प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र -  वनस्पतिशास्त्राचे मुख्य तीन भाग आहेत. ते वर्गीकरण जीवक्रियाविज्ञान आणि शरीरविज्ञान हे होत. यांपैकी शरीरविज्ञानाचे पुन्हां बाह्य शरीरविज्ञान आणि अंत:शरीरविज्ञान असे दोन उपभाग आहेत. तात्त्विकदृष्टया जरी अशी स्थिति असली तरी वनस्पतींचें वर्गीकरण बव्हंशीं बाह्य शरीरविज्ञानावर अवलंबून असल्याकारणानें वनस्पतिशास्त्राचे व्यवहारदृष्टया बाह्य शरीरविज्ञान आणि वर्गीकरण मिळून पहिला, जीवक्रियाविज्ञान हा दुसरा आणि अंत:शरीरविज्ञान हा तिसरा असे भाग पडतात. वनस्पतींविषयीं संपूर्ण ज्ञान होण्यास या तिन्ही भागांची जरी आवश्यकता आहे तरी असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं कीं, या तीन भागांचा अभ्यास एकमेकावर अवलंबून नसून ते एकमेकांपासून इतके भिन्न आहेत कीं, ज्या प्रकारच्या बुद्धिसामर्थ्यानें एखाद्याला त्यांपैकीं एखाद्या भागाचा शोधपूर्वक अभ्यास करतां येईल तेंच बुद्धिसामर्थ्य अन्य भागाचा शोधपूर्वक अभ्यास करण्याच्या कामी उपयोगी न पडतां त्या कामीं निराळ्या प्रकारच्या बुद्धिसामर्थ्याची आवश्यकता भासेल. या विधानाची सत्यता या तिन्ही भागांचा विकास परस्परांपासून भिन्न झाला आहे यावरून दिसून येणारी आहे या तीन भागांची परस्परापासून भिन्न वाढ ही जी गोष्ट वनस्पतिशास्त्राच्या इतिहासांत घडली आहे तिला अनुसरूनच पुढें या तीन भागांचा इतिहास वेगवेगळा दिला आहे.

बाह्य शरीरविज्ञान व वर्गीकरण.

इतिहास, जर्मनींतील आणि नेदर्लंडांतील ब्रुन्फेलपासून कॅस्पर बौहिनपंर्यतचे वनस्पतिशास्त्रज्ञ (१५३०-१६३०). - आरिस्टाटलनें वनस्पतीविषयीं पुष्कळ लिहिलें आहे व आरिस्टाटलचा शिष्य थिओफ्रास्टस यानें तर वनस्पतींवर एक मोठा ग्रंथ लिहिला आहे. यावरून असें दिसून येतें कीं, फार प्राचीन कालापासून वनस्पतींच्या अभ्यासाकडें मनुष्याचें लक्ष गेलें आहे; असे असण्याचें कारण मनुष्याला असणारें वनस्पतींच्या गुणधर्माविषयींचें आकलन हें होय. आरिस्टाटलच्या काळापूर्वी वनस्पतीचा अभ्यास लोक करीत होते त्याचेंहि कारण वनस्पतींच्या औषधी गुणधर्माचें आकलन हेंच होतें.

आधुनिक वनस्पतिशास्त्राशीं परिचय असणार्‍यांनीं जर्मनींतील व नेदर्लंडांतील ओटो ब्रुन्फेल, लिओन्हार्ड, फुश, हीरोनिमस इत्यादिकांचे सोळाव्या शतकांतील व कॅस्पर बौद्दिन याचा सतराव्या शतकाच्या आरंभीचा असे वनस्पतीवरील ग्रंथ जर पाहिले तर त्यांनां हे ग्रंथ फार चमत्कारिक वाटतील, इतकेंच नव्हे तर त्यांनां या ग्रंथांत उपयुक्त असें फारच थोडें सांपडेल व असें दिसून येईल कीं, या ग्रंथकारांचे विचार अत्यंत कोते होते. परंतु याप्रमाणें या ग्रंथांची आधुनिक ग्रंथांशी तुलना न करतां, आरिस्टाटलचें वनस्पतींसंबंधीं ज्ञान व विचार काय होते, आरिस्टाटलचा शिष्य थिओफ्रास्टस याचा वनस्पतीवरील मोठा ग्रंथ कसा आहे, प्लीनीचें 'निसर्गाचा वृतांत' नांवाचें पुस्तक कसें आहे, डायोस्कोराईड्सला वैद्यकीय वनस्पतींची कितपत व कशा प्रकारची माहिती होती; त्याचप्रमाणें मध्ययुगांतील वनस्पतींविषयींचें वाङ्मय कशा प्रकारचे होतें; अल्बर्ट म्याग्नसच्या ग्रंथांतून वनस्पतींविषयीं काय आढळतें व इसवी सन १५०० पूर्वी व त्यानंतरहि लोकांचा आवडता असलेला 'आरोग्योद्यान' नांवाचा ग्रंथ कसा आहे. इ. विषयीं चौकशी करून, आरिस्टाटलच्या काळापासून तों तहत सोळाव्या शतकांतील ग्रंथ तयार होईपर्यंत वनस्पतिशास्त्र कोणत्या अवस्थेंत होतें हें लक्षांत घेतलें असतां सोळाव्या शतकांतील ग्रंथ आधुनिक वाटतील; इतकेंच नव्हे तर असेंहि दिसून येईल कीं, या ग्रंथांच्या प्रकाशनाबरोबरच वनस्पतिशास्त्राच्या नवयुगास आरंभ झाला. याप्रमाणें या ग्रंथांनींच वनस्पतिशास्त्राचा पाया घातला असें म्हणण्याचें कारण हें कीं, जरी या पुस्तकांत सर्व ठिकाणीं आढळणार्‍या रानटी किंवा लागवडींत असलेल्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या वर्णनाशिवाय दुसरें कांहीहि नाहीं, तरी हीं वर्णनें वनस्पती पाहून इतकेंच नव्हे तर ती डोळ्यापुढें ठेवून केलेलीं आहेत. त्याचप्रमाणें वर्णनांबरोबर वनस्पतींचीं चित्रेंहि दिलेली असून हीं चित्रें स्वाभाविक व उठावदार आहेत. यामुळें केवळ चित्रांवरून वनस्पती ओळखितां येतात. परंतु या सोळाव्या शतकांतील ग्रंथापूर्वीचे जे वनस्पतींवरील ग्रंथ आहेत त्यांत सहसा चित्रें नाहींत; परंतु ज्या ठिकाणीं तीं आहेत त्या ठिकाणी तीं वनस्पती दृष्टीसमोर ठेवून काढलेलीं नसल्यामुळें केवळ भ्रामक आणि काल्पनिक आहेत.

सोळाव्या शतकांतील वनस्पतीशास्त्रज्ञांच्या डोळ्यापुढें वनस्पती ठेवून त्यांची वर्णनें लिहिण्याच्या उपक्रमाचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला कीं, त्यामुळें वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरणाचा न कळत कां होईना. पाया घातला गेला. वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरणास आरंभ होण्याच्या कामीं जी आडकाठी होती तीं वनस्पतींच्या देहाकडे वनस्पतिशास्त्रज्ञांचें जितकें लक्ष जावयास पाहिजे होतें तितकें जात नसे आणि त्यांच्याकडून अनेक वनस्पतींचें निरीक्षण केलें जात नसे ही होती. जेव्हां सोळाव्या शतकांतील वनस्पतिशास्त्रज्ञांनीं प्राचीन ग्रंथांत सांगितलेल्या वनस्पती प्रत्यक्ष ओळखण्याच्या खटपटीस आरंभ केला व नवीन वनस्पती प्रत्यक्ष पाहून त्यांचींहि वर्णनें लिहिण्यास सुरवात केली तेव्हां ही आडकाठी आपोआप दूर झाली. मनुष्य स्वभावत:च वर्गीकरणशील आहे, यामुळें वर सांगितलेल्या कारणामुळें जेव्हां सोळाव्या शतकांतील वनस्पतिशास्त्रज्ञांकडून हजारों वनस्पतींचें निरीक्षण होऊं लागलें तेव्हां सहजच त्यांच्याकडून एकमेकांशी साम्य असणार्‍या वनस्पती एकत्र वर्णिल्या जाऊन नैसर्गिक वर्गीकरणाचा पाया घातला गेला.

सोळाव्या शतकांतील वनस्पतिशास्त्रज्ञांनी आपल्या वनस्पतींच्या परीक्षणापासून वनस्पतिशास्त्रांस सर्वत्र लागू पडणारीं अशीं तात्त्विक अनुमानें जरी मुळीच काढली नाहींत, तरीं ज्यामानानें अधिक व नवीन वनस्पती एखाद्या ग्रंथांत वर्णिलेल्या असतील त्यामानानें त्या ग्रंथाची अधिक योग्यता ठरूं लागल्यामुळे प्रत्येक वनस्पतिशास्त्रज्ञ आपल्याकडून शक्य तेवढी अधिक वनस्पतींची वर्णनें मिळविण्याच्या कामीं श्रम करु लागला. याचा परिणाम त्या वेळच्या वनस्पतिशास्त्रज्ञांची वनस्पतींतील नैसर्गिक साम्य ओळखण्याची बुद्धि अधिक तरतरीत होऊन त्या वेळच्या मानानें वनस्पतींचें वर्गीकरण बरेंच चांगलें होण्यांत झाला. इतकेंच नव्हे तर एकंदीरींत वनस्पतिशास्त्राविषयीं एक प्रकारची आस्था उत्पन्न होऊन ज्ञात वनस्पतींची संख्या भराभर वाढूं लागली. उदाहरणार्थ फुशच्या १५४२ मधील वनस्पतीवरील ग्रंथांत केवळ पांचषें वनस्पतींचीं वर्णनें आढळून येतात तर कॅस्पर बौनच्या १६२३ मधील ग्रंथांत वर्णिलेल्या वनस्पतींची संख्या ६००० आहे.

सोळाव्या शतकांतील वनस्पतिशास्त्रज्ञ जर्मनींतील व नेदर्लंडांतील निरनिराळ्या भागांत रहात असल्यामुळें बहुतेक सर्व जर्मनीची व नेदर्लंडची त्यांच्याकडून वनस्पतिविषयक पहाणी झाली. पण याशिवाय त्यांत प्रवास करणार्‍या इतर लोकांकडून अन्य प्रदेशांच्या पहाणीची भर पडली. विशेषत: यासंबंधंत डी लेक्लसनें हंगेरी व स्पेन या देशांत प्रवास करून तेथील वनस्पती गोळा करून त्यांची वर्णनें लिहिलीं. याच सुमारास इटलींतील ज्ञात वनस्पतींची संख्या काहींशीं प्रवास करणार्‍या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांच्या परिश्रमानें व कांहीं अंशी इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञांच्या परिश्रमानें वाढली. थूरिंजरवाल्डचा पहिला वनस्पतिकोश थालनें लिहिला होता, तो त्याच्या मृत्यूनंतर (१५८८) प्रसिद्ध झाला. या वेळीं वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासास साहाय्यकारक अशीं उद्यानेंहि स्थापन झालेलीं होतीं; तीं जरी हल्लींच्या त्या कामासाठीं असलेल्या उद्यानाइतकीं परिपूर्ण नव्हतीं तरी त्या वेळच्या मानानें चांगलीं होतीं. असें पहिलें उद्यान इटलींतील पादुआ शहरीं १५४५ सालीं तयार झालें.

वनस्पती वाळवून त्यांचा संग्रह करण्यासहि प्रथम इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञांनी सोळाव्या शतकांत सुरवात करून इतर देशांतील वनस्पतिशास्त्रज्ञांपेक्षां त्या कलेंत आघाडी मारली. एर्नस्ट मेयरच्या समजुतीप्रमाणें लुका धिनी नांवाच्या इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञानें प्रथम शुष्क वनस्पती शास्त्रीय कारणासाठीं उपयोगांत आणिल्या; त्यानंतर त्याचे शिष्य आल्ड्रोवांडी आणि सेजाल्पिनो यांनी हल्ली असतात तसे शुष्क वनस्पतिसंग्रह तयार केले.

वरील सर्व गोष्टींवरून सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धांत वनस्पतिशास्त्राविषयीं किती आस्था उत्पन्न झाली होती हें दिसून येतें. ही गोष्ट त्यावेळीं वनस्पतींवर अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले, या ग्रंथांत पुष्कळ खर्च करून वनस्पतींचीं चित्रें दिलीं आहेत व अशा ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या या गोष्टींवरूनहि दिसून येतें. परंतु वनस्पतींच्या वर्णनाला जोडून दिलेलीं चित्रें मात्र ज्या मानानें अधिक वनस्पतींचीं वर्णनें तयार होऊं लागलीं त्यामानानें कमी प्रतीचीं होऊं लागलीं. याचें उदाहरण फुशनंतर त्याच्या ग्रंथांतील चित्राइतकीं सुंदर आणि हुबेहुब चित्रें कोणत्याहि ग्रंथांत आलीं नाहींत हें होय. याप्रमाणें चित्रांच्या बाबतींत जरी वनस्पतिशास्त्राची पिछेहाट झाली तरी उत्तरोत्तर वनस्पतींच्या वर्णनशैलीमध्यें सुधारणा होत गेली. वनस्पतींचें अधिक पूर्ण रीतीनें वर्णनशैलीमध्यें सुधारणा होत गेली. वनस्पतींचें अधिक पूर्ण रीतीनें वर्णन केलें जाऊन त्या वर्णनामध्यें एक प्रकारच्या विशिष्ट पद्धतीचा प्रवेश झाला. चिकित्सक बुद्धीचा उपयोग करून वनस्पती ओळखितां येतील अशा तर्‍हेनें त्यांचें वर्णन करण्यांत येऊं लागलें. डी लेक्लसच्या वनस्पतींच्या वर्णनास या दृष्टीनें सशास्त्र वर्णन असें म्हणण्यास हरकत नाहीं. कँस्पर बौहिनच्या ग्रंथांतील वनस्पतींचीं वर्णनें तर थोडक्यांत असून अत्यंत पद्धतशीर आहेत.

फुशपासून बॉकपर्यंतच्या व बॉकपासून बौहिनपर्यंतच्या वनस्पतिशास्त्रज्ञांच्या वनस्पतींच्या वर्णनासंबंधांत एक विशेष गोष्ट दिसून येते ती ही कीं, त्यांनी फूल आणि फळ यांकडे मुळींच लक्ष पुरविलेलें नाहीं. बॉक आदिकरून वनस्पतिशास्त्रज्ञांनीं वनस्पतीचें शब्दचित्र देऊन त्या कशा दिसतात हें ठसविण्याचा प्रयत्न शाखापद्धति, पानांची आकृति, मुळाची रचना, आणि फुलांचा आकार व रंग इत्यादि गोष्टीचीं वर्णनें देऊन केला आहे. परंतु वनस्पतींच्या वर्णनांत फूल व फळ यांच्या सविस्तर वर्णनाचा समावेश झूरिचचा प्रोफेसर कॉनराड गेस्नर या एकटयानेंच केलेला दिसून येतो; आणि कॉनराडच्या लिहिण्यावरून असें दिसून येतें कीं, वनस्पतींच्या या भागांचा वनस्पतींचें एकमेकांशी असलेले नातें ओळखिण्याच्या कामीं कसा उपयोग करून घ्यावा याची त्याला कांहींशी कल्पना आलेली होती. परंतु त्याच्या हातून यासंबंधांत विशेष कांहीं होण्याच्या पूर्वीच तो मरण पावला. वरील गोष्टीवरून हें ध्यानांत येईल कीं, वनस्पतींच्या शरीरांचे भाग तुलनात्मक पद्धतीनें लक्षांत घेऊन त्यांजवर उभारणी केलेल्या बाह्यशरीरविज्ञानाचा या ग्रंथकारांच्या ग्रंथांत नुसता आरंभ सुद्धां झालेला दिसून येत नाहीं. तथापि त्यांच्यापैकीं जे अधिक विद्वान होते त्यांनां वनस्पतींचें वर्णन करतांना उपयोगांत आणिलेल्या शब्दांनां ठराविक (पारिभाषिक) अर्थ असावा असें वाटे. आतां या दृष्टीनें त्यांचा प्रयत्न जरी अति अल्प होता तरी या ठिकाणीं त्यांचा थोडा तरी उल्लेख करणें अवश्य आहे. कारण असें केल्याशिवाय त्यासंबंधांत सोळाव्या शतकानंतर किती प्रगति झाली याची कशी कल्पना येणार? वनस्पतिशास्त्राच्या परिभाषेच्या स्थापनेचा प्रयत्न प्रथम १५४२ सालीं ल्यून्हार्ड फुशच्या हिस्टोरिया स्टर्पियन नांवाच्या ग्रंथांत दिसून येतो. या ग्रंथांची पहिली चार पानें या कामीं लाविलेलीं आहेत. त्यांत वर्णानुकमें पुष्कळ पारिभाषिक शब्द देऊन त्यांचे अर्थ दिलेले आहेत. याच प्रकारें म्हणजे वर्णनानुक्रमें या ग्रंथकारानें आपल्या ग्रंथांत वनस्पतींचीं वर्णनें दिलीं आहेत. वनस्पतींच्या शरीरांच्या निरनिराळ्या भागांची तुलना होऊन शरीरविज्ञानाच्या संबंधांत सोळाव्या शतकांत परिभाषा प्रस्थापित झाली नव्हती; यावरून हेंच सिद्ध होतें कीं, सोळाव्या शतकांतील वनस्पतिशास्त्रज्ञांनां वनस्पतीच्या नैसर्गिक साम्याची किंवा नात्याची जी कांहीं जाणीव झाली होती ती तुलनात्मक पघ्दतीनें वनस्पतीचा अभ्यास केल्यानें नसून वनस्पतींच्या निरीक्षणानें वनस्पतिकोटींत त्यांनां तें नातें प्रत्यक्ष दिसलें.

आता वर्गीकरणाच्या संबंधांत जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांकडून काय झालें याविषयीं पाहिलें असतां असें दिसून येतें कीं, त्यांनी प्राचीन काळच्या पद्धतीप्रमाणेंच वनस्पतींचे झाडें, झुडपें, लहान झुडपें व वनस्पती असे विभाग पाडिले. हे प्राचीन काळचे विभाग सेजाल्पिनोपासून अठराव्या शतकाच्या आरंभापर्यंतच्या वर्गीकरणव्यवसायी वनस्पतिशास्त्रज्ञानीं क्वचित ठिकाणीं त्यांत बदल करून राखिलेले दिसतात. याशिवाय झाडें या पूर्णदशेप्रत पोहोंचलेल्या अतएव सर्वांत उच्च वनस्पती आहेत असेंहि मानिलें जात असे. म्हणून या पुढें जें कांहीं लिहिलें आहे त्यांत वनस्पतींच्या नात्याचा उल्लेख प्रत्येक विभागापुरताच आहे असें समजावें.

डच आणि जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांकडून जीं कांहीं वनस्पतींची वर्गीकरणें झालीं, ती त्यांनीं वनस्पतींच्या वर्णनाचें काम अंगिकारिल्यामुळें झालीं. इतकेंच नव्हे तर कांहीं अशी वनस्पतींचें वर्णन म्हणजेच वर्गीकरण असा प्रकार घडून आला. कारण वनस्पतिकोटीच्या जातींतील कांहीं कांहीं उपजातींत विलक्षण साम्य असतें; तें इतकें कीं, अशा दोन उपजाती एकमेकींपासून भिन्न ओळखणें बरेंच कठिण असतें. अशा विलक्षण साम्य असणार्‍या दोन उपजाती एकमेकांपासून भिन्न काढण्याकरितां त्या दोघींच्या स्वरूपामध्यें भेद काय आहे हें ठरवावें लागतें. सोळाव्या शतकांतील वनस्पतिशास्त्रज्ञांनी जेव्हा वनस्पतींचीं वेगवगळीं वर्णनें करण्याचें काम सुरु केलें तेव्हां वर सांगितल्या प्रकारचा प्रसंग त्यांच्यावर येऊन साहजिकच त्यांच्या हातून कांहीं जातींतींल पुष्कळ साम्य असणार्‍या उपजाती एकमेकींपासून भिन्न काढण्यांत आल्या. किंवा हेंच दुसर्‍या शब्दांत सांगावयाचें म्हणजे त्यांच्या हातून वर्गीकरणांत जाती स्थापण्यापर्यंत कार्य घडून आलें. अत्यंत साम्याच्या वनस्पती भिन्न भिन्न काढण्याच्या योगानें व एकंदरीत हजारों वनस्पती बारकाईनें तपासण्याच्या अभ्यासामुळें त्या वनस्पतिशास्त्रज्ञांची वनस्पतींतील साम्य व भेद ओळखण्याची बुद्धि अधिक तरतरीत होऊन त्यांच्या कडून जातीवरीलहि कांहि विभाग स्थापिले गेले. परंतु यामुळें अत्यंत भिन्न भिन्न वनस्पती सहजच वेगवेगळ्या राखिल्या गेल्या असें मात्र नाहीं; यावरून असें दिसून येईल कीं वर्णनपर वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासास सुरवात, उपजाती एकमेकापासून भिन्न ओळखून वेगवेगळ्या काढण्याच्या उपक्रमापासूनच झाली नसून वनस्पतिशास्त्रज्ञांकडून या उपक्रमाबरोबरच जातीवरील कुल व वर्ग हे उपभाग वेगळे काढले गेले. वनस्पतींचें निरीक्षण करणार्‍याच्या मनांत प्रथम केवळ उपजातीच भरते, म्हणून जातींची स्थापना, उपजातींच्या वर्णनाचे बरेचसें काम झाल्यावर तुलनात्मक पद्धतीनें कांही उपजाती वनस्पतिशास्त्रज्ञांकडून एकत्र आणिल्यानें झाली ही गोष्ट खोटी असून उपजातीच्या सनातनत्वाचें तत्त्व खोटें ठरूं नये म्हणून नंतरच्या काळांत ती शोधून काढिली गेली. यासंबंधी खरा प्रकार असा आहे कीं, सोळाव्या शतकांत वनस्पतींच्या वर्णनांत जरी जाती आणि उपजाती या प्रचारांत आल्या होत्या तरी जाती म्हणजे काय व उपजाती म्हणजे काय यासंबंधाची कल्पना कोणालाहि नव्हती, जाती आणि उपजाती यांचें ध्येय भिन्न म्हणजे वनस्पतींचे कमीअधिक नातें दाखविण्याचें नसून तें एकच म्हणजे भिन्न वनस्पतींचें भिन्न वर्णन देणें एवढेंच होतें. म्हणून वनस्पतिशास्त्रांत एकानें प्रथम उपजाति स्थापिली, त्यानंतर दुसर्‍यानें जाति स्थापिली आणि मग तिसर्‍यानें जातीवरील विभाग स्थापिले असे म्हणण्यांत अर्थ नाहीं; तर अशा गोष्टी अक्रमवार व अहेतुक घडून आल्या हेंच खरें.

येथपर्यंत सोळाव्या शतकांत वनस्पतीचें वर्गीकरण कोणत्या दशेत होतें. याविषयींचें सामान्य विवेचन केलें आहे. परंतु त्याविषयीं अधिक कल्पना येण्यास त्यावेळच्या एखादा दुसर्‍या ग्रंथाचें संक्षिप्त परीक्षण करणें अवश्य आहे. हें परीक्षण कॅस्पर बौहिनच्या ग्रंथांचें करणें बरें. कारण त्याचे ग्रंथ त्यावेळच्या सर्व ग्रंथांहून श्रेष्ठ आहेत. बौहिनच्या 'प्रोड्रोमस थिएट्री बॉटॅनिका या ग्रंथामध्यें मुळांचा आकार, बुंध्याचा आकार व उंची, पानांची आकृति आणि फूल व फळ याप्रमाणें क्रमवार प्रत्येक वनस्पतीविषयीं थोडक्यांत माहिती दिलेली आहे. वर्गीकरणासंबंधीं जरी झाडें, झुडपें आणि वनस्पती असे मोठे विभाग पाडिले आहेत तरी त्या खालचें वर्गीकरण केवळ नैसर्गिक साम्य किंवा नातें लक्षांत घेऊन करण्याचा प्रयत्न केला आहे. जाती आणि उपजाती यांमधील भेद पूर्ण मानिला असून प्रत्येक वनस्पतीला दोन दोन नांवें आहेत; एक जातिवाचक आणि दुसरें उपजातिवाचक. ही द्विनामपद्धति सुप्रसिद्ध लिनियसनें शोधून काढिली असा जिकडे तिकडे बोलबाला आहे. परंतु बौहिनच्या ग्रंथांत हीच पद्धति रूढ दिसून येते. तथापि बौहिनच्या ग्रंथांत जातिलक्षणें दिलेलीं नसून नांवावरून त्यांचा बोध व्हावा अशा तर्‍हेचीं जातिवाचक नांवे दिलेलीं आहेत. हा प्रकार टूर्नफोर्टनें त्या विरूद्ध मोहीम करीपर्यंत सतराव्या शतकाअखेर चालू होता. बौहिनचा दुसरा ग्रंथ 'पिनाक्स' यांत वनस्पतींच्या निरनिराळ्या नांवांचा इतिहास शोधपूर्वक दिलेला आहे. या ग्रंथाचा उपयोग हल्लींच्या काळांतहि होतो असें म्हणणें म्हणजे त्या ग्रंथाची स्तुतिच होय.

कृत्रिम वर्गीकरणपद्धति आणि इंद्रियपरिभाषा (सेजाल्पिनोपासून लिनियसपर्यंत १५८३-१७६०):- मागें वर्णिल्या प्रमाणें आधुनिक वनस्पतिशास्त्राचा जर्मनींत व नेदंर्लडांत पाया घातला गेल्यानंतर बौहिनकडून त्यासंबंधांत बरेंच कार्य होण्याच्या अगोदर इटलंतील सेजाल्पिनोकडून सतराच्या व अठराव्या शतकांतील वर्णपर वनस्पतिशास्त्राच्या प्रगतीचा पाया घातला गेला होता. जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांत सतराव्या शतकांत शारीरविज्ञान आणि वर्गीकरण यासंबंधांत जें कांहीं कार्य झालें तें सेजाल्पिनोच्या मूल तत्त्वांनां अनुसरून झालें; मग हीं तत्त्वें वनस्पतिशास्त्रज्ञांनां मान्य असोत किंवा नसोत. सेजाल्पिनोचें हें वजन उत्तरोत्तर कमी होत गेल्यासारखें दिसतें, याचें कारण तें खरोखर कमी होत गेलें हें नसून त्याचेच विचार इतरांच्या लेखातून निराळ्या रूपांत बाहेर आले हें होय. उदाहरणार्थ लिनियसच्या विचारावर सेजाल्पिनोच्या तत्त्वांची इतकी छाया पडलेली दिसून येते की, लिनियसच्या फंडामेंटा किंवा फिलॉसॉफिया बॉटॅनिका या ग्रंथांतील अनेक वाक्यें सेजाल्पिनोच्या लेखनाची आठवण करून देतात. वनस्पतिशास्त्राच्या एकप्रकारच्या अभ्यासाला ज्याप्रमाणें बॉक आणि फुश पासून आरंभ होऊन त्याची परिणति बौहिनच्या परिश्रमांत झाली त्याचप्रमाणें दुसर्‍या प्रकारच्या अभ्यासाचा सेजाल्पिनोने पाया घातला व लिनियसनें त्याजवर इमारत बांधिली असें म्हणण्यास हरकत नाहीं. सेजाल्पिनो आणि जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ यांजमध्यें हें अंतर दिसून येतें कीं, जर्मन साधे परंतु कृति करून दाखविणारे होते तर सेजाल्पिनो हा तत्त्व ज्ञानी आणि विचार करणारा होता. यामुळें जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांनीं केवळ शोध करून माहिती मिळविली. परंतु सेजाल्पिनोनेंहि जरी शोध करून माहिती मिळविली, तरी मुख्यत्त्वेंकरुन त्यानें माहिती झालेल्या गोष्टीवर शास्त्रीय पद्धतीनें विचार करून सिद्धांत काढिले. विशेषत: त्यानें विशिष्ट गोष्टींवर विचार करून त्यांच्यापासून सामान्य म्हणजे सर्वत्र लागू पडतील असे सिद्धांत काढिले. परंतु त्याची विचारसरणी आरिस्टाटलसारखी असल्यानें त्याचें सिद्धांत चुकीचे ठरले. तथापि त्यानें फुलांतील वगैरे बारीक अतएव श्रमद्दश्य भागासंबंधी शोध करून इंद्रियपरिभाषेचा पाया घातला व वनस्पतिशास्त्रांत विशिष्टावरून सामान्य सिद्धांत काढण्याच्या शोधपद्धतीचा शिरकाव करून दिला या गोष्टी कांहीं लहानसान नाहींत. परंतु सेजाल्पिनोचे विचार समकालीन (व कांहीं अनुकालीनहि) शास्त्रज्ञांहून फारच अधिक प्रगल्भ असल्यामुळें त्यांतील मर्म इतरांस कळलें नाहीं. म्हणून सेजाल्पिनोच्या पद्धतिने वनस्पतीशास्त्राचा अभ्यास सेजाल्पिनोनंतर बराच काळपर्यंत न होतां जुन्या पद्धतीप्रमाणें वनस्पतिशास्त्राच्या केवळ माहितींतच भर टाकण्याचें काम बर्‍याच जोराने चालू राहिलें. या उद्देशानें इ. स. १६०० नंतर जगाच्या निरनिराळ्या भागांत प्रवास केला गेला; वनस्पतिशास्त्र साहाय्यकारी उद्यानांत अधिक भर पडली गेली आणि अनेक स्थानिक वनस्पतिकोशहि तयार झाले. याप्रमाणें प्रवास, याद्या, स्थानिककोश आणि उद्यानें इत्यादीच्या योगानें जरी वनस्पतिशास्त्रांत थोडी फार भर पडली तरी वनस्पतिशास्त्रांत खरी प्रगति होण्यास अशा प्रकारची माहिती एकत्र डोळ्यापुढें ठेवून तीपासून शास्त्रीय सामान्य सिद्धांत काढणें अवश्य होतें. परंतु अशा प्रकारचें काम सतराव्या शतकाच्या उत्तरार्धांत मॉरिसन, रे, बॅशमन (रिव्हिसन), टूर्नेफोर्ट इत्यादींकडून झालें. म्हणजे सेजाल्पिनोचा कित्ता सेजाल्पिनोनंतर १०० वर्षांनी गिरविला गेला. म्हणून त्याच्या पश्चात हे प्रयत्न होईपर्यंत वनस्पतिशास्त्र निकृष्टावस्थेंत होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण त्यावेळीं वनस्पतिशास्त्रज्ञ जें कांही करीत असत तें बौहिनकडून होऊन गेलें असून त्यांत नवीनपणा नव्हता. वरील गोष्टीला अपवाद म्हणजे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धांत होऊन गेलेला जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ जंग हा होय. याची वनस्पतींचा अभ्यास करण्याची पद्धति सेजाल्पिनोसारखी होती. यानें शारीररचनाविज्ञानाची कांही परिभाषा बसवून वनस्पतिशास्त्रांत चांगली भर टाकिली. समकालीन लोकांकडून जंग यास मान्यता मिळाली नाहीं तरी रेनें त्याच्या शोधाला आपल्या १६९३ तील वनस्पतीवरील मोठया ग्रंथांत स्थल दिल्यामुळें सामान्य जनसमूहाला त्याची माहिती झाली.

सोळाव्या शतकांतील बौहिन इ. वनस्पतिशास्त्रज्ञांकडून जें वनस्पतींचें थोडेसें नैसर्गिक वर्गीकरण झालें तें त्यांच्याकडून वनस्पतिकोटींतील 'नातें' मान्य होऊन झालें नाहीं, तर नैसर्गिक साम्य त्यांच्या डोळ्यांनां दिसून आणि मनाला केवळ अस्पष्ट पटून तसा प्रकार घडून आला. परंतु सेजाल्पिनोचा असा विश्वास होता कीं, अशा प्रकारचें नैसर्गिक साम्य वनस्पतींतील कांही लक्षणांवरून ओळखतां येतें. या दृष्टीनें विचार केला असतां सेजाल्पिनो जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांच्या पुढें होता. परंतु आधीं लक्षणें ठरवावयाचीं व त्यांवरून साम्य ठरवावयाचें हा प्रकार असा आहे कीं, तो चालू राहिल्यामुळें वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतींचा वनस्पतिशास्त्रांत शिरकाव होणें अपरिहार्य होतें; आणि तशी गोष्ट घडून येऊन लिनियसच्या वर्गीकरणाचा अखेरपर्यंत बरोबर मार्ग न सांपडल्यामुळें त्या वर्गीकरणांत घोटाळा माजून राहिला. तथापि वेळोवेळीं जे कृत्रिम वर्गीकरणाचे प्रयत्न झाले त्यांत ते करणार्‍यांच्या दृष्टीसमोर नैसर्गिक साम्य येतच असे. याचमुळें लिनियसनें जरी इतिहासप्रसिद्ध अशी एक कृत्रिम वर्गीकरणाची परिपूर्ण पद्धति मोठे परिश्रम घेऊन स्थापिली तरी त्यानें नैसर्गिक पद्धतीनेंहि कांहीं वर्गीकरण केलेंच. असाच प्रकार बरनार्ड डी ज्यूशू याच्या संबंधांतहि घडून आला.

वर्णनपर वनस्पतिशास्त्राच्या वाढीच्या, सेजाल्पिनोपासून सुरू होऊन लिनियस अखेर शेवट होणार्‍या काळाचा विशेष हा आहे कीं, यांत वनस्पतिशास्त्रज्ञांनीं नैसर्गिक साम्याचें समर्थनें कृत्रिम वर्गीकरणपद्धतीनीं केलें. या गोष्टींतींल परस्परविरोधीपणा लिनियसच्या चांगला लक्ष्यांत आला होता. म्हणून ज्या अर्थी जाणून बुजून वनस्पतींचें कृत्रिम वर्गीकरण करून नैसर्गिक वर्गीकरणाचें काम स्वत:च्या अंगाबाहेर टाकिलें त्या अर्थी लिनियसपासून आधुनिक वनस्पतिशास्त्राला सुरवात झाली असें न म्हणतां सेजाल्पिनोपासून सुरू असलेल्या वनस्पतिशास्त्राच्या अवस्थेचा त्याच्याबरोबर शेवट झाला असें म्हटलें पाहिजे.

येथेपर्यंत सेजाल्पिनोपासून लिनियस अखेर जो काळ लोटला त्यांत वनस्पतिशास्त्रासंबंधी काय काय झालें याचें सामान्य विवेचन केलें असून त्याच अवधींत वैयक्तिक प्रयत्न काय झाले तें आता थोडक्यांत पहावयाचें आहे.

अँड्रे सेजाल्पिनोचा 'डी प्लँटिस लिव्रि' हा सुप्रसिद्ध ग्रंथ फ्लारेन्स शहरी १५८३ त प्रसिद्ध झाला. या प्रचंड ग्रंथाचीं पहिलीं पंधरा पुस्तकें वनस्पतींच्या वर्णनानें भरलेली आहेत. परंतु त्या ग्रंथात जें कांहीं विशेष महत्त्वाचे आहे तें म्हणजे पहिल्या पुस्तकांतील उपोद्‍घात होय. या उपोद्‍घातांत सोपपत्तिक वनस्पतिशास्त्र संपूर्ण व संगतवार लिहिलें आहे. परंतु शरीरविज्ञान, जीवक्रियाविज्ञान वगैरे हल्लींप्रमाणें वनस्पतिशास्त्राचे निरनिराळे भाग त्यांत पाडिले नसून वनस्पतींविषयीं सर्व प्रकारची माहिती एकत्र दिलेली आहे. या उपोद्‍घाताविषयीं विशेष हा आहे कीं, त्यांत सेजाल्पिनोनें पुष्कळ नवीन व सुंदर विचार प्रदर्शित केले आहेत. वनस्पतींत ज्या भागापासून फळें बनतात त्या भागांनां फार महत्त्व दिलें आहे आणि दृष्टोत्पत्तीस येणार्‍या गोष्टीवर विचार करून अनुमानें काढिलीं आहेत. जरी सेजाल्पिनोचें हें पुस्तक वाङ्मय या दृष्टीनें अत्यंत सरस वठलें आहे तरी त्यांत दिलेली अनुमानें ऍरिस्टाटलच्या पद्धतीनें काढलीं असल्यामुळें चूक आहेत.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .