विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लोधरान - पंजाब, मुलतान जिल्ह्यां तील अगदी दक्षिणेकडील तालुका. क्षेत्रफळ १०५७ चौ. मैल. याच्या दक्षिणेस सतलज नदी वाहत असून पलीकडे भावलपूर संस्थान आहे. लोकसंख्यासुमारें एक लाख. खेडयांची संख्या २६२. तहशिलीचें मुख्य ठिकाण लोधरान हें आहे.