विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लीच टेनस्टीन :- यूरोप, एक संस्थान. व्होरार्लबर्ग हा ऑस्ट्रियाचा प्रदेश आणि सेंट गॅलेन व ग्रौबुन्डेव हे स्विस कॅन्टन यांमध्यें हें संस्थान वसलें आहे. हें कान्स्टंट सरोवरच्या दक्षिणेस असून र्हाईन नदीच्या उजवीकडच्या बाजूस आहे. क्षेत्रफळ ६५ चौरस मैल व लोकसंख्या (१९१२) १०७१६. लोक शेतकीच्या धंद्यांतलें असून धान्ये, दारू, फळें, आणि लांकूड हीं येथील मुख्य पिकेुं होत. सुती कापड विणणें हाच कायतो एक धंदा माहीत आहे. वडुझ (लोकसंख्या १४०५) हें राजधानीचें शहर आहे. बहुतेक राज्यकारभारांतल्य बाबी सर््वीत्झंलडच्या मदतीनें चालतात. १७ व्या शतकापर्यंत रोमांश भाषा प्रचलित होती. परंतु आतां जर्मन भाषा व रोमन भाषा चालते. २४ वर्षांवरील सर्व पुरुषास उमेदवार निवडण्याचा हक्क आहे. डायेट (राजसभा) मध्यें १५ सभासद असतात. त्यांची मुदत ४ वर्षांची असते. राजघराणें १२ व्या शतकांत स्थापन झालें असून राज्याचा वारसा पुरुषाकडेच जातो. सध्यांचा राजा दुसरा जॉन १८५८ सालीं गादीवर बसला. संस्थानांत वडुझ व शेलेनबर्ग असे दोनच परगणे आहेत. पहिला १६९९ सालीं व दुसरा १७१२ सालीं लीचस्टीन घराण्याकडे आला व १७१९ सालीं बादशहा ६ वा कार्ल यानें या घराण्याला या परगण्यांची सनद दिली. तेव्हांपासून हें लहानसें संस्थान बनलें. १८०६ सालीं रोमन साम्राज्य मोडल्यावर र्हाईन संघाला हें जोडण्यांत आलें. १८१५-६६ पर्यंत हें जर्मन राष्ट्रसंघांत होतें. हाहि संघ मोडल्यानंतर आतां हें कोणालाच सामील नाहीं.