विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लिबो :- हें रशियाचें बंदर असून रिगाच्या नैर्ऋत्येस आगगाडीनें १४५ मैल आहे. येथील लोकसंख्या सन १८९७ मध्यें ६४५०५ होती. १८७२ मध्यें मास्को, ओरेल व स्वारकाव्ह हीं जोडल्यामुळें लिबो महत्त्वाचें बंदर झालें. येथून बाहेर जाणारा माल ३२५०००० पासून ५५००००० पौंड किंमतीचा असतो. येथें जहाजें बांधण्याचें काम वाढत्या प्रमाणावर आहे. समुद्रस्नानाकरितां उन्हाळयांत लोक लिबोला येतात. १७९५ सालीं हें बंदर रशियाच्या ताब्यांत आलें.