प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लोखंड :- सर्व धातूंत लोखंड ही अत्यंत महत्त्वाची धातु आहे. निसर्गत: लोखंड धातुरूपांत क्वचितच आढळतें, तथापि त्याची अशोधित धातु विस्तृत प्रमाणावर सांपडते. तिजपासून लोखंड तयार करण्याला ब्राँझ करण्यापेक्षां ज्ञान व कौशल्य कमी लागतें. तथापि लोहयुग हें ताम्र व ब्राँझयुगाच्या नंतरचें आहे असा सामान्य समज आहे. लोखंडाचीं फार जुनीं अशीं हत्यारें इतरांच्या मानानें फार विरळा सांपडतात याचें कारण लोखंड ताबडतोब गंजून जातें हें असलें पाहिजे.

इतिहास :- जगांत अशोधित लोखंडापासून शुद्ध लोखंड तयार करण्याची कला हिंदुस्थानांत प्रथम निघाली असावी असें सर्वसाधारण मत आहे. परदेशांतून स्वस्त लोखंड येऊं लागल्यामुळें आगागाडीच्या फांटयांच्या आसपासचे लोखंड गाळण्याचे धंदे हल्लीं बहुतेक बसले. तरी अद्यापहि दूरदूरच्या भागांत कोठें कोठें जुन्या पद्धतीनें लोखंड गाळण्यांत येतें. लोखंडाविषयीं हिंदी लोकांचें ज्ञान किती प्राचीन आहे व लोखंडाचें घडीव काम किती कुशलतेनें होत असे हें दिल्लीजवळ कुतुब्मिनार जवळ असलेल्या लोखंडी घडीव स्तंभावरून चांगलें दिसून येतें. तसेंच प्राचीन प्रासादांचे भव्य लोंखडी दरवाजे व हिंदी राजांच्या षस्त्रागारांतील षस्त्रें यांवरूनहि या विशयाचें हिंदी ज्ञान कितपत होतें तें समजून येईल. वरील लोहस्तंभ एकंदर ६० फूट लांब आहे. स्तंभावर नक्षीदार शिखर असून त्यावर ४ थ्या शतकांततील एक खोदीव लेख आहे. हल्लींच्या सुधारलेल्या यंत्रांनीं सुद्धां अशा प्रकारचा घडीव स्तंभ करणें बरेंच कठिण असल्यामुळें पूर्वीचे लोक नुसत्या हस्तकौशल्यानें तो कसा करूं शकले असतील हीं अचंबा वाटण्याजोगी गोष्ट आहे. मध्ययुगांत प्रख्यात दमास्कसच्या तरवारींनां लागणारें पोलाद हल्लींच्या निजाम सरकारच्या राज्यांतून जात असे. मध्यहिंदुस्थानांत पन्ना, वोढसें या भागांत; मद्रासकडे सालेम, बल्लारी, सोंडूर या भागांत; मध्यप्रांतांत चंद्रपूर, व जबलपूर भागांत; बंगालमध्यें जमशेदपूर, कालीमाती भागांत लोखंडाच्या खाणी आहेत व तेथें त्याच्यापासून निरनिराळया वस्तूहि तयार करतात.

ब्रह्मदेशांत पूर्वीपासून लोखंडी जिन्नस पुष्कळ होतात. तिकडील देवळांवर लोखंडी छत्र्या बसवितात. बडोद्याचे लोखंडी कठडे; म्हैसूर, मदुरा, मलबार, विजगापट्टणकडील लोंखडी खोदकाम; जयपूर व राजपुतान्यांतील जाळीकाम, ढाली, तरवारी, कवचें यांची थोडया दिवसांपूर्वी व आतांहि प्रसिद्धि आहे. केप्रोन येथें एक लोखंडी हत्यार सांपडलें आहे, तें ख्रि. पू. ३५०० वर्षाचें आहे असें म्हणतात. होमरच्या (ख्रि. पू. ९ वें शतक) काव्यांत पोलादाचा उल्लेख आहे. लोखंडाच्या इतिहासाचे (१) प्राचीन काल ते इ. सनाचें १४ वें शतक, (२) १४ वें तें १९ वें शतक आणि (३) सांप्रतचा काल असे तीन कालदर्शक विभाग पाडतात. पहिल्या कालांत पोलाद माहीत होतें, दुसर्‍यांत भट्टया लावून लोखंड गाळण्याची रीत समजली. हंटस्मन, बेसेमीट वगैरे लोकांनीं निरनिराळया भट्टया शोधून काढून लोखंड गाळून शुद्ध करण्याचे प्रयत्न केले.

वस्तुक्षेत्र :- बहुतेक सर्व जमिनींत झर्‍यां च्या, नद्यांच्या व समुद्राच्या पाण्यांत, वनस्पतींच्या राखेंत व प्राण्यांच्या रक्तांत लोखंडाचा कमी अधिक अंष असतो. तुटलेल्या तार्‍यांतहि धातुरूप् लोखंड असतें असें शास्त्रज्ञांचें मत आहे.

अशोधित धातु व तीपासून लोखंड तयार करणें :- लोखंडाचें अस्तित्व जरी याप्रमाणें पुष्कळ पदार्थांत आढळून आलेलें आहे तरी लोखंड तयार करण्याकरितां दोनच प्रकारची अशोधित धातु घेतली जाते (१) कर्बितें (कार्बोनेटस) आणि (२) अम्लाजिदें अथवा प्राणिलें (ऑक्साईड्स). कर्बनितें दोन प्रकारचीं असतात; (अ) स्फटिकरूप व मातीपासून बहुधां अलिप्त. यांनां ''स्पॅथिक आयर्न बोअर'' असें म्हणतात; (आ) ज्यांत माती मिसळलेली आहे अशी; क्ले आयर्न स्टोन. अम्लजिदें तीन प्रकारची असतात. (अ) अनार्द्र लोहिक अम्लजिद, (आ) आर्द्र लोहिक अम्लजिद आणि (इ) चुंबकीय अम्लजिद सारखें लोहस व लोहिक अम्लजिदाचें मिश्रण; यांपैकी सामान्यत: अम्लजिदांपासून कोळशाच्या साहाय्यानें बरेंच लोखंड तयार करतात. या रीतीनें मिळालेलें लोखंड शुद्ध नसते. त्यांत कमीअधिक कोळसा असतो. बाजारांत मिळणार्‍या अत्यंत शुद्ध लोखंडांत सुमारें शें. ०.३ भाग तरी कोळसा व इतर परकीं द्रव्यें असतात वैद्युक्तिक व दुसर्‍या कांही रीतींनीं अगदीं शुद्ध लोखंड मिळूं शकतें. लोहमिश्रत माती ही कोळशाच्या ढिगार्‍यां त विपुल सांपडते. बलुचिस्तानांत खाधल किंवा लघ म्हणून एका खनिज पदार्थांतहि लोखंड सांपडतें. अशुद्ध लोखंडी दगडाच्या मॅग्नेटाईट, हिमेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट, पायरीटीज अशा ५ जाती आहेत.

लोखंड शुद्ध करण्याकरितां प्रथम त्यांतील खडे व माती काढून मग प्राणवायु काढतात. हें काम पहिल्या भट्टींत होतें. तेथें बहुतेक मळी निघून जाते व दगड व माती अलग होऊन लोखंडाचे द्रवरूप दोन प्रवाह निरनिराळया मार्गांनी बाहेर पडतात. अति शुद्ध लोखंड पाहिजे असल्यास हा द्रव निरनिराळया भट्टींत घालून व मळ काढून मग लहान लहान कढयांतून तो शुद्ध करितात. नेहमींच्या भट्टीची उंची ८० फूट व रूंदी २० फूट असते. वरून लोखंडाचे दगड, चुनखडी व कोळसा घालीत असतात, व खालून हवेचा प्रवाह सुरू झाला म्हणजे आंतील मिश्रण तापते. त्यानें चुनखडीचें पृथक्करण होऊन चुना व कर्बद्विप्राणिल बनतात. कर्बद्विप्राणिल, कोळसा व लोखंडाच्या दगडांतील प्राणिल यांचा मिलाफ होऊन कर्ब-एकप्राणिल बनतो व तो लोखंडांतील प्राणवायु घंऊन कर्बद्विप्राणिल बनते. चुना हा दगडांतील इतर द्रव्यांशी मिसळून मळी बनते व ती तळीं बसते. लोखंडाचा रस होऊन तोहि खालीं बसतो. या लोखंडांत पुष्कळ कोळसा व थोडी मळी शिल्लक राहतेच. भट्टींतून बाहेर निघालेल्या वायूमध्यें पुष्कळसें कर्बएकप्राणिल शिल्लक असतें याचा उपयोग आंत जाणारी हवा तापविण्याकरितां करितात. या भट्टीच्या बाजू पातळ व पोकळ केलेल्या असतात. त्या पोकळींतून नळीनें पाणी फिरवितात म्हणजे भट्टीच्या बाजू थंड राहतात. असें न केल्यास भट्टी फार तापते व आंतील तापलेलें मिश्रण भट्टीच्या बाजू खाऊं लागतें.

