विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनवासी उर्फ बनवासी - उत्तर कानडा जिल्ह्याच्या पूर्वसरहद्दीवर, शिर्सीच्या आग्नेयीला ३० मैलांवरील वरदाकांठचें प्राचीन शहर. त्या वेळी याला वैजयंती म्हणत. मुंख्य वस्ती हविग्, गुड्गार, लिंगायत, व आरे मराठा यांची. येथील मधुकेश्वराचें मंदिर जखनाचार्यानें बांधलें असें म्हणतात. ख्रि . पूर्व सुमारें २४० व्या वर्षी ह्या शहराचा उल्लेख आलेला आहे. त्यावेळीं अशोकानें येथें आपले बुद्ध भिक्षू पाठविले होते. टॉलेमी, रशीदुद्दीन व अल्बेरूणी ह्मांनींहि ह्याचा उल्लेख केला आहे. येथें १३ व्या शतकापर्यंत कदंब राजांची राजधानी होती. पुढें विजयानगरच्या राज्याच्या याच नांवाच्या प्रांताचें हें ठाणें होतें. हल्लीं ह्या शहराची लो. संख्या सुमारें २००० आहे. बृद्दत्संहितेंत (१४.१२) याचें नांव आहे. [इंपे. गॅझे; वनवासीमाहात्म्य]