विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वंग (बंग) - बंगालप्रांतांत, पद्या नदीच्या दक्षिणेकडे, भागीरथी नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीचा जुना प्रवाह यांच्यामधील प्रदेशाचें प्राचीन नांव. हा पूर्वबंगालचा दक्षिणभाग होय. याच्या उत्तरेस पुंड्रांचें जुनें राज्य होतें. वंग या नांवावरून हल्लीच्या बंगाल प्रांताचें नांव पडलें आहे. भारतीय युद्धांत येथील राजे होते. भागवतांत (९.२३) वंग नांव आलें आहे. बृहत्संहितेंत याच्या जवळच उपवंग देश सांगितला आहे (१४.८). चंद्रगुप्ताच्या मेहरोली शिलालेखंत हा देश आला आहे (गुप्त-इन्स्क्रि. १४१). जास्त माहिती 'बगाल' शब्दाखालीं पहा.