लोखंड ओतणें.- भट्टींतून बाहेर पडणारें लोखंड वाळूच्या किंवा लोखंडाच्या ठशांत ओततात. या ठशांची रचना डुकरांच्या घरकुल्यासारखी दिसते म्हणून या लोखंडास डुकरी (पिग) लोखंड म्हणतात. नंतर हे ठसे फोडून लोखंड काढून घेतात. हल्ली यूलिंग म्हणून रहाटासारखें एक यंत्र निघालें आहे. त्यानें एकदम ठसे पाडून सांठवितां येतात. एक ठशांची मोठी माळ केलेली असते. या माळेंतील ठशांत एकामागून एकांत असा डुकरी लोखंडाचा रस पडत असतो. त्यानंतर ती माळ एका पाण्याच्या हौदांतून नेलेली असते. तेथें ते ठसे थंड होतात व दुसर्‍या बाजूस येऊन आगगाडीच्या डब्यांत येऊन पडतात. या यंत्रानें पुष्कळ श्रम वांचतात.

शुद्ध लोखंड व पोलाद करण्याची कृति.- डुकरी लोखंडांत पुन्हां कोळसा व वाळू घालतात. व त्याचा पुन्हां द्रव करून शुद्ध लोखंड काढंतात. यानें लोखंडाशी मिसळलेला गंधक सुलभपणें वेगळा करतां येतो, व भट्टीच्या बाजूंस वाळूचें आच्छादन आपोआप बसतें, वितळलेलें लोखंड पुन्हां प्राणवायूशीं संयोग पावूं शकत नाहीं, प्राणवायु सर्वस्वीं निघून जातो. कमी उष्णमानावर लोखंड वितळतें व जळण कमी लागतें. डुकरी लोखंड सांठविण्याच्या एक हौदांत ७०० टन लोखंड मावतें यांत गेल्यावर तें द्रवरूप लोखंड चांगले मिसळतें. याच्यावर एक पेटती ज्योत ठेवतात तिनें याला घनरूप येत नाहीं. कमी अधिक प्रमाणांत असलेला गंधक व वाळू समप्रमाणांत येतात. यानंतर ओतीव लोखंडांतील गंध व वाळू व स्फुर हे काढावयाचे असतात. व कोळसा देखील बराच कमी करावयाचा असतो. पैकी गंधक व कोळसा यांचा प्राणवायूशी संयोग होऊन ते प्राणिल बनून उडून जातात आणि वाळू व स्फुर मिळून लोहस्फुरित व शैलस्फुरित बनून तें वर तरंगतें. प्राणवायु हवेंतील घेतात, किंवा लोखंडाच्या दगडांतून घेतात. लोखंड गाळण्याची एक पुडलिंग नांवाची पद्धति आहे ती अशी:- एका मोठया भट्टींत डुकरी लोखंड आणि अशुद्ध लोहप्राणिलाचे दगड घालून ते वितळवितात. आणि तो द्रव झार्‍यानें खूब ढवळतात. लोहप्राणिलांतील प्राणवायु निघून डुकरी लोखंडांतील वाळू व स्फुर यांशी संयोग पावेतो व त्यांचे प्राणिल बनतात. हे प्राणिल व लोखंड यांचे एक मिश्र लोहशैलित व स्फुरित तयार होतें. जसजसें बीड तयार होतें तसतसें तें घट्ट घनरूपांत येऊं लागतें व तो ढवळणारा इसम त्याचे लहान लहान गोळे तयार करतो. यांतील राख काढण्याकरितां ते एका यंत्रांत घालून दाबतात. बेसेमिर नांवाच्या दुसर्‍या एका पद्धतीनें डुकरी लोखंडाचें बीड व पोलाद करण्याचें काम सुलभ होतें. लोखंडांत असलेला कोळसा, शैल, स्फुर, गंधक व मंगल या सर्वांचा हवेंतील प्राणवायुशीं संयोग घडवून आणतात. याची भट्टी आडवी असते. भट्टी काढण्यास तयार झाली म्हणजे एक प्रकारचा आवाज होतो. या भट्टींत साधारणपणें २० टन लोखंड शुद्ध करण्यास घालतात व तें शुद्ध होण्यास सरासरी १० मिनिटें लागतात. बीड तयार झालें म्हणजे त्यांत कमी अधिक प्रमाणांत कोळसा घालून किंवा इतर धातू घालून ज्या प्रकारचें लोखंड पाहिजे असेल तें तयार करतात. स्वीडन देशांत परतें बीड तयार होण्याच्या अगोदरच भट्टी थांबवितांच पोलाद बनवितां येतें. पण हें काम जरा धोक्याचें आहे, म्हणून बहुतेक कारखान्यांत प्रथम पुरतें बीड तयार करून मगज पुन्हां कोळसा किंवा जी धातु पाहिजें असते ती घालितात. उघडया भट्टीच्या पद्धतींत प्रथम आंत लोहप्राणिलाचे दगड घालून त्यांतला प्राणवायूनें शैल, स्फुर, गंधक इत्यादि द्रव्यांचे प्राणिल बनवून त्यांस घालवून देतात व नंतर त्यांत लहान पोलादाचे व लोखंडाचे तुकडे घालून ढवळतात. ही कृति हळू हळू करावी लागते नाहींतर मोठाले बुडबुडे निघूं लागले तर आंतील रस बाहेर उडूं लागतो. म्हणून या भट्टीनें बीड तयार होण्यास फार वेळ लागतो. हल्ली विजेच्या भट्टया निघाल्या आहेत. त्यांच्यामुळें गंधक, स्फुर हीं पुरतेपणीं काढून टाकतां येतात. व प्राणवायूहि निघून जातो. शिवाय उष्णता फुकट जात नाहीं.

