विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वटेविन - उत्तर ब्रह्मदेश, मंडाले जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ १७५ चौरस मैल असून खेडयांची संख्या ३७ आहे. १९०१ सालीं लोकसंख्या ३३५४ होती. तालुक्याचें मुख्य शहर वटेविन असून तें मंडाल्यापासून ५५ मैल आहे. तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ असून पृष्ठभाग सर्व जंगलमय आहे.