विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लोई :- ब्रह्मदेश, दक्षिणेकडीलशान संस्थानें, मेलट प्रांतांतील एक संस्थान. याचें क्षेत्रफळ २०० चौरस मैल. याचा पश्चिमभाग डोंगराळ असून त्यांतून पिन लैंटश नदीला मिळणार्‍या नद्या वाहतात. १९०१ सालीं लोकसंख्या ५४४२ होती. यांत खेडी ७० आहेत. लनपो मुख्य ठिकाण होय. १९०४-०५ सालीं काळीचें उत्पन्न ५३०० रुपये होतें. इंग्रजसरकारला ३००० रुपये खंडणी द्यावी लागते.