गुणधर्म.- लोखंड ही बहुतेंक चांदीसारखी चकचकीत धातु असून तिला चांगली झिल्हई देतां येते. शुद्ध लोखंडाचें विशिष्ट गुरूत्व ७.८४ असतें. कोबाल्ट व निकल यांखेरीज इतर नरम व तार काढतां येण्याजोग्या धातूंत लोखंड हें अत्यंत चिवट आहे; तापवून तांबडें लाल केल्यास ते मऊ होतें व आणखी जास्त तापविल्यास त्याचे दोन तंकडे ताबडतोब एकजीव होतात. त्याची तार काढतां येते. तें विद्युद्वाहक व रोधकहि आहे. अशुद्ध लोहचुंबकाचे धर्म आणतां येतात. पण ते फार वेळ रहात नाहीत. पोलादाच्या अंगी मात्र ते रांहू शकतात; परंतु पोलाद तापविल्यास ते नाहींसे होतात. कोरडा अम्लजन व शुद्ध हवा, यांचा लोखंडावर कांही परिणाम होत नाहीं. पाण्यांत हवा नसल्यास तें गरम असलें तरी लोखंड त्याचें विघटन करूं शकत नाही. ओलसर हवेंत लोखंड ताबडतोब गंजतें; कर्बनब्द्याम्लजिद किंवा अम्लांचे धूर यांच्या अस्तित्वामुळें गंजण्याच्या क्रियेला फार मदत होते व अल्कोहलांच्या अस्तिवानें विरोध होतो. लोखंडांत कोळसाची मुख्य भेसळ असते व तिच्या कमीजास्त प्रमाणांवरून त्याचे गुणधर्म बदलतात. लोखंडाचे जिन्नस गंजूं नयेत म्हणून त्यांनां वारनिश अथवा तैलरंग देतात किंवा वरून तेल, चरबी, अथवा ग्राफाइट लावितात; त्याचप्रमाणें कधीं कधीं जस्त, कथील अथवा निकल यांची कल्हइै करतात. हरिताच्या वर्गांतील मूलद्रव्यांशी लोखंडाचा सहज संयोग होतो; पुष्कळ तापविल्यास तें अम्लजनांत व गंधकाच्या धुरांत जळतें व कर्बाशी संयोग पावतें. बहुतेक पातळ अम्लांत तें द्रवतें व उज्ज वायु निघतो.

ओतीव व लोखंड (उर्फ बीड). घडी व लोखंड व पोलाद.- धातुशोधनविद्येनें तयार केलेलें लोखंड कधींच शुद्ध नसतें; त्यांत कित्येक दुसरे पदार्थ असतात. त्यामुळें लोखंडाचे गुणधर्म व निरनिराळया कामाकरिता त्याची उपयुक्तता या बाबतींत बराच फरक होतो. लोखंडाबरोबर असलेल्या इतर पदार्थांपैकी कर्ब, सिलिकॉन, स्फुर, गंधक, व मँगॅनीज हे महत्त्वाचे होत. यांच्या प्रमाणांत थोडा फरक झाला तरी लोखंडाचे गुणधर्म बरेच बदलतात असें आढळून आले आहे. बाजारांत मुख्यत: लोखंडाचे तीन प्रकार आढळून येतात: (१) ओतीव लोखंड उर्फ बीड:- यांत शें. १.५-४ भाग कर्ब म्हणजे कोळसा, व त्याशिवाय वर दिलेल्या पदार्थांपैकी कमीअधिक मानानें इतर पदार्थ असतात हें फार लवकर वितळतें. थंड झाल्यावर हें फार ठिसूळ होतें त्यामुळें यावर घणानें काम करतां येत नाहीं. याचा उपयोग ठसे करण्याकडे होतो. नीप बीड म्हणून याचा एक प्रकार आहे. तें घनवर्धनीय आहे. (२) घडीव लोखंड:- यांत पहिल्यापेक्षां कर्ब कमी असतो व याचा रस लवकर होत नाही; परंतु थंडपणी हें घनवर्धनीय असल्यामुळें यावर हातोडयानें काम होऊं शकतें व खूप तापवून यांचे दोन तुकडे जोडतां येतात. याचा विशेष हा आहे की, हें रस केल्याशिवाय बनविलेलें असतें व यामुळें त्यांत किटाचे कण शिल्लक असतात. (३) पोलाद- घडीव अथवा घनवर्धनीय लोखंड व पोलाद यांत कर्बाचें प्रमाण सारखेंच असतें; पण पोलादांत धातूचा केव्हांतरी रस केलेला असतो व त्यांत किटाचे कण नसतात. पोलादाचा मुख्य गुण म्हणजे अतिशय तापवून एकदम थंड केलें असता तें फार कठिण होतें. पोलादांत निकल, मंगल, क्रुम व क्रमतुंग असे ४ मुख्य भेद आहेत. लोखंड व पोलाद यांचे गुणधर्म बारीक सारीक इतर द्रव्यांची भेसळ असल्यामुळें फार बदलतात. लोखंडात गंधक व स्फुर यांची पुष्कळ वेळां भेंसळ असते. व कधीं कधीं प्राणवायूहि त्यांत असतो. हत्यारें, पुलाचें सामान व आगगाडीचे रूळ करण्याच्या लोखंडांत स्फुर व गंधक मुळींच असतां कामा नयें. (४) क्रुम पोलाद:- यामध्यें क्रुम धातु शेंकडा २ भाग व कोळसा .८ ते २ भाग असतो. हें तापवून एकदम थंड केलें असतां फार कठिण व लवचिक होतें यामुळें हें लवकर मोडत नाहीं. व जोराच्या धक्कयाने याला भेगा पडत नाहींत. याचा उपयोग बहुधां तोफेचे गोळे करण्याकडे करतात व खडक फोडण्याचीं यंत्रेंहि करतात. क्रुम पोलाद व शुद्ध लोखंड यांचे एका आड एक पत्रे ठेवून तापवून त्यांस एकजीव करून त्या जोडपत्र्याच्या तिजोर्‍या करतात. यामुळें तीस चोराला भोंकहि पाडतां येत नाहीं. व टांकीचा घावहि आंत शिरत नाहीं. याखेरीज पोलादाचे आणखी पुढील प्रकार आहेत:- (५) तुंग पोलाद- यांत तुंग धातु शेुं. ५ ते १० भाग असते. व कोळसा १ ते २ भााग असतो. याचें लोहचुबंक करतात. कारण या धातुच्यामुळें लोहचुंबक शक्ति फार दिवस राहूं शकते.

(६) क्रुम-तुंग-पोलाद किंवा अतिवेग पोलाद. साधारणत: जसजसें पोलाद तापवावें तसतसें हें गरम हात जातें, परंतु हें पोलाद ६०० अंशापर्यंत तापविलें असतां फार बळकट व कठिण बनतें. त्या वेळीं तें इतरलोखंडास कापूं शकतें. यामुळें पोलादाच्या हत्यारानें काम चौपट जलद होऊं शकतें. १८८३ सालीं रॉबर्ट हॉड्फील्ड यानें मंगलपोलाद शोधून काढलें. हें फार घनवर्धनीय असून फार कठिण असतें.
(७) निकलपोलादमध्ये शेंकडा ३ ते ३.५ भाग निकल व .२५ भाग कोळसा असतो. हें फार मजबूत व कठिण असतें. यामुळें याचा उपयोग लढाईतची गलबतें बांध्यण्याकडे फार होतो. क्र्रप करखान्यांत या कामाकडे ज्या पोलादाचा उपयोग करतात त्यांत पुढीलप्रमाणें इतर धातूंचें मिश्रण असतें; शेकडा ३.२५ भाग निकेल, .४ भाग कोळसा. व १.५ भाग क्रुमयानें गलबताच्या बांजूनां भोक लवकर पडत नाहीं. इतकेंच नाहीं तर एके ठिकाणीं भोंक पडलें तरी त्यानें बाकीच्या भागाला भेगा पडत नाहींत. (८) मंगल पोलादामध्यें शेंकडा १२ भाग मंगल, व १.५ भाग कोळसा असतो. हें पोलाद तापवून हळू हळू थंड केल्यावर फार ठिसूळ होतें. याचा उपयोग दगड फोडण्याचीं यंत्रें, आगगाडीच्या रस्त्यावर घालावायाचे रूळ, तिजोर्‍या वगैरे करण्याकडे होता. नेहमीं तिजोर्‍या वगैरें करण्याकडे होता. नेहमीं तिजोर्‍या फोडतांना चोर तिजोरीची जागा तापवितात, ती जागा थंड झाली म्हणजे तेथें भोंक पाडून ते आंत सुरूंग भरतात. परंतु या युक्तीचा उपयोग मंगलपोलादाच्या तिजोरीवर होऊं शकत नाही. याला कापण्याकरितां कुरूंदाच्या हत्यारांचा उपयोग करावा लागतो.
कारखाने.- मद्रासकडे सं. १८३० त एक पोर्टोनोव्हो आर्यन कंपनी निघून तिनें ३० वर्षे लोखंडाचा कारखाना चालविला पण तज्ज्ञांच्या अभावी तो पुढें बुडाला. जंगलखात्यानें लांकडाच्या कामी पुष्कळ सवलती दिल्यास (कोळशामुळें) हा धंदा भरभराटीस येईल असें त्यावेळच्या एका रिपोर्टांत म्हटलें आहे. मध्यप्रांतांत जरी लोखंड पुष्कळ सांपडतें तरी तेथें कारखाने फारदेशीर चालणार नाहीत असें मार्टिन व लुई यांच्या रिपोर्टांत लिहिलें आहे. प्रथम टाटा सन्स ऍंड कंपनीकडे चांदारायपूर मयुरभंज या भागांत असा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी झाल्यावर मग जमशेदपूर कालीमाती इकडे कारखाने काढले. यासाठीं १९०७ सालीं टाटा आर्यन अँड स्टील कंपनीची स्थापना झाली. बंगाल्यांत टाटा कंपनीच्या पूर्वी बाराकार येथील आर्यंन अँड स्टील कंपनी साधेंच बिडी गोळ्यांचें (पिग) लोखंड तयार करी. पुढें १९०३ पासून तिने पोलाद तयार करण्यास प्रारंभ केला. या सालीं हिंदुस्थानांत लोखंडाचे (ओतकामाचे) ७८ कारखाने होते. त्यांत हळू हळू वाढ होत गेली. निरनिराळ्या ठिकाणी स्थानिक भेदानें निरनिराळा खर्च येतो. आगगाडीच्या जवळ असलेल्या कारखान्यांत एक टन लोखंड काढण्यास २॥ रू. तर आगगाडीपासून दूर असलेल्या कारखान्यांत ३ ते ४ रू. खर्च येतो. कोळशाच्या नजीकपणामुळें बंगाल्यांत तर २। रू. खर्च पडतो. यंत्राच्या साहाय्यानें लोखंड मोठया प्रमाणावर तयार होऊं लागल्यापासून त्याच्या किंमतींत फार क्रांति घडून आली. १८६८ सालापासून शें. ३५ नें किंमत कमी झालेली आहे व मजुरीचा जमाखर्च ५४ नें कमी झालेला आहे. अमेरिकेंतील सं. संस्थानांत १८१० सालीं सर्व जगाच्या लोखंडाचा शें. .७ भाग लोखंड निघालें तर १९०७ साली शें. ४३ भाग लोखंड निघालें म्हणजे निपज ६ पटीनें वाढली. याच वेळेस ग्रेटब्रिटनमध्यें सर्व जगाच्या शें. २८ भाग लोखंड निघालें व १८१० पासून १९०७ पर्यंत सर्व जगांतील लोखंडाची निपज तिपटीहून जास्त झाली. एकूण १९०७ साली ग्रेटब्रिटन, संयुक्त संस्थानें, जर्मनी व लक्झेंबर्ग हीं राष्ट्रें मिळून जगांतील शें. ८१ भाग लोखंड व शें. ८३ भाग पोलाद यांची त्यांनीं निपज केली.

