विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लोव्हेन - बेल्जममधील एक शहर. याची लोकसंख्या १९२३ मध्यें ४०६९३ होती. १४ व्या शतकांत लोव्हेन हें लोंकरीच्या व्यापाराचें शहर होतें. १३७९-१३८३ या सालांमध्यें येथील लोकांत आपापसांत लढे उत्पन्न झाले व त्यामुळें या शहरास अवनति प्राप्त झाली. १४२३ मध्यें एक विश्वविद्यालय स्थापण्यांत आले. हें बेल्जममध्ये पहिल्या प्रतीचें विश्वविद्यालय गणलें जातें. येथील ग्रंथसंग्रहालयांत ७०००० पुस्तकें असून ५०० पुराण हस्तलिखित आहेत. येथील प्रेक्षणीय इमारत 'हॉटेल दि व्हिले' ही आहे. शिवाय सेंट पेरीचें चर्चहि चांगलें बांधलें आहे.