिकाण. ही लाहोर सिव्हिल स्टेशनपासून तीन मैल आहे. त्या ठिकाणीं दोन रेल्वेस्टेशनें आहेत. एक पूर्व लाहोर छावणी व दुसरी पश्चिम लाहोर छावणी. १९०६ पर्यंत छावणीचें नांव मियानमीर होतें. पूर्वी छावणीची जागा अनार्कली येथें होती. परंतु तेथील हवापाणी मानवेना म्हणून छावणी तेथून हालविणें भाग पडलें. सांप्रतची जागा फार चांगल्या खुल्या मैदानावर असून सर्व बाजूंनी मोकळी हवा आंत घेणारी आहे. याच ठिकाणीं ही इमारत चांगली प्रेक्षणीय आहे. आवाराच्या आंत एक मशीद आहे. लाहोर छावणीमध्यें पंजाब ब्यांकेची एक शाखा आहे.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .