विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लेकिश :- हें दक्षिण पॅलेस्टाईनमधील एक महत्त्वाचें शहर होतें. याचा बायबलमध्यें उल्लेख येतो. गिबिओनाईटांच्या विरुद्ध संघात मिळाल्यामुळें जोशुआनें लेकिशचा नाश केला व हें शहर जूडांतील जातीच्या स्वाधीन केलें. येथें पळून आलेल्या अमेझिया राजाचा कटवाल्यांनीं खून केला. एल्युथेरोपोलीसच्या दक्षिणेस ७ मैलांवर असलेल्या टेल-एलं हेसी नांवाच्या टेंकडींजवळ हें शहर असावें, असा संशोधकांचा समज आहे.