विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लोणार - वर्हाड, बुलढाणा जिल्हा. मेहकरच्या दक्षिणेस १२ मैलांवर हा गांव आहे. वर्हाडांत हा गांव सर्वांत प्राचीन आहे. जुनें नांव विरजक्षेम असें आहे. कृतयुगांत हा गांव वसलेला आहे अशी दंतकथा आहे. स्कन्दपुराणांत लोणासुर नांवाच्या राक्षसाची कथा दिली आहे. विरजमाहात्म्यांत या तीर्थाचें वर्णन आहे. येथील तलावासभोंवतीं पुष्कळ देवळें आहेत व ती बहुतेक मोडकळीस आलेलीं आहेत. गांवाच्या मध्यभागी विष्णूने ज्या ठिकाणीं लवणासुर राक्षसावर जय मिळविला तेथें एक दैत्यसूदनाचें सुंदर देवालय असून तें सर्व वर्हाडांतील प्राचीन हिंदु बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. लोकसंख्या सुमारें ३०००. [ काळे-वर्हाडचा इतिहास; लोणारवर्णन. ]