प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वंजारी - यांनां बंजारा, सुकलीर, लवाण, लमाण, लंबाडी व बंजारी अशीं दुसरीं नावें आहेत. यांची एकंदर लोकसंख्या (१९११) १०८४९५५. यांच्यांत हिंदु, शीख, जैन व मुसुलमान (६१ हजार) हेहि आहेत. बहार, ओरिसा, मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मद्रास, पंजाब, संयुक्तप्रांत, हैद्राबादसंस्थान (सर्वांत जास्त वस्ती ४I लक्ष), काश्मीर, म्हैसूर व राजपुताना यांची वस्ती आहे. यांच्या ज्या निरनिराळ्या पोटजाती आहेत त्या:- चारण, गवार, माथूर, लाड, खदाने, लामथे, मेहुरान, भुसारे, असत्कर, रावजिन, इत्यादि . यांचा पूर्वीचा धंदा बैलांचे तांडेबाळगून माला (धान्या) ची ने आण करणें, हा होता. आगगाड्या झाल्यापासून हा धंदा बसल्यानें हल्ली ते जनावरांची अवलाद तयार करणें, मजुरी, सावकारी व शेती करणें हीं कामें करतात. हे त्या त्या प्रांतातील अशुद्ध भाषा बोलतात. मुख्य भाषा नेमाडी व हिंदी. माथूर, लमाण वगैरे कांही पोटजाती मद्यमांस खात नाहींत. बाकीचे खातात. म्हैसूरकडे बायकाहि दारू पितात. कांहीचा पेहराव स्थानिक असतो तर साधारण पोषाख रजपुतांप्रमाणें असतो. माथूर, लमाण व चारण सुवासनी स्त्रिया डोईवर वेणींत एक (अगर दोन) खुंटी उभी ६ इंच लांबीची खोवतात. वरील पोटजातींत अन्नव्यवहार होतो; सोयरिकी होत नाहीत. प्रत्येक जातींत वंशपरंपरागत नाईक असतो व पंचायती असतात. माथूर व लमाणांखेरीज इतरांत विधवाविवाह संमत आहे. उपाध्याय ब्राह्मण, गोसावी, बैरागी किंवा मानभावहि असतात. गोकुळअष्टमीचा सण फार मोठा मानतात. यांच्यांतील आडनांवें: पवार, चव्हाण, राठोड, जाधव, पलटे, कोर्च, लोहाण, वनोदे, अलोदे, बकीया, किलत, वर्तिया, विश्वावत, जाराबोला या आहेत. चारण हे इतरांपेक्षां सुरेख, पैसेवाले, टापटिपीचे, सदृढ असे असतात. यांचे केंस लांब असतात. यांनां गाण्यानाचण्याचा नाद विशेष आहे. सर्व हिंदु देव (विशेषत: श्रीकृष्ण व बालाजी) यांनां पूज्य आहेत. लमाण व माथूर यांच्यांत मुंजी होतात व खंडोबाचा गोंधळ घालतात. लाड वंजार्‍यांत लग्न लागल्यानंतर, रात्रीं नवराबायको दोन शेर डाळ तांदूळ शिजवितात. तीं शिजवितांना तोंडाला पदर घ्यावा लागतो. कारण शिजलेल्या अन्नाचा वास अशुभ मानतात. नंतर तें अन्न सर्वांना प्रसाद म्हणून वाढण्यांत येतें. हें अन्न उरतां कामा नये. उरलें तर तें नदींत टाकतात. किंवा गाईला चारतात. या विधीला वाढीदैवत म्हणतात. गांधर्वपद्धतीचा विधवाविवाह यांनां संमत आहे. वंजारी कांहीं स्थाईक तर कांहीं भटके असतात. माथूर जातीच्या घरी अग्नि नेहमीं असतो तो विझल्यास ते अन्न ग्रहण करीत नाहींत. यांच्यांत बहुधां गवारीया जातीचे पंच असतात. लाडांच्या लग्नांत धोबिणीचा फार मान असतो. देवकस्थापनेच्या वेळी नवरीच्या हातांत शिध्याचें शिप्तर व काकवी घालून तयार केलेला व हळदीनें माखलेला रोट असतो आणि नवर्‍याच्या खांद्यावर कुर्‍हाड व दोर असतो. यांची पांचपालवी, आंबा, जांभूळ, उंबर, सादवन्ती व रूई यांची असते. लवण (मीठ) पासून लमाण व वनचर किंवा वाणिज्यपासून बनज (पंजाबी), बनजारी शब्द बनले असे म्हणतात. पूर्वी लष्करांनां त्यांच्या फिरतीवर धान्याची रसद पूरविण्याचें काम यांच्याचकडे होतें. सन १५०४ मध्यें शिकंदराच्या धोलपूरच्या हल्ल्याच्या वर्णनांत लमाणांचे नांव आढळतें. मुंबईकडील वंजार्‍यांत कुणबी, चांभार, भाट, मांग, महार, अहीर, कोळी, गुजर, अगास, न्हावी, सोनार, या पोटजाती आढळतात. (सेन्सस रि. १९११, मुंबई. पृ. २८२.) कानडीभागांत व मध्यभागांत वंजारी अट्टल चोर म्हणून आख्या असून गुरें चोरून नेणें, दुसर्‍यांच्या बायका फूस लाऊन पळवून नेणें व खोटें नाणें पाडणें याबद्दल त्यांनां पूर्वी शिक्षां झालेल्या आहेत (कित्ता). चारण, मराठे व लमाण्यांत मुली २० ते ३० वर्षंपर्यंत अविवाहित असतात. चारण धनगरांत दिराशीं पुनर्विवाह होतो. मृत माणूस अविवाहित असल्यास जाळीत नाहींत, पुरतात. लमाणांत श्राद्धें करीत नाहींत. कानडी वंजार्‍यांचा मुख्य नाईक विजापूर जिल्ह्यांत कोनूर येथें आहे. त्याची फी १। रूपया असते. तिकडे सरकारी कोर्टात न जातां बहुतेक तंटे पंचायतीमार्फतच तोडतात. अपराध्यानें दंड न दिल्यास तो त्याच्या १५ व्या पिढीपर्यंत वसूल करण्याचा अधिकार पंचांस आहे. पंचमहाल जिल्ह्यांत ५२ नायकांची मोठी पंचायत आहे. तिचा अधिकार अपिलें ऐकण्याचा व नायकांवर खटले चालविण्याचा आहे. वंजार्‍यांची उत्पत्ति चारण व भाट यांच्यापासून झाली असें कंबरलेन म्हणतो. सन १५०४ नंतर यांचा स्पष्ट उल्लेख १६३० मध्यें आढळतो. त्या साली असफरखानाची स्वारी दक्षिणेंत झाली तेव्हां तिच्यांत धान्य पुरविण्यास भंगी, जंगी आणि भगवान नांवाचे तीन नाईक होते. या तिघांजवळ २३२००० बैल होते. यांनां शहाजहानशहानें धान्यपुरवठा करणाबद्दल ताम्रपट दिला होता, तो यांच्या वंशजांजवळ (मोंगलाई, हिंगोलीजवळ मुसागांव येथें आहे.) मध्यप्रांतांतील तुर्कियामुकेरी हे मुसुलमान वंजारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यांत यांचा दारूच्या दुकानांत साखरपुडा होतो; वर वधूच्या घरीं लग्नापूर्वी १ महिना (तोंडावर बुरखा घेऊन) राहतो व तिच्या नातेवाईकांस दारू पाजतो. विधवेनें दिराखेरीज इतरांशी लग्न केल्यास दिरास ७५ रू. दंड देतात. मिठू भूखिया म्हणून पूर्वी होऊन गेलेला एक वंजारी दरोडेखोर इकडील वंजार्‍यांचा देव आहे. दरोडयांतील प्रत्येक वांटणींत त्याचा भाग ठेवतात. वंजार्‍यांचे कुत्रे फार प्रसिद्ध असतात. यांच्या बायका कशिद्याचें काम करतात. पंजाबांत हे बुरूडकामहि करतात. एकंदरींत हे लोक शूर, धाडशी व धूर्त आहेत. गांवाबाहेर बहुधां निराळ्या वस्तीत ते राहतात. गुन्हेगारांच्या यादींत त्यांचें नांव असतें. हल्लीं त्यांनीं त्याविरूद्ध चळवळ चालविली आहे व ते थोडेंफार शिक्षणहि घेऊं लागले आहेत. रा. वामन केशव पाटील पिंपळे वणजारी मु. मासवण, ता. माहीम, जिल्हा ठाणें, हे कळवितात कीं ''जातीचें चातुर्वण्यव्यवस्थेंतील स्थान वैश्यवर्गाचें आहे असें श्री शंकराचार्य द्वारकापीठ यांनी तोंडीं सांगितलें, परंतु याविषयीं जातीचा समज आपण क्षत्रियवर्ग आहों असा आहे. ठाणें जिल्ह्यां त वंजारी लोकांत शिक्षणाचा प्रसार वाढत असून वकिली व सरकारी नोकरींतहि त्यांचा थोडासा प्रवेश झाला आहे. यांच्यांत कमल व कश्यप हीं गोत्रें आहेत.'' [ वंजारा मोनोग्राफ; सेन्सस रि. (१९११) मुंबई २८२; म्हैसूर १९११; नाशिक, ठाणें व खानदेश ग्याझेटीयर्स ]-

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .