प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग ४

बॅरन व्हॉन ग्लीकन रशवर्म (१७१७-१७८३) :- हा अन्स्पकच्या माग्रेव्हचा मंत्रि होता. यानें सूक्ष्मदर्शकांत यांत्रिक सुधारणा करण्याच्या कामांत बरेच परिश्रम घेतले; व सूक्ष्मदर्शकांतून पुष्कळ वस्तू तपासल्या; परंतु त्यानें शरीररचनेसंबंधानें कांहीहि केलें नाहीं. त्याचे परिश्रम वनस्पतीतील गर्भाधानासंबंधीं शोधांत व परागांत शुक्रजंतु असतो किंवा नाहीं तें पहाण्यांत झाले. यानें सूक्ष्मदर्शकानें त्वग्रंध्रें पाहिलीं. ग्र्यूनेंहि फर्नच्या पानावर त्वग्रंध्रें पाहिलीं होती; परंतु ग्लीकनला त्यांचा कांहीं तरी पुल्लिंगाशीं संबंध असावा असें वाटलें.

कास्पर फ्रेड्रिक वुल्फ :- हा बर्लिन शहरीं स. १७३३ त जन्मला. माल्फिगी आणि ग्र्यू यांच्यानंतर यानें शरीररचनाविज्ञानाकडे चांगलें लक्ष पूरवून त्याचा अभ्यास केला. परंतु त्याचा अधिक भर उपपत्ति लावण्याकडे असल्यामुळें शरीररचनाविज्ञानांत त्याच्या हातून प्रत्यक्ष असें फारसें झालें नाहीं. तरी पण त्याचा 'थिअरिआ जनरेशनीस' (१७५९) हा ग्रंथ फार महत्त्वाचा असून त्यांत पेशीजालें मूळ कशा बनतात. व वाढतात याचें चांगलें विवेचन केलें आहे. याच्या ग्रंथाचा पेशीची उपपत्ति लावण्याच्या कामांत बराचसा उपयोग झाला आहे. जोहान्से हेडविग (१७३०-९९) हा क्रोन्स्टाट (जर्मनी) या शहरीं जन्मला. याजला मॉसेसच्या शास्त्रीय अभ्यासास सुरवात केल्याचें श्रेय आहे. याच्या फंडामेंटम 'हिस्टोरिया मस्कोरम' (१७८३) व 'थिऑरिआ जनरेशनिस' या ग्रंथांतून शरीररचनाविषयक माहिती कांहीशी आहे परंतु ती डी फायब्रे व्हेजेटेब्लिस ऐट आनिमस्लिओर्टु या ग्रंथांत विशेष आहे. हेडविंगनें सुक्ष्मशरीराच्या संबंधांत ज्या आकृति दिल्या आहेत त्याजवरून त्याच्या सूक्ष्मदर्शकांतून पुष्कळच मोठें दिसत होतें. यांत शंका नाहीं. ग्लीकनची त्वग्रंध्रांचा फर्नच्या पुरूषंइंद्रियाशीं कांहीं संबंध असावा अशी जी कल्पना होती ती खोटी हें दाखविण्यासाठीं हेडविगनें सपुष्पवनस्पतींतहि त्वग्रंध्रे असतात हें सिद्ध केलें. तथापि शरीररचनाविज्ञानाच्या संबंधात हेडविगच्या हातून फारसें कांही झालें नाहीं हेडविगचें सुक्ष्मदर्शक यंत्र चांगलें असूनहि जर ही स्थिति तर पी. श्रांक मेडोल ब्रूनु, आणि सेनेबीअर यांच्या हातून शरीररचनाविज्ञानांत अति अल्प कामगिरी झाली यांत कांही नवल नाहीं.

पेशीभित्तिका मिळून बनलेल्या सांगाड्यासंबंधानें (१८००-१८४०) :- छेदशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीनें अठरावें शतक व एकोणिसाव्या शतकाचा आरंभ यांत कांहीं विशेष भेद नाहीं. कारण हेडविग आणि वुल्फ नंतर लागलीच ज्यांनीं छेदशास्त्राचा अभ्यास हातीं घेतला त्यांच्या परिश्रमापासून विशेष असें कांहीहि निष्पन्न झालें नाहीं. तथापि अठराव्या शतकाच्या आरंभापासून एका गोष्टींत मात्र पुष्कळ प्रगति झाली. ही गोष्ट म्हणजे छेदशास्त्राचा अभ्यास अनेक जणांनी सुरू करून त्यासंबंधी लिहिण्यास व टीका करण्यास व एकमेकांच्या लेखांचें परीक्षण करण्यास सुरवात केली हें होय. परंतु या पूर्वी १०-२० वर्षांनीं मात्र एखादा दुसरा ग्रथ प्रसिद्ध होत असे. या सुमारास बिस्यू मिर्बेल नांवाच्या फ्रेंच मनुष्यानें 'ट्रेट ल अँटोमिएट डी फिजिऑलॉजी व्हेजेटेबल' नांवाचा ग्रंथ १८०२ सालीं प्रसिद्ध करून छेदशास्त्रांत अनेक प्रश्न उपस्थित केले. यामुळें मोठा वादविवाद सुरू होऊन त्यामध्यें कर्ट श्रेंगल, बर्नहाडीं, ट्रेव्हिरानस लिंक आणि रूडाल्फी इत्यादि जर्मनांनीं भाग घेतला. यांपैकीं रूडाल्फी वगळून बाकी सगळे वनस्पतिशास्त्रज्ञ असल्यामुंळें छेदशास्त्रांत महत्त्वाचे कोणते व बिनमहत्त्वाचे कोणते हें त्यास कळत होतें. ही गोष्ट धाकटया मोल्डनहावरलाहि लागू पडते. मोल्डनहावरचा 'बिट्रेज' नावाचा ग्रंथ १८१२ सालीं प्रसिद्ध झाला. या ग्रंथाबरोबरच जुन्या पद्धीतीच्या छेदशास्त्राच्या अभ्यासाचा शेवट झाला. मोल्डनहार्बरच्या १८१२ तील ग्रंथानंतर छेदशास्त्रांत स. १८२८ पर्यंत कांहीं विशेष भर पडली नाहीं; पंरतु या अवधींत सूक्ष्मदर्शक यंत्रांत निरनिराळ्या सुधारण होत गेल्या. सूक्ष्मदर्शकांतून जो पदार्थ पहावयाचा तो तयार करण्याच्या पद्धतींतहि सुधारणा झाली. धाकटया मोल्डनहावरनें तर पाण्यांत वनस्पती कुजवून त्यांच्या पेशी सूक्ष्मदर्शकाखालीं निरनिराळ्या पाहिल्या. परंतु अद्यापि पदार्थ कोरडाच सूक्ष्मदर्शकाच्या खाली घालीत. रूडाल्फी आणि लिंक यांनीं १८०७ सालीं सुक्ष्मदर्शकाखालीं पदार्थ ओला राखावा असें सुचविलें होतें. परंतु वस्तर्‍यानें छेद घेणें व तो पाण्याच्या थेंबांत सूक्ष्मदर्शकाखाली पहाणें या गोष्टी मेयो आणि व्हानमोहोल यांनी प्रचारांत आणिल्या. सूक्ष्मदर्शकाखालीं पाहिलेल्या छेदानें चित्रें काढण्याची कलाहि उत्तरोत्तर सुधारत गेली; परंतु यासंबंधांत मर्बल आणि मोल्डनहावर यांजकडून एक चमत्कारिक चूक झाली. ती अशी कीं, त्यांनीं चित्रकलाभिज्ञाकडून आपण तयार केलेल्या छेदांचीं चित्रें काढविलीं. ही गोष्ट अर्थातच छेदशास्त्राच्या दृष्टीनें लाभदायक नाहीं.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी शरीररचनेविषयीं जें ज्ञान होतें त्यापेक्षां १८४० च्या सुमारास किती तरी अधिक होतें. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं ज्या गोष्टी अपूर्ण माहिती होत्या त्याच गोष्टी १८४० च्या सुमारास पूर्ण माहिती झाल्या, एवढेंच त्या दोन काळांतील अंतर असल्यामुळें १८००-१८४० पर्यंतचा शरीररचानाविज्ञानाचा इतिहास एकच प्रकाचा आहे. १८४० नंतर नागेल आणि श्लीडेन यांनीं निराळ्या दृष्टींनीं पेशीचा अभ्यास करण्यास सुरवात केलीं. यांच्यापूर्वी पेशीभित्तिकांच्या सांगाड्याच्या निरनिराळ्या आकृती, घटना व त्यांजपासून बनणारीं निरनिराळीं पेशीजालें याचें वर्गीकरण इत्यादि अभ्यासाला महत्त्व दिलें जात असे. परंतु पेशीभित्तिका ही दुय्यम महत्त्वाची असून पेशीभित्तिकेच्या आंतील पदार्थ त्याहून महत्त्वाचे आहेत असें वाटूं लागल्यामुळें १८४० नंतर त्यांजकडे शोधकांचें लक्ष लागलें. बर्नहार्डी (१७७४- १८५०) यानें स. १८०५ त बीओकटंजन अबर फ्लेंनियनगेफस नांवाचा एक लहानसा ग्रंथ प्रसिद्ध केला. यांत शरीररचनाविज्ञानासंबंधीं अनेक बरोबर व सूचक अवलोकनें आहेत. बर्नहार्डीचा हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी गॉटिंजन येथील राजाश्रयाखालील शास्त्रीय मंडळानें छेदशास्त्रावर एक निबंध मागवून त्याला बक्षिस लाविलें होतें, या बक्षिसाकरितां रूडाल्फी आणि लिंक ट्रेव्हिरानस या तिघांनीं निबंध पाठविले; पैकीं रूडाल्फ आणि लिंक यांनां पहिलें व ट्रेव्हिरानस याला दुसरें बक्षिस मिळालें. या तीनहि निबंधांतून विशेष नवीन असें कांहींच नाहीं; परंतु मिरबेलनें त्या निबंधांचें विशेषतः ट्रेव्हिरानसच्या निबंधांचें परीक्षण केलें ही गोष्ट छेदशास्त्राच्या दृष्टीनें लाभदायक झाली.

कार्ल अस्मस रूडाल्प (१७७१-१८३२) याचा जन्म स्टाकहोम शहरीं झाला. हा बर्लिन येथें अध्यापक होता. हेनरिच लिंक (१७६७-१८५१) हा बहुशास्त्रज्ञ असून ब्रेस्ला व बर्लिन या ठिकाणीं अध्यापक होता. लिंक आणि रूडोल्फी या दोघांचे निबंध वाचले असतां असें दिसून येतें कीं, त्यांचीं मतें निरनिराळीं आहेत; उदाहरणार्थ रूडाल्फीच्या मतानें गोमपज आणि शिलिंध्र हे मुळी वनस्पतीच नाहींत. याचें कारण त्यांचे पेशीतंतू आणि वनस्पतींच्या पेशी यांत त्याला कांहींहि साम्य दिसत नाहीं. परंतु लिंकच्या मतानें सर्व स्थाणु हे वनस्पति होत. म्हणून या दोघांनांहि पहिलें बक्षिस कसे मिळालें याचें आश्चर्य वाटतें.

लुडॉल्फ ख्रिश्चन ट्रेव्हिरानस हा ब्रमैन येथें १७७९ सालीं जन्मला. हा लिंकनंतर ब्रेस्ल अध्यापक होता. याच्या निबंधाची विषयव्याप्ती लिंक आणि रूडाल्फ यांच्या निबंधाच्या विषयव्याप्तीपेक्षां कमी असून भाषाहि चांगली नाहीं; तथापि त्यांत कांहीं नवीन गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मृदुजालांतील मृदुपेशींच्या मधून अवकाश म्हणजे रिकामी स्थलें असतात ही गोष्ट त्यानें स्वत: पाहून केली. त्यानें वनस्पतींच्या कांहीं जालांतील चाळणीसारखीं भोकें असणार्‍या नळपेशींचाहि उल्लेख केलेला आढळून येतो. मासीस्च्या बोंडावर त्वग्रंध्रें असतात हा शोधहि त्यानेंच लाविला.

मिरबेलनें गॉटिंजेनच्या बक्षिसाकरितां आलेल्या तिन्ही निबंधांचें परीक्षण करून त्यांत ट्रेव्हिरानसचा निबंध चांगला ठरविला व त्याला आपल्यांत व त्याच्यांत जो कांहीं मतभेद होता त्यासंबंधांत एक पत्र लिहिलें. यावर एक निबंध लिहून ट्रेव्हिरानसनें मिरबेलला उत्तर दिलें. या निबंधांत त्यानें मिरबेल, लिंक आणि स्वत:चीं मतें यासंबंधीं ऊहापोह केला.

मिरबेल आणि त्याचे ट्रेव्हिरानसआदिकरून जर्मन प्रतिवादी यांची शरीररचनाविज्ञानासंबंधांत माल्फिगी, ग्र्यू, हेडविग, वुल्फ इत्यादिंच्या ज्या कल्पना होत्या त्यांपुढें प्रगति झाली नाहीं. तरी हें कबूल केलें कीं, ट्रेव्हिरानसनें शरीरविज्ञानांत अशा तर्‍हेचें निरीक्षण केलें कीं, त्यामुळें त्यांत नवीन कल्पनांचा शिरकाव होण्यास साहाय्य झालें. परंतु या सुमारास ज्यानें शरीररचनाविज्ञानांत सर्वांत आघाडी मारिली होती. ती जॉन जाकोब पॉल मोल्डनहावर (१७६६-१८२७)हा होय. हा कील येथें वनस्पतिशास्त्राचा अध्यापक होता त्यानें १८२२ साली किती आघाडी गांठिली होती हें त्याच्या 'बिट्रेज गर अं'टोनि डर फ्लाँजन' या ग्रंथावरून दिसून येतें. मोल्डेनहावरची छेदशास्त्रविषयाचा अभ्यास करण्याची पद्धति आणि त्याच्या आकृति यांजवर मोहोलची छाया दिसून येते; परंतु यासंबंधांत हें म्हणणें अधिक संयुक्तिक दिसेल कीं मोल्डेनहावरची मोहोलच्या अभ्यासपद्धतीवर छाया पडलेली दिसून येते; कारण मोहोलला मोल्डेनहावरबद्दल मोठा आदर वाटत असून छेदशास्त्रांत शोध करण्याची पद्धति त्यानें मोल्डेनहावरपासून घेतली. इ.स. १८१२-३० पर्यंत मिरबेल स्कले, लिंक आणि टर्‍हिन इत्यादींकडून जे शरीररचनाविज्ञानावर ग्रंथ झाले त्यांजविषयीं, त्यांत नवीन कांहीहि नसल्यानें, लिहिण्याचें कारण नाहीं. मेयो आणि व्हान मोल्ड यांच्या शारीररचनाविज्ञानावरील परिश्रमास १८३० पासून सुरवात झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. दहा वर्षांत या दोघांच्या हातून त्यासंबंधांत इतकें कार्य झालें कीं, त्या विषयावर ते अधिकारी झाले. तथापि त्या दोघांची तुलना केली असतां असें दिसून येईल कीं, मेयोचें महत्त्व शरीररचनाविज्ञानाच्या संबंधांत केवळ ऐतिहासिक आहे. परंतु व्हान मोल्डचे शोध मात्र आधुनिक शारीररचनाविज्ञानाचा उगम आहेत. याशिवाय मेयोच्या मृत्यू मुळें १८४० त त्याच्या परिश्रमाची समाप्ति झाली; परंतु मोहल मात्र पुढें तीस वर्षे शोध करीत राहिला.

फ्रेनी मेयो(१८०४-१८४०) हा टिलसिट शहरी जन्मला. हा वैद्यकीचा धंदा करीत असे. यानें व्हॉन हम्बोल्डच्या सांगण्यावरून पृथ्वीभोंवतीं जलपर्यटन करून पुष्कळ वनस्पती गोळा केल्या. त्यानें थोड्या अवधीत वनस्पती शास्त्रविषयक इतके ग्रंथ लिहून काढले कीं, त्या गोष्टीचा अचंबा वाटतो. ह्युगो मोहाल (१८०५-१८७२) हा टुबिंजेन येथें पुष्कळ वर्षेपर्यंत वनस्पतिशास्त्राचा अध्यापक होता. याची लेखनाकडे फारशी प्रवृत्ति नसून शोध लावण्याकडे मात्र ती पूर्ण होती. त्याचप्रमाणें भ्रामक तात्त्विक चर्चा करण्याचा यास कंटाळा असून जें काम डोळ्यांनां दिसलें त्याजवरच अवलंबून रहाण्याचा याचा स्वभाव होता. अशा प्रकारचा त्याच्या गुणामुळें छेदशास्त्राच्या संबंधांत त्याच्या हातून महत्त्वाचे कार्य झालें. त्यानें पेशींच्या 'सेल्युलोज'च्या सांगाड्याचा पूर्ण अभ्यास करून नागेलीनें पुढें अंगिकारलेल्या (पेशीच्या) वर्धनेतिहासाच्या पायाची स्थापना केली.

पेशींचा अधिक शोध (१८४०-६०):- इ.स. १८३०-१८४० या अवधींत सर्वांनां हें समजून चुकलें होतें कीं. पेशी कशा बनतात. या संबंधांतील वुल्फ, स्प्रेंगल आणि मिरबेल यांच्या कल्पना केवळ ठोक असून त्यांचा पाया चांगल्या प्रकारच्या अवलोकनावर उभारलेला नव्हता. याच अवधींत मिरबेल व विशेषत: फाँ मोहोल यांनीं पेशीरज कसे बनतात तें पाहिलें. परंतु सर्वसाधारण पेशी कशा बनतात हें कांही त्यांनीं पाहिलें नव्हतें म्हणून त्यांनीं पेशीच्या बनण्याच्या संबंधांत सामान्य सिद्धांत न काढतां, पेशीरज बनणें हा पेशी बनण्याचा एक विशिष्ट प्रकार आहे अशा प्रकारचें सावधगिरीचें विधान केलें होते. श्लीडनचें वर्तन मात्र यांसबंधांत निराळें होतें. स. १३३८ त त्यानें सपुष्पवनस्पतींच्या गर्भपेशींतील पेशी बनण्याची स्वंतत्र पद्धति पाहिली आणि तींवरून त्यानें सर्व पेशी बनण्याच्या संबंधांत एक सामान्य सिद्धांत ठोकून दिला. त्यानें त्या संबंधांत ठाम मत दिल्यामुळें व त्यावेळी तो फार प्रसिद्ध असल्यामुळें व्हॉन मोल्ड सारख्यानींसुद्धा त्याचा सिद्धांत कांहीसा मान्य केला परंतु श्लीडननें उपस्थित केलेला प्रश्न असा होता कीं, त्या संबंधांत कल्पना करण्याचें कारण नसून पुष्कळ मोठें दिसणार्‍या सूक्ष्मदर्शकाच्या योगानें पाहूनच तो सोडवितां येण्याजोगा होता. अंगर (१८००-१८७१) नें वनस्पतींच्या वाढणार्‍या टोंकांतील पेशींचें (अग्रपेशींचें) याप्रमाणें परीक्षण करून श्लीडनचा सिद्धांत निदान तात्पुरता तरी खरा नाही हें दाखविलें आणि अंगरला त्यासंबंधांत इंग्रज वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्फ्रे याजकडून पाठिंबा मिळाला. परंतु हा प्रश्न सोडविण्याच्या संबंधांत नागेलीनें तत्परतेने व बुद्धिपुर:सर परिश्रम घेतलें. त्यानें श्लीडनचा पेशी बनण्याच्या संबंधांतील सिद्धांत खरा आहे असेंच धरून चालून वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीच्या संबंधांतील इंद्रियांत त्याचप्रमाणें नीच गूढलग्नवनस्पतींत आणि वनस्पतींच्या वाढणार्‍या भागांत पेशी कशा बनतात हें अत्यंत परिश्रम करून प्रत्यक्ष पाहिलें त्या सर्वावरून त्याची खात्री झाली कीं, श्लीडचा सिद्धांत चुकीचा होय. यानंतर त्यानें स्वत: त्या संबंधांत एका सिद्धांताची रूपरेषा तयार केली आणि पेशी कशा बनतात यासंबंधांतील आधुनिक सिद्धांत हा या रूपरेषेचेंच फल आहे. नागेलीनें पेशी बनण्याच्या आधुनिक सिद्धांताची जी रूपरेषा आखिली तींत त्याला जसा स्वत: केलेल्या वर सांगितलेल्या शोधाचा उपयोग झाला तसा अलेक्झांडर ब्रॉनच्या शैवालांच्या पेशीनिरीक्षणाचा व हाफमीस्टरच्या गर्भावस्थाविज्ञानांतील शोधांचाहि उपयोग झाला. नागेलीनें पेशी बनण्याच्या संबंधांत स. १८४६ त असें उघड जाहीर केलें कीं, जरी पेशी बनण्याच्या निरनिराळ्या पद्धतींत दुय्यम भेद असले तरी या सर्व पद्धतीचें सामान्य स्वरूप एकच असतें. हीच गोष्ट प्राण्यांच्या पेशी बनण्याच्या संबंधांतहि त्याच सुमारास कळून आली असून, प्राण्यांच्या व वनस्पतींच्या पेशी बनण्याच्या प्रकारांत साम्य असावें अशी अटकळ स्कौन आणि कॉलीकर यांनीं १८४५ सालीं बाधिली होती.

वरीलप्रमाणें पेशींच्या पुनरूपत्पत्तीच्या संबंधांत शोध करणार्‍या चें लक्ष पेशींच्या आंतील पदार्थाकडे जाणें केवळ अपरिहार्य होतें. यामुळें स. १८४० च्या पूर्वी पेशीतील निरनिराळ्या प्रकारचे कण, स्फटिक आणि गोंद इत्यादि पदार्थ शास्त्रज्ञांनीं पाहिले होते; आणि श्लीडन आणि मेयी यांनी पेशीरसाच्या हालचालीचा (चलनांचा) विशेष अभ्यास केला होता. परंतु स. १८४०-५० या अवधींतील वर्धनेतिहासाविषयक शोंधांतील निरीक्षणामुळें प्रथमत: शास्त्रज्ञांच्या नवीन पेशी बनण्याच्या संबंधांत सतत आणि नियमित भाग घेणार्‍या , रॉबर्ट ब्राउननें शोधून काढलेल्या केंद्राभोंवतीं असणार्‍या , पेशींच्या वाढींत महत्त्वाचा बदल पावणार्‍या , ज्याचें अस्तित्व नाहींसें झाल्यामुळें पेशींचा निर्जीव सांगाडा मात्र मागें शिल्लक रहातो अशा एका पदार्थाकडे- हल्लीं ज्याला जीवतत्त्व म्हणतात. त्याकडे-लक्ष गेलें. हें जीवतत्त्व -ज्याचा पेशीच्या आयुष्क्रमाशीं पेशीभित्तिकेपेक्षां अधिक निकट व प्रत्यक्ष संबंध आहे-श्लीडननें १८३८ सालीं पाहिलें होतें. परंतु याला तें गोंद वाटलें. जीवतत्त्वाचा नागेलीनें १८४२-४६ सालीं काळजीपूर्वक अभ्यास केला त्यावरून त्याला तो नत्रविशेष पदार्थ असावा असें वाटलें. व्हान मोलनें जीवतत्त्वाचें १८४४ सालीं आणि १८४६ सालीं निराळ्या दृष्टीनें वर्णन करून त्याला प्रोटोप्लॅझम (आदिजात) हें नांव दिलें गेलें (आणि अद्याप तेंच उपयोगांत आहे). त्याचप्रमाणें १०० वर्षांपूर्वी कॉर्टीनें शोधून काढिलेलें व पुन्हां १८११ त ट्रेव्हिरानसनें पाहिलेलें पेशीतील प्रदक्षिणेसारखें व आवर्तनासारखें चलन हें पेशीरसाच्या हालचालीमुळें नसून जीवतत्त्वाच्या हालचालीमुळें असतें हेंहि त्यानें दाखविलें. जीवतत्त्वांच्या अभ्यासाच्या कामीं शैवाल वनस्पतींचा फार उपयोग झाला. अलेक्झांडर ब्रॉन, थुरेट, नागेली, प्रिंगशीम, आणि डी बारी यांनीं पुंजरेणूंचें अवलोकन करून हें दाखविलें कीं, जीवतत्त्वाचें सजीवत्व पेशीभित्तिकेवर अवलंबून नसून तें स्वयंप्रेरणेनें आपली आकृति बदलूं शकते. १८५५ त अंगरनें आपल्या 'लेर्‍हबर्च' या ग्रंथांत हें जीवनतत्त्व अगदीं क्षुद्र प्राणी ज्या सजीव पदार्थाचे बनलेले असतात, त्या पदार्थासारखें असतें हें दाखवून दिलें. या दोन पदार्थांतील साम्य डी बारीच्या मिक्सॉनिकेटसच्या अभ्यासामुळे १८५५ त अधिक दृष्टोत्पत्तीस आलें; कारण डी बारीनें सिद्ध केलें कीं, मिक्सॉमिकेटसचा देह ज्या पदार्थाचा बनलेला असतो तो पदार्थ पेशीभित्तिकेशिवाय व पुष्कळ काळपर्यंत राहून नंतर त्याच्या भोंवतीं पेशीभित्तिका निर्माण होते. यानंतर प्राणिछेदकांचेंहि या वनस्पतिशास्त्रांतील शोधाकडे लक्ष जाऊन ब्रुक, मॅक्सशुल्झ आणि कूहून यांनी वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या जवितत्त्वाचा अभ्यास केला. यामुळें १८६०-७० या अवधींत शास्त्रज्ञांची अशी खात्री होत गेली कीं, जीवतत्त्व हें प्राणी आणि वनस्पती या दोघांनांहि समानआद्दतत्त्व आहे. वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या समान आद्यतत्त्वाचा हा शोध आधुनिक सृष्टिशास्त्रांतील नि:संशय अत्यंत महत्त्वाचा होय.

पेशींतील सेंद्रिय पदार्थांच्या अभ्यासामुळें आणखीहि महत्त्वाचे शोध लागले. उदाहरणार्थ, पेशींतील हरित्द्रव्यकण (ज्यापासून वनस्पतींच्या पोषणाच्या कार्यांत मदत होते ते) जीवतत्त्वापासूनच बनतात. पिष्टाचे कण यापूर्वी अनेकांकडून व विशेषत: पंयानकडून (१७९५-१८७१- हा पॅरिस येथें औद्योगिक रसायनशास्त्राचा अध्यापक होता) तपासले गेले होते; परंतु आतां त्यांचा नागेलीनें चिकाटीनें अभ्यास करून त्यासंबंधांत महत्तवाचीं शास्त्रीय अनुमानें काढिलीं. हीं १८५८ त डाय स्टार्केकॉर्नर या नांवाच्या एका सविस्तर ग्रंथांत प्रसिद्ध झाली. या अनुमानांचें महत्त्व छेदशास्त्रापुरतेंच नसून तें एकंदर सेंद्रिय पदार्थांच्या ज्ञानाच्या संबंधांतहि आहे. यापूर्वी अज्ञात अशा पद्धतीनें सूक्ष्मदर्शकाचा शोधाच्या कामीं उपयोग करून नागेलीनें पिष्टकणांनी रचना कशी असते व त्यांच्या जुन्या अणूंमधील अवकाशांत नवीन अणूंचा शिरकाव होऊन ते कसे वाढतात याविषयीं विशद कल्पना काढिली. या कल्पनेचें महत्त्व असें आहे कीं, तिच्यामुळें पेशीभित्तिकेची वाढ कशी होते, सेंद्रिय पदार्थांची रचना कशी असते व तिच्यांत कसा बदल होतो, व ध्रुवीभूत 'पोलराइज्ड' प्रकाशांत सेंद्रिय पदार्थ कोणते चमत्कार दाखवितात या सर्व गोष्टी समजून येतात. याप्रमाणें नागेलीचा अण्वीय हा सिद्धांत जीवकोटींतील चमत्काराच्या विवरणाच्या कामीं प्रेरणापदार्थविज्ञानांतील तत्त्वें लावण्याचा प्रथम यशस्वी प्रयत्न होता.

नागेलीसारखे उच्च मनोशक्तीचे शोधक जरी वर सांगितलेल्या प्रकारचे कठिण प्रश्न सोडविण्यांत गुंतले होते तरी त्यांच्याकडून जालांच्या (१८४० नंतर) अभ्यासाची हयगय झाली नाहीं. पेशीजालांच्या अभ्यासासहि नागेलीनेंच प्रोत्साहन देऊन पुढील प्रगतीची दिशा दाखविली. श्लीडेन आणि नागेली हे दोघे मिळून एक नियतकालिक काढीत होते; त्यांत १८४४-४६ च्या दरम्यान नागेलीनें प्रधान पेशीजालांपासून बनणार्‍या जलवाहीपेशीजालांस आरंभ कसा होतो याविषयीं स्वत: केलेल्या शोधाची माहिती दिली होती. अग्रपेशीपासून गूढलग्नवनस्पतींत सर्व जालें कशीं निर्माण होतात हें नागेलीनें पाहिलें आणि हाच अभ्यास हाफमीस्टरनेंहि चालू ठेविल्यामुळें त्याविषयीं पुष्कळ वाङ्मय झालें. शारीरविज्ञान आणि वर्गीकरण हीं सुधारण्यास आणि पेशीजालें बनण्याच्या संबंधांत सिद्धांत निघण्यास या वाङ्मयाचा फार उपयोग झाला.

वनस्पतींची सामान्य आणि सूक्ष्म शरीररचना पाहून तिजपासून शरीररचनाविज्ञानांत इंद्रियांच्या रूपसाम्याविषयीं काय अनुमानें काढावयाचीं हे हाफमीस्टर, नागेली, हॅन्स्टेन सॅनिओ इत्यादिंच्या प्रधानपेशीजालांपासून रसवाहीपेशीजालें बनण्याच्या संबंधांतील शोधामुळें आतां शक्य झालें. काष्ठमय वनस्पतींच्या खोडांचा घेर कसा वाढतो हा जीवक्रियाविज्ञानांतील महत्त्वाचा प्रश्न आहे; हा प्रश्न सोडविणें, रसवाही जालांचे पुंज कसे बनतात हें ठाऊक झाल्यामुळें व रसवाही जालांच्या पुंजांचा काष्ठत्वक्जनकपेशीजालांशीं काय संबंध असतो हें उघडीस आल्यामुळें सुलभ झालें. हॅनस्टेन व नागेली यांनीं हा प्रश्न १८६० च्या पूर्वी व सॅनिओ यानें १८६० नंतर मिळून बव्हंशी सोडविला.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .