विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिंगपुराण - अठरा पुरांणापैकी एक सृष्टयुत्पत्तीच्या कथेमध्यें भगवान् शिवाचें लाक्षणिक रूप म्हणून लिंग दिलें आहे. त्यावरून याला लिंगपुराण असें नांव मिळालें. आणि सृष्टयुत्पत्तीच्या वर्णनांत इतर पुराणांमध्ये विष्णूला दिलेलें स्थान या पुराणांत शिवाला दिलेलें असल्यामुळें यामध्यें शिवावतारांच्या सर्व कथा दिल्या आहेत. एकंदर पुराण म्हणजे शैवपंथाचा आधारग्रंथ आहे.