सर्व जगांतील लोखंडाचा सालीना खर्च १० कोटी टन आहे व खाणींतील निघण्यासारखें लोखंड १००० कोटी टन आहे. यावरून जर जगांतील लोखंडाचा खर्च वाढला तर फार तर जगांतील लोखंड सन १९५० पर्यंत पुरेल असा अंदाज आहे. हल्ली ज्या दगडामध्यें शें. २५ भाग लोखंड आहे असेच दगड गाळले जातात. लोखंडापेक्षा स्फट (अल्यूमिनियम) धातु ही पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली आहे. व यामुळें असाहि एक तर्क आहे की, लोखंड दुर्मिळ झालें म्हणजे स्फट किंवा तिच्या एखाद्या भेसळ धातूचाच उपयोग मोठया प्रमाणावर होऊं लागेल व लोखंडाचा उपयोग जरूर ते पदार्थ म्हणजे हत्यारें, लोहचुंबक व कमानी इत्यादि करण्याकडे होऊं लागेल.

व्यापार.- हिंदुस्थानांत लोखंड, पोलाद व यंत्रसामुग्री यांचा व्यापार कसा वाढत आहे तें पुढील आंकडयांवरून लक्षांत येईल. आयातमाल:- १९०१ सालीं १५११०६४३१ टन व १९०५ सालीं २३०११०५३५ टन. बहुतेक ही आयात इंग्लंड व आयर्लंड यांमधून झालेली आहे. बेल्जममधून पोलादी गज, अमेरिकेंतून लोखंडी नळ व नळ्या या वस्तू इंग्लंडपेक्षां जास्त येतात. हिंदुस्थानांत १९२२ सालांत ६२५२७४ टन लोखंड तयार झालें व १९२३ सालीं ८०४३८४ टन झालें म्हणजे शेंकडा २८.६ टक्के वाढ झाली. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीनें सन १९२४ सालांत ३९२१३५ टन बीड, १५१०९७ टन पोलाद (यांत आगगाडीचे रूळ आहेत) तयार केलें. बंगाल आयर्न कंपनीनें ११९६६९ टन बीड व ४१८४९ टन ओतीव लोखंडी पदार्थ तयार केले आणि इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीनें १९२३ त ७७९८० टन (रूळ, स्लिपर्स, घोड्या वगैरे) लोखंड तयार केलें. हिंदुस्थानांत बहार-ओरिसा, ब्रम्हदेश, मध्यप्रांत, या भागातच लोखंड विशेष निघतें. १९२३ सालीं या प्रातांतून अनुकमें १२६८०६२, २१२९५० व १०८९३३ रू. किंमतीचें अशुद्ध लोखंड खाणींतून निघालें.

संरक्षक जकात.- बंगाल आयर्न अँड स्टील कंपनी ही सांप्रत बाराकर व राणीगंज येथील अशुद्ध लोखंड न वापरतां कोल्हन व सिंगभूम भागांतील वापरते. सिंगभूम भागांत नीतु बुरू व बूदा बुरू नांवाच्या दोन टेंकडयांत हे अशुद्ध लोखंडी दगड पुष्कळ सांपडतात. हल्ली तर या दगडांचें क्षेत्र ओरिसाप्रांतांत ४० मैलापर्यंत पसरलें आहे. या दगडांपासून उत्तम लोखंड तयार करतां येतें. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या लोखंडाच्या खाणीं रायपूर, मयूरभंज भागांत असून तेथील लोखंड सिंगभूमपेक्षां उत्तम निघतें. गूह येथें इंडियन आर्यन अँड स्टील कंपनीचे कारखाने आहेत. तरी पण परदेशच्या मालाबरोबर येथील मालाला टक्कर देववत नाहीं. म्हणून इंडियन टॅरिफ बोर्डनें येथील पोलादाच्या धंद्यास संरक्षण व उत्तेजन देण्यास सरकारास सुचविले व त्याप्रमाणें लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनें एक ठराव आणून (मे. १९२४) सिलेक्ट कमिटीकडें सोपविला व एक महिन्यानें तो पास केला. त्या ठरावानें परदेशांतून आयात होणार्‍या पोलादी मालावरील जकात थोडीशी वाढविली व हिंदुस्थानांतील पोलादास (निरनिराळ्या पदार्थांच्या मानाने) दर टनास २० ते ३२ रू देणगी मिळाली. हा ठराव मार्च १९२७ पर्यंत अमलांत रहणार आहे.

लोखंड व त्यापासून झालेल्या पदार्थांचा औषधी उपयोग:- (१) शुद्ध लोखंड शेरी नांवाच्या दारूंत ३० दिवस भिजत ठेवून त्याचें फेरम् तयार करतात (२) शेंकडा ७५ लोखंड व इतर गंज मिळून फेरम् रेडक्टम तयार होतें. (३) लोहसगंधकित-यापासून लोहमिश्रण तयार होतें (४) ब्लाडच्या (गोळ्या लोहस-गंधकित १५० भाग, सिंधु-कर्बनित ९५ भाग, अकेशिया डिंक ५०, त्रागाकॅंथ १५, ग्लिसरीन १०, सिरप १५० व पाणी २० भाग (५) लोहकर्बनित-हें साखरेंत मिसळून देतात. (६) लोहतालित, प्राणिलांबरोबर मिसळून देतात(७) लोहस्फुरित. (८) लोखंड, अद, पाणी व सिरप हीं मिसळून देतात.

जखम, फोड यांवर लोहलवणें लावलीं असतां रक्तवाहिन्यांचीं तोडें बंद होतात. रक्तस्त्राव थांबतो. याचें उज्जहरिद गुद किंवा नासिका यांतून नेहमीं चालणारा रक्तस्त्राव बंद करितें, व जंतुनाशनाकरितां गुदांत याची पिचकारी मारतात. बहुतेक खाण्याच्या पदार्थांत लोखंड असतें. लोहयुक्त औषधी घेतांना दांत व जीभ काळी पडते; कारण तोडांत औषध गेल्यावर गंधकित बनतें म्हणून लोहयुक्त औषध घेतांना कांचेच्या नळीचा उपयोग करावा. पोटांत गेल्यावर सर्व लोहयुक्त औषधांचें लोटिक-हरिद बनतें. ज्याच्या पोटांत विकृति असेल त्याला लोहाचीं औषधें देऊं नयेत, व हीं औषधें नेहमीं जेवण्यानंतर घ्यावी. लोखंड आंतडयांत गेल्यास मलावरोध होतो. म्हणून हीं औषधें सारक पदार्थांबरोबर द्यावींत.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .